Nashik Mahanagarpalika Safai Karmchari Bharti 2020

Nashik Mahanagarpalika Safai Karmchari Bharti 2020

नाशिक महापालिकेत  सफाई कर्मचारी भरती

Nashik Mahanagarpalika Bharti 2020 : As there is insufficient number of “safai karmchari” in Nashik city, NMC has decided to outsource 700 cleaners. Congress spokesperson Hemalatha Patil had moved the high court alleging irregularities in the matter. The one-year contract was awarded for three years, while Watergress had objected to conducting the tender process only for the company. Therefore, the High Court had stayed the tender process. However, on May 22, the High Court lifted the stay and clarified that there was no irregularity. Read the details given below and keep visit us…

Nashik Mahanagarpalika Bharti 2020

नाशिक शहरात सफाई कामगारांची अपुरी संख्या असल्याने महापालिकेने ७०० सफाई कामगार आऊटसोर्सिंगने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अनियमितता झाल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एक वर्षाचा ठेका असताना तीन वर्षांचा देण्यात आला असून, वॉटरग्रेस कंपनीसाठीच निविदा प्रक्रिया राबविण्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली होती. परंतु, गेल्या २२ मे रोजी उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवत यात अनियमितता झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यामुळे डॉ. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात अनियमितता असून, स्थगिती देण्याची मागणी त्यांनी अॅड. विनय नवरे, अॅड. सम्राट शिंदे यांच्यामार्फत केली होती. मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या ठेक्यात स्थगिती आदेश उठवल्याने आणि मुळातच ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश दिल्याने पुन्हा स्थगिती आदेश देण्यास न्यायमूर्तींनी नकार दिला. स्थगिती देण्यापेक्षा मूळ याचिकेवरच सुनावणी घ्यावी, असे न्यायमूर्ती बोबडे यांनी नमूद केल्याची माहिती डॉ. पाटील यांचे उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. संदीप शिंदे यांनी दिली. महापालिकेत आऊटसोर्सिंगद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरती प्रकरणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. परंतु, या प्रकरणातील मूळ याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाने महापालिकेसह ठेकेदाराला दिलासा दिला आहे.

ठेकेदाराकडून भरती सुरू

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकणात थेट हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर पालिकेसह ठेकेदाराचे बळ वाढले आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ठेकेदाराने सफाई कर्मचारी भरती सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेवर मात्र विरोधकांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. आता उच्च न्यायालयातच ही लढाई लढू, असे स्पष्टीकरण डॉ. पाटील यांनी दिले आहे.

सौर्स : मटा


नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन महिन्यांसाठी स्वच्छता कर्मचारी भरती

Nashik Mahanagarpalika Bharti 2020 : As per the news received from the resources various posts like 5000 will be still vacant in Nashik Mahanagarpalika. But only 1700 employees are filled. Nashik Mahanagarpalika want to recruiting 700 safai karmchari very soon through the outsourcing process. Read the complete details carefully given below :

Nashik Mahanagarpalika Bharti 2020

नाशिक : शहरात स्वच्छता करण्यासाठी लोकसंख्येनुसार पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना, सध्या सतराशे कर्मचाऱ्यांवर सफाई केली जात आहे. पालिकेने आऊटसोर्सिंद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला असला तरी, तो न्यायालयात अडकून पडला आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात नियमित साफसफाईसाठी दोन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करावी अशी मागणी शहरातील तीनही आमदारांसह महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी, आमदार अॅड. राहुल ढिकले, सिमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे उपस्थित होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात स्वच्छता व जंतुनाशक फवारणी नियमित होणे आवश्‍यक आहे. सध्याच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. आऊटसोर्सिंगने ७०० सफाई कर्मचारी भरती प्रक्रियेस उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी शासनाच्या सचिवांशी चर्चा करून किमान दोन महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने कर्मचारी तातडीने भरावे, लॉकडाऊन मुळे नाशिक मध्ये नागरिकांना औषधे व जीवनावश्‍यक वस्तू घेण्यात अडचणी येत असल्याने महापालिकेने मोबाईल अॅप्लिकेशन तयार करून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची संपूर्ण नावे व त्यांच्या फोन नंबर अॅपवर द्यावा. शहरातील भाजी मार्केट मध्ये सामाजिक आंतर पाळणे, भाजीपाला हाताळताना संसर्ग होऊ नये तसेच पैशाची देवाण-घेवाण करताना संसर्ग होऊ नये यासाठी पेटीएम क्रेडिट कार्डची सुविधा वापरावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

सौर्स : मटा
7 thoughts on “Nashik Mahanagarpalika Safai Karmchari Bharti 2020”

Leave a Comment

MahaGov अधिकृत अँप डाऊन!