MSBTE Exam Dates 2020

MSBTE Exam Dates 2020

MSBTE Exam Dates 2020: Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) Engineering, Pharmacy as well as Government approved short term courses in the final year of the final session of students, theoretical examination will be taken online MCQ method. Accordingly, the final year theory examination of the Polytechnic will be held from 5th to 15th October, while the theoretical examination of non-AICTE courses will be held from 25th September to 4th October.Read More details about it below:

MSBTE: पॉलिटेक्निक परीक्षा ५ ते १५ ऑक्टोबर दरम्यान

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) इंजिनीअरिंग, फार्मसी तसेच शासन मान्यताप्राप्त अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा, थीअरी परीक्षा एमसीक्यू पद्धतीने ऑनलाइन घेण्यात येणार आहे. त्यानुसार पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाची थिअरी परीक्षा ५ ते १५ ऑक्टोबर दरम्यान, तर नॉन एआयसीटीई अभ्यासक्रमांची थिअरी परीक्षा २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल ३१ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे, अशी माहिती एमएसबीटीईचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.

GATE 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात !!

वेळापत्रक आणि मार्गदर्शक सुचनांनुसार, अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन एमसीक्यू पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. परीक्षा विद्यार्थ्यांना घरून देण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. परीक्षेत विद्यार्थ्यांना ४०पैकी ३० प्रश्‍न सोडवावे लागणार आहे. करोना कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांचा ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राप्त होणारे गुण ९० टक्क्यांपैकी प्राप्‍त झाल्याचे गृहीत धरून १०० टक्क्यांमध्ये रूपांतरीत केले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देणे शक्य नाही, त्यांना जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासह काही अपरीहार्य कारणास्तव विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, तर त्यांना परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे.

विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षा 2020

विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्थास्तरावर घेण्यात यावी. यासाठी विविध ऑनलाइन मीटिंग अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. शक्य नसल्यास टेलिफोनिक पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा संस्थास्तरावर घेण्यात यावी. वरील सर्व प्रयत्नानंतरही विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांचे सत्रातील काम, जर्नल्स, निरंतर मूल्यमापन या आधारावर मूल्यमापन करून गुण द्यावेत. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांचीच राहणार असल्याचेही डॉ. मोहितकर यांनी स्पष्ट केले.

इंजिनीअरिंग, फार्मसी अंतिम सत्राच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक

  • प्रात्यक्षिक परीक्षा – १५ ते २५ सप्टेंबर
  • बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा – २५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर
  • थीअरी परीक्षा – ५ ते १५ ऑक्टोबर
  • निकाल – ३१ ऑक्टोबर

Leave a Comment