Online Job Fair 2020 through google form

Online Job Fair 2020 through google form

ऑनलाईन रोजगार मेळावा २०२० – जॉब्स फेअर

Rojgar Melava 2020 : Unemployed youth will now be able to get information about available employment opportunities in industries in the state on the website. Apart from this, on this website, the entrepreneurs will also get information about the skilled manpower available in different parts of the state. For this, the website http://www.mahaswayam.gov.in has been launched through the Skill Development Department. This website has created a medium that is useful for both the entrepreneurs and the skilled manpower they need. Read the complete details carefully given below:

Imporatnat Update On 21st September 2020 About Online Job Fairs:

कौशल्य विकास योजनांच्या लाभासाठी सेवायोजन नोंदणी आधार लिंक करणे महत्वाचे

Solapur Rojgar Melava 2020-1500+जागेंसाठी

Aurangabad Rojgar Melava 2020-950जागेंसाठी

Satara Online Rojgar Melava 20201095 जागेंसाठी

Yavatmal Online Rojgar Melava 2020

Pune Rojgar Melava 2020

राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून http://www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे.

खाजगी, शासकीय रोजगारसंधींची माहिती होते उपलब्ध

बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी रिक्तपदांच्या जाहिराती (Vacancy Advertisement) या टॅबव्‍दारे माहिती मिळू शकते. शासकीय तसेच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेंतर्गत प्रकरण सादर करणे आदी कार्यवाही करता येते.

उद्योजकांना मिळते नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती

संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरित्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्‍तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदांची विनामुल्य प्रसिद्धी करणे, ही यादी पीडीएफ किवा एक्सेलमध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट ऑनलाईन नोंदविणे आदी कार्यवाही करता येते. उद्योजकांना सीएनव्ही कायदा १९५९ अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येते.

संकेतस्थळावर रोजगार विषयक सर्व सेवा ह्या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामुल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी http://www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.

सौर्स : सकाळ


Online Rojgar Melava 2020 for 2817 vacant posts : Lockdowns were carried out across the country to prevent the spread of corona. As a result, due to the large migration of other state workers, the industrial companies in Pune district are facing insufficient manpower. Now the industrial companies, which were started on a conditional basis by relaxing the lockdown, are facing a huge shortage of manpower, with only 25 to 30 per cent manpower available. Mega recruitment of employees will be done in the district to fill the void created in the industrial companies due to migration of other state workers. There are more than 2817 vacancies in various companies. An online job fair will be held soon. Read the complete details carefully given below:

Online Rojgar Melava 2020 – विविध कंपन्यांत २८१७ जागा रिक्त

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे परराज्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांना अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करावा लागत आहे. आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणून काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत असून, केवळ २५ ते ३० टक्के मनुष्यबळ उपलब्ध आहे. परराज्यातील मजुरांच्या स्थलांतरामुळे औद्योगिक कंपन्यांत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची मेगा भरती केली जाणार आहे. विविध कंपन्यांमध्ये २६००हून अधिक रिक्त जागा आहेत. त्यातही लवकरच ऑनलाइन रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.
‘पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, पेंटर, शीटमेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, ग्राइंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक, प्रोग्रॅमर, बीडीई, पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनीअर, अकाउटंट, टीग वेल्डर यासारख्या पदांसाठी भरती होणार आहे. आवश्‍यक पात्रताधारक, तसेच सातवी ते पदवीधर उमेदवारांसाठी एकूण २६०० पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत,’ अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्‍त अनुपमा पवार यांनी दिली.

  • ऑनलाइन रोजगार मेळावा – या नोकरभरतीच्या अनुषंगाने रस्ता पेठेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘ऑनलाईन रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
  • पसंतीक्रम नोंदविणे गरजेचे – या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांतर्गत उमेदवारांनी आपापल्या यूझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाइटद्वारे लॉग इन करून पदांचा पसंतीक्रम नोंदवावा लागेल. पसंतीक्रम नोंदविताना इच्छुकांनी त्यांच्या घरापासून किंवा वास्तव्यास असलेल्या ठिकाणापासून जवळची कंपनी पाहून, आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करावी. २२ जूनपर्यंत ही प्रक्रिया करता येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
  • ‘एसएमएस’द्वारे माहिती – इच्छुक व ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल. शक्य असेल तिथे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

सौर्स : मटा


Organizing an online job fair in Pune : Pune District NCP has organized a state level online job festival for unemployed youth on the occasion of the party’s anniversary from today (3rd June – Tuesday). Under this initiative, applications for jobs in various companies have been invited from unemployed youth through Google Forms. NCP district president Pradip Garatkar said that the applications received will be sent to the companies concerned. June 10 is the anniversary of the Nationalist Congress Party. This year, millions of workers have returned to their hometowns due to the lockdown. Due to the migration of these other state workers, industrial companies are now in face the need of manpower. Garatkar also appealed to the youth of the state to come forward to accept employment opportunities to take advantage of this available situation.

Those interested should apply online at https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8.

Online job fair – ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन

पुणे – पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त बेरोजगार युवकांसाठी आजपासून (ता. ३) राज्यस्तरीय ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या बेरोजगार युवक-युवतींकडून गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. प्राप्त झालेले अर्ज जागा रिक्त असलेल्या संबंधित कंपन्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले. येत्या १० जूनला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन आहे. यंदा लॉकडाऊनमुळे लाखो कामगार आपापल्या मूळ गावी परतले आहेत. या परप्रांतीय कामगारांच्या स्थलांतरामुळे औद्योगिक कंपन्यांना सध्या मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. या उपलब्ध परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी राज्यातील युवकांनी रोजगाराची संधी स्वीकारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही गारटकर यांनी केले आहे.

इच्छुकांनी https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8 या लिंकवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

सौर्स : सकाळ

11 thoughts on “Online Job Fair 2020 through google form”

  1. सरकारी नोकरभरती घ्या आधी हवं तर जॉइनिंग नंतर ठेवा, मुलं सरकारी नोकरीच्या मागे लागलीयेत, त्यानंतर भरती 5 वर्ष होणार नाही डिक्लिअर करा, पहा इथे कसे खोऱ्याने अर्ज येतील ते…..

    Reply
  2. I am m.sc.computer science & I have 13+ years teaching experience as a lecturer & now I am in search of job not only in teaching but in any field

    Reply

Leave a Comment

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!