MHT-CET at taluka level instead of district level

MHT-CET at taluka level instead of district level

MHT-CET जिल्हास्तराऐवजी तालुकास्तरावर

MHT-CET Exam 2020 – Uday Samant said, ‘It is necessary to take the CET exam. MHT-CET Exam 2020 schedule is currently announced’. The exams will be held on July 4, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 28, 29, 30 and 31. The examinations of the remaining students will be held from 3rd to 5th August. MHT-CET is a state common entrance test for admission to engineering, pharmacology and agriculture degree courses in Maharashtra. When and how to take this exam this year … read more details below :

MHT-CET Exam 2020

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच महाराष्ट्राच्या सीईटी सेलमार्फत राज्यातील वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात MHT-CET परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या आयोजनाबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून माहिती दिली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा आता जिल्हा पातळीऐवजी तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा कधी आणि कशी घेणार…वाचा

उदय सामंत म्हणाले, ‘सीईटी परीक्षा घेणं आवश्यक आहे. त्याचं वेळापत्रक सध्या जाहीर केलं आहे. जुलै ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० आणि ३१ या तारखांना परीक्षा घेण्यात येणार आहे. ३ ते ५ ऑगस्टला पुन्हा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. एकूण ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांची आधी नोंदणी झाली होती. अतिरिक्त नोंदणी झाली ती संख्या धरून ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.’
‘सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोर पाळण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी क्लास लावले किंवा नोंदणी केली आणि आज ते लॉकडाऊनमुळे आपल्या घरी अन्य जिल्ह्यात असतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीदेखील चिंता करू नये. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत जाता येत नसेल तर त्यांना तिथपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था विभागामार्फत करण्यात येईल,’ असेही सामंत यांनी सांगितले.

पीजीची प्रवेशप्रक्रिया सुरू – वैद्यकीय पदव्युत्तर आणि पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाची प्रक्रियादेखील राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू करण्यात आली आहे.

सौर्स : मटाLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *