MSCE Scholarship Exam Result 2020

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

MSCE Scholarship Exam Result 2020: MSCE Scholarship Exam Result 2020: The results of the Class V and VIII Scholarship examinations conducted on 16th February 2020 by the Maharashtra State Council Of Examination has released. Check below information and link:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा; तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इनमधून; तसेच पालक व विद्यार्थ्यांना हा निकाल परिषदेच्या http://www.mscepune.in/ वेबसाइटवर पाहता येणार आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यापासून या लिंकवर काही तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल समजू शकलेला नाही.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी २० ऑक्टोबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
संकेतस्थळावर तांत्रिक अडचण

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून काही तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावरील निकालाची लिंक उघडत नाही. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येत नसल्याची तक्रार केली.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

निकाल पाहण्यासाठी थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


इयत्ता पाचवी, आठवी  शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 10 ऑक्‍टोबरपर्यंत लागणार

MSCE Scholarship Exam Result 2020: The results of the Class V and VIII Scholarship examinations conducted on 16th February 2020 by the Maharashtra State Council Of Examination have reached the final stage. Therefore, the interim results of this examination will be issued by 10th October . Read below details..

राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 9 लाख 71 हजार 764 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यात इयत्ता पाचवीच्या 5 लाख 74 हजार 372 तर इयत्ता आठवीच्या 3 लाख 97 हजार 392 विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरवर्षी जून मध्ये या परीक्षेचा निकाल लागतो. यंदा मात्र या निकालाला तब्बल साडेतील महिने विलंब झाला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सतत लॉकडाऊन वाढविण्यात आला होता. कार्यालयातही अधिकारी, कर्मचारी रोटेशन पद्धतीने उपस्थित राहात होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याने कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यात आलेली आहे. परीक्षेचे कामकाज करणाऱ्या एजन्सीचे कर्मचारीही महाराष्ट्राच्या बाहेरील असल्याने ते आपापल्या गावी अडकले होते. त्यामुळे काही महिने परीक्षेच्या निकालाचे काम मंदावले होते.

मागच्या महिन्यापासून संबंधित कर्मचारी कार्यालयात परतले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाला वेग आला आहे. आता, सर्व उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. केंद्र संचालकाकडून कळविण्यात आलेल्या त्रुटींचीही तपासणी पूर्ण होत आलेली आहे. विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यात आलेले आहेत. त्याची तपासणीही करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 16 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षेचा अंतरिम निकाल 10 ऑक्‍टोबरपर्यंत लावण्यात येणार आहे.

ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षांचे निकाल लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले आहे. तो विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत. त्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ऑक्‍टोबर अखेर परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Comment