MPSC Bharti 2020 Online Apply

MPSC Bharti 2020 Online Apply

‘एमपीएससी’तर्फे परीक्षा जाहीर

MPSC Recruitment 2020 : MPSC has finally announced the examinations. A total of 200 posts will be filled in various 15 post in the state. The most prominent of these posts are the Naib Tehsildar. The main examinations are likely to be held in the month of April and August. According to this MPSC advertisement, it has decided to process the recruitment for 15 posts in the state The recruitment will be done for Group A and Group B seats. Various posts will be vacant for ex. Assistant State Tax Commissioner, Deputy Chief Executive Officer / Group Development Officer, Assistant Commissioner / Project Officer, Deputy Director of Industries, Technical, Assistant Director, Skill Development, Employment and Entrepreneurship will be filled. Read the complete details carefully and apply from below given link :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) अखेर परीक्षांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील १५ पदांवर एकूण २०० जागांवर या परीक्षेद्वारे भरती केली जाणार आहे. यातील सर्वाधिक नायब तहसीलदार ही पदे आहेत. यासाठी एप्रिल महिन्यात पूर्व, तर ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे.

‘एमपीएससी’ने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार राज्य सरकारमधील १५ पदांसाठी भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. गट ‘अ’ आणि गट ‘ब’च्या २०० जागांसाठी ही भरती होईल. यामध्ये सर्वाधिक नायब तहसीलदार या ७३ जागांची भरती केली जाणार आहे. सहायक राज्यकर आयुक्त १० पदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी ७, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी १, उद्योग उपसंचालक, तांत्रिक १, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता २ अशी वर्ग एकमधील २१ पदांची भरती केली जाईल.

वर्ग ‘ब’मधील उपशिक्षणअधिकारी, शिक्षण सेवा २५, कक्ष अधिकारी २५, सहायक गट विकास अधिकारी १२, सहायक निबंधक सहकारी संस्था १९, उपअधीक्षक भूमी अभिलेख ६, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग १, सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी तत्सम ११ पदांची भरती केली जाईल.

या पदांसाठीची पूर्व परीक्षा पाच एप्रिलला राज्यातील ३७ केंद्रावर घेण्यात येईल. यासाठी २३ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. पूर्व परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा २, ३ व ४ ऑगस्ट २०२० रोजी होईल, अशी शक्‍यता आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in आणि www.mpsc.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

म. टा.

MPSC Recruitment 2020

Online Apply Here

1 thought on “MPSC Bharti 2020 Online Apply”

Leave a Comment