Maha TAIT Exam Results
Maha TAIT Exam Results: The result of ‘Teacher Aptitude and Intelligence Test 2022’ (TET) which was conducted for the recruitment of teachers through the computerized system of Pavitra in all the local bodies and private management schools of the state has been announced. Applicants who applied for these posts may check their exam results from the given link.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ (टेट) या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने टेट परीक्षा घेण्यात आली. राज्य परीक्षा परिषदेने दोन लाख १६ हजार ४८३ उमेदवारांचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर होणार, याबाबत राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर आदल्या दिवशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत होते.
मात्र, संध्याकाळ झाली तरीही निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार काहीसे हताश झाले होते. दरम्यान परीक्षा परिषदेने शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास निकाल जाहीर केला. या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांची गुण यादी परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
TAIT 2022 Results & Eligible Candidates Lists
- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल पास विद्यार्थ्यांची यादी
- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 1
- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 2
- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 3
- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 4
- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 5
- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 6
Aptitude and intelligence test will be conducted by the state examination council for teacher recruitment process through sacred system in the state. 2 lakh 40 thousand candidates have registered for this exam. The posts of teachers are largely vacant in the state. Therefore, the candidates from all over the state were demanding to implement the teacher recruitment process
Maha TAIT 2023 राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ४० हजार उमेदवारांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.
राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनातील विविध विभागातील रिक्त पदांवर मेगा भरतीची घोषणा करण्यात आली. त्यात शिक्षकांच्या पदांचाही समावेश आहे. शिक्षकांच्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिंमापन चाचणी घेतली जाणार आहे. २०१७मध्ये झालेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीनंतर गेल्या पाच वर्षांत ही परीक्षाच झालेली नाही. या पार्श्वभूमीवर २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसासाठी नोंदणी करण्याची मुदत रविवारी संपली.
Maha TAIT Exam 2023
Maha TAIT Exam 2022: The state government has announced conduct aptitude test for teacher recruitment in the state. The exam will be held on 22nd March 2023. Interested and Eligible applicants need to submit online application form through the given lin. The closing date for submission of online application form is 8th Feb 2023 12th Feb 2023 Date Extended. Read More details are given below.
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 31/01/2023 |
Closure of registration of application | 12/02/2023 |
Closure for editing application details | 12/02/2023 |
Last date for printing your application | 23/02/2023 |
Online Fee Payment | 31/01/2023 to 12/02/2 |
TET परीक्षा फेब्रुवारी अखेरीस; १० हजार केंद्रांवर होणार परीक्षा
शिक्षक भरती 2023 आवश्यक टीईटी परिक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी ८ फेब्रुवारी २०२३ 12 फेब्रुवारी २०२३ आहे.. “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.
- परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे
- सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतः चा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
उमेदवारांची पात्रता – Educational Criteria For TAIT Exam 2023
- १ भारतीय नागरीकत्व
- २ वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना/शिक्षकांना लागू होईल.
- ३ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८/प्र.क्र.३९७ / टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासन शुध्दीपत्रक २५ फेब्रुवारी २०१९, १६ मे २०१९, १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
- प्रस्तुत जाहीरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६ / टीएनटी-०१, दि. १०/ ११ / २०२२ अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणान्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
MAHA TAIT Apply Online
Candidates can apply for the MAHA TAIT between 31st January 2023 to 8th February 2023 through online mode. The steps to apply for the Maharashtra TAIT have been shared below.
Direct Link to Apply
- Step 01: Click on the link shared above and register yourself.
- Step 02: Log in using your credentials and fill in the application form.
- Step 03: Enter your details as asked and then upload the required documents, Use the MAHA TAIT Photo & Signature Tool to resize the documents to the required dimension.
- Step 04: Pay the online requisite application fee.
- Step 05: Submit the application form and download the application form for future reference
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२- जाहिरात
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लिंक
Maha TAIT Exam 2022: The state government has announced conduct aptitude test for teacher recruitment in the state. The exam will be held in the month of February. The exam schedule will be announced on 16 December 2022. Read more details as given below.
पुढील वर्षी १७ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टिचर्स अॅप्टिट्यूट ॲण्ड इन्टेलिजन्स टेस्ट- टीएआयटी) म्हणजेच थेट ही परीक्षा घ्या व त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला दिला.
यासंदर्भात जितेंद्र सोनकुसरे यांच्यासह चार उमेदवारांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व एम. डब्ल्यू.चांदवानी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी १ ऑक्टोबर २०१८ रोजी शिक्षक पात्रता चाचणी (टिचर एलिजिबिलिटी टेस्ट-टीईटी) परीक्षा उत्तीर्ण केली परंतु, कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास पात्रतेसाठी टेट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मागील टेट चार वर्षांपूर्वी २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर ही परीक्षाच घेण्यात आली नाही, असे म्हटले होते.
पुणे शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाईनच घेण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यापैकी एका संस्थेची निवड होणार आहे. निवड झालेल्या संस्थेकडून 16 डिसेंबरला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर, प्रत्यक्ष परीक्षा 17 ते 28 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल 5 मार्च 2023 ला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षक भरती- अभियोग्यता चाचणी परीक्षा लवकरच
अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचे आयोजन करण्यापूर्वी परीक्षेच्या निकषांमध्ये काही आवश्यक सुधारणा करून शासन निर्णय जाहीर करण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल हे परीक्षा कसे घेणार, याचे सादरीकरण यापूर्वीच झाले आहे. परीक्षा परिषदेकडून निवडलेल्या संस्थेचा मान्यता प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. निवडलेल्या संस्थेला परीक्षेची तयारीकरिता 4 महिने वेळ लागेल. त्यामुळे 17 फेब—ुवारी 2023 पासून परीक्षेला सुरुवात होईल.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही. संबंधित परीक्षा ऑनलाईन घेण्याची कोणतीही यंत्रणा राज्य परीक्षा परिषदेकडे नाही. परंतु, शिक्षण विभागाशी संबंधित बाबींबाबत मार्गदर्शन, तसेच केंद्रस्तरावरील निरीक्षण या बाबी परीक्षा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आल्या होत्या. त्याचपध्दतीने फेब—ुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पार पडणार आहे
शिक्षक भरती- दुसरी अभियोग्यता चाचणी परीक्षा लवकरच
The state government has announced the decision to conduct the examination for the second time as the recruitment process is incomplete despite conducting aptitude test for teacher recruitment in the state. The exam will be held in the month of February. Read more details as given below.
राज्यात 2 हजार 88 प्राध्यापक पदांची भरती लवकरच
शिक्षक भरती २०२१ -प्राध्यापक पदांच्या 1298 पदे भरण्यास मान्यता
राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊनही भरती प्रक्रिया अर्धवट असताना आता राज्य शासनाने दुसऱ्यांदा ही परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही, अश्या उमेदवारांना हि संधी चालून आली आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि नगर परिषद महापालिका शाळांमध्ये साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.