Mahabharti Expected in April 2020

Mahabharti Expected in April 2020

राज्यात ‘एवढी’ पदे रिक्त?…माहिती अधिकारातून उलगडा!

गुड न्यूज! आता होणार 4.75 लाख सरकारी नोकर भरतीNew Update

खूशखबर… राज्यात शासकीय मेगाभरती अखेर मुहूर्त मिळाला

‘एमपीएससी’ मार्फत महाभरती राबवा!!

मेगाभरती ऑफलाईन पद्धतीनेच होणार !!

Maharashtra Mega Bharti 2020 : As per the latest news published in Sakal epaper tgere are total  29 various govt departments and zilla parishers in the state, Group A, B, C, D are two lakh 193 posts vacant at the end of December 31, 2019. It includes one lakh 41 thousand 329 posts of direct service. It will also include 58 thousand 864 posts when it is promoted. Nitin Yadav, from Someshwarnagar (Tal. Baramati), has come out with the information obtained by the General Administration Department in the Right to Information. Former Chief Minister Devendra Fadnavis’ government was going to Mega Bharti for 72 thousand posts, however, the recruitment ceased during the election code of conduct. Candidates read the complete details carefully and keep visit on our website. 

Maharashtra Maha Bharti 2020

राज्यातील 29 सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदांमधून गट “अ’, “ब’, “क’, “ड’ची 31 डिसेंबर 2019 अखेर दोन लाख 193 पदे रिक्त आहेत. त्यात सरळसेवेच्या एक लाख 41 हजार 329 पदांचा समावेश आहे. याखेरीज पदोन्नती मिळाल्यावर 58 हजार 864 पदांचाही यात समावेश होणार आहे. सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) येथील नितीन यादव यांना सामान्य प्रशासन विभागाकडून माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीतून हा उलगडा झाला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारतर्फे 72 हजार पदांची “मेगाभरती’ करण्यात येणार होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता काळात ही भरती थांबली. राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 हजार पदांच्या मेगाभरतीचा निर्णय घेण्यात आला. शिवाय बहुचर्चित महापोर्टलद्वारे होणाऱ्या भरतीवर फुली मारण्यात आली. नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने भरतीचे धोरण स्वीकारण्यात आले. अशातच, शिक्षकभरतीसाठी आंदोलकांशी संवाद साधत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांच्या मेगाभरतीचे संकेत दिले. मराठी भाषा विभागामुळे शिक्षकांच्या 20 हजार रिक्त जागा झाल्या. निवृत्तीमुळे दहा हजार पदे रिक्त होतील. मागील सरकारच्या भरतीमधील 24 हजारांपैकी 12 हजार पदे रिक्त राहिली, अशी माहिती देण्यात आली.

गट “क’मध्ये रिक्त पदांचे प्रमाण मोठे

गृह, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन-दुग्धोत्पादन, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल आणि वने, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, आदिवासी विकास, शालेय शिक्षण व क्रीडा, सार्वजनिक बांधकाम, सहकार-पणन, वस्त्रोद्योग, सामाजिक न्याय, उद्योग, कामगार, अन्न व नागरी पुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बालविकास, विधी व न्याय, नगरविकास, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, ग्रामविकास, पर्यटन, सामान्य प्रशासन, मृद व जलसंधारण, गृहनिर्माण,अल्पसंख्याक, पर्यावरण, मराठी भाषा अशा विभागांसाठी सात लाख 34 हजार 756 पदे मंजूर आहेत. त्यात गट “अ’च्या 40 हजार 567, “ब’च्या 63 हजार 912, “क’च्या पाच लाख 19 हजार 16, “ड’च्या एक लाख 11 हजार 261 पदांचा समावेश आहे. त्यांपैकी सरळसेवेची चार लाख 63 हजार 985, तर पदोन्नतीची दोन लाख 70 हजार 771 पदे आहेत. जिल्हा परिषदांमध्ये गट “क’ची तीन लाख 39 हजार 153 आणि “ड’ची 25 हजार 195 अशी एकूण तीन लाख 64 हजार 348 पदे मंजूर आहेत. त्यातील तीन लाख 16 हजार 538 पदे सरळसेवेची आणि 47 हजार 810 पदे पदोन्नतीची आहेत.

No. of Vacant Posts रिक्त पदांची संख्या :

 1. * सरकारी विभाग : गट “अ’- 10 हजार 545, “ब’- 20 हजार 999, “क’- 84 हजार 734, “ड’- 36 हजार 953.
 2. * जिल्हा परिषदा : गट “क’- 42 हजार 971, “ड’- 3 हजार 991.

सरकारी विभाग अन्‌ जिल्हा परिषदांमधील गटनिहाय रिक्त पदांच्या संख्येची स्थिती

 1. * “अ’- 10 हजार 545
 2. * “ब’- 20 हजार 999
 3. * “क’- 1 लाख 27 हजार 705
 4. * “ड’- 40 हजार 944

(एकूण सरळसेवेची एक लाख 41 हजार 329 आणि पदोन्नतीची 58 हजार 864 पदे)

Department wise total vacant posts : विभागनिहाय एकूण रिक्त पदे

 • * गृह —– 24 हजार 848
 • * सहकार-पणन व वस्त्रोद्योग —– तीन हजार दोन
 • * सार्वजनिक आरोग्य —– 20 हजार 544
  * सामाजिक न्याय —– दोन हजार 856
 • * जलसंपदा —– 20 हजार 873
 • * उद्योग-कामगार —– तीन हजार 406
 • * कृषी व पशुसंवर्धन —– 14 हजार 364
 • * अन्न-नागरी पुरवठा —– दोन हजार 736
 • * उच्च व तंत्रशिक्षण —– तीन हजार 762
 • * पाणीपुरवठा व स्वच्छता —– 728
 • * महसूल व वने —– 11 हजार 333
 • * महिला व बालविकास —– एक हजार 445
 • * वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये —– सहा हजार 490
 • * विधी व न्याय —– एक हजार 869
 • * वित्त —– पाच हजार 567
 • * नगरविकास —– एक हजार 291
 • * आदिवासी विकास —– सात हजार 391
 • * नियोजन —– 552
 • * शालेय शिक्षण व क्रीडा —– तीन हजार 477
 • * कौशल्य विकास व उद्योजकता —– पाच हजार 55
 • * सार्वजनिक बांधकाम —– आठ हजार 628
 • * ग्रामविकास 256 आणि जिल्हा परिषदा —– 46 हजार 962
 • * पर्यटन —– 301
 • * सामान्य प्रशासन —– दोन हजार 100
 • * गृहनिर्माण —– 281
 • * अल्पसंख्याक —– 16
 • * पर्यावरण —– दोन
 • * मराठी भाषा —– 58

विशेष गृह, महसूल, सामाजिक न्याय, नगरविकास, कौशल्य विकास, ग्रामविकास, सामान्य प्रशासन, मृद व जलसंधारण, गृहनिर्माण या विभागांची 31 डिसेंबर 2018 अखेरची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच 2013 पासून राज्य सरकारने भरलेल्या विभागवार रिक्त पदांची माहिती संकलित झालेली नाही. माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली माहिती प्रशासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांकडून 31 डिसेंबर 2019 अखेरची असल्याचे नमूद आहे. ही सारी परिस्थिती पाहता, रिक्त पदांमुळे कामाचा ताण आहे. शिवाय निवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे आणखी वेगळी असतील. त्यामुळे स्वाभाविकपणे रिक्त पदे कशी भरली जाणार, याबद्दलची उत्सुकता तरुणाईमध्ये आहे.

सौर्स : सकाळ

मेगाभरती जानेवारीपर्यंत लांबणीवर !

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये तब्बल पावणेदोन लाख पदे रिक्‍त..

Mahabharti in January 2020 : There are vacancies of 1,64,338 employees in various government departments in Maharashtra including Zilla Parishad, Nagarpalika, Revenue, Police, Talathi Etc. Maharashtra Government announced a mega recruitment of 72 thousand vacancies in 2019. Accordingly to that, in the first phase, the recruitment of 34,000 posts was planned. This megabharti will be held through the Mahapariksha portal. Candidates who are interested in this Mahabharti 2020 they should the complete details given below and keep visit us.

Mega Bharti 2020 Online Apply

राज्यातील जिल्हा परिषदांसह विविध शासकीय विभागांत एक लाख 64 हजार 338 कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन सरकारने 72 हजार रिक्‍तपदांची मेगाभरती जाहीर केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 34 हजार पदांची भरती डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन महापरीक्षा सेलतर्फे करण्यात आले होते. मात्र, महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी अन्‌ केलेल्या उपाययोजनांचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागविल्याने आता विद्यार्थ्यांना मेगाभरतीची जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची चर्चा आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहा लाख 96 हजार 994 मंजूर पदांपैकी एक लाख 37 हजार 640 कर्मचाऱ्यांची पदे मागील काही वर्षांपासून भरलेली नाहीत. तर दुसरीकडे जिल्हा परिषदांमधील तीन लाख 63 हजार 099 मंजूर पदांपैकी 26 हजार 698 पदे रिक्‍तच आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व भरती प्रक्रिया एकाच छताखाली राबविण्याच्या उद्देशाने 2017-18 मध्ये महापरीक्षा सेल सुरू केला. मात्र, राज्यभरातील महापरीक्षा सेलची 150 केंद्रे असून त्यातील काही केंद्रात घोळ झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीनुसार त्रुटींची माहिती अन्‌ त्यावरील केलेल्या उपाययोजनांचा अहवाल मागविल्याचे महापरीक्षा सेलच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास महापरीक्षा पोर्टल बंद होण्याच्या भीतीने महापरीक्षा सेलमधील सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांना चिंता सतावू लागली आहे.

महापरीक्षा सेलकडून विद्यार्थ्यांना आवाहन

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटींमुळे अनेक विद्यार्थ्यांची पंचाईत झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे, नागपूरसह अन्य जिल्ह्यांत मागील भरतीवेळी घोळ झाल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे आता महापरीक्षा पोर्टल बंद होईल की काय, अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर मेगाभरतीची प्रकिया तत्काळ पूर्ण व्हावी, राज्यातील सुमारे 30 लाख सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीची संधी मिळावी, या हेतूने सरकारला ऑनलाइन पत्रव्यवहार (ई-मेल) करावा, असे आवाहन महापरीक्षा सेलकडून करण्यात आल्याची चर्चा विद्यार्थ्यांत रंगली आहे.

Mahabharti Expected in January 2020

मेगाभरती जानेवारीपर्यंत लांबणीवर !

राज्यात लवकरच सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती!

जिल्हा परिषद महाराष्ट्र भरती २०२०

तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त

लांबणीवर पडलेला मेगाभरतीचा टप्पा

 • ग्रामविकास : 11,000
 • गृह : 7,000
 • आरोग्य : 10,000
 • कृषी : 2,500
 • पशुसंवर्धन : 1,047
 • सार्वजनिक बांधकाम : 837
 • नगरविकास : 1,664
 • एकूण : 34,048
सौर्स : सकाळ
10 thoughts on “Mahabharti Expected in April 2020”

 1. सर मि ,जिल्हा परिषद , पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य विभाग, इतर ठिकाणी फाँम भरले आहेत त्या परिक्षा केव्हा होतील सर, तस मला कळवा सर मोबाईल नंबर ९०७५८३५०९७

  Reply

Leave a Comment