MPSC Examinations 2020 New Dates

MPSC New Exam Dates Declared

Updated 11.01.2021: Maharashtra Public Service Commission (MPSC) has released an official Notification Of Revised dates for the competitive examinations which are held in the year 2020. The Maharashtra Public Service Commission has issued a circular on Monday (11th) informing about the change in the schedule.

MPSC Exams Revised Dates  – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2020 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे सुधारित दिनांक जाहीर करण्यात आलेले आहेत. सन 2020 आधील आयोजित उपरोक्त 3 परीक्षा पुढे ढकलण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर परीक्षा खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास नियोजित करण्यात येत आहेत. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

परीक्षेचे नाव –

 • राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2020
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 2020
 • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2020

सुधारिक्त तारखांचे वेळापत्रक – 

MPSC Bharti 2021

Check MPSC Revised Date Here


MPSC Exams Date Announcement: The Maharashtra Public Service Commission has taken a final decision on the new dates of the examinations which have been stalled for over a year. The state service pre-examination will be held in the second week of March and the pre-engineering service examination will be held in the third week. Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination will be held in the month of April. Official dates are expected to be announced by the state government on Friday. Read it briefly at below:

 वर्षभरापासून रखडलेल्या MPSC परीक्षा मार्चमध्ये होणार

मागील तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला आहे. (MPSC Exams Date Announcement)

तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखेबाबत आज (8 जानेवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परिक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. (MPSC exams will be held in march , date will be announced soon)

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती. त्याची दखल घेत, आता एमपाएससीची परीक्षा लवकरच घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षांबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखांची अधीकृत घोषणा आज केली जाऊ शकते. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. तर दुय्याम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा याच वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे. या सर्व परीक्षांची अधिकृत घोषणा राज्य सरकारतर्फे आज ( शुक्रवार 8 जानेवारी) होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याच निर्णय

दरम्यान मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे


MPSC पुढे ढकलण्याच्या सरकारच्या निर्णयाला ‘मॅट’ पुढे आव्हान

Some candidates have immediately challenged the decision of the state government and the MPSC to postpone the Maharashtra State Public Service Commission (MPSC) exams on the issue of Maratha reservation before the Maharashtra State Administrative Tribunal (MAT). Matt has also taken serious note of this and has sought an answer from the state government and MPSC on October 27.

मराठा आरक्षणच्या प्रश्नावरून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकार व ‘एमपीएससी’च्या निर्णयाला काही परीक्षार्थींनी महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर (मॅट) तातडीने आव्हान दिले आहे. ‘मॅट’नेही त्याची गंभीर दखल घेत २७ ऑक्टोबरला राज्य सरकार व ‘एमपीएससी’कडे उत्तर मागितले आहे.

‘एमपीएससीच्या परीक्षा घेणे, पुढे ढकलणे किंवा रद्द करणे हा अधिकार केवळ एमपीएससीला आहे. तो अधिकार राज्य सरकारला नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णयच बेकायदा आहे. मराठा समाजाचे नेते यांच्याकडून परीक्षा केंद्रे बंद पाडण्याच्या येणाऱ्या धमक्या आणि इशाऱ्यांमुळे राज्य सरकारने परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा बेकायदा निर्णय घेतला आहे. वास्तविक परीक्षा केंद्रांना आवश्यक पोलिस संरक्षण पुरवण्याची सरकारची जबाबदारी होती’, असे म्हणणे अनिल खंदारे व अन्य दोन परीक्षार्थींनी अॅड. गुणरतन सदावर्ते यांच्यामार्फत तातडीच्या अर्जाद्वारे ‘मॅट’च्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्यासमोर मांडले.

‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला ९ सप्टेंबरला स्थगिती दिली असून, सरकारी नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण लागू करता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे पीएसआय भरतीच्या संदर्भात २०१९मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीचीही मराठा आरक्षण वगळून फेररचना करणे आवश्यक होते. तेही एमपीएससीने केलेले नाही. या पार्श्वभूमीवर, गट-ब अराजपत्रित अधिकारी (पीएसआय, विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी) या पदांसाठी ११ ऑक्टोबरला नियोजित असलेली पूर्व परीक्षाही मराठा नेत्यांच्या इशाऱ्यामुळे बेकायदेशीरपणे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात आल्या तरी परीक्षा केंद्रे बंद पाडू, अशी थेट धमकी खासदार संभाजीराजे भोसले यांनी जाहीररित्या दिली. खासदार उदयनराजे भोसले यांनीही इशारा दिला. या पार्श्वभूमीवर, सरकारने बेकायदा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. आता या परीक्षा केव्हा घेतल्या जाणार, हेही अनिश्चित आहे. सरकारने करोनाचे कारण पुढे केले असले तरी प्रत्यक्षात मराठा समाजाच्या दबावामुळे निर्णय घेतला आहे. हे राज्यघटनेतील मूळ तत्त्वांचे उल्लंघन करणारे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही अवमान करणारे आहे’, असे म्हणणे परीक्षार्थींतर्फे झालेल्या सुनावणीत मांडण्यात आले.


MPSC परीक्षा अखेर पुढे ढकलली!

The state government has taken a big decision after the  Maratha andolan and the MPSC exam has finally been postponed. Exams were to be held at more than 200 places in the state. The Corona crisis has escalated, schools, colleges, studies were closed. Therefore, the examination was postponed after due consideration, informed Chief Minister Uddhav Thackeray. The Chief Minister said that now the students who are eligible for the examination will continue to be eligible.

मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून एमपीएससी परीक्षा अखेर पुढे ढकलली आहे. राज्यात 200 पेक्षी अधिक ठिकाणी परीक्षा होणार होत्या. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सरासर विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. आता परीक्षेला जे विद्यार्थी पात्र आहेत, ते पुढेही पात्रचं राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातचं राज्यात रविवारी एमपीएससी परीक्षा होणार होत्या. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले असून MPSC पुढे ढकलण्यात आली आहे.

ABP Maza…

Newमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 या परीक्षेच्या तारखेत पुन्‍हा एकदा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सोमवारी  (ता.०७) परीपत्रक जारी करत वेळापत्रकात बदल केल्‍याचे कळविले आहे. कोविड परिस्थिमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा

Newमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दिनांक 01 नोव्हेंबर 2020 व  दिनांक 22 नोव्हेंबर 2020 रोजी नियोजित अनुक्रमे अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात येत आहे. 

MPSC Examination Postponed

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा

 


MPSC Current Schedule Of Exams

Maharashtra Public Service Commission-MPSC on 2nd September 2020 has published Current Status and Proposed Timetable of Competitive Examination 2020 at official website. Candidates who have applied for exams like Subordinate Services, State Services etc can check tentative dates for 2020 examination from below link:

Current Status and Proposed Timetable of Competitive Examination 2020


MPSC Police Sub Inspector Physical Test Schedule

MPSC- Maharashtra Public Service Commission has announced Physical Test schedule for Police Sub Inspector Limited Departmental Competitive Main Examination – 2017. Candidates who have applied for this post can check their time table for Physical test from below link:

एमपीएससी पोलिस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी वेळापत्र


All examinations conducted through MPSC Extended-27th Aug Update

MPSC Exam Extended Again-The Pre-Examination of Maharashtra Public Service Commission was scheduled on September 20. However, the state government has said that the examination will be postponed due to the rising Corona outbreak. It is a bit surprising that the state government has taken such a decision at a time when all preparations for the exams are in the final stages. Read Further details below:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या राज्य सरकारचा  निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी नियोजित होती. पण वाढत्या करोना प्रदूर्भावाचे कारण पुढे करत राज्यसरकर कडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे दि. २६ रोजी जाहीर करण्यात आले. परीक्षेसाठी सर्व आरोग्य विषयक दक्षता, केंद्र बदल करण्याची मुभा देऊन सर्व पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारने असा निर्णय घेणे हे थोडं आश्चर्यकारक आहे, याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो तरुणांचे नुकसान होणार आहे. परीक्षा पुढे गेल्याने लाखो तरुणांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी वयोमर्यादा संपल्याने मिळणार नाही. याबाबत कुठले ही स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलेले नाही.

ही परीक्षा आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वात आधी ही परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार एमपीएससी पूर्व परीक्षा सर्वात आधी ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन १३ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले. तसे परिपत्रक १७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र १३ सप्टेंबरलाच नॅशनल एलिजीबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट आयोजित करण्यात आली. त्यामुळे एमपीएससी पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर ऐवजी रविवार २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता राज्यातील कोविड-१९ स्थितीमुळे केवळ पूर्व परीक्षाच नव्हे तर या दरम्यानच्या काळातील एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्य सेवा पूर्व परीक्षेव्यतिरिक्त महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही ११ ऑक्टोबर रोजी होणार होती. तीही लांबणीवर पडली आहे.


MPSC Revised Interview Time Table 2020

The Maharashtra Public Service Commission had announced revised Interview schedule For Assistant Secretary [Technical], Maharashtra State Board of Technical Education, Maharashtra Engineering & Administrative Services, Group-A, Assistant Director [Tech] of Tech Education, Mah State Board of Tech Education, Directorate of Ayush, Maharashtra State, Mumbai, Maharashtra Medical Education and Drugs Department. Now the interviews of the successful candidates will be conducted section wise from 14th To 16th  September 2020 as per posts. The MPSC has announced its schedule on its official website. Candidates who have selected for these exam can check their schedule here:

 • मुख्य प्रशासकीय अधिकारी, आयुष यांचे संचालक, गट – अ :14 सप्टेंबर
 • टेक्निकल एज्युकेशनचे सहाय्यक निदेशक (तंत्र), एम. एस. / डीवाय. महाराष्ट्र इंजीनियरिंग व प्रशासकीय सेवा, ग्रुप-ए : 15 व 16 सप्टेंबर
 • सहाय्यक संचालक (माहिती) किंवा पुस्तके व प्रकाशनेंचे परीक्षक किंवा माहिती अधिकारी जी.ए.डी. जीआर – बी (राजपत्रित) : 14 सप्टेंबर
 • आर्किटेक्चर, सार्वजनिक बांधकाम विभाग: 14 सप्टेंबर

MPSC Examinations Choice Of Center-मुदतवाढ

MPSC Duyyam Seva Recruitment 2020: According to the advertisement published by the Maharashtra Public Service Commission on 28th February 2020, the Maharashtra Secondary Service Pre-Examination 2020 was scheduled to be held on Sunday, May 3, 2020. However, the examination is proposed to be held on 11th October 2020. Candidates will be able to change centers from 21st August to 26th August 2020 28th August 2020. Read further details below:

दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 परीक्षा केंद्र बदलण्यासाठी मुदतवाढ 

MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020-विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा

महाराष्ठ्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २८ फेब्रुवारी, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०२० चे आयोजन रविवार दिनांक ३ मे २०२० रोजी नियोजित होते तथापि कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्याकरिता ही परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. २१ ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून २८ ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत.

 • जाहिरातीस अनुसरून अर्ज करताना उमेदवाराने निवडलेले जिल्हा केंद्र रद्द करण्यात येत आहे.
 • आयोगाच्या ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने निवडलेले जिल्हा केंद्र रद्द करण्यात येत आहे.
 • आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाइलव्दारे दिनांक २१ ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून २८ ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 


MPSC Examinations 2020 New Dates Declared

New UpdateMaharashtra Public Service Commission (MPSC) has released official Notification Of Revised dates For State Services exams which was on hold due to Lock down. Now MPSC has released exam dates for State Service Pre-Examination-2020. Earlier The Maharashtra Public Service Commission exam will take place on 13th September 2020. The exams were scheduled to take place on April 5. The application for the recruitment process was invited from February 28 to March 19 this year. Now due to clashes Of NEET exams this exam now be on 20th September 2020. Candidates who have applied for these exams can check new dates from below:

एमपीएससी परीक्षा देणाऱ्यांना दिलासा, त्या उमेदरांना मिळणार जवळचे परीक्षा केंद्र

महाराष्ट्र लोवसेका आयोगातर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले होते. आता ही परीक्षा येत्या 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे आयोगाने नुकतेच जाहीर केले आहे. ही परीक्षा देणारे महाराष्ट्रातील असंख्य उमेदवार हे पुण्यातील केंद्रातून नोंदणी करतात.

 त्यासाठी बहुसंख्य उमेदवार हे पुण्यात येऊन या परीक्षेची तयारी करतात. परंतु कोरोनामुळे हे सर्व उमेदवार आता आपापल्या गावी परतले आहेत. कोरोनामुळे परीक्षेसाठी त्यांना पुन्हा पुण्यात परतणे शक्य नसल्याने या उमेदवारांनी परीक्षा केंद्र बदलण्यासाठी युवा सेनेकडे धाव घेतली होती. उमेदवारांच्या मागणीनुसार शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परीक्षा केंद्र वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पुणे विभागातील नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या परीक्षा केंद्राजवळ नोंदणी करता येणार आहे.

परीक्षा केंद्र बदलण्यासाठी महत्वाच्या तारखा 

 • आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार आहे
 • यासाठी उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बदल करायचा आहे
 • संबंधित उमेदवारांना एसएमसद्वारे त्यांची माहिती कळविण्यात येईल
 • प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार केंद्र निवडण्याची मुभा देण्यात येणार आहे

NewState Services Preliminary Examination 2020 – Extension for Change in Choice of Centre


MPSC New Dates

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

Newमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.

अखेर 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


MPSC Interview Time Table 2020

The Maharashtra Public Service Commission had announced Interview schedule For Assistant Secretary [Technical], Maharashtra State Board of Technical Education, Maharashtra Engineering & Administrative Services, Group-A, Assistant Director [Tech] of Tech Education, Mah State Board of Tech Education, Mah Engg and Admin Services, Chief Administrative Officer, Directorate of Ayush, Maharashtra State, Mumbai, Maharashtra Medical Education and Drugs Department. Now the interviews of the successful candidates will be conducted section wise from 2nd, 3rd, 4th, 8th and 9th September 2020 as per posts. The MPSC has announced its schedule on its official website. Candidates who have selected for this exam can check their schedule here:

Newसहाय्यक सचिव [तांत्रिक], महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी व प्रशासकीय सेवा, गट-ए मुलाखत वेळापत्रक जाहीर..खाली दिलेल्या लिंक ने डाउनलोड करू शकतात

वेळापत्रक पुढील प्रमाणे:

 • मुख्य प्रशासकीय अधिकारी, आयुष यांचे संचालक, गट – अ : २ सप्टेंबर
 • टेक्निकल एज्युकेशनचे सहाय्यक निदेशक (तंत्र), एम. एस. / डीवाय. महाराष्ट्र इंजीनियरिंग व प्रशासकीय सेवा, ग्रुप-ए : ३ व ४ सप्टेंबर
 • सहाय्यक सचिव (तंत्रज्ञान), महर्षत्र इंजीनियरिंग प्रशासकीय सेवा: ८ व ९ सप्टेंबर

Newआर्किटेक्चर, ग्रुप-ए पीडब्ल्यूडी आणि -201 -201 -२०१ Assistant-सहाय्यक संचालक (माहिती), जीआर – बी (राजपत्रित) – मुलाखतीच्या वेळापत्रक संबंधित घोषणा


Newसहाय्यक संचालक (माहिती) किंवा पुस्तके व प्रकाशनेंचे परीक्षक किंवा माहिती अधिकारी जी.ए.डी. जीआर – बी (राजपत्रित) – मुलाखत वेळापत्रक

सूचना 

मुलाखतीचे स्थळ, वेळ या एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच मुलाखतीसाठी येताना काय काळजी घ्यावी याबाबत उमेदवाराला पाठविल्या जाणाऱ्या पत्रात नमूद केले जाईल, असे एमपीएससीने परिपत्रकाच नमूद केले आहे..


MPSC Interview Schedule Released-येथे चेक करा

MPSC Interview Time Table 2020-The Maharashtra Public Service Commission had announced the results of the Forest Service Main Examination in January. Now the interviews of the successful candidates will be conducted section wise from 20th July to 7th August 2020. The MPSC has announced its schedule on its official website. Candidates who have selected for this exam can check their schedule here.

New Update: MPSC has declared a list of candidates for Forest Service Main Examination 2019 Interview schedule. Candidates can check their names and center from below link

MPSC Forest Services Mains Interview Schedule

नवीन अपडेट :वन सेवेची ६ महिन्यापासून थांबलेली प्रक्रिया सुरू झाली…

वन सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जानेवारी महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केले होता.आता उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती २० जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान विभागवार घेण्यात येणार आहेत. एमपीएससीने मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या ३२२ उमेदवारांच्या मुलाखतींचे वेळापत्रक याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

वेळापत्रक पुढील प्रमाणे:

 • पुणे : २० जुलै ते २४ जुलै
 • औरंगाबाद २७ व २८ जुलै
 • नाशिक ३० व ३१ जुलै
 • मुंबई ४ ऑगस्ट
 • नागपूर ६ व ७ ऑगस्ट

मुलाखतीचे स्थळ, वेळ या एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच मुलाखतीसाठी येताना काय काळजी घ्यावी याबाबत उमेदवाराला पाठविल्या जाणाऱ्या पत्रात नमूद केले जाईल, असे एमपीएससीने परिपत्रकाच नमूद केले आहे


MPSC Examinations 2020 New Dates

Maharashtra Public Service Commission (MPSC) has released official Notification Of Revised dates For various exams which was on hold due to Lock down. Now MPSC has released exam dates for State Service Pre-Examination-2020, Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Joint Pre-Examination-2020, Maharashtra Engineering Service Pre-Examination-2020 Prelims. Candidates who have applied for these exams can check new dates from below:

MPSC On its Official website has announced New Dates For Exams. Candidates Can check here:-New Update


MPSC याच वर्षी होणार परीक्षा

MPSC Exam 2020 : The Maharashtra Public Service Commission had decided to conduct the state service pre-exam on March 26. Then the corona effect caused the schedule to change again. However, now that the schedule of UPSC examinations has been announced, the availability of examination centers and the examination dates of other departments of the Central and State Governments are being reviewed by the MPSC. As the students prepare for the exams, the state public service commission exams will be held by December and the schedule will be announced in a few days, said Geeta Kulkarni, deputy secretary in charge of MPSC.

MPSC Examinations 2020 New Exam Dates

MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  राज्य सेवेची पूर्व परीक्षा 26 मार्चला घेण्याचे ठरविले होते. त्यानंतर कोरोना इफेक्ट मुळे पुन्हा वेळापत्रकात बदल करावा लागला. मात्र, आता ‘UPSC’च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता परीक्षा केंद्रांची उपलब्धता अन्‌ केंद्र व राज्य शासनाच्या अन्य विभागांच्या परीक्षांच्या तारखांचा आढावा ‘एमपीएससी’कडून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केल्याने डिसेंबरपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतील आणि काही दिवसांत वेळापत्रक जाहीर होईल, असे ‘MPSC’च्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होतील का, याबाबत संभ्रम आहे. तर दुसरीकडे राज्यातील परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि अन्य परीक्षांची आढावा घेऊन राज्य सेवेची पूर्व परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक व मंत्रालयीन सहायक या पदांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक ‘एमपीएससी’कडून निश्‍चित केले जात आहे. कोविड-19 च्या संशयित तथा बाधित रुग्णांसाठी राज्यातील बहूतांश महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

आता खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्स ठेवावा लागणार असल्याने जास्तीत जास्त इमारती तथा वर्ग खोल्यांची गरज लागणार आहे. तर दुसरीकडे बहूतांश विद्यार्थी युपीएससी, एमपीएससीसह राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करीत असतात. त्यामुळे त्या परीक्षांच्या तारखा सोडून परीक्षा कोणत्यावेळी घेणे विद्यार्थ्यांसह ‘एमपीएससी’ला सोयीस्कर होईल, पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का, याचे नियोजन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षांवर काही परिणाम होईल का, याचीही स्थिती जाणून घेतली जात आहे. दरम्यान, डिसेंबरपर्यंत निश्‍चितपणे ‘एमपीएससी’ची परीक्षा घेतली जाईल, असा विश्‍वासही उपसचिव कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्‍त केला.


MPSC’s Exam postponed Due to CORONA

MPSC Pre Exam 2020 : Earlier we have published an advertisement regarding MPSC Exam dates, which was conducting as per planned scheduled on 5th April 2020 instructed by the state government but according to latest Notification Released By Commission, Pre examination Of-State Services Exam And Combined Examination is postponed  in a view of the increasing prevalence of the corona virus. Go through the complete details From given link carefully..

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा सध्या स्थगित

प्राप्त झालेल्या अपडेट नुसार राज्यातील करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अधिकृत परिपत्रका द्वारे जाहीर केला आहे.

या संदर्भात MPSC आयोगाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोवेल करोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दिनांक 22 मार्च 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 26 एप्रिल 2020 व 10 मे 2020 रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत.

सध्या कोरोना परिस्थिती मुळे आपण घरी असाल तर एक महत्वाची बातमी, सध्या आम्ही मोफत MPSC सराव परीक्षा (टेस्ट सिरीज) सुरु केल्या आहे. यात रोज दोन नवीन पेपर प्रकाशीत होत असतात. या पेपर्स मध्ये MPSC परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट आहेत. तेव्हा या लिंक वरून रोज या पेपर्सचा सराव करावा. 


MPSC Pre exam will be done on as per schedule

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० नियोजित वेळेनुसारच होणार

MPSC Pre Exam 2020 : AS per the latest news MPSC has announced that the pre- exams 2020 will be conducted according to the planned schedule. The state government has advised against taking any test from March 16 to 31, in view of the increasing prevalence of the corona virus. However, as there is no examination of the MPSC during this period, the pre-examination on April 5 will be conducted according to the scheduled schedule. The Commission has informed the Commission through a letter. Read the details carefully…

MPSC Engineering Services Bharti 2020

मुंबई : राज्यसरकारने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्याची सूचना दि. १५ मार्च २०२० च्या शासन पत्राद्वारे केली होती. मात्र, आयोगाच्या पूर्व नियोजित वेळापत्रकात १६ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत आयोगामार्फत कोणतीही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित नाही.’

त्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ५ एप्रिल २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत राज्यसेवा आयोगाने १७ मार्च रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. आयोगाने असे म्हटले आहे की, ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार रविवार दि. ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेच्या आयोजनासंदर्भातली पूर्वतयारी झाली असल्याने योग्य ती दक्षता घेऊन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात येईल.’

दरम्यान, ३१ मार्चपर्यंत करोनाच्या प्रादुर्भावाविषयी राज्यातील परिस्थितीचा आणि त्यावेळी राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल, असेही आयोगाने कळवले आहे. त्यानुसार ५ एप्रिलच्या पूर्व परीक्षेबाबत फेरआढावा घेण्यात येणार आहे. मात्र तूर्त तरी ५ एप्रिलला परीक्षा होईल असे मानून उमेदवारांनी अभ्यासाची तयारी सुरू ठेवावी.

सौर्स : डेलीहंट

Leave a Comment