Mahapariksha Portal Closed Now

Mahapariksha Portal Closed Now

अखेर महापोर्टल बंद

Mahapariksha Portal Closed : The government on Thursday decided to shut down the Mahapariksha portal around the controversy for the recruitment of Group B and Group C posts in all the administrative departments of the state government and their offices. For the past several days, there have been several serious objections from the candidates regarding the transparency of the Mahapariksha portal, which is processing government servants. As a result, both the Congress demanded the closure of the probe portal. Read the Complete details carefully.

Mahapariksha Portal Issue

राज्य सरकारचे सर्व प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या अखत्यारीतील कार्यालयातील गट ब आणि गट क पदांच्या भरती प्रक्रियेसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने गुरुवारी घेतला आहे.

मागील फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेतील त्रुटींबाबत राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असून, यापुढे नोकर भरती प्रक्रियेसाठी नवीन पद्धत आणली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले.

सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलच्या पारदर्शकतेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांकडून अनेक गंभीर आक्षेप घेतले जात होते. यामुळे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची जोरदार मागणी दोन्ही काँग्रेसने लावून धरली होती.

शासनाच्या विविध विभागाच्या गट क आणि गट ड सवंर्गातील पदांची परीक्षा राबविण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन सर्व्हिस प्रोव्हायडरची यादी तयार करण्याची कार्यवाही महाआयटीमार्फत करण्यात येईल. त्यानुसार त्या यादीतील निवड झालेल्या कंपन्यांकडून संबंधित विभागास पदभरतीसाठी परीक्षा आयोजित करता येईल. जाहिरात ते निवड प्रक्रियेचे संचलन संबंधित विभागाच्या पातळीवर होईल. यात महाआयटीची भूमिका मर्यादित कामासाठी राहील. तसेच सध्याच्या परिस्थितीत ज्याप्रकरणी जाहिरात प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अथवा परिक्षेचे आयोजन बाकी आहे. अशा प्रकरणी त्या त्या संबंधित विभागांना सर्व

आवश्यक माहिती महाआयटीकडून हस्तांतरीत करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाच्या यासंबंधीच्या नव्या शासननिर्णयात स्पष्ट आहे.

नोकरभरतीचे परीक्षा संदर्भातील सर्व प्रशासकीय नियंत्रण हे सामान्य प्रशासन विभागाचे असल्यामुळे या पदभरती संदर्भात उदभवणाऱ्या तांत्रिक बाबींविषयी आवश्यकता भासल्यास माहिती तंत्रज्ञान संचालनालय आणि महाआयटीमार्फत सल्ला पुरविण्यात यावा असेही नव्या शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे.

सौर्स : मटा

Demand to close ‘Mahapariksha Portal’

‘महापरीक्षा’ पोर्टल बंद होणार?

Mahapariksha.gov.in Online Poral of Maharashtra Examination. MP Supriya Sule, has demanded to closure of the Mahapariksha portal with Chief Minister Uddhav Thackeray. All Latest Police Driver Bharti and SRPF Police bharti advertisement published on this portal. But due to some technical reason candidates wants to close this portal. While the recruitment of government departments is underway through the Examination Portal, disillusioned, technical difficulties and wrong results have led to the harassed candidates ‘shut down the portal’. Read the complete details given below:

Mahapariksha Portal


महापरीक्षा पोर्टलद्वारे सरकारी विभागातील पदभरती सुरू असून, गोंधळ, तांत्रिक अडचणी आणि चुकीच्या निकालांमुळे हैराण उमेदवारांनी ‘पोर्टल बंद करा’ ही चळ‌वळ उभी केली. उमेदवारांचा हा आवाज खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री उध्द‌व ठाकरे यांच्याकडे पोर्टल बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पदभरतीच्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लवकरच पोर्टल बंद होऊन भरतीप्रक्रियेत अडसर दूर होण्याची अपेक्षा उमेदवारांना आहे.

सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता यावी, सर्व प्रक्रिया ऑनलाइन व्हावी, म्हणून महापरीक्षा पोर्टल सुरू केले गेले. मात्र, तलाठी भरतीसह इतर विभागातील भरती अंतर्गत परीक्षेचा गोंधळ, चुकीची प्रश्नपत्रिका, सदोष निकाल, उत्तरतालिकांच्या त्रुटी या संदर्भात उमेदवारांनी हरकती घेतल्या. राज्यातून सर्व उमेदवारांनी या संदर्भात सोशल मीडियावर चळवळ उभी केली. विविध जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना विधानसभेपूर्वी पोर्टल बंद करण्याचे निवेदन देण्यात आले. आचारसंहितेत भरतीप्रक्रिया रखडली, मात्र, विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा पोर्टल बंदची हाक देण्यात आली. उमेदवारांनी ट्विटवर टॅग करत भरतीप्रक्रियेच्या गोंधळाकडे राजकीय नेत्यांचे लक्ष वेधले. त्यानुसार खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट टॅग करत पोर्टल बंदची मागणी केली. शिवाय विधानसभेत त्यांची भेट घेत, पोर्टल बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले. दरम्यान, विधानसभेच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेतही सुळे यांच्याकडे उमेदवारांनी पोर्टलसंदर्भात कैफीयत मांडली होती. तेव्हा त्यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन उमेदवारांना दिले होते. त्यानुसार त्यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच, पूर्वीप्रमाणेच नोकरभरती घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता भरतीप्रक्रियेत पारदर्शकता येईल, असे मत व्यक्त होत आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून पोर्टल बंद करण्याबाबत लढा सुरू होता. अखेरीस विधानसभेत हा प्रश्न पोहोचला आहे. आता फक्त पोर्टल बंद होऊन, पारदर्शक भरतीप्रक्रिया सुरू होण्याकडे लक्ष लागले आहे.

महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची हाक गेल्या काही महिन्यांपासून देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारांच्या समस्यांची दखल घेतली जात नव्हती. आता याकडे लक्ष वेधले गेल्याने, पोर्टल बंद होण्याच्या प्रतिक्षेत आहोत.

महापोर्टल रद्द करा Cancel the Mahapariksha portals

महापोर्टल रद्द करा व पोलिस भरती आणि सर्व विभागांतील रिक्त जागांसाठी परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत घ्याव्यात, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

पोलिस भरतीच्या व सर्व स्पर्धा परीक्षा महापोर्टलद्वारे घेण्याचे मागील सरकारने ठरवले होते. ज्या कंपनीला महापोर्टलचे काम दिले आहे, त्या कंपनीचे नाव मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यात काळ्या यादीत आहे. या महापोर्टलद्वारे येत्या एक डिसेंबरपासून महापोर्टलने आखलेले परीक्षाचे नियोजित वेळापत्रक रद्द करावे व याच परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत घ्याव्यात. राज्यभरातील पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी महापोर्टल रद्द करावे, ही मागणी सरकारकडे करीत आहेत. परंतु, मागील सरकारने यावर कोणताही तोडगा काढला नाही. महापोर्टल रद्द करावे, यासाठी राज्यभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते; परंतु, त्यांना मागच्या सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. मुळात विद्यार्थी कितीतरी वर्षांपासून हजारो रुपये खर्च करून अॅकॅडमी व अभ्यास करीत आहेत. मागील सरकारने गेल्या सहा ते सात वर्षांपासून पोलिस भरती काढलेली नसताना केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अवघ्या तीन हजार चारशे जागांवर भरती काढली होती. पोलिस भरतीची तयारी करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची ही चेष्टाच होती. तरी सरकारने तातडीने महापोर्टल रद्द करावे आणि लवकरात लवकर सर्व रिक्त पदे ‘एमपीएससी’मार्फत भरावीत, अशी मागणीही संघटनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, शीतल रोकडे, तुषार पानसरे, गणेश जोंधळे, सचिन सानप, गणेश सानप, शुभम शिंदे, प्रशांत शिंदे याच्यांसह कार्यकर्त्यांनी केली आहे.

महापोर्टल बंद करा; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी Close the Mahapariksha portals; Supriya Sule demands CM
मुंबई: शासकीय नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेले ‘महापोर्टल’ बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मागील महायुती सरकारने महापोर्टल सेवा सुरू केली होती. त्याविरोधात अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती

सुप्रिया सुळे यांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शासकीय नोकरभरती करताना पारदर्शकता रहावी, ऑनलाइन अर्ज करता यावा यासाठी मागील राज्य सरकारने महासेवा पोर्टल सुरू केले होते. मात्र, या पोर्टलमुळे मदत होण्याऐवजी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी हजारो इच्छुक उमेदवारांनी केल्या होत्या. राज्यभरात ठिकठिकाणी महासेवा पोर्टलविरोधात आंदोलन झाले होते. निवडणुकी आधी सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रा काढली होती. त्यावेळी अनेक युवकांनी आपल्याला भेटून महापोर्टल बं द करण्याची मागणी केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. महापोर्टलद्वारे होणाऱ्या नोकरभरतीत पारदर्शकता होत असल्याचा दावाही निराधार असल्याचे युवकांनी आंदोलनादरम्यान म्हटले होते. मागील सरकारने सुरू केलेले हे महापोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परिक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बीड सरकारने मेगाभरती जागी महापोर्टल तयार केले. यात खासगी कंपनीला भरतीचे कंत्राट दिले आहे. याच कंपनीने मध्य प्रदेशमध्ये घोटाळा केला आहे. आताही महाराष्ट्रात ऑनलाइन भरतीत भ्रष्टाचार आहे, असा आक्षेप नोंदवत तात्काळ पोर्टल भरती बंद करुन ऑनलाइन परीक्षा घ्याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थी-युवकांनी घेतली होती.

महापोर्टलविरोधात लढा तीव्र! Mahapariksha Portal Problem Face

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी रस्त्यावर आणि सोशल मीडियावरही लढा तीव्र केला आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारे हे पोर्टल बंद करण्याचा शब्द दिल्याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला करून दिली. त्यामुळे या लढ्याला बळ मिळाले असून, या उमेदवारांचे लक्ष आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे आहे.

राज्यातील शासकीय पदांच्या भरतीसाठी सप्टेंबर २०१७ मध्ये शासनाने पोर्टल आणले. ऑनलाइन परीक्षेतून भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र, त्या परीक्षेतील गैरप्रकार, गोंधळ काही दिवसांतच समोर आले. डमी उमेदवार बसवणे, गुणवाढ, परीक्षेला उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादीत समावेश, दर्जेदार पर्यवेक्षक नसणे, परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांचा समावेश आहे. प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखों विद्यार्थ्यांनी याबाबत आवाज उठवला. खासगी पातळीवरून नियंत्रण करणाऱ्या या यंत्रणेतील गोंधळ विद्यार्थ्यांनी वारंवार समोर आणले. तत्कालीन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेत रस्त्यावरून, सोशल मीडियावरून रान उठवले. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर राज्यातील बेरोजगारांनी गैरप्रकारांनी गाजलेल्या या पोर्टलला बंद करून पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. सोशल मीडियावरून उमेदवारांनी प्रखरपणे आपली भूमिका मांडली. त्याला सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला. त्यांनी त्यांच्या सरकारला पोर्टल बंद करण्याचा शब्द दिल्याची आठवण करून दिली. त्यावरूनही उमेदवारांनी सरकारला तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे. त्यावर राज्यसरकार शब्द पाळते का, याकडे लाखों उमेवारांचे लक्ष लागले आहे.

या आहेत तक्रारी Maharpariksha Portal Complaints

प्रमाणित व दर्जेदार परीक्षा केंद्र नसणे, ठराविक संस्थांनाच परीक्षा केंद्र देणे, परीक्षा केंद्रांच्याबाबतीत निविदा प्रक्रियेमध्ये देण्यात आलेल्या अटी न पाळणे, परीक्षा केंद्रावर चालणाऱ्या गैरप्रकाराबद्दलच्या तक्रारी, नॉर्मलायझेशनची पद्धतीतील चुका, चुकलेल्या प्रश्नांसाठी सरळ, सरळ मार्क देण्याची चुकीची पद्धत, जाहिरात, फॉर्म भरण्याची तारीख, परीक्षा याबाबतचे अयोग्य नियोजन, बहुतांशी परीक्षा केंद्र खासगी संस्थांच्या ताब्यात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी ही ऑनलाइन पद्धत आणली गेली. विविध परीक्षेतील गैरप्रकार उमेदवारांनी समोर आणले तरी त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. गैरप्रकारांना कंटाळलेल्या बेरोजगारांनी पोर्टल बंद करण्याची हाती घेतलेल्या या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. पोर्टल बंद करून सर्वसमान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असे वाटते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *