Mumbai Metro Bharti 2020

Mumbai Metro Bharti 2020

मुंबई मेट्रोमध्ये भरती 2020

Mumbai Metro Published an advertisement for the Engineer posts. Candidates apply for this posts from below given link. Last date to apply for that posts is 2nd November 2020. Read the details carefully given below:

महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने काही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. ही भरती प्रक्रिया सेक्शन इंजिनीअर पदांसाठी होत आहे. पदांची तपशीलवार माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी आदी माहिती या वृत्तात देत आहोत. अर्ज करण्यासाठी थेट लिंकही पुढे देण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी १ ऑक्टोबर २०२० रोजी जाहिरात निघाली होती. अर्ज २ नोव्हेंबर २०२० पर्यंत भरता येणार आहेत.

MMRDA Recruitment 2020

No. of posts details : पदांची माहिती

  • सिनीअर सेक्शन इंजिनीअर (ई अँड एम) – ०२ पदे
  • सेक्शन इंजिनीअर (ई अँड एम) – ०४ पदे

एकूण पदे – ०६

Other Important Details

  • शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल्स/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आदि विविध शाखांमधील पू्र्ण वेळ पदवी किंवा पदविका
  • वयोमर्यादा : सिनीअर सेक्शन इंजिनीअर पदासाठी कमाल ४४ वर्षे तर सेक्शन इंजिनीअर पदासाठी कमाल ४२ वर्षे. वयाची गणना १ ऑक्टोबर २०२० या तारखेला ग्राह्य धरून केली जाईल. आरक्षित प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक उमेदवार [email protected] या ईमेलवर अर्ज आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्कॅन्ड कॉपीज पाठवायच्या आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा …..


मुंबई मेट्रो भरतीसाठी लाख पेक्षा अधिक अर्ज..

Mumbai Metro Recruitment 2019 : In the next few years, one lakh 5 thousand 313 applications have been received against the 1053 different posts of the metro which will be launched in Mumbai and around the area, out of which 87 thousand 135 applications have been valid. Valid applicants will be appointed in the next few months through written examination and interviews. Some of these positions will also be filled on deputation from the Railways and Metro Railways. More details are given below :

येत्या काही वर्षांत मुंबई आणि परिसरात सुरू होणाऱ्या मेट्रोच्या १०५३ विविध पदांसाठी एक लाख पाच हजार ३१३ अर्ज आले असून त्यापैकी ८७ हजार १३५ अर्ज वैध ठरले आहेत. वैध अर्जदारांची लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे पुढील काही महिन्यात नियुक्ती केली जाणार आहे. यातील काही पदे ही रेल्वे आणि मेट्रो रेल्वेतून प्रतिनियुक्तीवरदेखील भरण्यात येणार आहेत.

पुढील काही वर्षांत मुंबई आणि परिसरात मेट्रो तब्बल ३३७ किमीचे जाळे तयार होणार आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कर्मचारी गरजेचे आहेत. मेट्रोच्या संचालनासठी ‘महामुंबई मेट्रो संचालन महामंडळा’ची निर्मिती या वर्षी जूनमध्ये करण्यात आली होती. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांची नियुक्ती ऑगस्टमध्ये करण्यात आली.

महामंडळातर्फे सप्टेंबरमध्ये १०५३ कर्मचारी भरती जाहीर करण्यात आली. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला असून लाखभर अर्ज महामंडळाला प्राप्त झाले. यातील जवळपास सर्वच पदे ही तांत्रिक स्वरूपातील आहेत. एकूण १२० स्थानक नियंत्रक, १९ स्थानक व्यवस्थापक, १३६ विभाग अभियंते, ३० कनिष्ठ अभियंते आणि मेट्रोच्या चलनवलनासाठी इतर तांत्रिक पदांचा समावेश आहे. पुढील वर्षअखेर सुरू होणाऱ्या ‘मेट्रो २ ए’ आणि ‘मेट्रो ७’ या दोन्ही मार्गासाठी तिकीट विक्री कक्ष आणि ग्राहक सेवा ही कामे बाह्य़ स्र्रोतांमार्फत केली जाणार आहेत. त्यासाठी दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली आहे. ही सर्व पदे कायमस्वरूपी असून त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. या मोठय़ा भरतीमध्ये मराठा आणि आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गालादेखील आरक्षण ठेवण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो तीन नवीन मार्गाचे उद्घाटन केले. त्या वेळी २०२१-२२ पर्यंत मेट्रोचे १२० किमीचे काम पूर्ण होईल असे देखील सांगण्यात आले.
Leave a Comment