Larsen & Toubro Bharti 2021

Larsen & Toubro Recruitment 2021

These jobs are for women who want to pursue a career after a break. Larsen & Toubro, a leading engineering company, has announced that it will soon be offering jobs to women. Renew: L&T to offer jobs to women under Career Re-Entry for Women. Interested candidates may apply online through the given link.

इंजिनिअरिंग कंपनी L&T महिलांना देणार नोकरीची संधी

इंजिनिअरिंग क्षेत्रातील नामांकित कंपनी लार्सन अँड टुब्रो  नं लवकरच महिलांना नोकरी देणार असल्याची घोषणा केली आहे. रिन्यू: करिअर री-एंट्री फॉर वुमन’ कार्यक्रमांतर्गत L&T महिलांना नोकरी देणार आहे. ज्या महिला करिअर  ब्रेकवर आहेत अशा महिलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. तसंच ज्या महिलांना ब्रेकनंतर Career करण्याची इच्छा आहे अशा महिलांना हे जॉब मिळणार आहेत. यासंबंधीचं वृत्त लाईव्ह मिंट’ नं दिल आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलच्या डिटेल्स.

RENEW हा एक उपक्रम आहे जो L&T च्या वैविध्य आणि सर्वांसाठी समान करिअर संधींवरील दृढ विश्वासातून निर्माण झाला आहे. हे एक व्यासपीठ प्रदान करण्याचा उद्देश आहे ज्याद्वारे करिअर ब्रेकनंतर महिला व्यावसायिक कॉर्पोरेट जगतात पुन्हा प्रवेश करू शकतात आणि पुढे करिअर घडवू शकतात.

L&T अतुलनीय नेतृत्व संधी आणि प्रमोशन प्रदान करते. आमचा दृष्टीकोन कर्मचार्‍यांना आव्हानात्मक असाइनमेंट स्वीकारण्यासाठी आणि त्यांची क्षमता जाणून घेण्यासाठी सक्षम बनवण्यावर आधारित आहे असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Eligibility Criteria For L & T Career

 • BE / BTech / MBA / LLB (First Class) किंवा CA, ICWA पर्यंत शिक्षण पूर्ण असलेल्या महिला या पदभरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत.
 • Audit, Finance / Accounting, Engineering – Design, Project Management, Information Technology, Human Resource Management, Legal, CSR.या विभागांमध्ये महिलांना नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

अशा पद्धतीनं होईल निवड- Selection Process 

 • इच्छुक उमेदवारांनी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर नोंदणी करायची आहे आणि त्यांच्या Resume ची प्रत जोडायची आहे.
 • यानंतर सर्व बायोडेटा हे उमेदवारांच्या शिक्षणानुसार आणि विभागानुसार तपासले जातील आणि यातून काही उमेदवारांची निवड करण्यात येईल.
 • ज्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे अशा उमेदवारांची टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल.
 • यानंतर टेलिफोनिक मुलाखतीत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची पर्सनल मुलाखत होणार आहे. Hiring Managerआणि Department Head यांच्याकडून ही मुलखात घेतली जाणार आहे.

या लिंक व्दारे अर्ज कराL&T, has the highest attrition rate this year. So now the company has announced to employ 5500 freshers this financial year. Recognizing the growing demand in the market, this company is expediting the recruitment process. Therefore, this recruitment is more than the previous target of 1000. Read More details as given below.

L & T कंपनी करणार 5 हजारांहून जणांची भरती

लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (LTI NSE -3.30 %) आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ५,५०० फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहे. या कंपनीतर्फे मार्केटमधील वाढती मागणी ओळखून वेगाने भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे ही भरती आधीच्या टार्गेटपेक्षा १ हजारहून अधिक आहे.

 • ईएसजी आणि सायबरसुरक्षा सारख्या नवीन क्षेत्रांतील व्यापक मागणी पाहता LTI नवीन नोकर्‍या देत आहे. यासाठी एलटीआयला नॉन-टेक हायरिंग, इन-हाऊस टॅलेंटचे अपस्किलिंग आणि इतर अनेक उद्योगांद्वारे एक मोठा टॅलेंट ब्रीज तयार करायचा असल्याचे LTIचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापन दिग्दर्शक संजय जलोना म्हणाले.
 • मिड-टियर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फर्मने सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ५० दशलक्ष कमाईसह एक ग्राहक, त्याच्या २० दशलक्ष डॉलर्सच्या श्रेणीमध्ये तीन ग्राहकक आणि १० दशलक्ष डॉलर्सच्या यादीत पाच ग्राहक जोडले आहेत. दरम्यान ‘आम्ही ४५०० फ्रेशर्स भरण्याची घोषणा पहिल्या तिमाहीत केली होती त्यामध्ये आता १ हजार अधिक फ्रेशर्स भरणार असल्याचे’ जलोना म्हणाले.
 • दुसऱ्या तिमाहीत कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण (attrition rate) १५.२ टक्क्यांवरून १९.६ टक्के इतका वाढला होता. तरीही दुसऱ्या तिमाहीत LTI कर्मचाऱ्यांची संख्या ४ हजारपासून ४२ हजार ३८२ कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचली असेही ते म्हणाले. जगभरात कर्मचाऱ्यांकडून अधिक राजीनामे आणि क्षोभ पाहायला मिळत आहे. हे आणखी तीन वर्षे असेल सुरु राहील असे जलोना पुढे म्हणाले.
 • मागील आर्थिक वर्षात जेव्हा इतर कंपन्यांची भरती प्रक्रिया मंदावली होती तेव्हा देखील एलटीआयमध्ये कर्मचाऱ्यांची भरती सुरु होती. २०२१ या आर्थिक वर्षात एलटीआयमध्ये ९.५ टक्के इतकी कर्मचाऱ्यांची वाढ झाली. तरी देखील एलटीआय कंपनीने भरती सुरुच ठेवली होती असेही ते म्हणाले. स्पर्धेत राहण्यासाठी मोठी भूमिका बजावू शकणाऱ्या लोकांसाठी एक रोमांचक कार्यस्थळ निर्माण करायचे आहे.अशा प्रकारची प्रतिभा निर्माण करण्यासाठी काही वर्षे लागतील परंतु त्यादरम्यान आम्ही आमच्याकडील प्रतिभेचा पूर्ण वापर करु असेही म्हणाले.
 • एलटीआयकडे प्रतिभा सुधारण्यासाठी काही लीव्हर्स आहेत. जे फ्रेशर्सची नियुक्ती करतात. तसेच कंपनीतील सध्याच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देखील देत आहे. ‘नॉन टेक्निकल कर्मचाऱ्यांना नियुक्त करून सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात (for technical roles) कसे ठेवू शकतो याचे मूल्यमापन करत असल्याचे ते म्हणाले

Larsen & Toubro Job Fair

Great opportunity of training and employment by Larsen & Toubro Company Panvel to the candidates who have passed ITI. Molacha Odha at Satara on Thursday. On 28th October 2021, Larsen & Toubro Company, Panvel has organized a recruitment fair for training and employment.

लार्सन अँड टुब्रो कंपनी तर्फे प्रशिक्षण व रोजगार भरती मेळावा

ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षणाची व रोजगाराची उत्तम संधी. मोळाचा ओढा सातारा येथे गुरुवार दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षण व रोजगारासाठीचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 18 वर्ष पूर्ण असलेले आयटीआय वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन , सुतारकाम इ. पास-नापास किंवा 5 वी पास किंवा शिक्षण पूर्ण न झालेले बेरोजगार युवकांसाठी मोफत प्रशिक्षणाची लार्सन अँड टुब्रोच्या कन्स्ट्रक्शन स्किल इंन्स्टिट्यूट पनवेल येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.

 18 वर्ष पूर्ण असलेले आयटीआय वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, सुतारकाम इ. पास-नापास किंवा 5 वी पास किंवा शिक्षण पूर्ण न झालेले बेरोजगार युवकांसाठी मोफत प्रशिक्षणाची लार्सन अँड टुब्रोच्या कन्स्ट्रक्शन स्किल इंन्स्टिट्यूट पनवेल येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. बांधकामाशी संबंधित इलेक्ट्रिकल, वायरमन वेल्डिंग, सुतारकाम, गवंडी, बारबेंडिन्स व स्टील कामविषयक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  

Larsen & Toubro Company Panvel Bharti 2021

 • बांधकामाशी संबंधित इलेक्ट्रिकल, वायरमन वेल्डिंग, सुतारकाम, गवंडी, बारबेंडिन्स व स्टील कामविषयक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 • प्रशिक्षण दरम्यान राहण्याची, जेवणाची, प्रवासभाडेची सोय कंपनी मार्फत मोफत केली जाणार आहे.
 • उमेदवारांना गणवेश, सेफ्टीबुट, सुरक्षा साधने दिली जाणार आहेत.
 • प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर यशस्वी उमेदवारास प्रमाणपत्र दिले जाणार असून कंपनी मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, विजबिल, आधारकार्ड, फोटो व बँक पासबूक च्या तीन प्रतीसह दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय आय. टी. आय . मोळाचा ओढा सातारा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य एस. एम. धुमाळ यांनी केले आहे. अधिक माहिती साठी मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय आय.टी.आय. मोळाचा ओढा सातारा येथे संपर्क साधावा.


Larsen & Toubro Infotech Bharti 2021

L & T इन्फोटेक करणार ४ हजारांहून जणांची भरती 

Corona has hit many large companies financially. However, some companies are thriving. Some companies in the IT sector have also benefited greatly during the Corona period. However, some companies have higher attrition rates. One of these companies, L&T, has the highest attrition rate this year. So now the company has announced to employ 4500 freshers this financial year

कोरोनामुळे अनेक मोठ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. तर काही कंपन्या मात्र जोमात आहे. IT क्षेत्रातील काही कंपन्यांना कोरोनाकाळातही मोठा फायदा झाला आहे. मात्र काही कंपन्यांचा ऍट्रिशन रेट अधिक आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे L & T कंपनीचा यावर्षीचा ऍट्रिशन रेट म्हणजेच कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचा रेट सर्वाधिक आहे. त्यामुळे आता कंपनीनं या आर्थिक वर्षात तब्बल 4500 फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

गेल्या वर्षी कंपनीनं नवीन 3000 फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली होती. मात्र यावर्षी तब्बल 4500 फ्रेशर्सना नोकरी देण्यात येणार आहे अशी घोषणा कंपनीच्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी तरुण आणि टॅलेंटेड फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. गेल्या पाच वर्षांत L & T ची कमाई डॉलरच्या तुलनेत वार्षिक दरानं 13.5 टक्के वाढली आहे तर या कालावधीत नेट इनकम दुप्पट झालं आहे.

क्लाउड आणि इतर महत्त्वाच्या विषयांबाबतच ज्ञान असणाऱ्या उमेदवारांवर कंपनीचं लक्ष असणार आहे. अशा उमेदवारांनाच कंपनी नोकरीची संधी देणार आहे. कारण ही काळाची गरज आहे असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात L & T सारखी मोठी कंपनी फ्रेशर्सना दिलासा देणार आहे याबाबत शंका नाही.

3 thoughts on “Larsen & Toubro Bharti 2021”

Leave a Comment