Mumbai Seven hills Hospital Mega Bharti – 600 Posts

Mumbai Seven hills Hospital Mega Bharti – 600 Posts

मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात मोठी भरती

Mumbai Doctors Bharti 600 posts – At present, in the Seven hills hospital has 176 doctors and needs another 600 doctors. As a result, hospitals are offering higher salaries than usual. MDs are offered Rs 2 lakh per month, MBBS Rs 80,000 per month, Ayurvedic doctors Rs 60,000 and homeopaths Rs 50,000 per month. Apart from this, additional benefits like boarding, lodging, quarantine period of 15 days in a month are also being provided. complete details available below on this page.

MCGM Mumbai Bharti 2020

Mumbai Doctors Bharti 600 posts

शात एकीकडे नोकऱ्यांचा तुटवडा होऊन बेरोजगारीचे संकट आ वासून उभे आहे. दुसरीकडे आरोग्य क्षेत्रात मात्र कोविड- १९ मुळे नोकऱ्यांच्या भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत. इतक्या की नामांकित रुग्णालये समोरून ऑफर देऊनही डॉक्टर्स, नर्सेस मिळेनासे झाले आहेत. मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात तब्बल ६०० डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र ही पदे भरली जात नसल्याने आता जास्त पगाराची ऑफरही रुग्णालयाने दिली आहे.

सेव्हन हिल्स रुग्णालयात तब्बल १,००४ बेड्स कोविड -१९ रुग्णांसाठी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य कर्मचारीही तितक्याच मोठ्या संख्येने हवे आहेत. मात्र महाराष्ट्रातून ही गरज भागत नसल्याने आता रुग्णालयाने देशपातळीवर शोधमोहिम सुरू केली आहे. रुग्णालयाच्या जाहिरातीनुसार, १०० इंटेन्सिविस्ट्स, १०० अॅनेस्थेटिस्ट्स, १० नेफ्रॉलॉजिस्ट्स, ५ रेडिओलॉजिस्ट, २०० एमबीबीएस डॉक्टर्स, १०० बीएएमएस आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स, १०० बीएचएमएस आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स हवे आहेत.

सध्या या रुग्णालयात १७६ डॉक्टर्स आहेत आणि आणखी ६०० डॉक्टर्सची रुग्णालयाला आवश्यकता आहे. त्यामुळे रुग्णालय नेहमीच्या वेतनापेक्षा जास्त वेतन ऑफर करत आहेत. एमडींना दरमहा २ लाख, एमबीबीएसना दरमहा ८० हजार, आयुर्वेदिक डॉक्टरांना ६० हजार तर होमिओपॅथ्सना ५० हजार रुपये दरमहा पगाराची ऑफर आहे. याशिवाय बोर्डिंग, लॉजिंग, महिन्यातील १५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी आदी अतिरिक्त लाभही देण्यात येत आहेत.

No.of Posts Details – पदांची माहिती

  • इंटेन्सिविस्ट्स – १००
  • अॅनेस्थेटिस्ट्स – १००
  • नेफ्रॉलॉजिस्ट्स – १०
  • रेडिओलॉजिस्ट – ५
  • एमबीबीएस डॉक्टर्स – २००
  • बीएएमएस आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स – १००
  • बीएचएमएस आणि सर्जरी डिग्रीहोल्डर्स – १००

सौर्स : मटा

2 thoughts on “Mumbai Seven hills Hospital Mega Bharti – 600 Posts”

Leave a Comment