Mumbai Mahanagarpalika Nurse Bharti 2020

Mumbai Mahanagarpalika Nurse Bharti 2020

मुंबई महापालिकेत करारावर नर्सची भरती होणार

BMC Nurse Bharti 2020 : As per the news within a 3 month Doctors and Nurse mega bharti will be held in Mumbai Mahanagarpalika on contract basis. Mumbai Municipal Corporation will be recruiting a large number of doctors and nurses for the next three months. They will be contracted for three months. Mumbai Municipal Corporation has contacted the nurse who is going as home care. He has been offered a three-month contract and will be paid Rs 30,000 a month. Some nurses have shown willingness to work, but at the same time have demanded insurance cover. At present, the central government has provided insurance cover of Rs 50 lakh only to permanent employees in the health service.

मुंबई महापालिकेत डॉक्टरांची तात्पुरती भरती

BMC Nurse Bharti 2020

मुंबई : मुंबई महापालिकेने आगामी तीन महिन्यांकरीता डॉक्टर आणि नर्सची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. त्यांना तीन महिन्यांसाठी करारबद्ध करुन घेण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेने होम केअर म्हणून जाणाऱ्या नर्सबरोबर संपर्क साधला आहे. त्यांना तीन महिन्याकरीता करारबद्ध करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे तसेच त्यांना महिना तीस हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. काही नर्सनी काम करण्याची तयारी दाखवली आहे, पण त्याचबरोबर विमा संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या केवळ आरोग्य सेवेत कायम स्वरुपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच केंद्र सरकारने 50 लाखाचे विमा संरक्षण दिले आहे.
कोणत्याही रुग्णालयात कामास नसणाऱ्या पाच हजार नर्स मुंबईत आहेत. ते केवळ होम केअरचे काम करतात. सध्या लॉकडाऊनमुळे त्यांना फारसे काम नाही. त्याहीपेक्षा होम केअर करणाऱ्या नर्स प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यातील आहेत. अनेक नर्सनी काम करण्याची तयारी दाखवली आहे, पण आमच्या प्रवासाची व्यवस्था काय अशी विचारणा केली आहे. मुंबई परिसरातील अनेक नर्स उपनगरात राहतात. त्यामुळे घरी पोहोचण्याची सुरक्षित व्यवस्था असावी अशी त्यांची मागणी आहे.
मुंबई महापालिकेने खाजगी डॉक्टरांनाही तात्पुरते सेवेत घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनाही तीन महिने करारबद्ध करण्याची तयारी दाखवली आहे. चांगले मानधन देण्याचीही तयारी दाखवल्यानंतरही खाजगी डॉक्टरांचा प्रतिसाद खूपच कमी आहे. आमची वैयक्तिक प्रॅक्टीस सोडून तीन महिने कसे येणार अशी विचारणा अनेक खाजगी डॉक्टर करीत आहेत.

सौर्स : सकाळ
5 thoughts on “Mumbai Mahanagarpalika Nurse Bharti 2020”

Leave a Comment