Nanded Rojgar Melava Registration

Nanded Rojgar Melava Registration

नांदेड – रोजगारासाठी एक लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

Nanded Job Fair 2020 : For the last few years, unemployed students have been given the option of online registration for jobs in Nanded District. It was hoped that this would reduce the importance of the Center for Skill Development and Employment Entrepreneurship. But the number of students registering with the registration office is not low even when online registration has started. Many private companies, industries, businesses were shut down in the lockdown. As a result, thousands of educated youth lost their livelihood. Thousands of young people who have been sitting at home for six months are upset by unemployment. So everyone has started preparing their minds to go where they can get a job.

मागील काही वर्षापासून अनेक क्षेत्रात नोकरभरती झाली नाही. त्यामुळे राज्यातच नव्हे, तर देशभरात लाखो बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. मागील तीन वर्षात जिल्ह्यतील कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाकडे एक लाख १८ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी आॅनलाइन नोंदणी केली केली आहे.

मागील काही वर्षापासून बेरोजगार विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आॅनलाइन नोंदणी असा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राचे महत्व कमी होईल, असे वाटत होते. परंतु आॅनलाइन नोंदणी सुरु असताना देखील नोंदणी कार्यालयाकडे नोंद करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. लॉकडाउनमध्ये अनेक खासगी कंपन्या, उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी हजारो शिक्षित तरुण – तरुणी यांच्या हातचा रोजगार हिरावला गेला. सहा महिन्यापासून घरी बसून असलेल्या हजारो युवक बेरोजगारीमुळे अस्वस्थ झाली आहेत. त्यामुळे जिथे नोकरी मिळेल तिथे जाण्यासाठी सर्वांनी मनाची तयारी सुरु केली आहे.

मागील काही दिवसापासून एसटी महामंडळाची बस, रेल्वे आणि खासगी बस सुरु झाल्याने लॉकडाउनमध्ये घरी परतलेले शेकडो विद्यार्थ्या – विद्यार्थीनी पुन्हा मोठ्या शहराकडे वळत आहेत. विशेष म्हणजे एरवी कंपनीकडून दिवाळीचे घसघशीत बोनस, ॲडव्हान्स पगार, पेढ्यांचा बॉक्स घेऊन दिवाळी साजरी करण्यासाठी गावी परतणारे तरुण यंदा पहिल्यांदाच दिवाळीपूर्वीच नोकरीच्या शोधात मोठ्या शहराकडे कुच करताना दिसत आहेत.

एकाही विद्यार्थ्यास शासकीय नोकरी लाभ नाही

सध्या सर्व प्रकारच्या शासकीय नोकरभरती बंद आहे. यामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांना खासगी कंपन्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. जानेवारी ते डिसेंबर २०१९ पर्यंत कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राकडे झालेल्या नोंदीप्रमाणे एक लाख १८ हजार ३६१ बेरोजगार तरुण- तरुणींनी नोद केली असून, यामध्ये ८३ हजार ५४ बेरोजगार युवकांचा, तर ३५ हजार ३०७ विद्यार्थानींचा समावेश असल्याचे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता केंद्राने दिलेल्या माहितीवरुन दिसून येते. असे असले तरी, यातील एकाही विद्यार्थ्यास शासकीय नोकरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

सौर्स : सकाळ

Leave a Comment

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!