Maha Jobs 1600+ Companies Registered

Maha Jobs 1600+ Companies Registered –

टाळेबंदीनंतर कंपन्यांना आवश्यक कुशल, अर्ध-कुशल व अकुशल मनुष्यबळाची भासत असलेली कमतरता लक्षात आल्यानंतर एमआयडीसी आणि राज्याच्या उद्योग विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाजॉब्स’ संकेतस्थळाला दमदार प्रतिसाद दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ जुलैला उद्घाटन केलेल्या या संकेतस्थळावर मनुष्यबळ हवे असलेल्या १,६६७ कंपन्यांनी आठवडाभराच्या कालावधीत नोंदणी केली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्धता आणि कंपन्यांना समर्पक मनुष्यबळ अशा दुहेरी हेतून तयार करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर रोजगारइच्छुक २,१६,८०७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी दिली. मात्र नोकरी मिळविण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक तपशील, कामाचा अनुभव, कौशल्याबाबतचा तपशील आणि अधिवास प्रमाणपत्र अशी संपूर्ण माहिती नोंदवावी, असे अनबलगन यांनी आवाहन केले आहे.

महाजॉब्स वर अर्ज कसा करायचा जाणून घ्या, येथे क्लिक करा

10 thoughts on “Maha Jobs 1600+ Companies Registered”

Leave a Comment