Mahatransco 4500 Vacant Posts fill soon

Mahatransco Bharti 2022

 

Mahatransco Bharti 2022 latest updates : The way has been cleared to fill 4500 vacancies in Mahatransco. Tuesday, 15th June 2021 As per the administrative letter dated June 15, the way has been cleared for the promotion of four and a half thousand technology recruits to class four. The recruitment process will start soon in Mahatrasco. Maha Urja should announce a time bound calendar of recruitment process with all the four companies including MSEDCL, Mahatransport and Holding Company. Candidates should be allowed to participate in the recruitment process of all the three companies while fixing the examination dates, said the Energy Minister. Presented by Nitin Raut. 

महापारेषणमधील रिक्त साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवार, दि. १५ जून रोजी प्रशासकीय पत्रानुसार साडेचार हजार तंत्रज्ञान नेमणूक वर्ग चारच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीसह होल्डिंग कंपनी या चारही कंपन्यांसह महाऊर्जाने भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम (टाईम बाऊंड कॅलेंडर) जाहीर करावा. उमेदवारांना तीनही कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे हा विचार परीक्षेच्या तारखा निश्चित करताना करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महापारेषण कंपनीत वर्ग एक व वर्ग चार प्रवर्गातील आकृतीबंध पदोन्नतीमध्ये तयार झालेला असमतोल दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर फेडरेशन संघटनेच्यावतीने २००७ पासून सतत पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला अखेर यश येऊन महापारेषणमधील रिक्त साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०१७ मध्ये सुधारित आकृतीबंध लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, काही कारणांमुळे त्याला काहींनी विरोध केला होता. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली. ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर फेडरेशन संघटनेने मुंबई येथे आंदोलन केले. त्यावेळी ऊर्जा सचिव, कंपनीचे संचालक व संघटनेचे नेते यांच्यात बैठक होऊन एप्रिल महिन्यात सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. मे महिन्यात कंपनीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी तयार केलेल्या आकृतीबंधाला मान्यता दिली. महापारेषणमधील रिक्त साडेचार हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवार, दि. १५ जून रोजी प्रशासकीय पत्रानुसार साडेचार हजार तंत्रज्ञान नेमणूक वर्ग चारच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे


Mahapareshan Bharti For 8500 Posts Expected

महाट्रान्सको भरती 2021

Mahavitaran Bharti 2021

Mahanirmiti Recruitment 2021

At present, the recruitment process for 7500 vacant posts of Mahavitaran and 500 vacancies in Mahanirmiti Company is stalled. There are 8500 vacancies in Mahatransco. The recruitment process for vacancies in MSEDCL, Mahatransport and Mahanirmithi has already started. However, the Supreme Court has postponed the Maratha Reservation, which has halted the recruitment process in the state. Read the below given details carefully and keep visit us.

महावितरणमध्ये सध्या विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक यांच्या ७५०० रिक्त पदांची, महानिर्मिती कंपनीमध्ये ५०० रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. तर महापारेषण कंपनीमध्ये ८५०० पदे रिक्त आहेत. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्यात भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘परंतु तसे असले तरी यावर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांचे उच्चाधिकारी या नात्याने काय प्रयत्न केले’, असा प्रश्न विचारत डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेत असल्याने त्याची माहिती ऊर्जा मंत्र्यांनी तिन्ही कंपन्यांकडून घेतली. ऊर्जा विभागातील तिन्ही कंपन्यांमधील भरती प्रक्रिया थांबल्याबद्दल ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे बुधवारी चिडले. निर्णय होऊनदेखील अद्यापही ही प्रक्रिया सुरु का झाली नाही, यासाठी त्यांनी तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर धरले. डॉ. राऊत यांनी बुधवारी यासंबंधी बैठक घेतली.

Mahatransco will released the Maha Bharti for Technical posts very soon. As per the latest news the MahaTransco wants to filled the 8500 vacant seats of Technical  this year. Official Advertisement published soon for 8500 posts. Candidates who are interested in this mega recruitment they should keep visit on our website…

महापारेषण मध्ये 8,500 जागांची मेगाभरती, सरकारी नोकरीची मोठी संधी

महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे.

ऊर्जा विभागात महाभरती 

मुंबई – कोरोनामुळे राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून एकाही विभागात भरतीप्रक्रिया झाली नाही. मात्र, लॉकडाऊन संपुष्टात येत असल्याने हळूहळू विविध विभागात रिक्त पदांची भरती होणार असल्याचे दिसून येते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डिसेंबरपर्यंत पोलीस भरती पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. आता, ऊर्जामंत्री  यांनी महापारेषण कंपनीत तब्बल 8,500 जागांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

महापारेषण मध्ये 8500 जागेची भरती लवकरच अपेक्षित

महापारेषणमध्ये तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे. महापारेषण कंपनीतील ही रिक्त पदे भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर  नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीचीसंधी या भरतीद्वारे निर्माण होणार आहे.

ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी ;पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले


Mahatransco 2200 Vacant Posts fill soon

महापारेषण मध्ये २२०० जागेची भरती लवकरच अपेक्षित

Mahatransco Mega Recruitment expected soon : Mahatransco published the mega recruitment advertisement very soon. There are total 2200 technical post is still vacant in Mahapareshan. The way for promotion of the staff of the 2200 technicians category four in the office of the superintendent is paved. The Board of Directors has approved the new draft plan of the superintendent and the resolution of this meeting will come out soon. Due to this, in the next few days, the staff of the 2200 technical category four will be promoted to technician category three. More details regarding the Mahapareshan Bharti 2019-2020.

महापारेषणच्या २२०० तंत्रज्ञांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

महापारेषण कार्यालयातील २२०० तंत्रज्ञ श्रेणी चारमधील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. महापारेषणच्या नवीन आकृतीबंध आराखड्याला संचालक मंडळाने मान्यता दिली असून या बैठकीतील ठराव लवकरच समोर येणार आहे. यामुळे आगामी काही दिवसांत २२०० तंत्रज्ञ श्रेणी चारमधील कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञ श्रेणी तीनची पदोन्नती मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सचिव सय्यद जहिरोद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संबंधित विविध मागण्यांबाबत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला होता. १६ डिसेंबरपासून हे आंदोलन केले जाणार होते. मात्र, या आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी संचालक सुगत गमरे यांची भेट घेतली. या भेटीत सुगत गमरे यांनी सांगितले की, बढती व सरळ भरती एकाच वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संघटनेने सुचविलेली यंत्र चालकांच्या पदांची कपात न करणे, ३७२ यंत्रचालकांना वरिष्ठ यंत्रचालक म्हणून मान्यता देणे, ४२ टेक्निशियनला हेड फोरमन करणे, अभियंत्यांच्या जागाही कमी न करण्याच्या मागण्या देण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची किंवा ठरावाची माहिती प्रशासनाला मिळणार आहे. सर्व पदोन्नती करण्यासाठी लवकरच पॅनल तयार करण्यात येणार आहे.

म.टा.

important Links of MahaTransco Recruitment 2021

168 Posts – Mahagenco Mumbai Bharti 2021

30 Posts -MahaTransco Amravati Bharti 2021

156 Post – MahaVitaran Latur Bharti 2021

47 posts – Mahavitran Yavatmal Bharti 2021

188 Posts – Mahavitran Beed Bharti 2021

4 thoughts on “Mahatransco 4500 Vacant Posts fill soon”

Leave a Comment