Medical Exam started from 15th July

Medical Exam started from 15th July

वैद्यकीयच्या परीक्षा 15 जुलैपासून

Medical Exam 2020 Updates : Examinations of medical students conducted by Maharashtra University of Health Sciences were postponed indefinitely due to lockdown. Medical Education Minister Amit Deshmukh on Friday called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan and held discussions with him. The university is preparing to conduct examinations for medical students from July 15. A similar proposal has been made by the university.

पुणे – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा लॉकडाऊनमुळे अनिश्‍चित कालावधीसाठी पुढे ढकलल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस. पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

येत्या 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निश्‍चित केले जाईल, अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली. 15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे वैद्यकीय परीक्षेच मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसून येत आहे.

सौर्स : सकाळ

Leave a Comment