Pimpri-Chinchwad Mahanagarpalika will recruit 147 vacancy

Pimpri-Chinchwad Mahanagarpalika will recruit 147 vacancy

पिंपरी – चिंचवड महापालिका करणार 147 जागांवर भरती

PCMC Recruitment 2020 – As per the latest news PCMC will be recruiting 147 various expert doctor, staff nurse and safai kamgar for Pimpari and Chinchwad City. This various posts will be vacant in Mahanagarpalika Hospital, clinic. 147 seats will be filled for 15 technical posts on honorarium for a period of six months. The proposal has been approved by the Standing Committee for this recruitment and the proposal has been forwarded to the General Assembly for approval. Read the complete details carefully and keep visit on our website.

तज्ज्ञ डॉक्‍टरांसह परिचारिका, सफाई सेवकांचा समावेश

पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी हंगामी स्वरूपात तज्ज्ञ डॉक्‍टरांसह परिचाहरका, सफाईसेवक, फार्मासिस्ट या पदांची मानधनावर भरती करण्यात येणार आहे. सहा महिने कालावधीसाठी मानधनावर 15 तांत्रिक पदांसाठी 147 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी स्थायी समितीने मान्यता दिली असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे.

पिंपरी – चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 25 लाखांवर आहे. या लोकसंख्येनुसार, नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेचे शहरात 32 दवाखाने आहेत. तर, आठ रूग्णालये आहेत. संत तुकारामनगर येथे पिंपरी – चिंचवड महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. या दवाखाने आणि रूग्णालयांसाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांसह परिचारिका, वॉर्डबॉय, सफाईसेवक, फार्मासिस्ट अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.

महापालिकेत या पदांवर काही कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत. तर, काही कर्मचारी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी स्वरूपात मानधनावर घेण्यात येतात. यापूर्वी नेमणूका केलेल्या उमेदवारांच्या नेमणूकीच्या मुदतवाढीचा कालावधी संपुष्टात येत आहे. वैद्यकीय विभाग हा अत्यावश्‍यक सेवेत मोडत असल्याने विविध संवर्गातील अत्यावश्‍यक 15 तांत्रिक पदांसाठी 147 जागा मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहा महिने कालावधीसाठी “वॉक इन इंटरव्यू’ पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

त्यानुसार, महापालिका वैद्यकीय विभागातर्फे सहा स्त्रीरोग तज्ञ, सात बालरोग तज्ञ, सहा भूलतज्ञ, सहा फिजिशियन, एक रेडिओलॉजिस्ट, एक नेत्ररोगतज्ञ, तीन दंतशल्य चिकित्सक, 38 वैद्यकीय अधिकारी, 11 फार्मासिस्ट, 39 परिचारीका, पाच लॅब टेक्‍निशियन, एक एक्‍स-रे टेक्‍निशियन आणि 26 महिला सफाईसेवक अशा 15 पदांसाठी 147 जागांवर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी स्वरूपात भरती करण्यात येणार आहे.

सौर्स : प्रभात
5 thoughts on “Pimpri-Chinchwad Mahanagarpalika will recruit 147 vacancy”

Leave a Comment