नोकर भरतीचा महापूर; इतक्या लोकांना मिळाला रोजगार!

Increase in Recruitment After Lockdown

Many People in Our Country has lost their jobs Due to Corona lockdown. But there is a good news for those people who was Unemployed, Recruitment in all the sectors started once again after the exemption in the lockdown rule. According to the report, jobspeak index rose to 1,208 in June. It was 910 in May. This is an increase of 33 per cent over May and 44 per cent drop from June last year. Jobspeak is a one-month index based on job listings in Naukari.com. After the announcement of Unlock 1, recruitment in the country started again rapidly. Despite a 44 per cent drop in recruitment this year compared to June last year, IT, BPO, ITES and FMCG as well as the accounting sector saw higher recruitment this year than last June said by Pawan Goyal, Chief business officer of Naukari.com.

Large Number of Jobs and bharti –करोना लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेक ठिकाणी नोकर कपातीच्या बातम्या येत होत्या. आता देशात पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याच बरोबर नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नोकर भरतीची मध्ये ३३ टक्के इतकी वाढ झाली आहे.
जॉबस्पीक इंडेक्स जूनमध्ये १ हजार २०८ इतकावर गेला. तो मे महिन्यात ९१० होता. मे महिन्याच्या तुलनेत ३३ टक्के वाढ झाली आहे. अर्थात गेल्या वर्षाच्या जून महिन्याशी तुलना करता यात ४४ टक्के इतकी घट आहे. नोकरी जॉबस्पीक एका महिन्याचा इंडेक्स आहे जो नोकरी डॉट कॉम मधील जॉब लिस्टिंगच्या आधारे तयार केला जातो.
नोकरी डॉट कॉमचे मुख्य बिझनेस ऑफिसर पवन गोयल म्हणाले, ही गोष्टी खुप उत्साहजनक होती. अनलॉक १च्या घोषणेनंतर देशात नोकर भरती पुन्हा वेगाने सुरू झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या नोकर भरतीपेक्षा यावर्षीचे प्रमाण ४४ टक्क्यांनी कमी झाले असले तरी आयटी, बीपीओ, आयटीईएस आणि एफएमसीजी तसेच अकाऊंटिंग सेक्टरमध्ये या वर्षी गेल्या जून पेक्षा अधिक भरती झाली आहे.
पुढील काही महिन्यात पुन्हा परिस्थिती सामान्य होईल अशी आशा आहे. शिक्षण क्षेत्रात ४९ टक्के, फार्मा आणि बायोटेक सेक्टरमध्ये ३६ टक्के आणि सेल्स, बिझनेस सेक्टरमध्ये मासिक आधारावर ३३ टक्के वाढ झाली आहे. सर्व सेक्टरमध्ये अनुभवी लोकांच्या भरतीत २८ टक्के वाढ झाली आहे.

2 thoughts on “नोकर भरतीचा महापूर; इतक्या लोकांना मिळाला रोजगार!”

Leave a Comment