MCGM Ward Boy Bharti 2020

MCGM Ward Boy Bharti 2020

करोना रुग्णालयांत ५११ वॉर्डबॉय कर्मचारी नियुक्त

Mumbai Mahanagarpalika Ward Boy Bharti 2020 : As a large number of manpower is required for food supply in Corona Hospitals and Corona Care Centers in Mumbai, NMC has appointed 511 people as workers and wardboys. Considering the shortage of staff, the opportunity has also been given to the candidates in the merit list which was canceled in the year 2017-18. The number of patients in municipal hospitals and corona centers is increasing rapidly.

Mumbai Mahanagarpalika Ward Boy Bharti 2020

मुंबईतील करोना रुग्णालये, करोना काळजी केंद्रांत अन्नपुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असल्याने कामगार आणि वॉर्डबॉय म्हणून ५११ जणांची नियुक्ती महापालिकेने केली आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन सन २०१७-१८ मध्ये रद्द केलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. पालिका रुग्णालये आणि करोना केंद्रांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची देखभाल, विलगीकरण, नवीन रुग्णालये-कक्षाची उभारणी करणे, करोना चाचणी, बाधित आणि गरजूंना अन्नपुरवठा करणे यासाठी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगार आणि वॉर्डबॉय पदाच्या या जागा भरण्यात आल्या आहेत. पालिकेचे विविध विभाग आणि रुग्णालयांमध्ये सन २०१७-२०१८ मध्ये कामगार व वॉर्डबॉय या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांव्यतिरिक्त रद्द करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील १४६ उमेदवारांना आता करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर ३६५ जणांची भरती ही मलनि:सारण खात्याकडून करण्यात आली आहे. पालिकेच्या रुग्णालयात कामगार आणि वॉर्डबॉय पदासाठी ५०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, तेवढी पदे रुग्णालयात शिल्लक नसल्यामुळे ही पदे मलनि:सारण खात्यांतर्गत भरली गेली आहेत. या नियुक्तीबाबत स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी पालिका प्रशासन नंतर घेईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

सौर्स : मटा


मुंबई महापालिका करणार 511 पदांची भरती

BMC Ward Boy Recruitment 2020 – As soon as the emergence of Covid started, the Mumbai Municipal Corporation had invited applications for the post of Wardboy. Now the administration realized that it was not possible to complete the recruitment process. Therefore, the first list and waiting list of 1388 candidates was prepared from the applications called for recruitment of workers in 2017. The decision to cancel the recruitment was taken due to doubts about the process. As there is no time to recruit new recruits now, the administration has decided to appoint 511 open category workers in the list and the proposal has been tabled in the standing committee.

BMC Ward Boy Recruitment 2020

मुंबई : कोव्हिड महामारीच्या काळात मनुष्यबळ अपुरे पडू नये म्हणून वादग्रस्त ठरलेल्या कामगार भरतीतील यादीतून महापालिका कामगारांची नियुक्ती करणार आहे. परंतु 2017 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेतील फक्त खुल्या प्रवर्गातील 511 पदे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.
कोव्हिडचा प्रादुर्भाव सुरू होताच मुंबई महापालिकेने वॉर्डबॉय पदासाठी अर्ज मागवले होते.आता कामगार भरतीची प्रक्रिया पूर्ण करणे शक्‍य नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे 2017 मध्ये कामगारांच्या भरतीसाठी मागवलेल्या अर्जांतून 1388 उमेदवारांची पहिली यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. या प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्याने भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता नवी भरती करण्यास वेळ नसल्यामुळे या यादीतील खुल्या प्रवर्गातील 511 जणांची कामगार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये वॉर्डबॉयच्या 200 जागा रिक्त आहेत.त्यातील सर्व प्रकारची आरक्षणे वगळून 146 जागा भरण्यात येतील.ही भरती 2017 मधील पात्र उमेदवारांमधून करण्यात येणार आहे.साथीच्या काळात अधिक वॉर्डबॉयची गरज असल्यामुळे इतर विभागांतील 500 कामगारांच्या जागांपैकी खुल्या प्रवर्गातील 365 उमेदवारांची भरती करून वॉर्डबॉय म्हणून तात्पुरती नियुक्ती देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.त्यानंतरच्या उमेदवारांची भरती सामाजिक आणि समांतर आरक्षणांनुसार करण्यात येईल.

सौर्स : सकाळ
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ११४ वॉर्ड बॉयची भरती

BMC Recruitment 2020 : With the increase in stress on municipal hospitals due to corona treatment, a ward ward will be recruited for various municipal hospitals. More than 1.5 lakh candidates have come to the municipality for this recruitment. The results of the recruitment will be announced soon, the administration has said.

वॉर्ड बॉय भरती; दीड लाख अर्ज

करोनावरील उपचारामुळे महापालिका रुग्णालयांवरील ताण वाढत असल्याने विविध पालिका रुग्णालयांसाठी ११४ वॉर्ड बॉयची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी दीड लाखांहून अधिक उमेदवारांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. लवकरच या भरतीचा निकाल जाहीर केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धारावी परिसरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने पालिकेने दादर पश्चिम येथील जी-उत्तर विभागात २० डॉक्टर आणि प्रत्येकी ५० नर्स आणि वॉर्ड बॉयची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत होती. ५० वॉर्ड बॉयच्या जागांसाठी सुमारे २५० उमेदवार उपस्थित होते. सामाजिक वावराचे पालन या उमेदवारांनी केल्यामुळे भरतीची रांग रूपारेल कॉलेजपर्यंत पोहोचली होती. उमेदवार जास्त होत असल्याने पालिकेने फक्त १०० जणांचे अर्ज स्वीकारले, अशी माहिती पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.


Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2020 : As per the latest news Mumbai Mahanagarpalika published the recruitment advertisement for Attendance and Ward Boy Posts. There are total 114 vacancies available for this posts. Last date to apply for these posts is 17th April 2020. Below is the complete details of MCGM Ward Boy Recruitment 2020. Read the complete details carefully and apply soon. Candidate keep visit us for the further updates.

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2020

  1. -शैक्षणिक पात्रता: दहावी पास
  2. -वेतन: १८ हजार ते ५७ हजार
  3. -येथे पाठवा अर्ज: mcgm.wardboy@mcgm.gov.in
  4. -अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: १७ एप्रिल २०२०

BMC Recruitment 2020 – 114 Posts

मुंबईत करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे करोनाग्रस्तांची सेवा तसेच या बाबतची इतर कामे करण्यासाठी पालिकेने कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारितील विशेष रुग्णालयातील रिक्त असलेली वॉर्ड बॉय ही पदे भरण्यासाठी ९ एप्रिल २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी १८ हजार ते ५७ हजार इतका पगार निर्धारित करण्यात आला असून, शैक्षणिक पात्रता दहावी पास असावी. महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यावर करोनामुळे कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने कक्ष परिचर अर्थात वॉर्ड बॉयची ११४ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून १७ एप्रिल २०२०पूर्वी अर्ज पोस्टाने किंवा ईमेल आयडीवर पाठवण्याचे तसेच पालिका मुख्यालयातील बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या वेबसाइटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा आणि जाहिरातीतील अटी व शर्ती तसेच सूचनांनुसार भरावा आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती पीडीएफमध्ये तयार करून अर्जासह mcgm.wardboy@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर तसेच, ज्यांना शक्य नसेल त्यांनी पोस्टाने किंवा महापालिका मुख्यालयातील गेट क्रमांक ७ या ठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये १७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावा, असे आवाहन महापालिका सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.

सौर्स : मटा
3 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *