MHT CET 2020 Hall Ticket Download

MAH MCA CET Admit Card 2020 Released

MAH MCA CET Admit Card:  ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली होती, त्यांच्यासाठी अतिरिक्त परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, त्या परीक्षेसाठी हे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT-CET 2020 परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी केले आहेत. ज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते सीईटीचे अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in येथे जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करून घेऊ शकतात.

MHT CET 2020 परीक्षेचे PCB आणि PCM ग्रुपचे अतिरिक्त सत्र ७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी केली आहे त्यांनी https://mhtcet2020.mahaonline.gov.in या सीईटीच्या पोर्टलवर लॉगइन करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

ज्यांना हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक हवी आहे, त्यांच्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि हॉल तिकिट नंबर देऊन लॉग इन करायचे आहे.

परीक्षाविषयक अन्य माहितीसाठी तसेच सर्व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी mahacet.org या सीईटीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहावी.

प्रवेशपत्र डाउनलोड करा 


राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी MAH MCA CET 2020 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, ते सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.

cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील किंवा थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.

MAH MCA CET Admit Card : उमेदवारांना अॅडमिट कार्डवर अलिकडच्या काळातील छायाचित्र लावायचे आहे. नोंदणी करताना जे छायाचित्र पाठवले असेल, ते प्राधान्याने लावल्यास उत्तम. अॅडमिट कार्ड आणि ओळखपत्रासह उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळेल.

MAH MCA CET कोणत्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा?

MAH MCA CET 2020 ही प्रवेश परीक्षा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स २०२०-२१ या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष या परीक्षेचे आयोजन करतो.

कोणत्या महाविद्यालयांमध्ये होतात प्रवेश?

महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांशी संलग्न पुढील महाविद्यालयांमध्ये सीईटी स्कोरवर प्रवेश होतात –
१) एमसीए कोर्स उपलब्ध असणाऱ्या सर्व शासकीय संस्था
२) एमसीए कोर्स उपलब्ध असणारे विद्यापीठ विभाग
३) एमसीए कोर्स उपलब्ध असणारे विद्यापीठ संलग्न संस्था
४) सर्व विनाअनुदानित एमसीए इन्स्टिट्यूट्स

सोर्स : म. टा.


एमएएच सीईटी कायदा प्रवेश पत्र २०२० जाहीर: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) सेलने  एमएएच-एलएलबी (५ वर्षे) सीईटी २०२० (एमएएच सीईटी लॉ प्रवेश पत्र २०२०) चे अधिकृत संकेतस्थळ जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली असेल ते आपले हॉल तिकिट अधिकृत वेबसाइट वेबसाईटवर डाउनलोड करुन घेऊ शकता.

एमएएच-एलएलबी (५ वर्षे) सीईटी २०२० ची परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येईल. प्रवेश पत्रात अर्जदारांचा क्रमांक, रोल नंबर, परीक्षेचा वेळ आणि एमएएच सीईटी परीक्षा केंद्राचा समावेश असेल. या व्यतिरिक्त उमेदवार https://info.mahacet.org/cet2020/LL.B5/  या लिंकवर क्लिक करून थेट एमएएच सीईटी लॉ प्रवेश पत्र 2020 डाउनलोड करू शकतात.

एमएएच सीईटी लॉ प्रवेश पत्र 2020 कसे डाउनलोड करावे 

 • अधिकृत वेबसाइटवर जा cetcell.mahacet.org.
 • मुख्यपृष्ठावरील दुव्यावर क्लिक करा जिथे त्यावर लिहिलेले आहे “एमएएच-एलएलबी (5 वर्ष) सीईटी -2020”.
 • स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ दिसून येईल.
 • हॉल तिकिट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध दुव्यावर क्लिक करा.
 • आपली क्रेडेन्शियल्स आणि लॉगिन की प्रविष्ट करा.
 • एमएएच सीईटी लॉ प्रवेश पत्र 2020 स्क्रीनवर दिसून येईल.
 • प्रवेश पत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्यापैकी एक प्रिंट आउट घ्या.

Important Dates

Activity Scheduled Dates Links
Online registration for MAH-LL.B (5 Years)-CET 2020 on the website www.mahacet.org(( Reopening)) 07/09/2020 to 08/09/2020 New Registration /Login
Date of Downloading Hall ticket 02/10/2020 Click Here for Downloading Hall ticket
Date of MAH-LL.B (5 Years)-CET 2020 11th October 2020(Sunday) Click Here to see the E-mail and SMS
Text Sent to the Candidates on Registered
Mobile No and Registered E-mail ID

MHT CET 2020 Hall Ticket Download: The Admit Cards of the Common Admission Test (MHT-CET 2020) conducted by the CET Cell of the State of Maharashtra have been made available by the CET Cell from today, Saturday 26th September. Students can download these admit cards by visiting the official website mhtcet2020.mahaonline.gov.in. Details on how to download it are provided later in this report.

MHT-CET 2020: PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी

MHT-CET Exam Admit Card : MHT-CET Admit Card 2020: महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.

अधिकृत नोटीस येथे बघा 

हे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.

यापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील अॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.

एकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.

MHT CET Admit Card 2020 कसे डाऊनलोड कराल?

 • mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
 • MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
 • अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
 • आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.
 • अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.

 

सोर्स : म. टा.

Leave a Comment