Mega bharti 2020 will be expected soon

Mega bharti 2020 will be expected soon

विविध प्रशासकीय विभागांत सुमारे अडीच लाख पदे रिक्त

TCS मध्ये नवीन भरती सुरू

According to the ET report, Bajaj Finance, Axis Bank, Bandhan Bank and Ujjivan Small Finance Bank are all hiring at least 15 % more employees in their collection profiles. Over the next 18-24 months, many organizations will recruit staff in this profile. Demand for telephone and field agents is at least 15 % higher. They are paid between Rs 1.5 lakh and Rs 3.5 lakh annually. The main reason for the increase in recruitment is low collection. Bandhan Bank and Ujjivan SFB have confirmed the increase in recruitment in the collection profile. Chandrasekhar Ghosh, MD, Bandhan Bank, said, “We have lived in a select few companies that offer jobs between lockdown. The bank has recruited more than 3,000 people in the last six months. This includes recruitment in all types of departments.

ईटीच्या अहवालानुसार, बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक, बंधन बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक सर्वच त्यांच्या संग्रह प्रोफाइलमध्ये किमान 15 टक्के अधिक कर्मचाऱ्यांची भरती करीत आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. पण आता असे वाटत आहे की, जश्या गोष्टी बदलत आहे तसे लोकांना नोकऱ्या मिळत आहे. कुठे मिळत आहे लोकांना नोकरी करण्याची संधी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लोन मॉरेटोरियम जवळजवळ समाप्त होणार आहे. त्याच वेळी कर्जाची सरासरी वापसी देखील कोरोनाच्या आधीच्या पातळीपेक्षा खाली आली आहे. हेच लक्षात घेता बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) संकलन एजंटच्या भरतीमध्ये वाढ करीत आहेत. स्टाफिंग फर्म टीमलीझ सर्व्हिसेसचे प्रमुख अमित वाडेरा यांनी ईटीला सांगितले की, बर्‍याच ग्राहकांना हा नियम आणि त्याचा परिणाम समजत नाही. हे पाहता कलेक्शनमध्ये अडथळा आला आहे. हे लक्षात घेता, पुढील 18-24 महिन्यांत, अनेक संस्था या प्रोफाइलमध्ये कर्मचारी भरती करतील. टेलिफोन आणि फील्ड एजंट्सची मागणी कमीतकमी 15 टक्क्यांनी अधिक आहे. त्यांना वार्षिक दीड लाख ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जातात. भरती वाढविण्याचे मुख्य कारण कमी कलेक्शन आहे.

रेटिंग एजन्सी इक्रा म्हणाले की, कोविडच्या तुलनेत हे कलेक्शन 20-40 टक्के कमी आहे. हे मालमत्ता वर्गावर अवलंबून असते. रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट फर्म एमके ग्लोबलच्या मते, कोविडच्या पहिले सरासरी कलेक्शन 90 टक्क्यांहून अधिक होते. आता ते 60 टक्के आहे. ईएमआय बाऊंस होण्याच्या दराबाबतही प्रमुख संस्था चिंतित आहेत. ती जवळपास 25 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. कलेक्शन आणि रिकव्हरी सुधारण्यासाठी ते फील्ड आणि टेलि-कलेक्शन एजंट्सची भरती वाढवित आहेत. उज्जीवन एसएफबीचे एमडी नितीन चुघ म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत बँकेने रिप्लेसमेंटसाठी हायरिंग केली आहे. व्यवसायाची गती वाढत असताना आम्ही वेगवेगळ्या भूमिकांसाठी कामावर घेत आहोत.

बंधन बँक आणि उज्जीवन एसएफबीने कलेक्शन प्रोफाइलमध्ये भरती वाढवल्याची पुष्टी केली आहे. बंधन बँकेचे एमडी चंद्रशेखर घोष यांनी सांगितले की, आम्ही साथीच्या आणि लॉकडाऊन दरम्यान नोकऱ्या देणाऱ्या काही निवडक संस्थांमध्ये राहिलो आहोत. गेल्या सहा महिन्यांत बँकेने 3,000 हून अधिक लोकांना भरती केले आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या विभागातील भरतीचा समावेश आहे.

सौर्स : पोलिसनामा


सातारा जिल्ह्यात ४००० आयटीआयधारकांना राेजगाराची संधी – update on 24th May 2020

महाराष्ट्र तलाठी भरती २०२० – update on 3rd June 2020

Mega Bharti 2020 Latest update : As per the news received from newspaper SAKAL the Mega bharti in Maharashtra will be expected soon. Mahapriksha portal was completed this process but due to various issue other 5 companies will get the contract of this mega bharti. 12 different companies apply for this tender. Various department of Maharashtra state will be recruiting the staff in larger amount. Candidates keep visit on our website for the latest updates regarding the Mega Bharti 2020.

Mega Bharti 2020 Latest update

MahaBharti 2020 Vacancy updates : There are about two and a half lakh vacancies in various administrative departments and thousands of employees are retiring every year. There are 6,000 vacancies in the finance department, 14,000 in agriculture and animal husbandry, 9,000 in public works, 21,000 in water resources, 8,000 in the revenue department, 20,000 in the police and 21,000 in the public health department. The government is delaying the decision to raise the retirement age of state government employees to 60 years on the lines of the Center, which has angered the bureaucracy. Two and a half lakh vacancies in various departments including 21,000 posts in the health department of the state government should be filled immediately, Such an insistent demand was made by the president of the federation Vinod Desai and the chief advisor Kulthe has done.

MahaBharti 2020 Vacancy updates

विविध प्रशासकीय विभागांत सुमारे अडीच लाख पदे रिक्त असून, दरवर्षी हजारो कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. राज्याच्या वित्तीय उलाढालीत महत्त्वाच्या वित्त विभागात ६ हजार, कृषी पशुसंवर्धनमध्ये १४ हजार, सार्वजनिक बांधकाममध्ये ९ हजार, जलसंपदा २१ हजार, महसूल विभागात ८ हजार, पोलिस यंत्रणेत २० हजार, तर सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल २१ हजार पदे रिक्त आहेत.
महाराष्ट्रात करोना संकटाच्या काळात प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोप महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शुक्रवारी केला. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात सरकार दिरंगाई करीत असून, त्याबद्दल नोकरशाहीत नाराजी आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील २१ हजार पदांसह विविध विभागांतील अडीच लाख रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी आग्रही मागणी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी केली आहे.
राज्य सरकारचे प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ४ फेब्रुवारी २०२० रोजी सकारात्मक चर्चा झाली. पण निर्णयाचे गाडे पुढे सरकत नसल्याचे देसाई आणि कुलथे यांचे म्हणणे आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. अशा निर्णायक स्थितीत विविध प्रशासकीय विभागांत सुमारे अडीच लाख पदे रिक्त असून, दरवर्षी हजारो कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. राज्याच्या वित्तीय उलाढालीत महत्त्वाच्या वित्त विभागात ६ हजार, कृषी पशुसंवर्धनमध्ये १४ हजार, सार्वजनिक बांधकाममध्ये ९ हजार, जलसंपदा २१ हजार, महसूल विभागात ८ हजार, पोलिस यंत्रणेत २० हजार, तर सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल २१ हजार पदे रिक्त आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून नवीन भरतीचे प्रमाण अत्यल्प आहे. नवीन नोकर भरतीबाबत सरकारने कोणतेही नियोजनबद्ध प्रयत्न केलेले नाहीत. परिणामी सरकार राज्यातील तरुण बेरोजगारांना उपलब्ध अडीच लाख रिक्त पदांवर सोयीस्करपणे संधी नाकारत आहे. केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय वाढवून उपलब्ध जागा किमान दोन वर्षांसाठी राखण्याबाबत व्यवहार्य असा निर्णयदेखील घेण्याचे महाविकास आघाडी सरकार टाळत आहे. वाढीव आव्हानांस सामोरे जात असताना अपुऱ्या मनुष्यबळावर प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्याबाबत मात्र शासन गंभीर नाही, ही बाब आम्ही खेदाने नमूद करीत आहोत, असे महासंघाचे सरचिटणीस विनायक लहाडे, देसाई आणि कुलथे यांनी स्पष्टपणे सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी

केंद्र शासनातील कर्मचारी, २२ घटक राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्र शासनातील चतुर्थ श्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या ६० वर्षे आहे. यामुळे सेवानिवृतीची वयोमर्यादा सरसकट ६० वर्षे करावी. तसेच शासनाने विद्यमान स्थितीतील अडीच लाख रिक्त जागांवर नवोदितांची भरती करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. या मागण्यांबाबत महासंघाबरोबर तातडीने ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ द्यावी, अशी मागणी कुलथे आणि लहाडे यांनी केली आहे.

सौर्स : मटा

खूशखबर… राज्यात शासकीय मेगाभरती अखेर मुहूर्त मिळाला

लॉकडाऊन मध्ये हि नोकरीची संधी

मेगाभरती लांबणीवर : मुदतवाढीनंतर पाच कंपन्यांची नियुक्‍तीNew Update

गुड न्यूज! आता होणार 4.75 लाख सरकारी नोकर भरतीNew Update

‘एमपीएससी’ मार्फत महाभरती राबवा!!

मेगाभरती ऑफलाईन पद्धतीनेच होणार !!

MahaBharti 2020 Date Declared :  As per the latest source the Mahabharti 2020 will be expected in next month. The number of vacant posts in government departments in the state has now reached two lakh. Directly related to the public are the vacant posts in the Home, Public Health, Social Justice, Water Resources, Agriculture and Animal Husbandry, Revenue and Forestry, Women and Child Development. On this backdrop, the official mega recruitment date has been fixed and the private agency will be appointed by April 15 and the mega recruitment will start from April 20. Reservation verification of one lakh one thousand posts has also been completed. Read the complete details carefully given below:

राज्यात ‘एवढी’ पदे रिक्त?…माहिती अधिकारातून उलगडा!

MahaBharti 2020 Date Declared

राज्यातील शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची संख्या आता दोन लाखांवर पोहचली आहे. थेट जनतेशी संबंधित गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास या विभागांमध्ये सर्वाधिक रिक्‍त पदे आहेत. या पार्श्‍वभूमीवर शासकीय मेगाभरतीची तारीख निश्‍चित झाली असून 15 एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्‍त करुन 20 एप्रिलपासून मेगाभरतीला सुरवात होणार आहे. एक लाख एक हजार पदांची आरक्षण पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे.

ठळक बाबी…

 1. मेगाभरतीनंतर राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी द्यावे लागणार नऊ हजार कोटी
 2. सामान्य प्रशासन (जेईडी) विभाग ठरविणार 10 एप्रिलपर्यंत शासकीय मेगाभरतीचे नियोजन
 3. शासकीय रिक्‍त पदांच्या भरतीसाठी 15 एप्रिलपर्यंत महाआयटीतर्फे नियुक्‍त केली जाणार खासगी एजन्सी
 4. महापरीक्षा पोर्टलकडील 35 लाख विद्यार्थ्यांचा डाटा महाआयटीला सुपूर्द
 5. गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी व पशुसंवर्धन, महसूल विभागातील सर्वाधिक पदांची भरती

तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन 72 हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील 34 लाख 82 हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलकडे अर्ज केले. मात्र, मेगाभरतीला प्रत्यक्षात मुहूर्त लागलाच नाही आणि विद्यार्थ्यांची तब्बल 130 कोटींहून अधिक रक्‍कम अडकून पडली. आता महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करुन खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाआयटी विभागाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया युध्दपातळीवर पूर्ण केली जात आहे. महाआयटी विभागातर्फे ‘आरएसपी’ (रिक्‍वेस्ट ऑफ प्रपोजल) प्रसिध्द केली जाणार असून देशातील एका सक्षम अशा एजन्सीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार 15 एप्रिलपर्यंत राज्यातील शासकीय मेगाभरतीसाठी एक एजन्सी नियुक्‍ती केली जाणार आहे. तत्पूर्वी, राज्याच्या सामान्य प्रशासनाकडून एक परिपत्रक प्रसिध्द केले जाणार आहे. त्यामध्ये महाभरतीची प्रक्रिया कशी राहणार, त्यावर नियंत्रण कोणाचे असणार याबद्दल स्पष्टीकरण दिले जाणार आहे.

सौर्स : सकाळ

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये तब्बल पावणेदोन लाख पदे रिक्‍त..

मोदी सरकारनं रोजगार निर्मितीसाठी उचललं पाऊल! रिक्त पदांसाठी लवकरच होणार भरती

Mahabharti 2020 : Maha Rojgar Bharti will be expected soon. As per the news source Maha Bharti for various vacant posts will be filled soon through the UPSC & SSC Examination. Prime Minister Narendra Modi’s government, which is targeting the opposition from unemployment issues, has now taken big steps to fill vacancies in government jobs. The central government is launching a campaign to fill the vacancies. According to the sources, instructions have been given to the Ministry of Personnel and Training (DoPT) for the preparation of an Action Taken Report (ATR) for all ministries and departments as soon as possible.

राज्यभरात मेगाभरती – ७० हजार पदे भरण्याची अजित पवारांची माहिती

Mahabharti 2020

Mahabharti Mumbai 2020

नवी दिल्ली : बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांच्या निशाणावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आता सरकारी नोकऱ्यांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकार रिक्त पदांची भरती करण्यासाठी अभियान सुरु करणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सर्व मंत्रालय आणि विभागांना लवकरात लवकर यासंबंधी अॅक्शन टेकन रिपोर्ट (एटीआर) तयार करून पाठविण्याचे निर्देश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून (डिओपीटी) देण्यात आले आहेत.

Mahabharti will be expected soon
सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात गुंतवणूक आणि विकास दर वाढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या समितीची बैठक झाली. या बैठकीत नोकऱ्यांमध्ये रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ समितीच्या निर्देशानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व मंत्रालये आणि विभागांना पत्र लिहून जागरूक केले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, सरळ भरती असलेली पदे भरण्यात यावी आणि यांदर्भात माहिती कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे द्यावी. मंत्रालय आणि विभागाला महिन्याच्या पाच तारखेच्या आत यासंबंधी घेतलेल्या निर्णयाची माहिती कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे सुपूर्द करावी लागणार आहे. ग्रुप A, B आणि C पदांची सरळ भरती केंद्रात होते. यामध्ये UPSC आणि SSC संचालित करते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे, देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची योजना केंद्र सरकारची आहे. यातच, विरोधी पक्षांनी रोजगार आणि गुंतवणुकीची मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे.

सौर्स : लोकमत
16 thoughts on “Mega bharti 2020 will be expected soon”

 1. Bharati kartana corruption hotey changlya lokana interview madhe kami marks dilya jatay ..Selection madhe only interview criteria thevun chukichya padhatine medical Maharashtra asst professor anatomy physiology psm che list lavley

  Reply
 2. Gov ne only interview che marks n thevata mcq cha paper tasech experience research publications he sagale baghave ..Interview he tya selection committee che members proper asses n karita chukichya padhatine kunalahi mage pudhe kartat so interview ha only criteria selection process made nasava

  Reply
 3. Sir aata mule graguate houn baher padtil aani ya vadtya mahagai mule khedyatlya shetkari mulanna uchya shikshan ghen parvadnar nhi.
  Aata tya mulankade shiknyache kaushlya asle tri te kahich kru shakat nhit. Aani te sushikshit berojgar rhatil. Yasathi kahi tri upay yojna krne garjechech aaahe. Aani te aapl prashasnik yogyaritine krel aashi aasha sarv tarun yuvakanchi aaahe. ???JAY SHIVARAY???

  Reply

Leave a Comment