अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2021

11th Admission Mission 2021

The 11th admission schedule for Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Amravati and Aurangabad divisions of the state is likely to be announced today, Monday. Sources said that students who have registered and completed the first part can fill Part 2.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक…

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या सहा विभागांसाठी सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज, सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून पहिला भाग पूर्ण केला आहे अशा विद्यार्थ्यांना पार्ट २ भरता येईल असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई एमएमआर विभाग तसेच, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अकरावीचे ऑनलाइन प्रवेशाचे अर्ज भरले जात आहेत. राज्यभरात रविवारी सांयकाळपर्यंत या भागातून ४ लाख ३१ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा भाग एक भरून नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई एमएमआर विभागात २ लाख १९ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. औरंगाबाद १८ हजार ४५५, अमरावती ११ हजार ७७८, नागपूर ३५ हजार १४९ आणि नाशिक २८ हजार ११३ आणि पुणे विभागात ९० हजार ४९६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यापैकी या विभागांतील एकूण १ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित केला आहे. आता या विद्यार्थ्यांना भाग दोन भरायचा आहे. या संदर्भातील वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज भाग – १?

ऑनलाइन अर्ज कसा भराल:-

https://mumbai.11thadmission.org.in/Registration/Registration.aspx या लिंकवर क्लिक करावे.

सर्व प्रथम वरील लिंकवर क्लिक करा एक फॉर्म दिसेल.

1. एमएमआर रिजनमधील विद्यार्थ्यांनी Within MMR Area वर क्लिक करा. इतरांनी Outside MMR Area तर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी Outside Maharashtra Area या पर्यायावर क्लिक करा.

2. Fresher वर क्लिक करा.

3. SSC वर क्लिक करा.

4.Seat No. बॉक्स मध्ये तुमचा स्वतःचा 10वी परीक्षा बैठक क्र.(Seat No.) लिहा.
उदा. A011025.

5. Seat No.च्या खाली लाल रंगातील Get SSC Data वर क्लिक करा.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे उद्घाटन

6. तुमचे पूर्ण नाव, आईचे नाव व इतर माहिती तुम्हाला दिसेल.

7. Mobile Number बॉक्स मध्ये तुमचा चालू असलेला मोबाईल नं. टाका.

8. Security Question पुढे Select ला क्लिक करा त्यातील एक प्रश्न निवडा, त्याच्या पुढच्या बॉक्स मध्ये त्या प्रश्नाचे उत्तर लिहा.

उदा. What is the name of your grandfather?
पुढच्या बॉक्स मध्ये तुमच्या आजोबांचे नाव लिहा.
(तुम्ही कोणताही प्रश्न निवडू शकता व त्याचे उत्तर लिहून तो प्रश्न व उत्तर लक्षात ठेवा)

9. तुमच्या 11वी ऍडमिशन फॉर्मचा पासवर्ड तुम्ही सेट करा पुढच्या बॉक्स मध्ये परत तोच पासवर्ड लिहा व लगेच ते वहीत लिहून घ्या व लक्षात ठेवा.

10. CAPCHA CODE बॉक्स मध्ये त्या बॉक्स खाली जे दिसते आहे सेम तसेच पाहून लिहा(टाईप करा)

11. वरील तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर परत एकदा चेक करून खालील हिरव्या Register बटन वर क्लिक करा.

प्रवेशाचा दुसरा टप्पा असा असेल 

पहिला टप्पा – पसंतीक्रम आणि कोटा प्रवेशासाठी शून्य फेरी (१२ ते २२ ऑगस्ट)

 • नियमित फेरी एकसाठी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदविणे सुरू
 • नवीन विद्यार्थी प्रवेशाचा पहिला आणि दुसरा भाग भरू शकतात
 • विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी मार्गदर्शन केंद्र व माध्यमिक शाळांमध्ये सुरू राहील
 • कोटाअंतर्गत प्रवेश करणे – व्यवस्थापन, इनहाऊस, व अल्पसंख्याक कोटा (शून्य फेरी)
 • व्यवस्थापन, तसेच इनहाऊस कोटा प्रवेशाच्या रिक्त जागा प्रत्यार्पित करणे
 • नियमित फेरी एकसाठी प्रवेश अर्ज भाग दोन भरणे बंद होईल

दुसरा टप्पा – नियमित प्रवेश फेरी एक (२३ ते २५ ऑगस्ट)

 • तात्पुरती, संभाव्य सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे
 • तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती ऑनलाइन नोंदविणे
 • ऑनलाइन प्राप्त झालेल्या आक्षेप, सूचनांचे संकलन करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतीम करणे

तिसरा टप्पा – नियमित प्रवेश फेरी एकसाठी गुणवत्ता यादी जाहीर करणे (३० ऑगस्ट)

 • विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेले कॉलेज दर्शविणे
 • कॉलेजांना प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगीनमध्ये दर्शविणे
 • विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मोबाइल संदेश पाठविणे
 • पहिल्या नियमित फेरीचे कटऑफ वेबसाइटवर दर्शविणे

चौथा टप्पा – पहिली फेरी अकरावी प्रवेश निश्‍चिती (३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर)

 • विद्यार्थ्याने शाळेमध्ये ऑनलाइन प्रवेश निश्‍चित करणे
 • प्रवेश घ्यायचा नसल्यास प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन करू नये, घेतलेला प्रवेश रद्द करणे
 • व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरू राहतील
 • व्यवस्थापन कोटाअंतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे
अकरावी प्रवेश अधिकृत संकेतस्थळ – https://11thadmission.org.in/

 


Mumbai 11th Admission 2020 – अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२०

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाइट 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या वेबसाइटवर ज्युनियर कॉलेज नोंदणी करू शकतात. दक्षिण, पश्चिम आणि उत्तर मुंबईतील कॉलेज 1 जुलैला तर ठाणे, मीरा- भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेतील कॉलेज 2 जुलैला वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.

तसेच यंदाच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती देण्यासाठी विभागनिहाय ऑनलाइन प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे. meet.google.com/ktb-cwsq-dmq या गुगल लिंकद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment