MSCE Scholarship Exam 2022

MSCE Scholarship Exam 2022 Hall Tickets

MSCE Pune Released the Scholarship examine 2022 dates on their official website – https://www.2022.mscepuppss.in/startpage.aspx/. MSCE Pune 5th & 8th Class examine 2022 will be held on 20th July 2022. Hall Tickets for the same has been available in school login. Read the more details given below and keep visit us for the further updates.

शिष्यवृत्ती परीक्षा बुधवार दि. २०/०७/२०२२ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा दि. २०/०७/२०२२ चे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र तात्काळ निर्गमित करावे.

MSCE Scholarship Exam 2022 Hall Tickets Download

Hall Ticket Download

MSCE Scholarship Exam 2022

MSCE Scholarship Exam 2022 Postponed

MSCE Scholarship Exam 2022: The deadline for online application for Class V and VIII Scholarship Examination to be conducted by Maharashtra State Examination Council has been extended till 31st January 2022. There is not enough time available for planning for the exam on 20th February 2022. Therefore, the scholarship examination has been postponed.

MSCE शिष्यवृत्ती परीक्षा पोस्टपोन; सुधारित तारीख लवकरच प्रसिद्ध होणार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

 • पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (म्हणजेच इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (म्हणजेच इयत्ता आठवी) २०२२ संदर्भात परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
 • या परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज (आवेदनपत्र)भरण्यासाठी १ ते ३१ २०२१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु आता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे.
 • शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अद्याप ऑनलाइन अर्ज न भरलेल्या शाळांना ३१ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ३१ जानेवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज किंवा शुल्क भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख लवकरच प्रसिद्ध होणार

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.’’


MSCE Scholarship Exam 2022 Results

Interim results of Class V and VIII Scholarship examinations conducted by the Maharashtra State Examination Council were announced. Applicants who attend the Scholarship exam may check their results from the given link. Students who have appeared for the exam will be able to view their personal results at www.mscepune.in or www.mscepuppss.in.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवी आणि आठवीचा निकाल तुलनेने घटला. त्यामुळे शिक्षण विभागाने या दृष्टीने कंबर कसली असून मिशन शिष्यवृत्ती कार्यक्रम शिक्षण विभागाने जाहीर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा इयत्ता पाचवीचा निकाल ५.१ टक्के, तर आठवीचा निकाल ६.६ टक्के इतका लागला आहे. हा निकाल समाधानकारक नसल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता वाढवण्याकरिता ‘मिशन शिष्यवृत्ती’ कार्यक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला असल्याचे अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी दिली.

यावर्षी इयत्ता पाचवीच्या एक हजार ३०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार ८९ विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये फक्त ५६ विद्यार्थी पात्र ठरले. इयत्ता आठवीच्या ५१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४०५ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी फक्त २७ विद्यार्थी पात्र ठरले. ही आकडेवारी समाधानकारक नसल्याने प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी मुख्याध्यापकांची बैठक घेतली.

मिशन शिष्यवृत्ती

या कार्यक्रमांतर्गत महापालिका शाळातील पाचवी आणि आठवी इयत्तेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करण्यात येईल. तसेच यासाठी शिक्षकांचे चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील शिष्यवृत्तीत तज्ज्ञ असलेली ८ मंडळी यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. महापालिकेचे ३५० हून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक याचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्य़ांच्या ३ सराव चाचण्या महापालिकेच्या वतीने घेण्यात येतील.

सध्या २०२२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरण्याची ३१ डिसेंबर २०२१ ही अंतिम तारीख आहे.

अंतरिम परीक्षेचा निकाल येथे तपासा  


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवीचे १६.९९ टक्के आणि पूर्व माध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. एकूण १४.८४ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत

ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला वैयक्तिक निकाल www.mscepune.in किंवा www.mscepuppss.in या संकेतस्थळांवर पाहू शकतील. मुंबई वगळता राज्यातील अन्य केंद्रावर या परीक्षेचे १२ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजन करण्यात आले होते.

दृष्टीक्षेपात निकाल –

इयत्ता पाचवी –

 • परीक्षेला उपस्थित विद्यार्थी – ३,३७,३७०
 • पात्र विद्यार्थी – ५७३३२
 • पात्रतेची टक्केवारी – १६.९९

इयत्ता आठवी –

 • परीक्षेला उपस्थित विद्यार्थी – २१०३३८
 • पात्र विद्यार्थी – २३९६२
 • पात्रतेची टक्केवारी – ११.३९

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २४ नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरता ५० रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाईल.

अंतिम निकाल कधी?

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण इत्यादी दुरुस्तीसाठी ५ डिसेंबर पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज पाठवल्यास तो स्वीकारला जाणार नाही. या मुदतीत ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगइनमध्ये ३० दिवसांपर्यंत कळवण्यात येईल. हे सर्व अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.


5th & 8th Class शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची जाहीर !!

MSCE Scholarship Exam 2021 is carried out on 12th August 2021 In all over Maharashtra.  Applicants who have participated in 5th and 8th scholarship examine can able to view their Answer keys here. Students can submit their objection if any errors display on the Answer Sheet before the 2nd September 2021.

शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्ट २०२१ ची अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन नोंदविण्यासाठी पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये दि. २४/०८/२०२१ ते दि. ०२/०९/२०२१ रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

MSCE Scholarship Exam Answer Key

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 9 ऑगस्टला ऐवजी 12 ऑगस्टला रोजी घेण्यात येणार आहे

Scholarship examinations for Class V and VIII students in the state have been postponed twice in the last fortnight. The exam will now be held on August 12. Earlier, it was announced that the exam would be held on August 8. The exam will now be held on August 12 instead of August 9.

राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ८ ऑगस्टला होणार असे जाहीर झाले होते. पण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परीक्षेशी क्लॅश होत असल्याने ती ८ ऐवजी ९ ऑगस्ट रोजी होईल असे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा ही परीक्षा लांबणीवर पडली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरस्थिती आणि बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा ९ ऑगस्टऐवजी १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र १२ ऑगस्ट रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळवण्यात आले आहे.


शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 8 ऑगस्टला ऐवजी 9 ऑगस्टला रोजी घेण्यात येणार आहे

The Scholarship Examination is conducted by the State Examination Council in February every year. Due to the reduction in the number of corona patients, the examination was scheduled to be held on August 8 and will now be held on August 9. In general, more than one million fifth and eighth grade students register for the scholarship examination every year. But, this year, the number of students taking the exam due to corona has decreased

राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती आता ती 9 ऑगस्टला होईल. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती दिली आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला आयोजित केली जाईल. 8 ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती

यापूर्वी परीक्षा दोन वेळा लांबणीवर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात परीक्षा लांबणीवर टाकली गेली होती.


शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २५ एप्रिल ऐवजी २३ मे २०२१ रोजी घेण्यात येणार आहे

Maharashtra State Council Examination has been postponed. The exam which will be held on April 25, will now be held on May 23. The State Examination Council has issued a press release in this regard.


MSCE Scholarship Exam 2021 Time Table

 1. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)
 2. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी – २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)
 3. Click Here

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता 23 मे रोजी होईल. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

25 एप्रिल ऐवजी 23मे ला होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 एप्रिल दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्यानं शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा – २०२१ बाबतच्या सूचना


MSCE Scholarship Exam 2021- Updated

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २५ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार आहे

Scholarship Exam for 5th and 8th online application link has been open now. Last date to online apply will be 30th March 2021. The scholarship examination will be held simultaneously on April 25 in all the districts of the Maharashtra state.

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२१ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ३०/०३/२०२१ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी 25 एप्रिल 2021 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Application Form Link


शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये होणार

MSCE Scholarship Exam 2020-2021: Scholarship Exam was postponed for two months. Maharashtra State Examination Councils Pre Primary Scholarship Exam (5th) & Pre Secondary Scholarship Exam (8th) examinations schedule changes. This change is made due to the Corona crisis, the exam has been postponed for two months and will be held on the fourth Sunday of April instead of February 2021. Complete details of MSCE Scholarship Exam 2020-2021 are given below

पूर्व प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये होणार

राज्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये होणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा करोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासदेखील विलंब झाला होता. नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

प्राथमिक शाळा उघडण्याबाबत निर्णय नाही: शिक्षणमंत्री

दरम्यान, पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याबाबतचा विचार करता येईल. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे सहज शक्य नसल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही. तसेच कोणताही निर्णय झालेला नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

सोर्स: सकाळ


यंदा स्कॉलरशिपची परीक्षा दोन महिने पुढे ढकलली

Scholarship Examine 2020-2021 : Earlier, the 5th and 8th Class scholarship examinations were held on the second and third Sunday of February. However, this year (2020-2021) the scholarship examination has been approved to be held on the third or fourth Sunday of April instead of February. Accordingly, the examination council has proposed to conduct the examination on the fourth Sunday of April and after its approval, the notification of the examination will be published, said the chairman of the examination council, Tukaram Supe.

Scholarship Examine 2020-2021

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारीमध्ये होतात. मात्र यंदा या परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी साधारणत: ऑक्टोबरमध्ये सुरू होते. याच कालावधीत परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे आधीच्याच (फेब्रुवारी २०२०) परीक्षेचा निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. याबाबत ‘सकाळ’ने ऑक्टोबरमध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे आता राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.

यापूर्वी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी घेण्यात येत. मात्र यंदा (२०२०-२०२१) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्याऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्याचा प्रस्ताव असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

सौर्स : सकाळ


पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

MSCE Scholarship Exam Result 2020: MSCE Scholarship Exam Result 2020: The results of the Class V and VIII Scholarship examinations conducted on 16th February 2020 by the Maharashtra State Council Of Examination has released. Check below information and link:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा; तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इनमधून; तसेच पालक व विद्यार्थ्यांना हा निकाल परिषदेच्या http://www.mscepune.in/ वेबसाइटवर पाहता येणार आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यापासून या लिंकवर काही तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल समजू शकलेला नाही.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
संकेतस्थळावर तांत्रिक अडचण

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून काही तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावरील निकालाची लिंक उघडत नाही. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येत नसल्याची तक्रार केली.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

निकाल पाहण्यासाठी थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


इयत्ता पाचवी, आठवी  शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 10 ऑक्‍टोबरपर्यंत लागणार

MSCE Scholarship Exam Result 2020: The results of the Class V and VIII Scholarship examinations conducted on 16th February 2020 by the Maharashtra State Council Of Examination have reached the final stage. Therefore, the interim results of this examination will be issued by 10th October . Read below details..

राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 9 लाख 71 हजार 764 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यात इयत्ता पाचवीच्या 5 लाख 74 हजार 372 तर इयत्ता आठवीच्या 3 लाख 97 हजार 392 विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरवर्षी जून मध्ये या परीक्षेचा निकाल लागतो. यंदा मात्र या निकालाला तब्बल साडेतील महिने विलंब झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सतत लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. कार्यालयातही अधिकारी, कर्मचारी रोटेशन पद्धतीने उपस्थित राहात होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याने कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यात आलेली आहे. परीक्षेचे कामकाज करणाऱ्या एजन्सीचे कर्मचारीही महाराष्ट्राच्या बाहेरील असल्याने ते आपापल्या गावी अडकले होते. त्यामुळे काही महिने परीक्षेच्या निकालाचे काम मंदावले होते.

मागच्या महिन्यापासून संबंधित कर्मचारी कार्यालयात परतले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाला वेग आला आहे. आता, सर्व उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. केंद्र संचालकाकडून कळविण्यात आलेल्या त्रुटींचीही तपासणी पूर्ण होत आलेली आहे. विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यात आलेले आहेत. त्याची तपासणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 16 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षेचा अंतरिम निकाल 10 ऑक्‍टोबरपर्यंत लावण्यात येणार आहे.

ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षांचे निकाल लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. तो विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत. त्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ऑक्‍टोबर अखेर परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Comment