Panvel Mahanagarpalika Bharti 2021 in Arogya Vibhag

Panvel Mahanagarpalika Bharti 2021

आरोग्य विभागातील ८५०० जागेच्या मेगा भरतीला उद्या पासून सुरुवात…

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. पूर्ण माहिती येथे पहा ..

पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागात भरती

Panvel Mahanagarpalika Bharti 2021 : Panvel Municipal Corporation Has published the recruitment advertisement for various post under the Health Department. The health department of Panvel Municipal Health Department has been lacking staff since its inception. Employees were hired a few months ago, but there is still a shortage of staff in the health department. Municipal corporation will be recruiting employees under the National Health Mission. Therefore, the health department of the municipality is likely to be enabled in the coming months.

पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरुवातीपासून कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. काही महिन्यांपूर्वी कर्मचारी भरती करण्यात आली होती, मात्र अजूनही कमी मनुष्यबळावर आरोग्य विभागाचा कारभार हाकला जातो. महापालिकेच्या प्रयत्नाने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम होण्याची शक्यता आहे.

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पनवेलमध्ये सहा ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र चालविले जातात. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल शहरात दोन अशा सहा नागरी आरोग्य केंद्रांत केवळ ३५ कंत्राटी नर्स कर्मचारी आहेत. ऑक्टोबर २०१८ रोजी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पदभरतीच्या माध्यमातून ही भरती करण्यात आली होती. काही महिने स्थगित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतून केवळ ३७ पदे भरण्यात आल्यामुळे आरोग्य विभागात अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे. दोन महिन्यांपूर्वी महापालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. सचिन जाधव यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रयत्न सुरू केले होते. राज्याच्या आरोग्य विभागाने याची दखल घेतली असून पनवेल महापालिकेसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून कंत्राटी भरती केली जाणार आहे. ठाणे येथील उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई परिमंडळ या कार्यालयाच्या माध्यमातून भरतीप्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. परिचारिका म्हणजे नर्स या पदासाठी ८ जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करता येणार आहेत. कंत्राटी पद्धतीने काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरून थेट मुलाखतीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये फार्मासिस्ट ३, स्टाफ नर्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी ३, तर नर्सपदावर ८४ कर्मचाऱ्यांची पदे भरती केली जाणार आहे. महापालिका क्षेत्राची लोकसंख्या १० लाख एवढ्यापर्यंत पोहोचल्यामुळे नागरी आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असते, मात्र कर्मचारीसंख्या कमी असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या भरतीनंतर अपुऱ्या कर्मचाऱ्यांची तक्रार बंद होऊन नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देता येईल, असा विश्वास महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी व्यक्त केला आहे.

पदे भरण्यासाठी वेगळे प्रयत्न

सरकारी पगारात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीपदावर काम करण्यास उमेदवार मिळत नाहीत. महापालिकेत तीन पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेत सहभागी होऊन महापालिकेला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळावेत, यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रयत्नशील आहेत.

📄 जाहिरात

म. टा.
2 thoughts on “Panvel Mahanagarpalika Bharti 2021 in Arogya Vibhag”

Leave a Comment