Maharashtra Teachers Recruitment 2022

Maharashtra Teachers Recruitment 2022

The Minister of State for School Education Bachchu Kadu announce that the Maharashtra Teachers Recruitment 2022 process will be started soon. He has promised to take up the Shikshak Recruitment in the education department ASAP. Bachchu Kadu Said that in the Corona crisis Schools were closed for more than two years. However, according to a survey conducted by the Central Education Department in 2021, Maharashtra is still leading in terms of educational quality. So their is a need start the Teachers Recruitment 2022 process quickly.

शिक्षण विभागातील रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर घेऊ असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू त्यांनी दिलं आहे. एवढंच नाहीतर, शैक्षणिक विषमतेबाबत बोलताना शैक्षणिक विषमता अत्यंत घातक असून ती देशाला पोकळ करु शकते, असं बच्चू कडू म्हणाले. कोरोना संकटात शिक्षणात अधोगती आली. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ शाळा बंद होत्या. मात्र तरीदेखील केंद्रीय शिक्षण खात्यानं 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत आजही अव्वल असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

Maharashtra Teachers Recruitment 2022 –  Latest updates regarding the professor recruitment is that their are out of 1,293 additional posts in junior colleges in the state, information of 1,028 posts has been submitted to the ministry and information for the remaining 265 posts will also be submitted to the ministry in two days, assured state education director Mahesh Palkar. As the the souce Director said that the aptitude test will be conducted very soon to fill the vacancies through the portal.

Teacher Accreditation, School ID, Recognition of teachers in a subsidized institution in probationary and regular pay scales should be given at the same time, Salary should be paid through nationalized bank, Effectiveness of Service Act should be implemented, PF, DCPS; Demands for regular receipt of NPS receipts, overdue payments, part-time teachers going to full-time posts after completion of education service, their part-time pay should not be deducted till post approval, etc. were made at this time. The director promised to take a decision on all the demands which are not at the government level after discussing with all the deputy directors of education in the state.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील एक हजार २९३ वाढीव पदांपैकी एक हजार २८ पदांची माहिती मंत्रालयात सादर केलेली असून उर्वरित २६५ पदांची माहिती देखील दोन दिवसांत मंत्रालयात सादर केली जाणार आहे, असे आश्वासन राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांतील प्राध्यापकांच्या वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागणे निश्चित झाले आहे.

रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी लवकरच अभियोग्यता परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संचालकांनी सांगितले. शिक्षक मान्यता, शालार्थ आयडी, अनुदानित संस्थेत शिक्षकांना परिविक्षाधीन आणि नियमित वेतन श्रेणीतील मान्यता एकाच वेळी देण्यात यावी, वेतन राष्ट्रियकृत बँकेमार्फत अदा करण्यात यावे, सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, पीएफ, डीसीपीएस; एनपीएस पावत्या नियमितपणे मिळाव्यात, थकित देयके, अर्धवेळ शिक्षकांना शिक्षण सेवक पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ पद पायाभूतमध्ये जाते, अशा वेळी त्यांचे अर्धवेळ वेतन पद मंजुरीपर्यंत खंडित करू नये, आदी मागण्या यावेळी करण्यता आल्या. यापैकी शासन स्तरावर नसलेल्या मागण्यांवर राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालकांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी संचालकांनी दिले.

सेवानिवृत्त शिक्षकांची संपकालीन ४२ दिवसाची रजा त्यांचे खात्यावर जमा करणे, विषय गट योजना पूर्ववत ठेवणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे, संच मान्यता २०१८-१९ प्रमाणे या वर्षी देखील शिक्षक संख्या निश्चित करणे, माध्यमिक संलग्न कनिष्ठ महाविद्यालयीन तुकडीतील विद्यार्थी संख्या ६० व वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न मध्ये ८० असावी, शिक्षकाचा कार्यभार शून्य झाल्याशिवाय त्यांना अतिरिक्त घोषित करू नये आदी मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.


Maharashtra Teachers Recruitment 2022- As per the news Teacher recruitment process will be started within this month.School Education Minister Varsha Gaikwad has informed that teachers will be recruited where there is shortage of teachers and adjustment will be made where there is excess. Read More details as given below.

Updated on 25.03.2022: मागील काही दिवसांपासून शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा सुरु आहेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकवेळा टोलेबाजीही झाली आहे. मात्र आता शिक्षक भरती संदर्भात राज्य सरकारने (Maharashtra Govt.) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिथे शिक्षक कमी आहेत तिथे शिक्षकभरती केली जाणार असून अतिरिक्त असतील तिथे त्यांचं समायोजन केलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. आज सभागृहात त्यांनी ही घोषणा केली आहे. याच महिन्याभरात या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक दिवसांपासून हा शिक्षक भरती रखडली असल्याने अनेकवेळा शिक्षकांकडून आंदोलने झाली. संबंधित अनेक संघटनांनी मोर्चे काढले मात्र तरीही राज्यसरकारला जाग येत नसल्याने विरोधकांनी राज्यसरकारला धारेवर धरलं होतं. मात्र आता या घोषणेमुळे शिक्षकांत पुन्हा एकदा उत्साहाते वातावरण पसरले आहे


राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

Maharashtra Teachers Recruitment 2022 : Goods News for TET pass holders who are waiting for teacher recruitment.  The CET will be held in May for teacher recruitment. The education department has decided to recruit 15,000 seats for the sixth to eighth grades in the state. CET schedule will be announced soon. Candidates will have to submit online application after the schedule is announced. There are more than 2 lakh TET pass holders in the state. So there is likely to be a huge crowd for the CET. Read More deails as given below.

शिक्षक भरतीसाठी मे महिन्यात सीईटी (CET) घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या टीएटी पास धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 • शिक्षण खात्याने राज्यात सहावी ते आठवीसाठी 15 हजार जागा भरती करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी सीईटी कधी होणार याची उत्सुकता टीईटीत पास झालेल्या परीक्षार्थीना लागून राहिली आहे.
 • मात्र शिक्षण खात्याने दहावी व बारावीची परीक्षा झाल्यानंतर सीईटी घेण्याचा निर्णय घेतला असून बारावीची परीक्षा मेच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस सीईटी होण्याची शक्यता आहे.
 • सीईटी झाल्यानंतर गुणवत्तेनुसार शिक्षकांची भरती होणार असून सीईटी चे लवकरच वेळापत्रक जाहीर होणार आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना ऑनलाइन ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. राज्यात 2 लाखांहून अधिक टीईटी पास धारक आहेत. त्यामुळे सीईटीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
 • राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त आहेत. मात्र सरकारने 15 हजार जागा भरती करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे जागा कमी असल्याने सर्वच परीक्षार्थींचे सीईटीत गुणवत्ता मिळविण्याचे उद्धिष्ट असणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी अभ्यासाला सुरवात केली आहे.

Maharashtra Teacher Recruitment 2022: As per the news, 15,000 teachers will be recruited in the state. The date of the Common Entrance Test (CET) is likely to be announced in the coming weeks. This recruitment will be for B. Ed. Degree holders. Read More details as given below.

राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच

Maharashtra Teachers Recruitment 2022 updates : Under the leadership of Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar, approval has been given for recruitment of 2,088 professors in the first phase and filling of all principal posts, informed the Minister of Higher and Technical Education. However, at present there are about 1,298 vacancies for Assistant Professors in Shivaji University. As there is a big difference between the vacancy and the ruling, there is a mixed reaction from the eligible candidates. Higher Education Minister Uday Samant informed about the recruitment of professors in the college through Twitter. This has paved the way for stalled professor recruitment.

महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बाबतची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली. यामुळे रखडलेल्या प्राध्यापक भरती चा मार्ग मोकळा झाला आहे.

 • महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बाबतची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली. यामुळे रखडलेल्या प्राध्यापक भरती चा मार्ग मोकळा झाला आहे.
 • मात्र, सध्या शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुमारे 1,298 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. रिक्त जागा व शासन निर्णयात मोठी तफावत असल्याने पात्रताधारकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 • राज्यातील विद्यापीठे व अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने विविध विषयांची सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, कोरोना व त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पदभरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती.
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील 2,088 प्राध्यापक भरती व सर्व प्राचार्य पदे भरण्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली आहे.

2013 पासून राज्यात प्राध्यापक भरती झालेली नाही

राज्यात 2013 पासून प्राध्यापक भरती नियमितपणे झालेली नाही. महाविद्यालयातील 40 ते 50 टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांची सुमारे 1298 पदे रिक्त आहेत. प्राध्यापक भरती व्हावी म्हणून नेट-सेटधारक व पीएच. डी. पदवी मिळविलेल्यांनी पाठपुरावा केला होता. युती सरकारने 40 टक्के भरतीनुसार 3580 पदे भरण्याचा निर्णय झाला. त्यातील सुमारे प्राध्यापकांची 1100 पदे भरण्यात आली. अद्याप 2400 पदे भरणे अपेक्षित आहेत. परंतु, महाविकास आघाडी सरकारने 2088 पदे भरतीचा निर्णय घेतला आहे. आणखी 312 पदे रिक्त ठेवल्याने पात्रताधारकांमध्ये नाराजीची भावना आहे.


The government is positive to fill all the vacancies of teachers under PESA in the state including Palghar district. A time bound program will be undertaken by the school education department to fill this vacancy, said the school education minister Prof. Varsha Gaikwad. Prof. Gaikwad also directed that the commissioner should immediately submit a proposal to fill this vacancy and the education department should seek the permission of the general administration and finance department.

महाराष्ट्र टीईटी 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

पालघर जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक आहे. या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या जागा भरण्यासाठी आयुक्तांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावी, असे निर्देशही प्रा.गायकवाड यांनी दिले.

पालघर जिल्ह्यातील शिक्षकांची पदे भरताना पवित्र पोर्टल प्रणाली लागू न करता स्थानिक पातळीवर प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी तेथील आदिवासी डीटीएड, बीएड (TET/ CTET) कृती समितीने आंदोलन केले आहे. त्याची दखल घेऊन प्रा.गायकवाड यांनी याबाबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पालघर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना, शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी, पालघर जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह आंदोलनकर्ते आदिवासी डीटीएड, बीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घेतली जाईल. तसेच ही भरती प्रक्रिया राबविताना त्याच क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे वंदना कृष्णा यांनी यावेळी सांगितले.

Approval to fill all teacher vacancies under PESA. The government is positive to fill all the vacancies of teachers under PESA in the state including Palghar district. A time bound program will be undertaken by the school education department to fill this vacancy, said the school education minister Prof. Varsha Gaikwad. Read More details as given below.

महाराष्ट्र टीईटी 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

राज्यात 2 हजार 88 प्राध्यापक पदांची भरती लवकरच

पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास मान्यता

पालघर जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक आहे. या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या जागा भरण्यासाठी आयुक्तांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावी, असे निर्देशही प्रा.गायकवाड यांनी दिले.

 • पालघर जिल्ह्यातील शिक्षकांची पदे भरताना पवित्र पोर्टल प्रणाली लागू न करता स्थानिक पातळीवर प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी तेथील आदिवासी डीटीएड, बीएड (TET/ CTET) कृती समितीने आंदोलन केले आहे.
 • त्याची दखल घेऊन प्रा.गायकवाड यांनी याबाबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पालघर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना, शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी, पालघर जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह आंदोलनकर्ते आदिवासी डीटीएड, बीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 • पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घेतली जाईल. तसेच ही भरती प्रक्रिया राबविताना त्याच क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे वंदना कृष्णा यांनी यावेळी सांगितले

Teachers who have been waiting for a permanent job for the last several years will be greatly relieved. The process of recruitment of teachers in government primary and secondary schools in the state will begin soon. It has been suggested to seek permission from the education department while recruiting teachers for the vacant posts in private aided schools.

राज्यात 2 हजार 88 प्राध्यापक पदांची भरती लवकरच

शिक्षक भरतीसाठी शासनाचा नविन नियम ; अश्या आहेत अटी

खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची भरती करताना शिक्षण खात्याकडून परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच शिक्षक भरती करतेवेळी स्थानिक वृत्तपत्रामध्ये माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

 • राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण खात्याने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच बरोबर आता खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर देखील शिक्षकांची भरती केली जाणार आहे.
 • गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र शिक्षक भरती करण्यापूर्वी सर्व अनुदानित शाळांनी शिक्षण खात्याकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी. यासाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन शिक्षक भरतीची माहिती देणे गरजेचे असल्याचे सर्व शाळांना कळविण्यात आले आहे.
 • बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या जगा लवकर भरती कराव्यात अशी मागणी सातत्याने खाजगी शिक्षण संस्थांकडून होत आहेत. मात्र शिक्षक भरतीला सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 • भाषिक अल्पसंख्यांकांच्या शाळांना रोस्टर लागू करण्यात आल्याने अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांक शाळांना देखील शिक्षकांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे शिक्षक भरती करण्यास लवकर हिरवा कंदील दाखवा असे मत व्यक्त होऊ लागले आहे.
 • शिक्षक भरती करण्यापूर्वी संबंधित खाजगी अनुदानित शाळांनी शिक्षण खात्याकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. असे कळविण्यात आले आहे. शिक्षक भरतीचा निर्णय झाल्यानंतर सर्व शाळांना ही माहिती द्यावी लागणार आहे.


Maha TET Exam 2021 Postponed : The Maharashtra Teacher Eligibility Test 2021 was organized by the State Examination Council on October 30. But the Deglur-Biloli assembly constituency has a by-election on this date. In view of this, the date of TET examination has been changed. The exam will now be held on 21 November 2021. 21. As the written test for the recruitment of various posts in the health department will be held on 31st October 2021.

पालघर जिल्ह्यात केवळ प्राथमिक विभागातील २२१२ पदे रिक्त आहेत. For complete details of Palghar District Primary Teachers Vacant Posts click here

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘TET’ची परीक्षा पुढच्या महिन्यात

Teachers Recruitment 2021 updates : The written examination of the Central Public Service Commission (UPSC) is on October 10. Due to this, Maharashtra State Examination Council has postponed the date of Teacher Eligibility Test (TET Exam) and this examination will be held on 31st October in Maharashtra. With the change in the date of TET, future teachers appearing for UPSC exams will be able to appear for both the exams. Read the more details regarding this on given link

२०६२ रिक्त शिक्षक पदांसाठी मुलाखतीसह पद भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे

Teachers recruitment process for class 6th to 12th directily will be held through the interview. Pavitra Portal orginised the all arrangement. 561 schools are involved in this teachers recruitment process. total 2062 Teachers vacancies will be filled through the interview. This complete process will be started from 13th September to 14th October 2021 from the Pavitra Portal Login. Read the details given below and keep visit on our website. www.mahagov.info.

इयत्ता सहावी ते बारावीच्या शिक्षकांच्या रिक्त पदांवर मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत सुरू करण्यात आल्याने शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या अंतर्गत एकूण ५६१ शाळा व्यवस्थापनांच्या दोन हजार ६२ रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पद भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी मुलाखतीशिवाय पदभरतीची कार्यवाही पूर्ण केलेली आहे. आता मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही राबविण्यात येत आहे. यात शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवरील आपल्या लॉगिनमध्ये जाऊन गुणवत्तेनुसार संबंधित पात्र ठरत असलेल्या संस्थेकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

संबंधित व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरीता १:१० या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शाळा व्यवस्थापनांकडून मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही १३ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Teachers Selection Process शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांसाठी सूचना :

 • – उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील
 • – उमेदवारांची अंतिम निवड व्यवस्थापनाकडून या ३० गुणाच्या आधारे होईल
 • – गुणवतेनुसार जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रमावर उमेदवाराची ‘पवित्र पोर्टल’मार्फत त्या-त्या व्यवस्थापनांकडे होईल शिफारस
 • -निवड प्रक्रियेबाबत काही अडचणी असल्यास संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांशी संपर्क साधावा.
 • – उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या ‘[email protected]’ या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

The process for recruitment of teachers in the state has started and in the first phase 2062 vacancies are being filled. A total of 3902 candidates have been recommended for the interview, announced the state’s school education minister Varsha Gaikwad. This recruitment is being done through the sacred portal.

Teacher Recruitment : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी एकूण 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. राज्यातील शिक्षकपद भरतीसाठी प्रक्रिया सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात 2062 रिक्त पदं भरण्यात येत आहेत. त्यासाठी एकूण 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. ही शिक्षकपद भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संबंधी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणतात की, “पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”

Maharashtra Teachers Recruitment 2022

राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदं भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डीएलएड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

डिसेंबर, 2017 मध्ये आयोजित केलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12 हजार 70 शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 5 हजार 970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, 2020 मध्ये पूर्ण झाली आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागाने नवीन पदभरती करू नये, असे वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती. मात्र शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, यांनी पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने शिक्षण सेवक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, वित्त  विभागाने शिक्षण सेवक पदाच्या प्रलंबित भरतीसाठी मान्यता दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शासकीय नोकऱ्यांमधील नियुक्त्या देताना एसईबीसी आरक्षण रद्दबातल ठरवले आहे. त्या अनुषंगाने विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवक पदांसाठीच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही शालेय शिक्षण विभागामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.


Maha TET 2022 Online Registration started now

Maharashtra Teacher Eligibility Test will be held on 10th October 2021. The Teacher Eligibility Test (TET) is being conducted after a long period of time. The test was postponed due to corona virus infection. The registration process for the TET exam is starting from 3rd August 2021. All other importat details are given here. 

Maha TET 2022 Online Registration Steps

 1. The following are the steps for registration and application for the Maharashtra Teacher Eligibility Test as mentioned below.
 2. Online registration.
 3. Portal login.
 4. Filling the application form.
 5. Verify the information in the application.
 6. aying online exam fees Printing of application form

आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. टीईटी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरू होत आहे.

Maha TET नोंदणीला आज पासून सुरुवात …! येथे संपूर्ण वाचा आणि ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करा…


Maharashtra Teachers Recruitment 2022

The Department of Education has been moving fast to announce the selection list of candidates for the interview by the end of July for the recruitment of teachers in private aided schools implemented through the sacred portal.

पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी जुलै अखेर मुलाखतीसाठीची उमेदवार निवड यादी जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने जलद गतीने हालचाली सुरू ठेवलेल्या आहेत.

राज्य शासनाने 12 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली होती. यात आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलाखतीशिवायची भरती करण्यात आली. यात 6 हजार शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्‍त्या मिळालेल्या आहेत. आता 900 खासगी शैक्षणिक संस्थांमधील 2 हजार 500 शिक्षकांची रिक्त पदे मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार असून 30 गुणांसाठी मुलाखती होणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ही मुलाखत प्रक्रिया पूर्ण करुन पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाकडून या भरतीसाठी मुलाखतीकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याचे काम सुरु असून ती बारकाईने तपासण्यातही येत आहे. लवकरच पवित्र पोर्टलवर या भरतीबाबच्या सवीस्तर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे.

शिक्षण विभागाकडून खासगी संस्थांना मुलाखती घेण्यासाठी ठराविक कालावधी निश्‍चित करुन देण्यात येणार आहे. याच कालावधीत वेळापत्रक तयार करुन उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे बंधनही घालण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये मुलाखतीची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन सप्टेंबरमध्ये शिक्षकांना नियुक्‍त्या द्याव्या लागणार आहेत.

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय झाला आहे. 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (Maha-TET) घेण्यात यावी यासंदर्भात शिक्षण विभागाकडून राज्य शिक्षण परिषदेला निर्देशही देण्यात आले आहेत.

Maharashtra Teachers Recruitment 2022 updates

As per the latest news More than 6,000 teacher posts for various subjects, which have been vacant in school vacancies for the last several years, will soon be filled. School Education Minister Varsha Gaikwad has given information about this today. He said that the quality of education in the state would be taken into consideration while selecting new teachers, adding that all these processes would be implemented through a sacred system to bring transparency in the recruitment process.

सहा हजार शिक्षकांची रिक्त पदे भरणार

 • मागील अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित आदी शाळांचे रिक्त (School Vacancies) असलेली विविध विष्यानाची सुमारे 6 हजाराहून अधिक शिक्षकांची पदे (Teacher Post) लवकरच भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करून नवीन शिक्षकांना (New Teacher selection) निवड करताना त्यांच्या गुणवत्तेचा विचार प्रामुख्याने केला जाणार आहे, आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता (Positivity in vacancies) आणण्यासाठी ही सर्व प्रक्रिया पवित्र प्रणालीच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Maharashtra Teachers Recruitment 2022

 1. शिक्षकांची ही भरती प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या,खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) असलेल्या रिक्त पदांवर केली जाणार आहे.
 2. डिसेंबर, 2017 मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12 हजार 70 शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 5 हजार 970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी,2020 मध्ये पूर्ण झाली आहे. मात्र, पुरणाच्या पार्श्वभूमीवर नवीन भरती करण्यास बंदी असल्याने त्यासाठी ती कारवाई थांबली होती अशी माहिती देण्यात आली.

13 thoughts on “Maharashtra Teachers Recruitment 2022”

 1. Tait exam 2017 dili 4 subject madhe MA jhale 15 varshacha teaching experience ahe tri majhi nivad jhali nahi pavitr protal shiksha bharti vay vadhty kay karaych m ami teva plz tumi anubhavi lokanna pradhynya dav hi vinanti

  Reply
 2. सर, मी उज्व्ला दिलिप गावडे जात —‘– हिंदू मराठा SEBC PRVARG शैक्षणिक पात्रता —- व्यवसायिक पात्रता 1) 12—सायन्स—-60 %
  2) 10– वी ——- 70 %
  3) DTED(Ded) 78 % 4) TET उत्तीर्ण पेपर क्र 1 ( 1 ते 5 ) 6) TET -पात्र वर्ष — 2019 5) TAIT 97 6) अद्यापन वर्ग क्षमता 1ते 8
  7) विषय सर्व
  8) विशेष बाब —–‘ स्वताच्या मुलाला 5वी
  शिषवृत्ती मार्गदर्शन व शिष्यवृत्ति
  मिळवून देण्यात सहभाग.
  9) अनुभव 4 वर्षे मातृभूमी शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार सावंतवाडी .

  Reply
 3. Aanganwadi पद्भर्तीसाठी व महाराष्ट्र पोर्टल शिक्षण सेवक भरती केव्हा सुरू होणार आहे? व त्याची वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता काय आहे?

  Reply

Leave a Comment