Mumbai Mantralaya Bharti 2020

Mumbai Mantralaya Bharti 2020

मंत्रालयात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

If you are looking for a government job, there is a good chance for you. Recruitment has been started for several vacancies under the Ministry of Law and Justice, Government of India. You can apply for this by visiting the official website of the Ministry. The recruitment will range from Rs 44,900 to Rs 1,42,400. In particular, 12 successful candidates will also be able to apply for it. Read the details given below:

Jalsampada Vibhag Bharti 2020

जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत, अनेक रिक्त जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन यासाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी 44, 900 ते 1,42,400 पर्यंत वेतन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे 12 उत्तीर्ण उमेदवारांना देखील यासाठी अर्ज करता येणार आहे.

या पदांसाठी भरती –  कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या विभागात उर्दू, कोकणी, नेपाळी, संथाली आणि तमिळ भाषांसाठी वैयक्तिक सहाय्यक (प्रादेशिक भाषा) अशा पाच पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 12 वी पास असणे गरजेचे आहे. त्याशिवाय संबंधित भाषांव्यतिरिक्त कम्प्यूटरमध्ये निपुण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे. उमेदवार http://leligslative.gov.in/documents/recruitment या लिंकवर जाऊन या पदांसाठी संबंधित पात्रता, पदांसाठीचे निकष आणि इतर तपशील मिळवू शकतात.

सौर्स : पोलिसनामा


मुंबई मंत्रालयातील अधिकारी वर्गाची पदे रिक्त

Vacant posts of officers in Mumbai Mantralaya will be filled soon. Assembly Speaker Nana Patole has directed that the process of filling up the vacancies in the ministry should be expedited as p

er the directions of the court and in the prescribed manner. He also said that seniority list of cell officers should be issued and action should be taken to set up a special cell for this purpose. A meeting was held in the Vidhan Bhavan regarding the pending promotion of officers to the post of cell officer in the ministry. At this time, Patole directed to fill the vacancies immediately.

Vacant posts of officers in Mumbai Mantralaya

मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे (vacant posts of officers in Mantralaya) न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सूची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पटोले यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले. यावेळी नाना पटोले म्हणाले की, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी तयार करुन पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी.  कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारीत करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असेही पटोले यांनी सांगितले. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव संजय कुमार यांनी विहित नियामांनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

सौर्स : डेली हंट

Leave a Comment