MahaJobs Portal -Skills Development Training

MahaJobs Portal -Skills Development Training

MahaJobs Portal -Skills Development Training: The ‘Mahajobs’ website, launched by the Department of Industries and Labor to provide skilled manpower to industries in the state, is getting a huge response. So far, two lakh 86 thousand people have registered for the job. Out of them, 8,403 are unskilled job seekers and they will be referred to the Skill Development and Entrepreneurship Department for training, Industry Minister Subhash Desai said here on Tuesday. Read Important Update related To Skills Development Training at below:

अकुशल नोकरी इच्छुकांना प्रशिक्षण

‘महाजॉब्स’ संकेतस्थळाचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली. या वेळी उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग, कामगार विभागाच्यावतीने सुरू केलेल्या ‘महाजॉब्ज’ संकेतस्थळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन लाख ८६ हजार जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८,४०३ अकुशल नोकरीइच्छुक असून, त्यांना  प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडे वर्ग केले जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी येथे दिली.

नोकरी इच्छुकांना रोजगाराच्या उच्चतम शक्यता असणाऱ्या पणन अधिकारी, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टूल ऑपरेटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, ऑफिस असिस्टंट व मनुष्यबळ विकास आदी क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित केले जाईल.


MahaJobs Portal – महाजॉब्सची रजिस्ट्रेशन करा

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशा स्थितीत अनेकांवर बेरोजगारी ओढवली आहे. अनेकांचे वेतन कपात केले जात आहे, तर काहींच्या नोकऱ्या जात आहेत. लॉकडॉऊन लागू झाल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. त्याबरोबर उद्योजकांनाही कुशल व अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून ‘महाजॉब्स’ वेब पोर्टल सुरू करण्यात आले. या संकेतस्थळाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच राज्यातील उद्योगांची चाके पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे. MahaJobs Registration 2020.
महाजॉब्स उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करत आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर ‘महाजॉब्स’ वेब पोर्टल उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला दिली आहे. या महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी १७ क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील ९५० व्यवसायांसाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी, यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी अनेकांना मदत होईल.
महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. याचा अनेक युवक युवतींनी लाभ घेण्यास सुरुवात केली आहे.
या पोर्टलची उद्दिष्ट्ये आहेत…
– नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.
– निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.
– उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.
– महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.

3 thoughts on “MahaJobs Portal -Skills Development Training”

  1. Lokmanya Nagar korochi near Sangeetha hotel taluka hatkanangale jilla kolhapur pin generation 416 109

    Reply

Leave a Comment