MPSC Bharti 2022 will be started soon

MPSC Bharti 2022

MPSC Recruitment 2022: This is important news for MPSC students. The advertisement was drawn up in 2019 for the five posts of Health Workers, Health Workers, Pharmacists, Laboratory Technicians and Health Supervisors in the Zilla Parishad which have been stalled for the last three years. But for the last three years, it has been stalled due to technical reasons. Reassuringly, the state government on Tuesday issued a ruling ordering immediate implementation of the 2019 recruitment process. According to the order, students who applied in 2019 will not have to apply anew. Students are likely to be relieved to see positive signs about starting the recruitment process. Due to Corona and his various controversies, recruitment of health workers, nurses and other related posts in the Zilla Parishad has been stalled for the last three years. The students were disappointed that the recruitment process could not be completed even after the advertisement was removed. Meanwhile, the movement for immediate start of recruitment process has gained momentum once again.

 • एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी  महत्वाची बातमी आहे. गेल्या तीन वर्षापासून रखडलेली जिल्हा परिषदेतील  ZP Health  आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदासाठी ही जाहिरात 2019 ला काढण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडली होती.
 • दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच सकारात्मक चिन्ह दिसून लागल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
 • कोरोनामुळे  आणि त्यानं वेगवेगळ्या वादांमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता आणि इतर संबंधित पदांची भरती रखडली होती. जाहिरात काढण्यात आल्यानंतरही ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यानं विद्यार्थी निराश झाले होत. दरम्यान, आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया तत्काळ सुरु करण्यात येण्याच्या हालचालींना वेग आलाय.

5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा 

 जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्देशांनुसार 5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी शैक्षणिक पात्रता औषध निर्माता यासाठी B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-CIT/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे.

 Eligibility Criteria 

 • आरोग्य सेवक पदासाठी 10वी उत्तीर्ण तसेच संगणकीय ज्ञान हवे.
 • आरोग्य सेविका पदासाठी सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद असावे.
 • आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी आरोग्य कर्मचारी कोर्स केलेला असावा, अशी अट घालण्यात आली आहे
 •  प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc ला फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी हे विषय घेऊन पदवीधर असावा.

 या परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे होती. ही पदे संपूर्ण महाराष्ट्र भरली जाणार आहेत. यासाठी नोंदणी फी ओपन कॅटेगिरीसाठी 500 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आणि माजी सैनिकांसाठी मोफत असणार आहे. या प्रक्रियेत, उमेदवाराला ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तपशीलांसह तयार होणे आवश्यक होतं. वैयक्तिक तपशील जसे आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, ईमेल आयडी, फोन नंबर, पत्ता तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी आवश्यक आहे. SSC किंवा जन्म प्रमाणपत्रानुसार अर्जदाराचे नाव भरावे, कारण जर तुमच्या कोणत्याही अधिकृत ओळखपत्राशी नाव जुळत नसेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल.


MPSC Vacancy Bharti 2022- After Corona, recruitment for 15,000 posts will be started in the state, Deputy Chief Minister Ajit Pawar had announced. Accordingly, the recruitment process for 7,000 posts has started so far. This information was given by Minister of State for General Administration Dattatreya Bharane. Read the more details given below:

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या सहा महिन्यांत पदभरतीच्या सात हजार जागांसाठी जाहिराती  दिल्या आहेत. त्या भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनात विविध विभागांतर्गत तब्बल दोन लाख जागा रिक्त असून ती पदे भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे तरुणांनी आपले ध्येय निश्चित करावे. मनात जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती ठेवून त्यादिशेने वाटचाल करावी, त्यातून निश्चितच यशाचा मार्ग मिळेल’, असा सल्ला राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी युवकांना दिला. दत्तात्रेय भरणे म्हणाले, ‘कोरोनानंतर राज्यात १५ हजार जागांवरील पदभरती सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार आतापर्यंत सात हजार जागांवरील भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.’


MPSC Bharti 2022

MPSC Bharti 2022: This is important news for students studying MPSC. MPSC will soon fill 15,000 competitive examination seats in the state, Out of which recruitment process has started for 8000 posts. Recruitment process will be carried out for the remaining posts. Read More details as given below.

राज्यात लवकरच स्पर्धा परीक्षेच्या १५ हजार जागा भरणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती आली आहे. वर्षभरात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या प्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी आहे. तशीच मलाही आहे. एमपीएससी अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. या वर्षात खूप परीक्षा द्यायच्या असल्याने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना केले.

 अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांचे संयुक्त विद्यामाने आयोजित स्पर्धा परीक्षा वास्तव, भवितव्य आणि दिशा या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमीत्ताने दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शैलेश पगारिया, अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेंडगे, महेश बडे, किरण निंभोरे उपस्थित होते.दत्तात्रय भरणे यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 ”कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे १५ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी ८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राहिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षांबाबत कोणताही गोंधळ आता होणार नाही. वर्षभरात सर्व रिक्त पदे भरली जाऊन नेमणुकाही दिल्या जाणार असुन मोठा भाऊ या नात्याने आपल्यासाठी काम करणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.”


MPSC Bharti 2022 New GR

MPSC Bharti 2022 The state government has approved the resumption of the government recruitment process, which was suspended due to Corona. Approved departments have been approved to fill 100% vacancies within the scope of MPSC and 50 % vacancies outside the scope of the Commission.

New GR has been issued by the government on Tuesday (Thu. 12) regarding the recruitment of vacancies in various departments of the government. This Government Resolution is available on the Government of Maharashtra’s website www.maharashtra.gov.in. This order has been issued with digital signature attestation.

शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात शासनाकडून मंगळवारी (ता. १२) शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार शासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर करून घेतले आहेत, त्या सुधारित आकृतीबंधातील ५० टक्के (एमपीएससीच्या कक्षेतील पदे वेगळून) पदभरती करता येणार आहे. तसेच दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने तरुणांना आणखी एक खुषखबर देत एमपीएससीच्या कक्षेतील सर्वच पदे भरण्यास मान्यता दिली आहे.

राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या तुलनेत वेतनावरील खर्च अधिक होऊ नये, यासाठी नवीन पदभरती, पदनिर्मितीवर वित्त विभागाने यापूर्वीच निर्बंध घातले आहेत. पण, विविध विभागांमधील काही प्रमाणात रिक्तपदे भरण्यासाठी वित्त विभागाने आज मन्यता दिली आहे. ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार शासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर करून घेतले आहेत, त्यांना पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यात विशेषत: एमपीएससीमार्फत भरल्या जाणारी पदे प्रामुख्याने भरली जाणार आहेत.

MPSC’च्या कक्षेतील पदांची होणार १०० टक्के भरती

ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसल्यास किमान एक पद भरता येईल.

ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत ४ मे २०२० चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्चस्तरीय सचिव समितीने/उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.

संपूर्ण जाहिराती GR येथे पहा 


MPSC Bharti 2022

MPSC Bharti 2022-Big news for MPSC students. The state will soon have a large recruitment through MPSC. This is because of the demand for filling up of Group-A, Group-B and Group-C posts in various departments of the State Government. It has come to light that 6 thousand 356 vacancies have been filled. The state government has given such a demand letter to the MPSC commission. A circular has also been issued regarding the number of vacancies in each department. So soon there will be a big recruitment.

एमपीएससी मार्फत होणार मोठी भरती 

एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी MPSC students मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच राज्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती होणार आहे. कारण राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिलं आहे. यात तब्बल 6 हजार 356 जागा भरण्याची गरज असल्याचे मागणीपत्र दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

MPSC Recruitment 2022

एमपीएससी आयोगाला राज्य सरकारने तसं मागणीपत्र दिले आहे. कोणत्या विभागात किती जागा भरणार याबाबत परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच मोठी भरती निघणार आहे.


MPSC Bharti 2022- Good news for student who preparing for MPSC Exam. Maharashtra Public Service Commission has advertised for 300 examinations and recruitment process is underway. The recruitment process for the highest number of 8,000 posts in the history of the state will be completed in the next six months. Read More details as given below.

MPSC माध्यमातून होणार मेगा भरती- ८ हजार पदांची भरती

आगामी सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) (MPSC) च्या ३०० परीक्षांच्या (Exam) माध्यमातून राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक आठ हजार पदांची भरती प्रक्रिया (Mega Recruitment) राबवली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिली आहे.

भरणेवाडी (ता.इंदापूर) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून इंदापूर व बारामती तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी भरणे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडल्या होत्या. यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करुन एमपीएसीची सदस्यांची नेमणूक करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पाठपुरावा केला. राज्यपालांची सहीसाठी मी स्वतः भेट घेवून सही घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३०० परीक्षांची जाहिरात दिली असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे. आगामी सहा महिन्यामध्ये राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक ८ हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

विद्यार्थ्याचे स्वप्न होणार पूर्ण

ग्रामीण भागासह शहरातील मुलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न असते. सामान्य प्रशासन मंत्री झाल्यानंतर एमपीएसीची च्या संदर्भात मुले-मुली वारंवार भेटत होती. त्यांच्या अडचणी सांगत होते. त्यांची तळमळ पाहून तातडीने एमपीएसच्या परीक्षेचा प्रश्‍न मार्गाी लावला असून सहा महिन्यामध्ये ८ हजार पदांची भरती प्रक्रिया होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

मुलाने स्पर्धा परीक्षा पास होवून अधिकारी होणे आई वडिलांचे स्वप्न असते. ही परीक्षा संयमाची व विद्यार्थ्याच्या वाढत्या वयाची परीक्षा असते. एमपीएससीच्या परीक्षासंदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेवून तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण केल्याने कुंटूबाचे व आमचे स्वप्न वेळेत पूर्ण करु शकलो असल्याचे नवनिर्वार्चित पोलीस उपनिरीक्षक निलेश ओमासे यांनी सांगितले.


Saral Seva Bharti 2022

MPSC Bharti 2022- As per the news, Demands for 7,460 posts have been submitted to Maharashtra Public Service Commission (MPSC) by various departments of the state government. The recruitment process for government posts is carried out through direct service and competitive examinations. Accordingly, applications for 7,460 posts for various posts in Group A, B and C have been issued from a total of 25 departments such as Public Health, Finance, Home, Higher and Technical Education, Water Resources, Planning, Public. This includes 3,011 posts in Group A, 2,658 in Group B and 1,891 in Group C.

MPSC Recruitment 2022-  मध्ये  181 पदाची भरती – Last Date 21st Feb 2022

MPSC PSI Bharti 2022:-मध्ये  250 पदाची  भरती 

 • राज्य शासनाच्या विविध विभागांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) ७ हजार ४६० पदांची मागणीपत्रे देण्यात आली आहेत. आयोगाने जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची जाहिरात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती एमपीएससीने दिली.
 • एमपीएससीने शासनाच्या विविध विभागांकडून ३१ डिसेंबपर्यंत आलेल्या पदांच्या मागणीपत्राची माहिती शुक्रवारी दिली. सरळसेवा आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय पदांची पदभरती प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य, वित्त, गृह, उच्च व तंत्रशिक्षण, जलसंपदा, नियोजन, सार्वजनिक अशा एकूण २५ विभागांकडून अ, ब आणि क गटातील विविध पदांसाठी ७ हजार ४६० पदांची मागणीपत्रे देण्यात आली आहेत.
 • त्यात अ गटाची ३ हजार ११, ब गटातील २ हजार ६५८ आणि क गटातील १ हजार ८९१ पदांचा समावेश आहे.
 • आयोगाकडून आतापर्यंत ४ हजार ३२७ पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात अ गटातील १ हजार ४९९, ब गटातील १ हजार २४५ आणि क गटातील १ हजार ५८३ पदांचा समावेश आहे.
 • जाहिरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून अन्य पदांसाठीची जाहिरात आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 • सरळ सेवा भरती परीक्षा आता IBPS, TCS आणि MKCL मार्फत!
 • As per the latest GR,  All government exams will now be conducted through IBPS, TCS, and MKCL. Due to various complaints received in the examination system started by OMR Vendor, a revised decision was taken in the state cabinet on Wednesday for recruitment.
 • पदभरतीसाठी  घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे. यापुढे राज्य शासकीय भरती फक्त IBPS, TCS आणि MKCL मार्फत होतील असा GR जाहीर झाला आहे.
 • राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी रात्री. 15/12/2021 च्या बैठकीत मा. मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या  परीक्षेसाठी  सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे, असा निर्णय घेतला आहे. 
 • या पुढील पद भरती संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात येतील. शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या  निर्देशांची अंमल बजावणी व सनियंत्रण करण्याची  करण्याची  सर्व जबाबदारी सर्व संबंधित मंत्रालयीन विभागाची राहील.
 • संपूर्ण माहिती येथे वाचा 

 • MPSC Application Process Postponed
 • The Maharashtra Public Service Commission has given an important information. The application process is being postponed as per all the advertisements published. Re-notification will be given after the technical problem is resolved and sufficient time will be given to submit the application as per all the advertisements.
 •  महत्त्वाची माहिती; MPSC परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटरवरुन एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आयोगाने म्हटलंय की, प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल.
 • प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल

 • संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी तांत्रिक अडचण येत आहे. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यानंतर अनेक तक्रारी येऊ लागल्या. या तक्रारीअंती आता आयोगाने अर्ज भरण्याची ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर पुन्हा कळवण्यात येईल आणि त्यानंतर सर्वच जाहिरातींना अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी पुरेश मुदत देखील देण्यात येईल, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

1 thought on “MPSC Bharti 2022 will be started soon”

 1. सर आपण please mpsc मार्फत भरली जाणारी पदे बद्दल माहिती देऊ शकतात का?
  नवीन gr नुसार

  Reply

Leave a Comment