MahaBharti 2020 will be proceed through Offline

MahaBharti 2020 will be proceed through Offline

मेगाभरती ऑफलाईन पद्धतीनेच होणारNew Update

Mahabharti 2020 updates : As per latest news – Currently, about 2 lakh employees are vacant in various departments of the state government. The recruitment begins on April 2020. Chief minister said that – This Mahabharti will be done through the offline.

Mahabharti 2020 will be held for the vacant posts in the state government from April 2020. For this, a reservation verification of 1 lakh 6 thousand has also been completed. However, MLA Rohit Pawar met Chief Minister Uddhav Thackeray, objecting to this megabharti. At this time, the Chief Minister explained to Rohit Pawar that the next recruitment would be offline only. MLA Rohit Pawar has tweeted about this.

Mahabharti 2020 updates on 16th March 2020 New Update

‘काळजी नको… मुख्यमंत्र्यांनी मेगाभरतीचं स्पष्टच सांगितलं’

राज्यातील रिक्त पदांसाठी मेगाभरतीची २० एप्रिल पासून सुरुवात होणार असून, त्यासाठी १ लाख ६ हजारांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाली आहे. मात्र या मेगाभरातीला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन देऊन परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होईल असेही स्पष्ट केलं.
राज्य सरकारच्या विविध विभागात २ लाखाच्या वर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहे. त्यामुळे लवकरच मेगाभरती प्रक्रिया सुरु होणार आहे. आधीच्या सरकारने सुरु केलेल्या महापोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव लक्षात घेता, राज्यातील तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला आहे. तरुणांनी मला आणि अन्य आमदार नेत्यांना भेटून भरती ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याची मागणी केली होती. त्यावेळी ‘रोहित याबाबत तू काहीही काळजी करू नको आणि मुलांनाही तस सांग. यापुढे होणारी भरती ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
सरकारच्या या निर्णयामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रकियेत सहभागी होता येणार आहे. भरती करताना एका दिवशीच एका पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच पूर्वी महापोर्टल वर नोंदणी केलेल्या तरुणांना या भरतीत सामील करण्यात यावं आणि ‘महाराष्ट्र्र लोकसेवा आयोगा’तील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या आणि ‘एमपीएसच्या माध्यमातून जी पदे भरली जातात त्या पदांची रखडलेली भरती प्रकिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
निवडणुकीआधी सुप्रिया सुळे यांनी सरकार आल्यावर महापोर्टल बंद करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पाळत महाविकास आघाडी सरकारने महापोर्टल बंद करून एका खाजगी एजन्सीद्वारे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार महाआयटी विभागाच्या माध्यमातून सक्षम अशी खाजगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. दोन दिवसात त्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या जाणार असून सामान्य प्रशासन विभागातर्फे परीपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामध्ये शासकीय भरती कशी राबवायची याबाबत माहिती दिली आहे. असे महाआयटी चे मुख्यअधिकारी अजित पाटील यांनी सांगितले.

सौर्स: पोलिसनामा

राज्यात ‘एवढी’ पदे रिक्त?…माहिती अधिकारातून उलगडा!

खूशखबर… राज्यात शासकीय मेगाभरती अखेर मुहूर्त मिळाला

‘एमपीएससी’ मार्फत महाभरती राबवा!!

काळजी करू नका मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई: राज्यात मोठ्या प्रमाणात शासकीय विभागांमध्ये विविध पदे रिक्त आहेत. सरकारने लवकरच मेगा भरती केली जाणार असल्याचे सांगितले आहे. भरतीची तयारी सुरू असून या भरतीची तारीख निश्चित झाली आहे. 20 एप्रिलपासून राज्य सरकारमधील रिक्त पदांसाठी मेगभारती होणार आहे. त्यासाठी, 1 लाख 6 हजारांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाली आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी या मेगाभरतीवर आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांना यापुढील भरती ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्वीटकरून माहिती दिली आहे. “रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसे सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल”, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
सध्या राज्य सरकारच्या विविध विभागात मिळून साधारण 2 लाख कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या भरतीला 20 एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

‘महापोर्टल’च्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेबाबत मोठ्या प्रमाणत नाराजी होती. अनेक तरुणांनी मला, अन्य आमदारांना व नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन भरतीचे स्पष्ट केले, असे रोहित पवार यांनी सांगितले. या निर्णयामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती करताना एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

सौर्स : डेलीहंट
2 thoughts on “MahaBharti 2020 will be proceed through Offline”

Leave a Comment

MahaGov अधिकृत अँप डाऊन!