Maha Staff Nurse Recruitment 2022

Maha Staff Nurse Recruitment 2022

Maha Staff Nurse Recruitment 2022: The government has agreed to fill 4445 posts through external sources (contract). On 13th April, the government issued a circular approving the recruitment of 4445 posts in government medical and ayurveda colleges and affiliated hospitals through external sources. The medical education department has sent a letter to the medical education commissioner on April 13 informing him to take action in this regard. Thereafter, the Directorate of Medical Education and Research has instructed to fill the vacancies in all the government medical colleges and hospitals in the state through external system.

Other Important Recruitment

महाराष्ट्र तलाठी भरती 2022 : पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार
राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच- मे महिन्यात CET
मेगा भरती – एप्रिलनंतर राज्यात 50 हजार पदांची मेगाभरती
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा
महाराष्ट्र वनविभागात 2762 पदांची मेगा भरती
महाराष्ट्र वीज कंपन्यात २७ हजार पदे रिक्त
मेगा भरती नवीन अपडेट्स -येथे पहा
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – देशभरात पोलिसांची तब्बल 5 लाख 30 हजार पदे रिक्त
पोलीस भरती -राज्यात ७ हजार पदांची भरती लवकरच होणार

Maha Staff Nurse Recruitment 2022 details

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी सलग्न रुग्णालयांमधील ४ हजार ४४५ रिक्त जागांवर बाह्ययंत्रणेमार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात परिचारिकांसह ४० हून अधिक पदांचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व दंत महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांतील रिक्त पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आधिपत्याखालील तसेच आयुष्य संचालनालयाच्या आधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमधील वर्ग तीन व वर्ग चार या संवर्गातील रिक्त पदे नियमितरीत्या भरेपर्यंत बाह्ययंत्रणेमार्फत सेवा उपलब्ध करून घेण्यास परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
  • सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने त्यास मान्यता दिली. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमधील ४ हजार ४४५ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • वैद्यकीय शिक्षण विभागाने १३ एप्रिल रोजी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना तसे पत्र पाठवून त्यासंबंधीची कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधील रिक्त पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्याच्या सूचना दिल्या आहे.
  • कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांमध्ये परिचारिका, आहारतज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, एमआयआर तंत्रज्ञ, औषधनिर्माता, क्ष किरण तंत्रज्ञ व साहाय्यक, ग्रंथपाल, डायलेसिस तंत्रज्ञ आदी पदांचा समावेश आहे.

 

1 thought on “Maha Staff Nurse Recruitment 2022”

Leave a Comment