Maharashtra Police Bharti 2020

Maharashtra Police Bharti 2020

SID Mumbai Bharti 2020 New Update

राज्यात ८ हजार पोलीस, ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती होणार

Latest Police Bharti Announcement : Home Minister Anil Deshmukh announced that 8,000 police and 7,000 security guards will be recruited in the state. The then BJP government had not recruited police in the state in the last five years. That is why these recruits will be recruited, ”said Deshmukh. More Details are given below :

पुणे: राज्यात येत्या काळात ८ हजार पोलीस आणि ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. तत्कालीन भाजप सरकारने राज्यात गेल्या पाच वर्षात पोलीस भरती केली नव्हती. त्यामुळेच ही भरती करण्यात येणार असल्याचं देशमुख म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला भेट दिली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. आगामी काळात पुण्यात दीड ते दोन लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं. भाजप सरकारच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याची चौकशी करण्यासाठी दो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जळगावच्या भाजपच्या एका बड्या नेत्यानेही त्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचीही चौकशी करण्यास सांगितले आहे. त्याचाही विचार करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात हिंगणघाट सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहे. बलात्कार रोखण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारनं केलेल्या कायद्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी स्वत: आंध्रप्रदेशात जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सौर्स : मटा


Police Bharti 2020 Physical Test & Written Exam

पोलिस भरतीबाबतच्या निर्णयाचा होणार फेरविचार

The decision taken by the then BJP government to reduce the quality of physical examination in the police recruitment process and give extra marks to the written test is likely to be reviewed by the front. Home Minister Anil Deshmukh has confirmed that the government is trying to give 100 marks in physical examination as before. So there are signs of success for the thousands of candidates who have taken to the streets against this decision.

पुणे – तत्कालीन भाजप सरकारने पोलिस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीचे गुण कमी करून लेखी परीक्षेला जादा गुण देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा महाआघाडी सरकारकडून फेरविचार होण्याची शक्‍यता आहे. शारीरिक चाचणीला पूर्वीएवढेच 100 गुण देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरणाऱ्या हजारो उमेदवारांच्या लढ्याला यश येण्याची चिन्हे आहेत.

तत्कालीन भाजप सरकारने पोलिस भरती प्रक्रियेत बदल केले होते. त्यानुसार, शारीरिक चाचणीसाठी 100 गुणांऐवजी 50 गुण ठेवले, तर लेखी परीक्षेसाठी 100 गुण ठेवले. याबरोबरच लेखी परीक्षेसाठी पूर्वी असलेले उमेदवारांचे एकास 15 हे प्रमाण बदलून, ते प्रमाण एकास 10 केले. त्याबाबतचा अध्यादेशही काढला होता. या निर्णयाबद्दल पोलिस भरतीची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या व शारीरिक चाचणीची जमेची बाजू असणाऱ्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, उमेदवारांनी रस्त्यावर उतरून आंदोलने व मोर्चे काढले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. दरम्यान, या निर्णयाला ज्योती सैनी व भीमराव शिरसीपूरकर या उमेदवारांनी ऍड. श्रीकांत ठाकूर यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये (मॅट) आव्हान दिले होते.
गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील मुला-मुलींकडून पोलिस भरतीला प्राधान्य दिले जात होते. शारीरिक चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळवून स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. असे असताना शारीरिक चाचणीचे गुण कमी करण्याचा निर्णय तत्कालीन भाजप सरकारने घेतला होता. त्यास लाखो उमेदवारांनी कडाडून विरोध केला होता. यामुळे महाआघाडी सरकारने शारीरिक चाचणीचे गुण पूर्ववत म्हणजेच 100 गुण ठेवण्याबाबत विचार सुरू केला आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

पोलिस भरतीच्या प्रक्रियेवेळी शारीरिक चाचणीसाठी असणारे गुण यापूर्वीच्या सरकारने कमी केले होते. ते पूर्ववत ठेवण्यासाठी म्हणजेच 100 गुण करण्यासाठी राज्य सरकारकडून विचार सुरू आहे.
पोलिस भरतीची तयारी करणारे उमेदवार

* पुणे शहर – 5 ते 5.5 लाख

* राज्यभरात – 12 ते 13 लाख

सौर्स : पोलिसनामा





पोलिस शिपाई भरतीला मुहूर्त केव्हा?

Police Recruitment 2020 : When is it time to recruit a policeman? On September 2019, the Home Department announced the recruitment of 3,500 policemen in the state. Candidates filled out his application. In the seven years so far, the process of field or written examination was started within a month after filling in the application form.

Police Recruitment 2020

राज्यातील साडेतीन हजार पोलिस शिपाई भरतीसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरून घेतल्यानंतर आतापर्यंत गृह विभागाकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यातच नोव्हेंबरमध्ये पोलिस वाहनचालक व राज्य राखीव पोलिस दलाच्या शिपाई भरतीचेही अर्ज भरून घेतले. मात्र, पुढे काहीच हालचाल नसल्याने उमेदवार निराश झाले आहेत. मागील वर्षीचीच साडेपाच हजारांची भरती होत नसताना गृहमंत्री नव्याने आठ हजार पदांची भरती होणार असल्याचे सांगत असल्याने ही निराशा वाढली आहे.

गृह विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये राज्यात तीन हजार ५०० पोलिस शिपाई पदांची भरती जाहीर केली. त्याचे अर्ज उमेदवारांनी भरले. आतापर्यंतच्या सात वर्षांतील पोलिस भरती प्रक्रियेत अर्ज भरल्यानंतर एका महिन्याच्या आत मैदानी किंवा लेखी परीक्षेच्या प्रक्रियेला सुरुवात केली जात होती. मात्र, २०१९ मध्ये ही प्रक्रिया रखडली. ती अजूनही सुरू झालेली नाही. सरकारने पोलिस वाहनचालकांच्या एक हजार जागांची भरती जाहीर केली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या ८२८ जागांची भरतीप्रक्रिया जाहीर झाली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. मात्र, या तिन्ही दलांच्या भरती प्रक्रियेला अद्याप मूहूर्त मिळालेला नाही.

या संदर्भात सरकारनेही कोणतेही परिपत्रक काढले नसल्याने राज्यभरातून शहरांच्या ठिकाणी किंवा मोठ्या अॅकॅडमीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेणारे उमेदवार संभ्रमात आहेत. त्यांचा प्रतिमहिना चार हजार रुपयांचा खर्च वाढत चालला आहे. ही परीक्षा महापोर्टलद्वारे होणार, की यापूर्वीच्या प्रक्रियेतून होणार; तसेच ऑनलाइन की ऑफलाइन, याचीही माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. यामुळे संगणकावर सराव करावा, की कागद-पेन पद्धती अवलंबावी, या विषयीही उमेदवार संभ्रमात आहेत. पोलिस भरती होताना अगोदर लेखी चाचणी होणार, की मैदानी चाचणी याविषयीही उमेदवारांत गोंधळाचे वातावरण आहे.

मी पोलिस शिपाई होण्यासाठी सोलापूरातून बारामतीत आले आहे. गेले चार महिने मी फक्त अभ्यासच करत आहे. यातून माझा प्रशिक्षण व निवास, भोजनाचा खर्च वाढत चालला आहे. आतापर्यंत महिन्यात प्रक्रिया सुरू व्हायची आणि भरतीही पूर्ण होत होती. आता मात्र ती लांबली असल्याने माझ्यापुढे समस्या वाढत चालल्या आहेत.

गृह विभागाने या संदर्भात परिपत्रक काढणे अत्यंत जरुरीचे आहे. राज्यात वेगवेगळ्या शहरांत गावांकडून आलेले उमेदवार थांबून आहेत. त्यांचा खर्च दिवसेदिवस वाढत चालला आहे. ही मुले अल्प उत्पन्नगटातील असतात. त्याचा विचार सरकारने करावा. भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यानुसार व पद्धतीने होणार, याचाही खुलासा करावा. ही सर्व पदे पाच हजार २९७ आहेत. त्यासाठी लाखो उमेदवार प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे हा गोंधळ थांबला पाहिजे.

म. टा.





पोलिस दलात पाच लाख जागा रिक्त

Police Recruitment 2020 : The police force has a total of 25,95,435 seats. Out of them, police are working on 20,67,270 seats and 28,265 seats are vacant. This information is given in the annual report of the Police Research and Development Center (BPR&D). The organization operates under the leadership of the Union Home Ministry. All other important Details are given below :

‘बीपीआर अँड डी’च्या अहवालातील माहिती; महिलांचे प्रमाण नगण्य

नवी दिल्ली – पोलिस दलात देशभरात पाच लाख जागा रिक्त आहेत. २०१९ मध्ये एकूण पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाणे ९ टक्‍क्‍यांपेक्षा कमी होते, असे सरकारच्या नव्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

पोलिस दलात एकूण २५ लाख ९५ हजार ४३५ जागा आहेत. त्यापैकी २० लाख ६७ हजार २७० जागांवर पोलिस कार्यरत असून पाच लाख २८ हजार १६५ जागा रिक्त आहेत. ही माहिती पोलिस संशोधन आणि विकास केंद्रा (बीपीआर अँड डी) च्या वार्षिक अहवालात दिली आहे. ही संस्था केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली काम करते. पोलिस संघटनांच्या अहवालाचे प्रकाशन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बुधवारी (ता.२९) झाले. त्या वेळी ‘बीपीआर अँड डी’चे संचालक व्ही. एस. के. कौमुदी उपस्थित होते.
अहवालातील माहितीनुसार पोलिस दलात महिलांची कुमक एक लाख८५ हजार ६९६ म्हणजेच ८.९८ टक्के होते. गेल्या वर्षी हे प्रमाण ९. २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. पोलिस दलात २०१८मध्ये एक लाख ५० हजार ६९० नव्या उमेदवारांची भरती झाली, असेही यात नमूद केले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (सीएपीएफ) क्षमता १ जानेवारी २०१९ रोजी १० लाख ९८ हजार ७७९ होती. प्रत्यक्षात नऊ लाख ९९ हजार ९१८ जागा भरलेल्या आहेत. ‘सीएपीएफ’त महिलांची संख्या २९ हजार ५३२ म्हणजे २. ९५ टक्के आहे. देशात एक लाख नागरिकांमध्ये सध्या १५८. २२ पोलिस असे प्रमाण आहे. नियमानुसार ते १९८.६५ असायला हवे. एका पोलिसामागे ५०३.४० असे प्रमाण हवे असताना ते ६३२.०२ असे आहे.
साडेसोळा हजार पोलिस स्थानके

देशात मंजूर १६ हजार ७७१ पोलिस स्थानकांपैकी १६ हजार ५८७ पोलिस स्थानके कार्यरत आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन लाख चार हडार ८०७ पोलिस वाहने असून चार लाख २७ हजार ५२९ सीसी टीव्ही कॅमेरे आहेत, अशी माहिती अहवालात दिली आहे.





‘महापोर्टल’च्या प्रक्रियेला स्थगितीमुळे पोलीस भरती रखडली

Police Bharti 2020 Mahapariksha Portal : In the state police force, about 12 lakh application received form candidates for the vacant posts of 8,000 vacant posts of Police Constable. However, the state government has Stay the recruitment process due to the postponement of the ‘Mahapariksha Portal’ process implemented for it. Read the complete details carefully. And keep visit us.

मुंबई : राज्य पोलीस दलामध्ये विविध घटकांतील शिपाई पदासाठीच्या रिक्त आठ हजार जागांसाठी राज्यभरातून तब्बल १२ लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. मात्र त्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘महापोर्टल’च्या प्रक्रियेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याने भरतीची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे संबंधित उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने ही भरती ‘आॅफलाइन’ घेण्याचा विचार गृह विभागाकडून करण्यात येत आहे.कॉन्स्टेबल पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने राज्यातील बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे. मात्र महापोर्टलला स्थगिती दिल्याने भरतीचे भवितव्य धोक्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस घटकातील एकूण रिक्त जागांसाठी पोलीस भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महापोर्टलवरून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
निर्धारित कालावधीमध्ये त्यासाठी तब्बल १२ लाख अर्ज आले. मात्र अन्य पदांच्या ठिकाणी ‘महापोर्टल’ची अचूकता व विश्वासार्हतेबद्दल उमेदवारासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी साशंकता व्यक्त केली होती. राज्यात भाजपविरोधात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर ‘महापोर्टल’च्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीची प्रक्रियाही आपसूक रखडली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याने ही भरती पूर्वीप्रमाणे ‘आॅफलाइन’ घेण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.मात्र, आॅफलाइन भरती प्रक्रिया किचकट ठरण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यासाठी पहिल्यांदा आलेले अर्ज, उमेदवारांनी जमा केलेली अनामत रक्कम संबंधितांच्या खात्यावर परत करावी लागेल, त्यानंतर पुन्हा अर्ज मागवून घेणे, खूपच क्लिष्ट व गुंतागुंतीचे काम होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

राज्यात लवकरच सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती

Police Bharti 2020 : As per the latest news the Maharashtra Police Bharti for 8000 posts will be announce very soon. Home Ministry Anil Deshmukh told that, The Home Department has decided to take up the mega recruitment and the Home Department is trying to fill the vacant posts in the police force. Under this decision, the Home Department will soon recruit police for seven to eight thousand posts in coming months. Candidates keep visit on our website and read the complete details carefully given below :

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच…

अमरावती: देशभरात बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र रुप धारण केलेले असताना, रोजगाराबाबत राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्यागृहविभागाने मेगा भरती हाती घेण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या प्रयत्नात गृहविभाग आहे. या निर्णयांतर्गत गृह विभाग लवकरच सात ते आठ हजार पदांवर पोलीस भरती करणार आहे. ही माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा आहे.

दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यातील महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन पावले उचलणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत गृहमंत्री देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सभापती जयंतराव देशमुख, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी आमदार अमर काळे, सुनील वऱ्हाडे, आनंद माने आदी यावेळी उपस्थित होते.

सौर्स : मटा

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच…


Police Bharti 2019 – LAST DAY

Maharashtra Police Bharti 2019 advertisement published now. There are 1019 vacancies available for Police Driver Posts and 828 vacancies available for SRPF Police. total 1847 Vacancy recruitment advertisement published on maharapriksha. SRPF Police Bharti and Police Driver Bharti advertisement available now on mahapariksha.gov.in. Online Registration process will be started from 2nd December 2019. Last date of Online registration will be 22nd December 2019 is now extended till 8th January 2019. District wise separate details of SRPF Police Bharti 2020 & Police Constable Driver Bharti 2020 are given here. Keep visit us for the further updates.

पोलीस भरती २०१९ च्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, pdf जाहिरात आज पासून उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन २ डिसेंबर २०१९ पासून सुरु होईल आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ ८ जानेवारी २०२०. पूर्ण माहिती आमच्या www.mahagov.info ह्या वेबसाईट वर उपलब्ध झाली आहे….

POLICE BHARTI 2019 DATE EXTENDED

Police Bharti 2019 Date Extended

SRPF Police & Police Driver Vacancy Details

Police Bharti Vacancy Details

Police Driver & SRPF Police Recruitment 2019 District Wise Advertisement

  1. बृहन्मुंबई पोलिस भरती २०१९ – १५६ जागा 
  2. लातूर पोलिस भरती २०१९ – ६ जागा 
  3. नागपूर ग्रामीण पोलिस भरती २०१९ – २८ जागा 
  4. नागपूर पोलिस पोलिस भरती २०१९ – ८७ जागा 
  5. औरंगाबाद पोलिस भरती २०१९ – २४ जागा 
  6. बीड पोलिस भरती २०१९ – ३६ जागा
  7. सांगली पोलिस भरती २०१९ – ७७ जागा 
  8. ठाणे शहर पोलिस भरती २०१९ – ११६ जागा 
  9. सोलापूर ग्रामीण पोलिस भरती २०१९ – ४१ जागा 
  10. अकोला पोलिस भरती २०१९ – ३४ जागा
  11. अमरावती पोलिस भरती २०१९ – १९ जागा 
  12. भंडारा पोलिस भरती २०१९ – ३६ जागा 
  13. बुलढाणा पोलिस भरती २०१९ – ५२ जागा 
  14. जालना पोलिस भरती २०१९ – २५ जागा 
  15. उस्मानाबाद पोलिस भरती २०१९ – ३३ जागा 
  16. रत्नागिरी पोलिस भरती २०१९ – ४४ जागा 
  17. सिंधुदुर्ग पोलिस भरती २०१९ – २० जागा 
  18. वर्धा पोलिस भरती २०१९ – ३७ जागा 
  19. मुंबई रेल्वे पोलिस भरती २०१९ – १८ जागा 
  20. रायगड पोलिस भरती २०१९ – २७ जागा 
  21. पुणे SRPF ग्रुप 1 पोलिस भरती २०१९ – ७४ जागा 
  22. पुणे SRPF ग्रुप 2 पोलिस भरती २०१९ – २९ जागा 
  23. दौंड SRPF ग्रुप 5 पोलिस भरती २०१९ – ५७ जागा 
  24. दौंड SRPF गट 7 पोलिस भरती २०१९ – ४३ जागा 
  25. नागपूर SRPF ग्रुप 4 पोलिस भरती २०१९ – ११७ जागा 
  26. नवी मुंबई पोलिस पोलिस भरती २०१९ – १०३  जागा 
  27. नवी मुंबई SRPF गट 11 पोलिस भरती २०१९ – २७ जागा 
  28. औरंगाबाद SRPF गट 14 पोलिस भरती २०१९ – १७ जागा 
  29. गोंदिया SRPF गट 15 पोलिस भरती २०१९ – ३८ जागा 
  30. अकोला SRPF ग्रुप 18 भरती २०१९ – १७६ जागा
  31. जळगाव SRPF गट 19 पोलिस भरती २०१९ – २५० जागा

Important Links Regarding Police Recruitment 2019





Police Bharti 2020 for 8757 Posts

Maharashtra Police Bharti 2020 : As per the latest news various news papers source the Police Bharti process for 8757 vacancies will be started soon. Probably After the election of vidhansabha the Police Recruitment Mega Bharti 2019. Currently 3450 constable recruitment online process was complete still the various vacant posts has been needs to filled for Police Constable posts. Candidates continue their study and keep practice for written and physical examination. This Mega Recruitment Process will be held thorough the Mahapariksha.gov.in Portal.

Expressing satisfaction over the government’s efforts to fill the vacant posts of the police force in the state, the Bombay High Court has directed the state government to take steps to fill the vacant posts of Assistant Police Deputy Inspector General, Head Constable, Police Nayak and Constable at the earliest. 

महाराष्ट् पोलीस विभागामध्ये कॉन्स्टेबल, पोलिस नायक, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदांच्या एकूण ८७५७ रिक्त जागांची भरती होणार आहे. याबद्दलची अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Vacancy Details :

  • Total No. of Approved Posts : 2 lakh 19 thousand 268 Posts
  • Currently Filled Posts (Currently Working) : 2 lakh 7 thousand 725 Posts
  • Total Vacant Posts : 11 thousand 543 Posts

Maharashtra Police Bharti 2020 – Notification

Maharashtra Police Vacancies 2020

At present, only five percent of the positions approved in the state are vacant. The government is also trying to fill it. As per news Out of a total 11543 vacancies, 8757 posts belong to the Constable, Police Chief, Head Constable and Assistant Police Sub-Inspector. The process is underway to fill the vacant posts of the Deputy Inspector General of Police. Further details are available soon.

Police Bharti Practice Paper Set

Important Links of Police Bharti 2019

Other Related Links :




17 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *