Maharashtra Teachers Recruitment 2021

Shikshak Bharti 2021

२०६२ रिक्त शिक्षक पदांसाठी मुलाखतीसह पद भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे

Teachers recruitment process for class 6th to 12th directily will be held through the interview. Pavitra Portal orginised the all arrangement. 561 schools are involved in this teachers recruitment process. total 2062 Teachers vacancies will be filled through the interview. This complete process will be started from 13th September to 14th October 2021 from the Pavitra Portal Login. Read the details given below and keep visit on our website. www.mahagov.info.

इयत्ता सहावी ते बारावीच्या शिक्षकांच्या रिक्त पदांवर मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत सुरू करण्यात आल्याने शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या अंतर्गत एकूण ५६१ शाळा व्यवस्थापनांच्या दोन हजार ६२ रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पद भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी मुलाखतीशिवाय पदभरतीची कार्यवाही पूर्ण केलेली आहे. आता मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही राबविण्यात येत आहे. यात शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील आपल्या लॉगिनमध्ये जाऊन गुणवत्तेनुसार संबंधित पात्र ठरत असलेल्या संस्थेकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

संबंधित व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरीता १:१० या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शाळा व्यवस्थापनांकडून मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही १३ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Teachers Selection Process शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांसाठी सूचना :

 • – उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील
 • – उमेदवारांची अंतिम निवड व्यवस्थापनाकडून या ३० गुणाच्या आधारे होईल
 • – गुणवतेनुसार जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रमावर उमेदवाराची ‘पवित्र पोर्टल’मार्फत त्या-त्या व्यवस्थापनांकडे होईल शिफारस
 • -निवड प्रक्रियेबाबत काही अडचणी असल्यास संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांशी संपर्क साधावा.
 • – उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या ‘[email protected]’ या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

The process for recruitment of teachers in the state has started and in the first phase 2062 vacancies are being filled. A total of 3902 candidates have been recommended for the interview, announced the state’s school education minister Varsha Gaikwad. This recruitment is being done through the sacred portal.

Teacher Recruitment : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी एकूण 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. राज्यातील शिक्षकपद भरतीसाठी प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात 2062 रिक्त पदं भरण्यात येत आहेत. त्यासाठी एकूण 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. ही शिक्षकपद भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संबंधी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, “पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”

सुमारे सहा हजार शिक्षकपदं भरण्यात येणार

राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदं भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डीएलएड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

डिसेंबर, 2017 मध्ये आयोजित केलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12 हजार 70 शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 5 हजार 970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, 2020 मध्ये पूर्ण झाली आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असे वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती. मात्र शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, यांनी पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने शिक्षण सेवक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, वित्त  विभागाने शिक्षण सेवक पदाच्या प्रलंबित भरतीसाठी मान्यता दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शासकीय नोकऱ्यांमधील नियुक्त्या देताना एसईबीसी आरक्षण रद्दबातल ठरवले आहे. त्या अनुषंगाने विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवक पदांसाठीच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही शालेय शिक्षण विभागामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.


Maha TET 2021 Online Registration started now

Maharashtra Teacher Eligibility Test will be held on 10th October 2021. The Teacher Eligibility Test (TET) is being conducted after a long period of time. The test was postponed due to corona virus infection. The registration process for the TET exam is starting from 3rd August 2021. All other importat details are given here. 

Maha TET 2021 Online Registration Steps

 1. The following are the steps for registration and application for the Maharashtra Teacher Eligibility Test as mentioned below.
 2. Online registration.
 3. Portal login.
 4. Filling the application form.
 5. Verify the information in the application.
 6. aying online exam fees Printing of application form

आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. टीईटी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे.

Maha TET नोंदणीला आज पासून सुरुवात …! येथे संपूर्ण वाचा आणि ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करा…


The Department of Education has been moving fast to announce the selection list of candidates for the interview by the end of July for the recruitment of teachers in private aided schools implemented through the sacred portal.

MAH TET 2021- MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला; 2 टप्प्यात परीक्षा होणार

पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी जुलै अखेर मुलाखतीसाठीची उमेदवार निवड यादी जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने जलद गतीने हालचाली सुरू ठेवलेल्या आहेत.

राज्य शासनाने 12 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली होती. यात आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलाखतीशिवायची भरती करण्यात आली. यात 6 हजार शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्‍त्या मिळालेल्या आहेत. आता 900 खासगी शैक्षणिक संस्थांमधील 2 हजार 500 शिक्षकांची रिक्त पदे मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार असून 30 गुणांसाठी मुलाखती होणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ही मुलाखत प्रक्रिया पूर्ण करुन पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे.

पवित्र प्रणालीमार्फत 3 हजार शिक्षण सेवकांची पदे भरणार

शिक्षण विभागाकडून या भरतीसाठी मुलाखतीकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याचे काम सुरु असून ती बारकाईने तपासण्यातही येत आहे. लवकरच पवित्र पोर्टलवर या भरतीबाबच्या सवीस्तर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे.

शिक्षण विभागाकडून खासगी संस्थांना मुलाखती घेण्यासाठी ठराविक कालावधी निश्‍चित करुन देण्यात येणार आहे. याच कालावधीत वेळापत्रक तयार करुन उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे बंधनही घालण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये मुलाखतीची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन सप्टेंबरमध्ये शिक्षकांना नियुक्‍त्या द्याव्या लागणार आहेत.

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय झाला आहे. 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (Maha-TET) घेण्यात यावी यासंदर्भात शिक्षण विभागाकडून राज्य शिक्षण परिषदेला निर्देशही देण्यात आले आहेत.


Shikshak Bharti 2021 updates

As per the lastest news More than 6,000 teacher posts for various subjects, which have been vacant in school vacancies for the last several years, will soon be filled. School Education Minister Varsha Gaikwad has given information about this today. He said that the quality of education in the state would be taken into consideration while selecting new teachers, adding that all these processes would be implemented through a sacred system to bring transparency in the recruitment process.

सहा हजार शिक्षकांची रिक्त पदे भरणार

 मागील अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित आदी शाळांचे रिक्त (School Vacancies) असलेली विविध विष्यानाची सुमारे 6 हजाराहून अधिक शिक्षकांची पदे (Teacher Post) लवकरच भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करून नवीन शिक्षकांना (New Teacher selection) निवड करताना त्यांच्या गुणवत्तेचा विचार प्रामुख्याने केला जाणार आहे, आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता (Positivity in vacancies) आणण्यासाठी ही सर्व प्रक्रिया पवित्र प्रणालीच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शिक्षक भरती २०२१ -पवित्र प्रणालीमार्फत 3 हजार शिक्षण सेवकांची पदे भरणार

शिक्षकांची ही भरती प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या,खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) असलेल्या रिक्त पदांवर केली जाणार आहे.

डिसेंबर, 2017 मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12 हजार 70 शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 5 हजार 970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी,2020 मध्ये पूर्ण झाली आहे. मात्र, पुरणाच्या पार्श्वभूमीवर नवीन भरती करण्यास बंदी असल्याने त्यासाठी ती कारवाई थांबली होती अशी माहिती देण्यात आली.


Shikshak Bharti 2021 updates

प्राध्यापकांच्या 3064 रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु

Higher and Technical Education Minister Uday Samant assured that the recruitment process for the 3,064 vacancies that had stalled during the Corona period would begin soon. On behalf of Net-Set PhD Eligible Struggle Committee, agitation was being organized in front of Directorate of Higher Education, Pune office from 21st June 2021 regarding various demands.

पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अखेर सुरु!!

करोनाच्या काळात थांबलेली 3 हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीने 21 जून 2021 पासून विविध मागण्यांच्यासंदर्भात उच्च शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी वर्गा सोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

उच्चस्तरीय समितीच्या वतीने एकून ४,०७४ प्राध्यापकांच्या जागांच्या भरतीला मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी १,६७४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण करण्यात आलेली आहे. या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

वित्त विभागाकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून मान्यता घेतल्यानंतर भरती संदर्भात लवकरच शासन निर्णय काढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 2020 या वर्षापर्यंत एकूण रिक्त पदे गृहित धरुन 700 पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले. 2020 या वर्षापर्यंत प्राध्यापकांची किती पदे रिक्त आहेत याबाबतच दोन महिन्यात सर्वेक्षण करुन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मागणीच्या अनुषंगाने ४८ मिनिटांची तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सीएचबी संदर्भात निर्णय घेण्यासाठी संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

संवर्गनिहाय धोरणासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, आदिवासी कल्याण मंत्री व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री यांची समिती स्थापन करुन लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगत यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.


ZP Shikshak Bharti 2021

There are 23 thousand 435 vacancies for teachers in Zilla Parishad schools.there is a need to adjust these additional teachers and implement a new teacher recruitment process for the remaining vacancies. Read More details as given below.

ZP शिक्षक भरती 2021- 23 हजार जागा रिक्त

 राज्यात एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार ४३५ जागा रिक्त (23,000 vacancies for teachers) आहेत. त्याचा परिणाम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमावर होत आहे. शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतही अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

एकीकडे अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठी असताना दुसरीकडे रिक्त पदांची संख्या त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित रिक्त जागांवर नव्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. खासगी शाळेतील शिक्षकांचे जि. प. शाळेत समायोजन करण्यास जि. प. प्राथमिक शिक्षक संघटनांचा विरोध आहे

राज्यातील हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गाचे एकही पद रिक्त नाही. मात्र, सहावी ते आठवीच्या वर्गासाठी असलेल्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. चंद्रपूर ७८१, हिंगोली ७४०, अकोला ७२१, नागपूर ५९८, गडचिरोली ५४१, अमरावती जिल्हात गटशिक्षणाधिकारी १४, शिक्षण विस्तार अधिकारी ३५, केंद्रप्रमुख १००, उच्चश्रेणी मुख्याध्यापक १००, विषय शिक्षक २६० सहायक शिक्षक ४२० यांचा समावेश आहे.

झेडपीच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे

 • पहिली ते पाचवी : ८,२६१
 • सहावी ते आठवी : १४,९९५
 • नववी ते दहावी : १७९

एक हजारापेक्षा जास्त पदे रिक्त असणारे जिल्हे

 • पालघर : १,५१९
 • यवतमाळ : १,४०६
 • नाशिक : १,२८०
 • पुणे : १,२१५
 • नांदेड : १,१९७
 • जालना : १,१२५

‘सर्व शिक्षा अभियान’ या नावाने शासनाची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही – शिक्षण परिषदेचा खुलासा

Sarva Shiksha Abhiyan Recruitment 2021 : The recruitment process for the posts of Primary Teacher, Junior Teacher, Karyalaya Staff, Chaprasi is underway on the website of Sarva Shiksha Abhiyan (http://shikshaabhiyan.org.in/index.php). Rahul Dwivedi, State Project Director, Maharashtra Primary Education Council, said in a letter that the website and the recruitment process published on the website have nothing to do with the state government, Maharashtra Primary Education Council, Mumbai office, Samagra Shiksha Yojana. Confusing news in this regard was spread through various media.

सर्व शिक्षा अभियानाच्या (http://shikshaabhiyan.org.in/index.php) संकेतस्थळावर Primary Teacher, Junior Teacher, Karyalaya Staff, Chaprasi या पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे संकेतस्थळावर दिसून येते. या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी, समग्र शिक्षा योजनेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी एका पत्राद्वारे केला आहे. यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारे वृत्त विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित झाले होते.


TET Certificate Validity Update: आयुष्यभर राहील प्रमाणपत्राची वैधता

पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरती अखेर सुरु!!

From last few years Pavitra Portal Shikshak Bharti Process had stopped. Now this process has finally started. The list for 196 vacancies without an interview has been announced on the 14th May on Pavitra Portal. These vacancies were due to candidates who were disqualified in the verification of documents, absent for verification of documents, did not appear within the stipulated time despite the appointment order. Read the details given below:

गत काही महिन्यांपासून विविध कारणांनी रखडलेली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती अखेर सुरू झाली आहे़. १४ मे राेजी पवित्र पाेर्टलवर मुलाखतीशिवाय रिक्त राहिलेल्या १९६ जागांसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे़. कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले, कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले, नियुक्ती आदेश देऊनही विहित मुदतीत रुजू न झालेले उमेदवारांमुळे या जागा रिक्त राहिल्या हाेत्या़.

पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांतील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी उमेदवारांची पात्रता पडताळणी करून पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत.

विहित मुदतीनंतर कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले, कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले, नियुक्ती आदेश देऊनही विहित मुदतीत रुजू न झालेले उमेदवार अशा एकूण १९६ रिक्त जागांवर पवित्र पोर्टलमधील यादीतील गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार संबंधित व्यवस्थापनाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यासाठी ही फेरी घेण्यात आली आहे़ १४ मे राेजी निवड यादी जाहीर करण्यात आली असून उमेदवारांना नियुक्ती मिळालेल्या संस्थेमध्ये रुजू व्हावे लागणार आहे़.


Teacher recruitment in the state has been postponed due to the cancellation of Maratha reservation given by the state government to the Maratha community in education and recruitment. It is learned that the teacher recruitment process will not take place unless a new order is issued by the state government.

पवित्र पोर्टलद्वारेची शिक्षक भरती आणखी लांबणीवर

Updated on 13.05.2021: सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरभरतीमध्ये दिलेलं मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यातील शिक्षक भरती लांबणीवर पडली आहे. राज्य सरकाचे नवे आदेश आल्याशिवाय शिक्षक भरतीची प्रक्रिया केली जाणार नाही अशी माहिती आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या लेखा व कोषागार विभागातील लिपीक आणि लेखापाल भरतीवर देखील परिणाम होणार आहे. ( Supreme Court cancelled Maratha reservation impact on Teacher Recruitment)

एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 3479 शिक्षक पदाची भरती

3 हजार शिक्षकांची भरती प्रस्तावित

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शिक्षक भरतीला ब्रेक लागलेला आहे. राज्य शासनाचे आदेश आल्याशिवाय शिक्षक भरती होणार नाही. मे आणि एप्रिल महिन्यात राज्यातील 3 हजार शिक्षकांची भरती प्रस्तावित होती. मात्र, मराठा आरक्षण रद झाल्याने भरती प्रक्रीया कधी होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पवित्र पोर्टलमध्येही तांत्रिक अडचणी

शिक्षक भरती होणाऱ्या पवित्र पोर्टलमध्येच तांत्रिक अडथळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. शिक्षण संचालनालयाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आलं होतं.


शिक्षण विभागाची चक्क 50 टक्के पदे रिक्त…– अपडेट २० एप्रिल २०२१

एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 3479 शिक्षक पदाची भरती

लवकरच शिक्षक भरती ५८०० जागा रिक्त

As per the news published in newspaper Teacher recruitment will be held soon for 5800 vacant seats. More details regarding this are given below, keep visit our website for the further updates.

जिल्ह्यात पेसा भागातील शिक्षकांच्या १८०० हून अधिक रिक्त

The administration has informed that there are more than 1800 vacancies in the Zilla Parishad is still vacant. Since the recruitment of teachers after the year 2010, the dream of many D.Ed, B.Ed graduates to become teachers has remained unfulfilled. There are more than 1800 vacancies for teachers in Pesa area in the district and more than 350 tribal youth who have passed the teacher qualification examination are waiting for jobs. Out of 363 vacancies for Zilla Parishad schools, 140 candidates were selected from 318 PESA constituencies. 

जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी ३६३ रिक्त जागांपैकी ३१८ पेसा क्षेत्रातील जागांमधील १४० उमेदवारांची निवड करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये १८०० पेक्षा अधिक पेसा क्षेत्रातील जागा रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सन २०१० नंतर शिक्षक भरती झाली नसल्याने अनेक डी.एड, बी.एड उत्तीर्ण पदवीधरांना शिक्षक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. जिल्ह्यात पेसा भागातील शिक्षकांच्या १८०० हून अधिक रिक्त जागा असून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले ३५० पेक्षा अधिक आदिवासी तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती पुढील महिन्यात होणार !

शिक्षक भरती अंतर्गत पवित्र पोर्टलंद्वारे खासगी शाळांमधील मुलाखतीसह शिक्षक भरती एप्रिल-मेमध्ये होणार आहे. यात 950 खासगी शाळांमधील 3 हजार पदे भरण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या शिक्षक भरती अंतर्गत, पहिल्या टप्प्यात मुलाखतीशिवायची गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरती करण्यात आली. यात 5 हजार 970 उमेदवारांच्या शाळांमध्ये नियुक्‍त्यांसाठी शिफारस केल्या आहेत. तसेच यातील अपात्र, गैरहजर या कारणामुळे 1 हजार 500 उमेदवार प्रत्यक्षात शाळांमध्ये रुजू होऊ शकले नाहीत. माजी सैनिकांच्या जागांसाठी पुरेसे उमेदवार मिळालेच नाहीत. यामुळे या जागा कन्व्हर्ट करण्यात येणार आहेत.

पवित्र पोर्टलद्वारे 12 हजार शिक्षकांची भरतीची घोषणा केली होती. उमेदवारांची बऱ्याचदा झालेली आंदोलने, पवित्र पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे, धोरणात्मक बांबीवरील प्रलंबित निर्णय या अडथळ्यातून मार्ग काढत पाठपुरावा करत शिक्षण आयुक्‍त यांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्याला सतत प्राधान्य दिले आहे.


नाशिक- जिल्ह्यात प्रा‌थमिक शिक्षकांची चारशे पदे रिक्त

The number of pre-primary and primary schools in Nashik district is about 3266 for which 11655 teachers have been appointed. It had more than 600 vacancies. Before the lockdown was announced in March due to corona, the government had filled the posts of about 242 teachers through the Pavitra Portal for Nashik district. But about 400 posts are still vacant. Read the complete details here.

नाशिक जिल्ह्यात पूर्व प्रा‌‌थमिक व प्राथमिक शाळांची संख्या जवळपास ३२६६ इतक्या असून, त्यासाठी ११६५५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात जवळपास सहाशेहून अधिक पदे रिक्त होती. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी शासनाने सुमारे २४२ शिक्षकांची पदे शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरून नाशिक जिल्ह्यासाठी दिले होते. परंतु सुमारे चारशे पदे अद्याप अजून रिक्तच आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून केली जाणारी शाळांची पट पडताळणीही होऊ शकलेली नाही. शाळांची पट संख्या निश्चित केल्यानंतर त्याच्या आधारे शिक्षकांची पदे शाळानिहाय निश्चित केली जातात. साधारणत: ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक देण्यात येतो. त्यानंतर मात्र विद्यार्थी संख्येचा आधार घेऊन कमीत कमी एका शाळेला दोन शिक्षक दिले जावेत असा शिक्षण विभागाचा दंडक आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळांची पटसंख्या ऑनलाईन भरून त्या आधारे शिक्षकांची पदे मान्यता देण्यात येत असले तरी, यंदा शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे संचमान्यता न झाल्याने शिक्षकांची संख्या निश्चित होऊ शकली नाही. परिणामी शिक्षकांचे समायोजनही रखडले आहे.जिल्ह्यात शिक्षकांची चारशे पदे रिक्त असली तरी, अलीकडेच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यांकडून मंजूर पदे व रिक्त पदांची माहिती मागविली आहे. राज्यातील बीड, परभणी आदी जिल्ह्यात शिक्षकांची अतिरिक्त पदे असल्याने त्यातून शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.


Shikshak Bharti 2021: This is a golden opportunity to get a job in the education department. In the education department, 266 posts have been recruited for the post of Junior Clerk. Direct recruitment will be done in the education department. School Education Minister Varsha Gaikwad has informed about this by tweeting

३० जानेवारी २०२१ अपडेट शिक्षण विभागात सरळसेवा भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) 31 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येईल.

CTET 2021: ‘सीटीईटी’ परीक्षेचं ऍडमिट कार्ड प्रसिद्ध; परीक्षा 31 जानेवारीला होणार

सीटीईटी २०२1 परीक्षा अपडेट्स

३१ हजार टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची प्रमाणपत्रे मुदतबाह्य

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे.


Shikshak Bharti 2021 updates

सहा हजार शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांची टि्वटरद्वारे घोषणा

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) 31 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येईल.

CTET 2021: ‘सीटीईटी’ परीक्षेचं ऍडमिट कार्ड प्रसिद्ध; परीक्षा 31 जानेवारीला होणार

सीटीईटी २०२1 परीक्षा अपडेट्स

३१ हजार टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची प्रमाणपत्रे मुदतबाह्य

The state government had started teacher recruitment through the sacred portal. Out of the total 12 thousand posts, 6 thousand posts have been filled. The recruitment of the remaining 6,000 posts is still vacant. About three and a half thousand posts will be filled with interviews and two and a half thousand posts without interviews. Earlier, recruitment was delayed due to various reasons, after which all types of recruitment were stopped in Corona. The state government has decided to lift the ban and start the process once again through the sacred portal in a meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar.

Ratnagiri Teachers Recruitment 2021

भावी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण ; भरतीवरील बंदी उठली…

पवित्र पोर्टलवरून शिक्षकभरती करण्यावरील बंदी उठवण्यात आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक उपलब्ध होणार आहेत. जिल्हा परिषद शाळांसह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून विद्यार्थ्यांचे नुकसान आता टळेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात परजिल्ह्यातील शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तीन वर्षे नोकरी करून ते आंतरजिल्हा बदलीने गावाकडे जातात. परिणामी शिक्षकांची वानवा निर्माण होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या भरतीसाठी पवित्र पोर्टलचा पर्याय वापरण्यात आला; मात्र २०१७ पासूनची ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही; परंतु यात जि. प. शाळा आणि हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. ९ ऑगस्ट २०१९ ला एक निवड यादी प्रसिद्ध झाली; मात्र मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेची यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

आरक्षणातील रिक्त जागा, विषय शिक्षकांच्या जागा व इतर रिक्त जागांसाठी भरती करण्याची प्रक्रिया सुरू असताना कोविड संकटाने भरती स्थगित झाली. आता कक्ष अधिकारी कविता तोंडे यांच्या ७ डिसेंबरच्या पत्रान्वये पवित्र प्रणालीवरील बंदी उठविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भावी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा बिंदुनामावली घोटाळा नाही. राज्यातील इतर ठिकाणी घोटाळा असल्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागा अतिरिक्त ठरत आहेत, त्या शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यात करू नये. नवीन उमेदवारांनाच संधी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील स्थानिकांतून होत आहे. मागासवर्गीय उमेदवारांची ५० टक्के पदे कपात केल्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील सातशे ते आठशे पदे अद्याप रिक्त आहेत. या पदांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत, अशी मागणी होत आहे.


शिक्षक भरतीचं परिपत्रक काढलं, आता वेळापत्रक जाहीर करा; शिक्षक संघटनांची मागणी

राज्य सरकारने आता संच मान्यतेचे काम सुरू केले आहे, त्याचा परिणाम शिक्षक भरतीवर होऊ नये. जेवढ्या जागा ठरल्या आहेत त्याची त्वरीत भरती करण्यासाठी त्याचा कार्यक्रम जाहीर करावा. आधीच दोन अडीच वर्ष वाया गेल्याने त्याचा परिणाम उमेदवार आणि शिक्षण पद्धतीवर होत आहे. कोरोनानंतर प्रत्यक्षा शाळा सुरू होण्याची तयारी सुरू असताना नवे शिक्षकही उपलब्ध व्हावेत, अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनांनी दिली आहे. राज्य सरकारने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू केली होती. त्यामध्ये एकूण 12 हजार पदांपैकी 6 हजार पदे भरली गेली आहेत. उर्वरीत 6 हजार पदांची भरती रखडली आहे. यामध्ये सुमारे साडे तीन हजार पदे मुलाखतीसह तर मुलाखतीशिवाय अडीच हजार पदे भरली जाणार आहेत. यापूर्वी भरती सुरू असताना त्यास अनेक कारणांनी उशीर झाला, त्यानंतर पुन्हा कोरोनामध्ये सर्व प्रकारची भरती बंद करण्यात आली. राज्य सरकारने ही बंदी उठवत पुन्हा एकदा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याबाबत शिक्षण विभागाने मंगळवारी (ता.8) परिपत्रक काढले, पण भरतीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड म्हणाले, “शिक्षक भरती रखडली असल्याने अर्जदार वैतागलेले आहेत. यापूर्वी कोर्ट कचेऱ्या व इतर करणांमुळे भरती लांबलेली होती, आता अशा अडचणी येऊ नयेत यासाठी शासनाने त्वरीत वेळापत्रक जाहीर करून प्रक्रिया पूर्ण करावी व संस्थांना संबंधित शिक्षकांची नावे पाठवून द्यावेत. राज्यातील शाळा सुरू होत असताना अपुऱ्या शिक्षकांमुळे एक शिक्षक दोन तीन विषय शिकवत आहे, नवे शिक्षक भरले तर विद्यार्थी व शिक्षक यांना दिलासा मिळेल. त्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर करून लवकर भरती करावी.”

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महसंघाचे सचिव संतोष फासगे म्हणाले, “एकीकडे शिक्षक भरतीची घोषणा केलेली असताना दुसरीकडे शाळेतील विद्यार्थी संचाची मान्यतेची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थी शाळेत गेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी झाल्याचा परिणाम शिक्षक भरतीवर होऊ नये. सरकारने भरती वरील बंदी उठवली असली तरी त्याचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही, ती प्रक्रिया जाहीर केल्यास उमेदवारांना दिलासा मिळेल.”

सौर्स : सकाळ


The state government had imposed restrictions on the recruitment process due to Corona. But now the recruitment of “Shikshak Sevak” has been approved and initially 6,000 Posts will be recruited. These candidates were selected in July 2019. This will bring relief to these candidates who are waiting for appointment despite being appointed. The teacher recruitment process in primary, secondary and higher secondary schools in the state will be stared soon. The decision was taken at a meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar, Education Minister Varsha Gaikwad said in a tweet. Corona had banned government recruitment in connection with the financial measures it had taken on the economy. However, in a recent meeting, the Teacher – Shikshak Sevak recruitment through the Pavitra portal has been exempted from the ban. This has given the green signal to this recruitment. Read the complete details given below:

Teachers Vacant Posts Details:

 • स्थानिक स्वराज्य संस्था – 7 हजार 888
 • खाजगी संस्था – 4 हजार 252
 • एकूण जागा – 12 हजार 140
 • मुलाखतीशिवाय पदभरतीच्या जागा – 9 हजार 129 त्यातील 5 हजार 822 उमेदवारांच्या नियुक्तीसाठीची यादी जुलैमध्ये प्रसिद्ध

कोरोनामुळे सरकारी नोकर भरती प्रक्रियेवर राज्य सरकारने बंधने आणली होती. मात्र आता शिक्षण सेवक भरतीला मान्यता मिळाली असून सुरुवातीला सहा हजार शिक्षण सेवकांची भरती होणार आहे. या उमेदवारांची निवड जुलै 2019 मध्ये करण्यात आली होती. यामुळे नियुक्ती होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वटद्वारे जाहीर केले आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सरकारी पदभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीत पवित्र पोर्टलद्वारे सुरू असेलेली शिक्षक सेवक सरळसेवा पदभरती बंदीतून वगळण्यात आली आहे. यामुळे या भरतीला हिरवा कंदील मिळाला आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील जवळपास 12 हजार 140 शिक्षण सवेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने ही पदभरती होत आहे. मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी पाच हजार 822 उमेदवारांची यापूर्वीच निवड करण्यात आली होती. मात्र त्यांची नियुक्ती रखडली होती. त्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. तर उर्वरित जागांवरील भरतीसाठी ही प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षण सेवक पदांच्या भरतीला राज्य सरकारने विशेष परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात त्यासाठीच्या अंतर्गत बाबींची पूर्तता करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया नवीन वर्षात सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले.

SEBC Arakshan एसईबीसी आरक्षणाबाबत स्पष्टता हवी

राज्य सरकारने प्रवेश देताना ‘सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरीता’(एसईबीसी) आरक्षित जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेतला. या पदभरतीमध्येही एसईबीसी प्रवर्गात जागा राखीव होत्या. प्रवेश प्रक्रिया आणि पदभरती यात फरक असल्याने सरकारने याबाबत अधिक स्पष्टीकरण करावे अशी मागणी प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे समजते. याबाबत खुलासा झाल्यानंतरच तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रक्रिया पुढे सुरू होईल.

सौर्स : सकाळ


Teachers Recruitment 2020: School Education Minister Vinod Tawde decided to fill 12,400 posts of class I to XII teachers in the state. However, the recruitment of 6,000 posts was completed. There are a large number of vacancies in the state education department. There are a large number of vacancies in the state education department. However, about 17,000 schools with a score of 10 to 20 will be relocated to other schools. It is now being speculated that more than ten thousand teachers will be added to these schools. The economic condition of the state is also in trouble due to Corona. Therefore, the finance department has instructed not to recruit new posts in any department other than medical. Therefore, even though the posts of teachers are vacant, the decision to recruit new teachers will not be taken immediately.

मोठी बातमी! राज्यात सहा हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे पदभरती

तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची 12 हजार 400 पदे भरण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यापैकी सहा हजार पदांची भरती पूर्ण झाली. उर्वरित पदभरतीवर वित्त विभागाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक परिस्थितीचे कारण देत बंदी घातली. आता 3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या पदभरतीवरील बंदी उठविली. त्यानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेली शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

 राज्यातील शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्‍त आहेत. तरीही दहा ते 20 पटसंख्या असलेल्या सुमारे साडेसतरा हजार शाळांचे अन्य ठिकाणच्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. आता या शाळांवरील सुमारे दहा हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्‍त होतील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यातच कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थितीही अडचणीतच आहे. त्यामुळे वित्त विभागाने वैद्यकीय वगळता अन्य कोणत्याही विभागातील नवी पदभरती करु नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांची पदे रिक्‍त असतानाही नव्या शिक्षक भरतीचा निर्णय तुर्तास होणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.

शिक्षणसेवकांच्या मानधन वाढीचा निर्णय नाहीच 
पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकांना दरमहा सहा हजार रुपयांवर सलग तीन वर्षे काम करावे लागत आहे. तर नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना नऊ हजारांचे मानधन दिले जाते. वाढत्या महागाईच्या काळात तेवढ्या रकमेवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही भागू शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शिक्षणसेवक पद रद्द करा अथवा मानधनवाढीची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नसून शिक्षण आयुक्‍तांचा प्रस्तव वित्त विभागाकडे तसाच पडून आहे.

सोर्स: सकाळ


अतिरिक्‍त शिक्षकांमुळे शिक्षक भरती लांबणीवर !

सीटीईटी २०२1 परीक्षा अपडेट्स – उमेदवार आता 17 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत परीक्षेचे शहर बदलू शकतात, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

धक्कादायक! राज्यातील १० हजारांपेक्षा अधिक शिक्षक होणार ‘अतिरिक्त’, सरकारसमोर असणार समायोजनाचे आव्हान

A list of low-performing schools has been compiled and adjustments will be made to schools near these schools once Corona’s condition improves. However, at present there are thirteen hundred additional teachers in the state and about ten thousand new teachers will be added from the schools with low pass percentage. Therefore, a dilemma has arisen in front of the school education department as to how and where to adjust these teachers. The information of additional teachers in the state has been collected and they will be appointed in the vacancies in the respective subjects. Planning is underway to accommodate about thirteen hundred teachers in the state. Read the complete details carefully given below:

कमी पटसंख्या असलेल्या शाळांची शासनाने यादी तयार केली आहे. कोरोनाची स्थिती सावरल्यानंतर या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे सध्या राज्यात जवळपास 1300 शिक्षक अतिरिक्त असून कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील जवळपास 10 हजारावर शिक्षक नव्याने अतिरिक्त होणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून त्यांच्या समायोजनाचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे ठाकणार आहे. राज्यात 10 ते 12 पेक्षा कमी पटसंख्येच्या साडेसतरा हजार शाळा असून त्यात दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या चार हजार शाळांचा समावेश आहे. 20 पटापेक्षा कमी साडेतेरा हजार शाळा असून या शाळांमध्ये 29 हजार शिक्षक कार्यरत आहेत. शासनाच्या नव्या धोरणानुसार या शाळांवरील जवळपास 10 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी राज्यातील 24 जिल्ह्यामधील तेराशे शिक्षक अतिरिक्त ठरले असून अद्यापही त्यांचे समायोजन झालेले नाही. कोरोनामुळे सध्या पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंद असून पुढील वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. पर्यायाने शिक्षक भरती सुद्धा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Additional teachers by district – जिल्हानिहाय अतिरिक्‍त शिक्षक

 • मुंबई (297), दक्षिण मुंबई (124), उत्तर मुंबई (188), ठाणे (93), रायगड (6), पुणे (22), कोल्हापूर (16), सोलापूर (17), सांगली (2), सिंधुदुर्ग (5), जळगाव (12), धुळे (70), नंदुरबार (33), नागपूर (182), चंद्रपूर (53), वर्धा (10), गोंदिया (36), औरंगाबाद (24), जालना (10), बीड (51), लातूर (41), उस्मानाबाद (18), अकोला (15), वाशिम (4).

अतिरिक्‍त शिक्षकांच्या समायोजनेचे सुरू आहे नियोजन – राज्यातील अतिरिक्‍त शिक्षकांची माहिती संकलित केली असून, संबंधित विषयांच्या जागा रिक्‍त असलेल्या ठिकाणी त्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. राज्यात सुमारे तेराशे शिक्षकांचे समायोजन करण्याचे नियोजन सुरू आहे.

शिक्षक समितीचा विरोध –

आरटीई कायद्यानुसार कोणतीही शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेला बंद करता येत नाही. मुलांना 1 ते 3 किलोमीटरच्या आतच शिक्षण मिळणे आवश्‍यक आहे. गाव, वाड्या वस्त्या, आदिवासी दुर्गम भागातील शाळा बंद करता येणार नाही. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नये, असे निवेदन प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शासनाला देण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा कशा सुरू राहतील, याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शिक्षक समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

सौर्स : सकाळ


शिक्षक भरतीचा नव्या वर्षात सोक्षमोक्ष

The phase of recruitment of 4,500 teachers in schools through Pavitra portal has been delayed due to the process delay by state finance department. The code of conduct for graduate and teacher constituency elections has also been implemented. So now it is possible to leave this bitter new year. Pavitra Poral Started Teachers recruitment process for 12000 posts last year but due to the technical issue this process was stop. Read the details given below:

पुणे – पवित्र पोर्टलद्वारे शाळांमध्ये 4 हजार 500 शिक्षकांची भरती पूर्ण करण्याचा टप्पा राज्य शासनाच्या वित्त विभागाने ग्रीन सिग्नल न दिल्यामुळे रखडला आहे. त्यातच पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता हा तिढा नवीन वर्षातच सुटण्याची शक्‍यता आहे.
पारदर्शक शिक्षक भरतीसाठी “पवित्र पोर्टल’ ही प्रणाली विकसित करण्यात आली. याद्वारे 12 हजार पदांसाठी प्रक्रिया सुरु केली. मात्र, काहींना काही अडचणींमुळे त्यास विलंब होत गेला. अडथळ्यांचा सामना करत पात्र, गरजू व गुणवत्ताधारक नियमात बसणाऱ्या उमेदवारांना शिक्षकाची नोकरी मिळावी यासाठी शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांची धडपड सुरुच आहे. त्यासाठी शासनाकडे सतत ते पाठपुरावाही करत असतात. आतापर्यंत मुलाखतीशिवायची 6 हजार भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून हे शिक्षक शाळांमध्ये रुजूही झाले. मात्र, विविध कारणांमुळे 1 हजार 500 जागा रिक्‍त आहेत. याबरोबर 950 खासगी शाळांमधील 3 हजार शिक्षकांच्या मुलाखती घेऊन पदे भरण्याचे नियोजन केले होते. मात्र, ते कोलमडले आहे.

सौर्स : प्रभात


शिक्षक भरती प्रक्रिया अजूनही जैसे थे !

Due to the Corona, the government has decided not to recruit any new recruits this year. As a result, teacher recruitment with various government offices has also taken a break till March 2021. It is necessary to retain the teachers in the age group of 40 to 45 working in various subsidized schools in Belgaum Educational District this year. Otherwise, 167 teachers in the district, despite working for many years, will be hit hard by the age limit. Candidates read the complete details given below:

सरकारच्या निर्णयामुळे 167 शिक्षकांचे भवितव्य अधांतरी

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विविध अनुदानित शाळांमध्ये विनाअनुदानित काम करणाऱ्या 40 ते 45 वयोगटातील शिक्षकांना यावर्षीच सेवेत कायम करुन घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा जिल्ह्यातील 167 शिक्षकांना अनेक वर्षे नोकरी करुनही वयोमर्यादेमुळे मोठा फटका बसणार आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सरकारने यावर्षी कोणत्याही प्रकारची नवीन भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विविध सरकारी कार्यालयांसह शिक्षक भरतीलाही मार्च 2021 पर्यंत ब्रेक लागला आहे.

मात्र याचा सर्वाधिक फटका अनुदानित शाळांमध्ये अनेक वर्षांपासुन करणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे. अनुदानित शाळांमध्ये कायमस्वरुपी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या बेळगाव जिल्हातील अनेक शिक्षकांची मयोमर्यादा संपत आली आहे. शिक्षक भरतीसाठी सामान्य वर्गासाठी 40, ओबिसी 42 तर मागासवर्गीयांसाठी 45 अशी वयोमर्यादा आहे. जिल्ह्यातील 167 शिक्षकांची वयोमर्यादा यावेळी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यावर्षीच शिक्षक भरती होणे आवश्‍यक आहे. अन्यथा पंधरा ते विस वर्षे काम करुन देखिल शिक्षकांना नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.

भाषिक अल्पसंख्याकांच्या शाळांना रोष्टर पध्दत लागु करण्यात आल्यामुळे शिक्षक भरती झालेली नाही. त्याचा फटकाही विनाअनुदानित शिक्षकांन बसला आहे. काही महिन्यांपुर्वी रोष्टर हटविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात आलेली नाही त्यामुळे नाराजी व्यक्‍त होत आहे. तसेच सरकारच्या भुमिकेमुळे काही अनुदानित शाळांमध्ये फक्त एक दोनच शिक्षक कायमस्वरूपी असून बाकीच्या शिक्षकांना संस्थेतर्फे मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सौर्स : सकाळ


The government has reduced backward class posts in shikshak bharti, leaving about 4500 and 6500 vacancies. About 30,300 eligibility holders will get opportunity for 3,031 posts selected in preference order along with interviews; But the finance department has banned recruitment as per the government decision dated May 4, 2020. Students should not be harmed academically due to lack of teachers, so it is necessary to get permission from the Department of Education. The advertisements for 12,140 posts, which have been suspended for ten years, were published between February 22, 2019 and March 9, 2019. Of these, only 5 thousand 51 posts were filled. In reality, only 3 thousand 667 candidates appeared; However, as the next recruitment process is still going on throughout the year, there is an atmosphere of confusion and frustration, with more than one lakh brothers in the state waiting for the next selection list. Complete details are given below:

माजी सैनिक या अरक्षणांतर्गत रिक्त जागा त्याच प्रवर्गातील खुल्या प्रवर्गात रूपांतरित करून तसेच गैरहजर, अपात्र व रिक्त जागा तसेच रुजू न झालेल्या उमेदवारांमधून १४०० रिक्त पदांसाठी निवड यादी लागणे बाकी आहे. सरकारने मागासवर्गीय पदे कपात केली, त्यात सुमारे साडेचार ते सहा हजार पदे रिक्त आहेत. मुलाखतींसह पसंतीक्रम निवडलेल्या ३ हजार ३१ पदांसाठी सुमारे ३० हजार ३०० अभियोग्यता धारकांना संधी मिळणार आहे; परंतु वित्त विभागाने शासन निर्णय ४ मे २०२० अन्वये पदभरतीस बंदी घातली आहे. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ही शिक्षक भरती शिक्षण विभागास परवानगी मिळणे आवश्‍यक आहे; मात्र महाविकास आघाडी सरकार मागील सरकारप्रमाणेच शिक्षक भरतीबाबत नकारात्मक भूमिकेत आहे. दहा वर्षांपासून स्थगित भरतीच्या १२ हजार १४० पदांच्या जाहिराती २२ फेब्रुवारी २०१९ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांतील केवळ ५ हजार ५१ जागांचीच भरती झाली. प्रत्यक्षात मात्र ३ हजार ६६७ एवढेच उमेदवार हजर झाले; मात्र भरतीची पुढील प्रक्रिया वर्षभरानंतरही ‘जैसे थे’ असल्याने संभ्रमाबरोबरच नैराश्‍येचे वातावरण असून शिक्षक भरतीचे कागदी घोडे काही केल्या पुढे सरकत नसल्याने प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील सुमारे एक लाखाहून अधिक बांधव पुढील निवड यादीच्या प्रतीक्षेत आहेत. तरी अनेकांचे विहित केलेले वयोमान उलटत असल्याने बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

एनसीटीईने टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा आजन्म असल्याचे सूतोवाच केले होते. नुकतीच टीईटी परीक्षा एकदाच द्यावी लागेल, अशी घोषणाही करण्यात आली. त्यामुळे या आधी पात्र विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यातच वेळकाढू भरतीमुळे वयोमानासह पात्रता परीक्षेची मुदत सुद्धा समाप्त होत आली असल्याने विद्यार्थ्यांवर दुहेरी दडपण आहे. समांतर आरक्षण अंतर्गत उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त जागा त्या प्रवर्गातील खुल्या उमेदवारामधून भरल्या होत्या. तथापि उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील याचिकेचा ३ फेब्रुवारीचा न्यायालयीन आदेश विचारात घेऊन समांतर आरक्षणात ३५ उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करायची आहे.

शासन प्रतिकूल शिक्षक भरतीस विशेष परवानगी मिळावी म्हणून जीवन काकडे, संदीप कांबळे, संतोष मगर या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली; परंतु प्रशासन त्याबाबत काय भूमिका घेत आहे यावर सर्वांचे लक्ष लागून होते; पण पदरी निराशाच पडली. शिक्षणमंत्र्यांनी वेळ मारून नेण्याचे काम केले. भरतीचे तोंडी आश्‍वासन दिले; मात्र नेहमीप्रमाणे काहीच कार्यवाही झाली नाही. ही शिक्षक भरती २०२० ची नसून ती २०१९ ची असल्याने नवीन बंदीच्या नियमातून शिक्षक भरती वगळावी म्हणून अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे अभियोग्यता धारक पाठपुरावा करत आहे. वेळोवेळी निवेदने देत आहे.

ट्‌विटरद्वारे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत. तरी शिक्षण आयुक्तालयातून गेलेल्या प्रस्तावाला मान्यता देऊन न्याय द्यावा, अशी मागणी अभियोग्यताधारक करत आहेत. शाळा सुरू झाल्यशिवाय शिक्षक भरती कशी करता येईल? या वाक्‍याने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना विद्यार्थ्यांनी बरेच ट्रोल केले. तरी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आशा निर्माण झाल्या आहेत. राज्यातील इतर प्रश्‍न मार्गी लागत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष का करत आहेत? शिवाय ग्रामविकास मंत्र्यांचे लेखी आदेश असून त्यास कॅबिनेटला मान्यता का मिळत नाही? याप्रश्‍नी शिक्षणमंत्री गायकवाड यांची भूमिका डळमळीत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

शासनाचे उदासीन धोरण – कोरोना पार्श्‍वभूमीमुळे शाळा कधी सुरू होतील? याबाबत निश्‍चित कालावधी सांगता येत नसला तरी २०१९ पासून चालू असणाऱ्या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पवित्र या ऑनलाईन प्रणालीवरील सगळा डेटा तयार आहे. फक्त निवड यादी लागणे बाकी असताना शासनाच्या उदासीन धोरणामुळे नैराश्‍येचे वातावरण आहे. किमान या निवड याद्या लावाव्यात तसेच नियुक्‍त्या कोरोनाची स्थिती निवळून शाळा सुरू होतील तेव्हा द्याव्यात, अशी मागणीही होत आहे.

“राज्यातील शैक्षणिक स्थितीसाठी सध्या ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय ठेवला असून सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी थोडक्‍यात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मर्यादा येत असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाल्याचे दिसते. त्यामुळे शिक्षक भरतीस पर्याय नाही. तत्काळ प्रक्रिया पूर्ण करून निवड याद्या प्रसिद्ध कराव्यात. जिल्ह्यात पाचशेहून अधिक जागा रिक्त असताना पहिल्या टप्प्यात प्राथमिकची पदेच भरली नाहीत, ती भरावीत.” – भाग्यश्री रेवडेकर, अभियोग्यताधारक.

सौर्स : सकाळ


Good News for who dream of becoming teachers.

Earlier, the validity of TET was seven years. This means that from the time the candidates passed the examination, they were eligible to work as teachers in any government school for the next seven years. However, the NCTE has now decided that all teacher eligibility test certificates will be valid for life. This means that now the candidates who pass any exam will always be eligible to become government teachers.

शिक्षकांसाठी खुशखबर! NCTE ने घेतला TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय

CTET TET Validity: शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE) ने केंद्रीय शिक्षक पात्रता परिषद आणि अन्य शिक्षक पात्रता परीक्षांसंबंधी (TET) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एनसीटीईचा हा निर्णय लाखो उमेदवारांना मोठा दिलासा देणारा आहे. एनसीटीईने आता सेंट्रल टीचर्स एलिजिबिलीटी टेस्ट किंवा देशातील कोणत्याही अन्य राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेला आतापर्यंत असलेली सात वर्ष वैधतेची मर्यादा हटवली आहे. अलीकडेच एनसीटीईच्या ५० व्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी टीईटीची वैधता सात वर्षांची होती. म्हणजेच जेव्हा परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण होत, तेव्हापासून पुढील सात वर्षांपर्यंत कोणत्याही सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी करण्यास पात्र असत. मात्र एनसीटीईने आता हा निर्णय घेतला आहे की सर्व शिक्षक पात्रता परीक्षांचे प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध राहील. म्हणजेच आता जे उमेदवार कोणत्याही परीक्षेत यशस्वी होतील, ते नेहमी सरकारी शिक्षक बनण्यास पात्र राहतील.

ज्यांनी यापूर्वी टीईटी उत्तीर्ण केले, त्यांचे काय?

बैठकीत असं सांगण्यात आलं की जे पूर्वी टीईटी उत्तीर्ण झाले आहेत, ज्यांच्याकडे टीईटी क्वालिफाइड सर्टिफिकेट आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होणार नाही नाही यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. एनसीटीईने आता यासंबंधी कोणतेही औपचारिक परिपत्रक किंवा तत्सम सूचना जारी केलेली नाही. विविध राज्या पात्रता परीक्षांसाठी संबंधित राज्यांकडून नोटिफिकेशन जारी केले जाईल. त्याचवेळी सीबीएसई बोर्ड देखील अधिकृत संकेतस्थळावर लवकरच यासंबंधी घोषणा करतील. अधिकृत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर एनसीटीईद्वारे केलेला हा बदल लागू होणार आहे.


शिक्षक भरती प्रक्रिया तीन वर्षांपासून रखडलेलीच!

Teachers Bharti 2020 – Aptitude test for teacher recruitment was held in December 2107. The teacher recruitment process then started a few months ago. Recruitment process has started for about 12 thousand 147 posts in all government and private aided schools in the state. Recruitment process was implemented for 5 thousand 822 posts in last three years. There are still more than 6,000 vacancies. Read the complete details carefully given below :

शिक्षक भरतीसाठी डिसेंबर 2107 मध्ये अभियोग्यता चाचणी झाली. त्यानंतर शिक्षक भरतीची काही महिन्यांपूर्वी प्रक्रिया सुरू झाली. राज्यात सरकारी व खासगी अनुदानित अशा सर्व शाळांमध्ये सुमारे 12 हजार 147 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या तीन वर्षांत 5 हजार 822 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात आली. अद्याप सहा हजारांहून जागा रिक्‍त आहेत. शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा केल्यावर उमदेवारांना वित्त विभागाच्या पदभरती स्थगित करण्याबाबत असलेल्या निर्णयाचे कारण दिले जात आहे. या पत्रामुळे सध्या भरतीवर बंदी आहे. शालेय शिक्षण विभागाने अर्थ मंत्रालयाकडे विशेष परवानगी मागितली आहे. यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. शिक्षक भरती प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे रखडली आहे. भरतीच्या संथ प्रक्रियेबाबत पात्र उमदेवार हवालदिल झाले असून, संतप्‍त भावना व्यक्‍त होत आहेत.

शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्याने प्रचंड असंतोष आहे. शिक्षक भरतीस सूट देऊन पात्र हजारो उमेदवारांवरील अन्याय तत्काळ दूर करावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, यासाठी औरंगाबाद ते मुंबई मंत्रालयावर अन्‍नत्याग पायी दिंडी काढण्यात आली.

सरकारने तलाठी भरती प्रक्रियेस मान्यता दिली आहे. तीन वर्षांपासून शिक्षक भरती सुरू असून, ती पूर्ण होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. नुकतीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमवेत चर्चा झाली. वित्त विभागाशी चर्चा करून फाईलवर निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करू, भरतीचा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.

– संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डीटीएड, बी.एड.

स्टुडंट असोसिएशन


Shikshak Bharti 2021

सन २०१५ मध्ये आर्थिक काटकसरीचे कारण देत मागील सरकारने प्राध्यापक पदभरती प्रक्रिया बंद केली होती. त्यामुळे पात्रताधारकांच्या अनेक संघटनांनी मोर्चा, आंदोलने, निवेदन देऊन प्राध्यापक पदभरती सुरू करण्याची मागणी केली. पात्रताधारकांचा वाढता रोष पाहून तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जाचक अटींसह ४० टक्के प्राध्यापक पदभरतीला मान्यता दिली होती. परंतु याच काळात मराठा आरक्षण व आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीय आरक्षण जाहीर झाल्याने बिंदूनामावली निश्चित करण्यात बराच वेळ निघून गेला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता करोनामुळे  भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील पात्रताधारकांनी शिक्षक दिनी पदवी जलाव आंदोलनही केले.

राज्यात अठरा ते वीस हजार सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त !! मागण्या काय?

*    सहाय्यक प्राध्यापक पदाची पदभरती यूजीसीने ४ जून २०१९ रोजी काढलेल्या पत्रानुसार, १०० टक्के पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी.

*   यूजीसीच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्यात यावी

*   सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व २०१५च्या शासन निर्णयानुसार विषयनिहाय आरक्षणानुसार पदभरती करावी

*    राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात प्रचलित आरक्षणानुसार बिंदूनामावलीमधील राखीव प्रवर्गातील इमाव, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाचा अनुशेष प्रथम भरण्यात यावा

*   तासिका तत्त्वावरील नेमणुका बंद करण्यात याव्या, शंभर टक्के प्राध्यापक भरती होईपर्यंत तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना समान काम समान वेतन लागू करण्यात यावे.


वयामुळे निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आले नाहीत? तर हि  संधी उपलब्ध

पवित्र संके तस्थळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीसाठी खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी वयोमर्यादा लागू करण्यात आलेली होती. त्यामुळे वय जास्त असलेल्या अनेक उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. मात्र, आता महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम भरून देण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे

Teachers Bharti Process started now – pavitra portal

मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित न केलेल्या, आता नव्याने प्राधान्यक्रम देणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या समांतर आरक्षणाची (उदा. महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ) नोंद एकदाच करता येईल.

त्यामुळे समांतर आरक्षणामध्ये दुरुस्ती करता येणार नसल्याने उमेदवारांनी समांतर आरक्षणविषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित केलेल्या उमेदवारांनी  पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने पवित्र संके तस्थळाद्वारे दिली आहे.

सोर्स: लोकसत्ता


कोरोना संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार रोजगार

Teachers Recruitment 2020: कोरोना संकटाच्या काळात पदवीधर आणि पदव्युत्तर महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. एडटेक स्टार्टअप व्हाइटहॅट जुनियर (WhiteHat Jr) ने म्हटले आहे की, ते आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील महिला शिक्षकांची संख्या वाढवित आहेत. कंपनी प्लॅटफॉर्मवर दररोज 220 शिक्षकांना जोडत आहे. आतापर्यंत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7,000 पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहे. वर्षाच्या अखेरीस 20,000 शिक्षकांची भरती करण्याची त्यांची योजना आहे, अर्थात यावर्षी आणखी 13,000 शिक्षकांची भरती करण्याची कंपनीचा मानस आहे.

अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्येत  सातत्याने वाढ…

व्हाइटहॅट जुनियरला अलीकडेच बीजू(Byju’s) यांनी विकत घेतले होते. व्हाइटहॅट ज्युनियर म्हणाले की, त्यांचे भारत (India), अमेरिका (US), कॅनडा (Canada), ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, त्याच्या प्लॅटफॉर्मवर शिक्षकांची संख्या वाढत आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे डिजिटल शिक्षण आणि शिक्षणाच्या पद्धतींमध्ये नवीन प्रयोग करण्यात येत आहेत

ऑनलाइन शिकण्यास पूर्णपणे पाठिंबा…

व्हाइटहॅट ज्युनियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण बजाज म्हणाले की, पालकांनीही ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. मुलांच्या शिक्षणाच्या या नवीन दृष्टिकोनास पालक पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित 84 टक्के शिक्षकांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. ते घरी मुलांना शिकवत आहेत आणि दरमहा सरासरी 50,000 ते 1.5 लाख रुपये कमवत आहेत. बहुतेक शिक्षकांकडे पदव्युत्तर पदवी आहेत. या कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली होती.

सोर्स: लोकमत


Maharashtra Teachers Recruitment 2021 Update

Maharashtra Teachers Recruitment 2020 update: The recruitment process of professors has not been carried out smoothly in the state since 2012. There are about 30,000 to 40,000 vacancies for professors in universities and colleges in the state. The vacancies of retired professors have not been filled in the last eight to ten years. As a result, some colleges do not have full-time professors in important subjects like science, commerce and arts. As a result, the academic work of the college is being carried out by appointing professors on (CHB). Read more details below:

राज्य सरकारकडून सीएचबी प्राध्यापकांची  नियुक्ती कधी ?

शासनाने सर्वच भरती प्रक्रियेवर बंदी घातली आहे.त्यामुळे सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीवरही परिणाम झाला असून उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भात शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव सुमारे महिन्याभरापासून शासनाकडे पडून आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विना अनुदानित महाविद्यालयांमधील सीएचबीवरील प्राध्यापकांच्या मान्यतेचे प्रस्ताव येत्या ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहे.तर अनुदानित महाविद्यालयांमधील सीएचबी प्राध्यापकांच्या मान्यतेचे प्रस्ताव वर्षभर स्वीकारले जातील,असे परिपत्रक विद्यापीठाच्या शिक्षक मान्यता कक्षातर्फे 13 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.मात्र,मान्यता नसली तरी काही प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत.त्यामुळे या प्राध्यापकांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त

राज्यात २०१२ पासून प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरळीतपणे राबविली गेली नाही.  राज्यातील विद्यापीठातील व महाविद्यालयांमध्यील प्राध्यापकांची सुमारे ३० ते ४० हजार पदे रिक्त आहेत. गेल्या आठ-दहा वर्षात सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे काही महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील महत्त्वाच्या विषयांना एकही पूर्णवेळ प्राध्यापक नाही,अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महाविद्यालयात तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांची नियुक्ती करून महाविद्यालयीन शैक्षणिक कामकाज चालविले जात आहे.
एम.फुक्टोचे सचिव प्रा.एस.पी.लवांडे म्हणाले, प्राध्यापकांची पूर्णवेळ नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाने तात्पूरती व्यवस्था म्हणून सीएचबीवरील प्राध्यापकांच्या नियुक्तीचा मार्ग स्वीकारला.आता सीएचबी प्राध्यापकांची भरतीही केली नाही तर महाविद्यालयांचे कामकाज करणे शक्य होणार नाही.त्यामुळे शासनाने तात्काळ सीएचबी प्राध्यापकांच्या भरतीला परवानगी द्यावी..


MH Teacher recruitment process is ‘unlocked’ again!

Shikshak Bharti 2020: Teacher recruitment process is ‘unlocked’ again, And the facility of filling school priorities for the waiting candidates has been introduced on the portal. On August 9 last year, the state government announced the first list of candidates to be appointed without interview through Pavitra Portal and  handed over appointment letters to thousands of candidates. However, after that, the selection list of the candidates selected for appointment along with the interview remained pending due to corona crises. Now this recruitment  process has began  on Portal till 31st August 2020. Candidates can fill their school priorities in this period. Check below information for More details:

पवित्र प्रणालीमार्फत सुरू झालेली शिक्षक भरती कोरोनामुळे अडखळली होती. मात्र आता पुन्हा ही प्रक्रिया ‘अनलॉक’ झाली असून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या १५६० जागा आता रिक्त आहेत. तर एकूण जाहीर केलेल्या १२ हजार १४० जागांपैकी पाच हजार ८२२ जागा अजून भरणे बाकी आहे
गेल्या वर्षी ९ ऑगस्टला  राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीशिवाय नियुक्ती द्यावयाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर ५ सप्टेंबरला ऐन शिक्षक दिनी हजारो उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रेही प्रदान केले. मात्र त्यानंतर मुलाखतीसह नियुक्तीचा पर्याय निवडलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रलंबित राहिली.  त्यातच कोरोना संकटामुळे वित्त विभागाने ४ मे रोजीच्या निर्णयानुसार भरती प्रक्रियेवर बंदी आणली.

शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक दिनीच उमेदवारांना गोड बातमी कळण्याची दाट शक्यता आहे. कारण  पवित्र पोर्टलला पुन्हा एकदा गती आली असून गुरुवारी उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ३१ ऑगस्ट ही अखेरची मुदत देण्यात आली आहे.
कोणी भरावे प्राधान्यक्रम

 • आता माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदासाठी प्राधान्यक्रम देता येईल.
 • ज्यांना यापूर्वी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने उच्च माध्यमिकचे प्राधान्यक्रम आले नव्हते, परंतु त्यांनी पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली, त्यांना प्राधान्यक्रम भरता येईल.
 • तसेच माध्यमिक गटासाठी पदवीला ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने ज्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते, त्यांनाही आता मुलाखतीसह पदाचे प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
 • ज्यांनी यापूर्वीच मुलाखतीसह संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केले, त्यांना प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही

Maharashtra Teachers Recruitment 2021

‘शिक्षक भरतीला परवानगी मिळावी’ – Shikshak Bharti new update

बीएड पदवीधारकाला प्राथमिक शाळांत संधी

Teachers Recruitment 2020 – Candidates who have studied B.Ed in classes I to V can teach as primary teachers. These candidates will have to complete a six-month bridge course in two years after joining the service, an important decision has been given by the Aurangabad bench of the Mumbai High Court. Candidates will have to re-publish the selection list for education recruitment due to this decision, the candidates said. The state government had made it a condition in the recruitment process to complete the bridge course along with BEd education to teach classes I to V. However, NCTE has already announced its decision to conduct this bridge course within two years of joining the service as a primary teacher. Therefore, Yogesh Maind had filed a petition in the Aurangabad bench to give a chance to the candidates pursuing BEd for class I to V in the teacher recruitment process implemented by the state government. The court has ruled on it.

Teachers Recruitment 2021

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना ‘बीएड’चे शिक्षण घेतलेले उमेदवार प्राथमिक शिक्षक म्हणून अध्यापन करू शकतात. या उमेदवारांना सेवेत रुजू झाल्यानंतर सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स दोन वर्षात पूर्ण करावा लागेल, असा महत्त्वाचा निकाल मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

या निर्णयामुळे शिक्षण भरतीची निवड यादी पुन्हा प्रसिद्ध करावी लागणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले. राज्य सरकारने शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी बीएडच्या शिक्षणासोबतच ब्रिज कोर्स पूर्ण केल्याची अट घातली होती. मात्र, ‘एनसीटीई’ने हा ब्रिज कोर्स प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर दोन वर्षांत करण्याबाबतचा निर्णय पूर्वीच जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत इयत्ता पहिली ते पाचवीसाठी बीएडचे शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना संधी द्यावी, यासाठी औरंगाबाद खंडपीठात योगेश मैंद यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे.
शिक्षक भरतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीला बीएडधारकला नियुक्ती द्यावी. त्यानंतर सेवेत असताना ब्रिज कोर्स पूर्ण करावा,’ असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षक म्हणून सेवेत येण्यापूर्वी सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स पूर्ण असणाऱ्या बीएडधारकांनाच प्राथमिक शिक्षक म्हणून संधी दिली जाईल, हा राज्य सरकारचा निर्णय खंडपीठाने रद्दबातल केला आहे. या निर्णयामुळे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असून, सरकारच्या शालेय शिक्षण विभागाला शिक्षक भरतीची निवड यादी पुन्हा तयार करावी लागणार असल्याची माहिती उमेदवारांनी दिली.

या निर्णयाबाबत पूर्ण माहिती घेतली आहे. त्याबाबत प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील उपाययोजनांबाबत काय करता येईल, याची चाचपणी विभागाकडून सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सौर्स : मटा


The state government has decided to take measures considering the impact of corona virus on the state’s economy in the year 2020-21. The decision clarifies that new appointments should not be made. Click here

शिक्षक भरती एप्रिलनंतर

Shikshak Bharti 2020 will be process after April 2020. Corona’s lockdown has had an impact on teacher recruitment without interviews. In the process of recruitment of teachers, the then government had said that the state would fill 24,000 seats. In fact, the process of filling only five thousand to six thousand seats. All other important details are given below, Read it carefully and keep visit us…

Shikshak Bharti 2021 will be process after April 2020

करोनाच्या लॉकडाऊनचा परिणाम मुलाखतीशिवाय शिक्षक भरती प्रक्रियेवर झाला आहे.आता ही प्रक्रिया एप्रिलनंतर होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

राज्यात पवित्र पोर्टल मार्फत गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. दहा वर्षानंतर होत असलेल्या या भरती प्रक्रियेची डीटीएड, बीएड पदविका, पदवीधारक बेरोजगारांना प्रतीक्षा आहे. मात्र, विविध टप्प्यावर ही प्रक्रिया अडखळली. त्यात आता करोनाच्या प्रादुर्भावाने केलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती थांबवण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. त्यात असे म्हटले आहे की, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पद भरती करोनामुळे सध्या बंद असून, ३१ मार्च दरम्यान परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरती प्रक्रियेत तत्कालीन सरकारने राज्यातल्या २४ हजार जागा भरण्यात येतील असे सांगितले होते. प्रत्यक्षात पाच हजार ते सहा हजार जागाच भरण्याची प्रक्रिया झाली. त्यामध्येही शासकीय पातळीवरच्या संस्थांमधीलच शिक्षक भरती प्रक्रिया झाली. खासगी संस्थांवरील भरतीची प्रक्रिया कधी आणि केव्हा होणार, असा प्रश्‍न अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६० हजारपेक्षा अधिक आहे तर, अभियोग्यता चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशा करण्यात आल्या सूचना

पवित्र प्रणाली मार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीच्या नऊ ऑगस्टच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर विषयनिहाय, प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेली पदे, गैरहजर उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे, उमेदवार अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठीची निवड प्रक्रिया प्रथम करण्यात येणार आहे. ही कार्यवाही मुलाखतीसाठीची यादी जाहीर करण्यापूर्वी करण्यात येणार आहे. मुलाखतीसह पद भरतीमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, त्यांना एमईपीएसच्या नियमानुसार खासगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत.

ज्या उमेदवारांना यापूर्वी अकरावी, बारावीच्या गटांसाठी ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, परंतु असे उमेदवार पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत.

नववी, दहावी या गटातील पदासाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण परंतु ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, अशा उमेदवाराकडून मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आली होती. त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पद भरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत, त्यांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.

काळजीपूर्वक नोंद गरजेची

या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने मुलाखतीसह पदांचे प्राधान्यक्रम देणार आहेत, त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करण्याची सुविधा दिली नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून सेव्ह करून येणाऱ्या फॉर्मसमोर ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही.

सौर्स – मटा

पवित्र पोर्टलद्वारेची शिक्षक भरती प्रक्रिया स्थगित

Teachers Bharti 2020 new update : The outbreak of Corona is on the rise and as a precautionary measure, the process of recruiting teachers through the Holy Portal has been postponed till March 31. Information about this has also been released on the portal.

Teachers Bharti 2020 new update

पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून खबरदारीचा उपाय म्हणून पवित्र पोर्टलद्वारे सुरु असलेल्या शिक्षक भरतीची प्रकिया 31 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. त्याबाबतच्या सूचनाही पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

शिक्षण विभागाने मुलाखतीशिवाय पद भरती व मुलाखतीसह पद भरतीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वेगाने कामकाज करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र यात सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. करोनामुळे सध्यस्थितीत भरतीची कार्यवाही करता येत नाही. दरम्यान परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील महिन्यात योग्य निर्णय घेण्यात येईल. मुलाखतीशिवाय पदभरतीच्या 9 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर विषयनिहाय, प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेली पदे, गैरहजर उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे, उमेदवार अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठीची निवड प्रक्रिया प्रथम करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती कार्यवाही नंतर पूर्ण करण्यात येणार आहे.
मुलाखतीसह पद भरतीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना नियमानुसार खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत. ज्या उमेदवारांना यापूर्वी इयत्ता ११ वी ते १२ वी च्या गटासाठी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत परंतु असे उमेदवार पदव्युतर पदवी किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत. खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेले होती . त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पद भरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत त्यांना तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देता येणार आहेत.

उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावयाचे आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही, असे उमेदवारांना सूचित करण्यात आलेले आहे.

सौर्स : प्रभात


Maharashtra Teacher Recruitment 2021

महाविकास आघाडी लवकरच शिक्षकांची मेगाभरती करणार

Shikshak Bharti 2020 : As per the news that the recruitment of teachers be declared immediately 2020 and the announcement of the date for the Teacher Selection Chief Exam Practicality and Intelligence Test (TAIT) Second Test 2020 immediately. The delegation met Minister Varsha Gaikwad at the Vidhan Bhavan for this demand. About 20,000 seats are vacant for teachers during the tenure of the government leading the development and after the implementation of Marathi language law in the state by 2020. Also, the number of retirees is about ten thousand ahead. Of the 24 thousand declared by the previous government, 12 thousand are vacant posts. Minister Gaikwad told the delegation that he would recruit mega teachers soon. Therefore, the candidates who qualified for the AD, BAD hold postponed the immediately.

पवित्र शिक्षक भरती मार्चअखेर करणार

दहा वर्षानंतर ‘शिक्षक’ पदी नियुक्ती

शिक्षक भरतीसाठी ८३८ उमेदवारांची यादी जाहीर

Shikshak Bharti 2021

महाविकास आघाडी सरकार लवकरच राज्यात शिक्षकांची मेगा भरती करेल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच टेट डी.एड.,बी.एड.धारक पात्र उमेदवारांना मुंबईत दिले. त्यामुळे आझाद मैदानात सुरु असलेल्या डी.एड., बी.एड.धारक पात्र उमेदवारांचे उपोषण स्थगित करण्यात आले.याबाबतची माहिती बंजारा क्रांती दल मराठवाडा युवा संघटक प्रा.संतोषकुमार राठोड यांनी शनिवारी दिली.
शिक्षक भरती दुसरी 2020 तत्काळ जाहीर करुन शिक्षक निवड मुख्य परिक्षा अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टीएआयटी) दुसरी परिक्षा 2020 ची तारीख तत्काळ जाहीर करावी या मागणीसाठी 24 फेब—ुवारी 2020 पासून उपोषण सुरु करण्यात आले होते. या मागणीसाठी शिष्टमंडळाने मंत्री वर्षा गायकवाड यांची विधानभवनात भेट घेतली. विधानसभा अधिवेशनानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात व 2020 ला राज्यामध्ये मराठी भाषा कायदा लागू केल्याने सुमारे 20 हजार जागा शिक्षकांच्या रिक्त आहेत. तसेच सेवानिवृत्त होणारी संख्या सुमारे दहा हजार पुढे आहे. मागील सरकारने घोषित केलेली 24 हजारांपैकी 12 हजार रिक्त पदे आहेत. त्यामुळे लवकरच शिक्षकांची मेगा भरती करु, असे मंत्री गायकवाड यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे डी.एड.,बी.एड.धारक पात्र उमेदवारांनी उपोषण स्थगित केले.

सौर्स : पुढारी

72000 Posts MahaBharti Will Be expected Soon

राज्यात ‘एवढी’ पदे रिक्त?…माहिती अधिकारातून उलगडा!

खूशखबर… राज्यात शासकीय मेगाभरती अखेर मुहूर्त मिळाला

रिक्त मागासवर्गीय पदांसाठी शिक्षक भरती सुरू

Pune Teachers Bharti 2020 : The government has given instructions to recruit teachers for vacant backward posts of Pune Zilla Parishad within the next eight days. A letter of this notification has been sent to the Zilla Parishad CEO by the Rural Development Department. Due to this, the recruitment process for vacant backward classes will start soon. Read the given details carefully and keep visit on this page.

Pune Teachers Bharti 2021

पुणे – पुणे जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या मागासवर्गीय पदांची शिक्षक भरतीची कार्यवाही येत्या आठ दिवसात करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या सूचनेचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील रिक्त असलेल्या मागासवर्गीय पदांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय प्रवर्गाची शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत सांगून, 2019 मध्ये पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय रिक्त पदांमधून केवळ मराठी माध्यमांची पन्नास टक्के प्राथमिक शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. त्यावेळी जिल्हा परिषदेतील बिंदूनामावली (रोस्टर) अद्यावत नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे सीईओंना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच ग्रामविकास मंत्र्यांनी शिक्षकांच्या पदभरतीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची मागासवर्गीय उर्वरीत पन्नास टक्के पदे भरण्याची कार्यवाही आठ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेची बिंदुनामावली अद्यावत असल्याचे शासनास तात्काळ कळवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

तसेच सद्यस्थितीत बिंदुनामावलीनुसार प्रवर्गनिहाय मागासवर्गीयांची प्रत्यक्षात किती पदे आहेत त्याचा प्रवर्ग निहाय तपशील शासनास तात्काळ सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे म्हणाले, जिल्ह्यात 32 मागासवर्गीय शिक्षकांची पदे रिक्त असून, त्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार भरती करण्यात येईल.

सौर्स : प्रभात
पवित्र शिक्षक भरती मार्चअखेर करणार

दहा वर्षानंतर ‘शिक्षक’ पदी नियुक्ती

Shikshak Bharti 2020 : After ten years, the process of transfer of teachers from the Department of Education to the recruitment process which started in the year 10 has started. 251 candidates, who were then eligible for re-examination in DTAD CET, were appointed to the post of Education Officer ten years later. Many were surprised when the selection list came up. However, many of these cannot be benefited by being ‘sacred’ and others being employed. Read the more details carefully.

गोवा शिक्षक भरती २०२1

Shikshak Bharti 2021

शिक्षण विभागाकडून शिक्षक भरती प्रक्रियेत २०१० साली सुरू झालेली पदस्थापना देण्याची प्रक्रिया तब्बल दहा वर्षानंतर आता मार्गी लागली आहे. त्यावेळच्या ‘डीटीएड सीईटी’मध्ये पुनर्पडताळणीमध्ये शिफारसपात्र ठरलेल्या २५१ उमेदवारांना दहा वर्षानंतर शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात आली. अनेकांना निवड यादी आल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यातील अनेकांना ‘पवित्र’मध्ये तर काही इतर नोकरीत असल्याने लाभ घेता येणार नाही.

राज्यातील शिक्षक भरतीची २०१० पासूनची रखडलेली प्रक्रिया लाखो तरुणांना बेरोजगार करून गेली. २०१० मध्ये शेवटची भरती प्रक्रिया झाली. त्यानंतर अखेर पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया सुरू झाली. २०१०मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेतही गोंधळ झाला होता. त्यानंतर अनेकांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर कोर्टाने पुनर्पडताळणीचे आदेश दिले. त्यात अनेकांना पात्र असताना डावलण्यात आल्याचे समोर आले होते. अशा पुनर्पडताळणीमध्ये शिफारसपात्र ठरलेल्या अनेकांना रिक्त जागा नसल्याचे कारण देत आजपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले होते. सुरुवातीला अनेक वर्ष या विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाला खेटे मारले. अखेर दहा वर्षानंतर यातील उमेदवारांना शिक्षण सेवक पदावर नियुक्तीची प्रक्रिया करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रिक्त पदे नसल्याने पदस्थापना देण्यात आली नसल्याचे विभागाकडून सांगण्यात येत होते. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी अखेर अशा २५१ जणांची नियुक्ती यादी जाहीर केली. त्यांना शिक्षकांची नियुक्ती कोठे झाली, गुणवत्ता यादीतील क्रमांक, प्रवर्ग अशी माहिती यादीमध्ये देण्यात आली. या नवीन शिक्षकांसाठी समुपदेशनाची प्रक्रिया २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

३५३९ उमेदवारांचा प्रश्न

शिक्षक भरती प्रक्रियेत २०१० मध्ये ‘डीएड सीईटी’तून पुन:पडताळणीने निवड करण्यात आलेल्या तीन हजार ५३९ उमेदवारांचा प्रश्न होता. या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. २०१२ मध्ये पदस्थापना देण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये नियुक्ती देण्यात आली. मात्र, जागा रिक्त नसल्याने प्रक्रिया लांबली. ती दहा वर्ष लांबल्याबाबत उमेदवारांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीतील अनेकजन पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या भरतीमध्ये नियुक्त झाले तर काही जणांना इतर विभागात नोकरीची संधी मिळाली.

म. टा.

शिक्षक भरती सुरू करण्याबाबत राज्य शासनास सूचना करा

Shikshak Bharti 2020 : In the state, teacher recruitment in schools has been closed since 2012. Subsequently, the sacred portal system launched by the government is not functioning properly, resulting in large vacancies for teachers. The students are suffering from academic loss. We should inform the state government to start the recruitment process.

Shikshak Bharti 2021

बंद असणारी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य शासनास त्वरित सूचना कराव्यात, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. संघाचे सचिव प्रा. जयंत आसगावकर, एस. डी. लाड यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
राज्यात 2012 पासून शाळांमध्ये शिक्षक भरती बंद आहे. त्यानंतर शासनाने सुरू केलेली पवित्र पोर्टल प्रणाली सक्षमपणे कार्यरत नाही, परिणामी शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्‍त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत आपण राज्य सरकारला भरती प्रक्रिया सुरू करण्यास सूचना करावी.
कायम विनाअनुदानित शाळांमधील कर्मचारी तुटपुंज्या पगारात काम करीत आहे. त्यांचे थकीत वेतनासाठी टप्पे तत्काळ मंजूर करण्याबाबत सूचना करावी. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्‍न प्रलंबित असून तो मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, आमदार राजेश पाटील, संजय डी. पाटील उपस्थित होते.

सौर्स : पुढारी


मागासवर्गीय शिक्षक भरती तात्काळ करा; ग्रामविकासमंत्र्यांचे आदेश

Shikshak Bharti 2020 : Examination took place on December 2017 for the recruitment of teachers and the result was also done on March 2018. Six months later, the government was registered on the Pavitra portal. However, on the recommendation of the Rural Development Department during the previous government, the Education Department removed one GR and removed 8000 out of the 4,000 seats. Frequent protests were held to fill these seats. There were also discussions with ministers and officials of the previous government. But these demands were ignored.

Shikshak Bharti 2021

मुंबई: दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय शिक्षक भरती प्रश्नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भरती कृती समितीने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मुश्रीफ यांनी शिक्षक भरती तात्काळ करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा होऊन मार्च २०१८ मध्ये निकालही लागला. त्यानंतर सहा महिन्यांनी शासनाच्या पवित्र पोर्टलवर नोंदणीही करण्यात आली. परंतु, मागील सरकारच्या काळात ग्रामविकास खात्याच्या शिफारसीवरून शिक्षण खात्याने एक जीआर काढून ८ हजार जागांपैकी ४ हजार जागा रद्द केल्या. या जागा भराव्यात म्हणून वारंवार आंदोलनं करण्यात आली. तसंचस मागील सरकारचे मंत्री, अधिकारी यांच्याशी चर्चाही झाल्या. परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिक्षक भरती कृती समितीने ११ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केले. त्याची दखल घेत राजू वाघमारे यांनी आज या आंदोलकांसह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मागासवर्गीय शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. यावेळी मुश्रीफ यांनी शिक्षक भरतीचे आदेश दिले व आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं.

सौर्स : मटा


शिक्षक भरतीसाठी ८३८ उमेदवारांची यादी जाहीर

Shikshan Bharti 2020 : Teachers recruitment selection list for 838 candidates is published now. In the process of recruitment of teachers through the Pavitra Portal of Education Department, an unlisted selection list of 838 candidates from Private Education institutes has been announced. Read the more details below on this page. And keep visit our website for the further details.

Shikshan Bharti 2020 Selection List

शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत खासगी शिक्षण संस्थांतील नववी ते बारावीसाठीच्या ८३८ उमेदवारांची विनामुलाखत निवड यादी जाहीर करण्यात आली असून, आता उर्वरित जागांवर शिक्षक म्हणून नियुक्ती कधी मिळेल, याकडे राज्यभरातील पात्रताधारक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील शाळांत शिक्षकांच्या रिक्त असलेल्या १२ हजार जागा भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया गेल्या वर्षी सुरू करण्यात आली. सप्टेंबरमध्ये ५ हजार उमेदवारांची निवड यादी जाहीर करून, त्यांना नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भरती प्रक्रिया खोळंबली. त्यानंतर ७७१ शिक्षकांच्या निवडयादीवर आक्षेप घेऊन, न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने या यादीला स्थगिती मिळाली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही जागांची वाढ होऊन, ८३८ जागांसाठी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम भरून प्रक्रिया राबवण्यात आली. विनामुलाखत भरती प्रक्रियेसाठी तयार असलेल्या खासगी संस्थांतील रिक्त जागांसाठी ही पदभरती करण्यात आली आहे. गणित-विज्ञान अशा काही विषयांसाठीच्या काही जागांबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.

पहिली ते आठवीच्या माजी सैनिकांच्या जागा; तसेच यापूर्वीच्या निवड यादीत निवड होऊन उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या अशा साधारण बाराशे ते पंधराशे जागांसाठीची फेरी घेतली जाईल. त्यानंतर मुलाखतीद्वारे भरल्या जाणाऱ्या तीन हजार जागांसाठीची फेरी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

म. टा. प्रतिनिधी, पुणे

Teachers Recruitment 2020 Process will be completed soon. All the process of recruitment of teachers being implemented by the Pavitra Portal on behalf of the state government will be completed by March 2020, said Education Commissioner Vishal Solanki. For the past one-and-a-half years, the recruitment process has been going on in phases. Due to technical difficulties on the portal, court cases were constantly hampering the recruitment. The process is being worked out by making way out of it. The recruitment process is currently underway without interviews between local self-government schools and private institutions.

Teachers Recruitment 2021 – 800 रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा

पुणे – राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेली शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया मार्च अखेर पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.

मागील एक-दीड वर्षांपासून टप्प्याटप्प्याने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, न्यायालयीन प्रकरणे यामुळे भरतीत सतत अडसर येत होता. त्यातून मार्ग काढत प्रक्रिया राबवण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी संस्थांच्या शाळांमधील मुलाखतीशिवायची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे.

आता इयत्ता नववी ते बारावी या गटातील खासगी संस्थांमधील 800 रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यात पूर्ण करण्यात आलेली आहे. यातील उमेदवारांची निवड यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये माजी सैनिकांच्या 1 हजार 200 पदे भरण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. खासगी संस्थांमधील 3 हजार शिक्षकांची पदे भरण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवावे लागणार आहे. गुणवत्तेनुसारच उमेदवाराची निवड करण्याचे बंधनही घालण्यात आलेले आहे.

सौर्स : प्रभात


‘पवित्र’ शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू

The Mega Recruitment will be conducted of 10001 Post of teachers. Due to this huge vacant posts affects the advanced development of Maharashtra. After the demands and ad hoc recruitment in the state, the state government has decided to recruit 10 thousand teachers across the state through a holy portal. The teacher recruitment will be published in the advertisement newspaper on March 2, 2019, and at the same time, the advertisement portal will be displayed on the Pavitra Portal.

The first teacher will be recruited by the Holy Parental without corruption. Students should apply silently to the portal while applying in the Sacred Portal, no one should be confused, so appeals have to be at least error. Educator recruitment advertisement will now be available to the institutional and education officer on the Pavitra portal.

Vacancy Details Of Teacher Recruitment 2021

Category Wise distribution of Vacant posts as below:
Category No Of Post
Scheduled Castes 1704
Scheduled Tribes 2147
Scheduled Tribes (PESA) 525
V.J.A 407
N.T.B 240
N.T.C 240
N.T.D 199
Imava 1712
E.W.S 540
S.B.C 209
S.E.B.C 1154
General 924
Total 10001

पोस्ट्स डिटेल्स शिक्षक भरती 2021

For these seats, for the scheduled castes, 1704 for Scheduled Castes, 2147 for Scheduled Tribes, 525 for Scheduled Tribes( pesa), 407 for VJA, 240 for NTB, 240 for NTC, 199 for NTD, 1712 for Other Backward Classes, 540 for EWS, 209 for SBC, 1154 for SEBC and 924 for General Block. There are. The announcement of this mega-bill was displayed at the hands of Chief Minister Devendra Fadnavis on the holy web portal in the presence of Education Minister Vinod Tawde.

More Details about Teacher Recruitment 2020

 • Name Of Origination: School Education and Sports Department Government Of Maharashtra
 • No.Of Post :10001 Post
 • Name Of Post : Teacher Post
 • Job Location : All Over Maharashtra
 • Pay Scale : As Per  The Rule.
 • Mode Of application: Online

Eligibility Criteria  for Maharashtra Teacher Recruitment 2020

 •  Educational Qualification: D.ed / B.Ed  from a recognized University or Any equivalent qualification recognized as such by the Central Government.

How to Apply For Maharashtra Teacher Recruitment 2020

 • The application is to be done online.
 • The application link will be available from 03/03/201 to 31/03/2016.
 • After filling the application properly, click this submit button.
 • A copy of the application will be received on your Gmail account

Important Date

 • Starting date for submission of online application form: 3th March 2019
 • The Last date for submission of online application form: 31st March 2019

Complete Advertisement as below :

teacher reciuritment 2019 new

Important Link

अधिकृत वेबसाईट

📄 जाहिरात13 thoughts on “Maharashtra Teachers Recruitment 2021”

 1. Tait exam 2017 dili 4 subject madhe MA jhale 15 varshacha teaching experience ahe tri majhi nivad jhali nahi pavitr protal shiksha bharti vay vadhty kay karaych m ami teva plz tumi anubhavi lokanna pradhynya dav hi vinanti

  Reply
 2. सर, मी उज्व्ला दिलिप गावडे जात —‘– हिंदू मराठा SEBC PRVARG शैक्षणिक पात्रता —- व्यवसायिक पात्रता 1) 12—सायन्स—-60 %
  2) 10– वी ——- 70 %
  3) DTED(Ded) 78 % 4) TET उत्तीर्ण पेपर क्र 1 ( 1 ते 5 ) 6) TET -पात्र वर्ष — 2019 5) TAIT 97 6) अद्यापन वर्ग क्षमता 1ते 8
  7) विषय सर्व
  8) विशेष बाब —–‘ स्वताच्या मुलाला 5वी
  शिषवृत्ती मार्गदर्शन व शिष्यवृत्ति
  मिळवून देण्यात सहभाग.
  9) अनुभव 4 वर्षे मातृभूमी शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार सावंतवाडी .

  Reply
 3. Aanganwadi पद्भर्तीसाठी व महाराष्ट्र पोर्टल शिक्षण सेवक भरती केव्हा सुरू होणार आहे? व त्याची वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता काय आहे?

  Reply

Leave a Comment