Police Bharti 2021

Police Bharti 2021

खात्यांतर्गत फौजदार भरती कधी?

The MPSC conducts the Shipai Bharti process under the Police Department. The government is demanding early recruitment of Shipai under the department, on behalf of young constables who have been vying for the post of Shipai for many years. About 50% of the vacancies in the state police force are filled through the MPSC’s direct service recruitment process. About 25 %of promotions under the Shipai account are paid through promotions. The remaining 25 % recruitment is done through competitive examination of the candidates under the department.

MPSCच्या वतीने पोलीस खात्यांतर्गत फौजदार भरती प्रक्रिया राबविल्या जाते. शासनाच्या वतीने लवकर खात्यांतर्गत फौजदार भरती करावी, अशी मागणी फौजदार पदाकरिता अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत असलेल्या तरुण कॉन्स्टेबल युवकांच्या वतीने केली जात आहे. राज्य पोलीस दलात फौजदार पदाकरिता ५० टक्के रिक्त पद भरती MPSCच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाते. २५ टक्के फौजदार खात्यांतर्गत सेवेत असलेल्या पदोन्नती मार्गाने भरली जातात. उर्वरित २५ टक्के पदभरती ही खात्यांतर्गत उमेदवारांची स्पर्धा परीक्षा घेऊन केली जाते. मात्र २०१६ नंतर खात्यांतर्गत फौजदार पदाची जाहिरातच आलेली नाही.

गृहमंत्र्यांची घोषणा – राज्यात 12,500 पोलिसांची भरती

Police Bharti 2021: Police Bharti 2021 updates, Major change have been made in Police Bharti 2021 After the transfer of senior police officers, Home Minister Anil Deshmukh has announced that 12,500 policemen will be recruited in the state. Maharashtra Police Bharti 2021 Details and application form will be available soon. Police Bharti 2021 exam details, educational details, how to apply etc., will be available soon on this page. As per the Latest News Out Of 12538, 5300 Vacancies Get Filled In First Stage Of Recruitment. State government has been approved to fill 12,528 posts of police constables. Read more details from given link below:

पोलीस दलांत GD कॉन्स्टेबल पदासाठी ५५ हजार ९१५ जागेसाठी बंपर भरती

खुशखबर! साडेबारा हजार जागांसाठीच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण – त्वरित अर्ज करा…

Under the Police Shipai Bharti Pre-Examination Training Scheme candidates from Muslim, Christian, Buddhist, Sikh, Parsi, Jain and Jewish minority communities will be prepared for the opportunity. Candidates who fulfill the following given The full address, email id contact number / whatsapp number should be mentioned by attaching Xerox of the papers which will be accessible till 05/04/2021.

पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजने अंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. खालील दिलेल्या पूर्तता करण्याऱ्या उमेदवारांनी दि. 05/04/2021 पर्यंत पोहोच होतील असे कागद पत्रांच्या झेरॉक्स जोडून संपूर्ण पत्ता, इमेल आय डी संपर्क क्रमांक /व्हाट्सअप नंबर नमूद करावा.

Police Bharti 2021 Training

राज्य शासनाच्या पदभरतीवर वित्त विभागाने आणलेल्या निर्बंधातून सूट देत पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश गुरुवारी काढण्यात आला. यापैकी २०१९मधील रिक्त ५,२९७ पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक स्रोतांवर प्रतिकूल परिणाम झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ४ मे २०२० रोजी एक आदेश काढून वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांनी नवीन कोणतीही पदे भरण्यावर निर्बंध घातले होते. आजच्या आदेशाने गृह विभागाला पोलीस भरतीसाठी त्यातून सूट देण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपायांची पदे १०० टक्के भरण्याला अनुमती देण्यात येत असल्याचे वित्त विभागान�E0 गुरुवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. दिनांक १३ नोव्हेंबर २०२०च्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपायांची २०१९मधील रिक्त ५,२९७ पदे ;तसेच २०२०मधील ६,७२६ पदे, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी ५०५ अशी एकूण १२,५२८ पदे भरण्यासाठी आधीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यासंबंधीचा शासन आदेश आज (गुरुवारी) काढण्यात आला.

पहिल्या टप्प्यातील पोलीसभरती नक्षलग्रस्त भागात 

वर्धा -;मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे पोलीसभरती रखडली होती. मात्र, आता पोलीसभरती घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने नक्षलग्रस्त भागासह पहिल्या टप्प्यात पाच हजार जागांसाठी भरती घेण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच भरती सुरू होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी येथे दिली

पुण्यातील २१ नगरसेवकांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. येत्या काळात भाजपचे मोठे नेते महाविकास आघाडीत प्रवेश करणार असून, लवकरच त्यांची नावेही नागरिकांना लवकरच कळणार असल्याचा टोला देशमुख यांनी भाजपला लगावला राज्यात पोलीस शिपायांची पदे भरण्याचा शब्द आमच्या सरकारने पाळला आहे. आजच्या आदेशाने पोलीस दल अधिक मजबूत होण्यास मदत होईल.


येत्या आठ दिवसांत पोलीस भरती जाहिरात अपेक्षित…

Police Bharti 2021 GR

पोलीस खात्यात भरती २०२१ – अपडेट्स १७ जानेवारी २०२१

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र पोलीस खात्यात 12538 जागांच्या भरतीची घोषणा केली होती.  पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.

पोलिस भरतीचा जीआर गृहविभागाकडून रद्द

Police Bharti 2021 GR Cancelled: The Home Department has withdrawn the GR of police recruitment without SEBC reservation in just three days. The Home Department will issue a new GR corrigendum to enable SEBC students to avail of EWS. In the GR dated January 4, it was mentioned that SEBC students should be recruited from the open category. Therefore, Home Minister Anil Deshmukh has announced the cancellation of GR on 04 January.

Police Bharti 2021 GR Cancelled:  एसईबीसी आरक्षणाशिवाय पोलिस भरतीचा जीआर अवघ्या तीन दिवसांत गृहविभागानं मागे घेतला आहे. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूयएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग नवीन जीआर शुद्धीपत्रक काढणार आहे. ४ जानेवारीच्या जीआरमध्ये एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावं असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे ४ जानेवारीचा जीआर रद्दा केल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

राज्यात पोलिस भरती 2019 करीता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. गृह विभागाने  4 जानेवारी 2021 ला निर्गमित केलेला सरकारनं निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 पोलिस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील कडील 23 डिसेंबर 2020 च्या सरकार निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित सरकार निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले.

 बुधवारीच राज्यातील पोलिस भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी SEBC आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाकडून घेण्यात आला होता. पोलिस भरतीदरम्यान जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा. SEBC तून अर्ज केलेल्या पोलिस भरतीतील उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार, असा निर्णय घेऊन त्याबाबतचा GR देखील जारी करण्यात आला होता.


पोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती

Police Bharti 2021 GR Published by Home Ministry – As per the latest updates the state Home Ministry has decided not to have SEBC reservation for conducting police recruitment process in the Maharashtra state. The age limit of open category will be applied while determining the eligibility of candidates who have applied from SEBC. The state government has issued a ruling in this regard. It has been decided that the candidates who fulfill the terms and conditions of the open category should be considered from the open category. Those who apply from SEBC will be charged an open category examination fee. Increased examination fees will be allowed to be paid online. Proceedings must be completed within 15 days. The Director General of Police has been directed to implement this decision immediately and submit a report to the government.

  • राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.
  • ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र, गृह विभागाने पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले.
  • दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा संघटनानंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. 25 जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागानं नवा आदेश काढल्यानं मराठा संघटना काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.
  • येत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार- मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, येत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार आहे. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती आणि भविष्यातील भविष्याबद्दल भीती वाटत आहे. या परीक्षार्थी उमेदवारांची सद्यस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली कमाल संधी आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या संदर्भातील परिपत्रके मागे घेणे आवश्यक आहे, यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे ही विनंती, असं रोहित पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

For More details of Police Bharti 2021 Click here


Police Bharti 2021

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच…

Police Recruitment 2020 : There were total 11000 vacancies vacant for Police Constable. The recruitment criteria for the personnel of the state police force will be changed, there will be first field test for the recruitment of the police and then a written examination. For this, the recruitment criteria of former Chief Minister Devendra Fadnavis will be changed and a government order in this regard will be withdrawn by the Home Ministry. Read the complete details carefully and keep visit us.

राज्यात लवकरच सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती

Police Recruitment 2021

मुंबई – राज्य पोलिस दलातील जवानांच्या भरतीचे निकष बदलले जाणार असून, पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा होईल.या निकषानुसार लवकरच सुमारे ११ हजार रिक्‍त जागांसाठी भरती मोहीम राबविण्यात येईल. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील भरतीचे निकष बदलण्यात येणार असून, याबाबतचा शासन आदेश गृहमंत्रालयाकडून काढला जाणार आहे. या माध्यमातून पोलिस दलास सक्षम जवान मिळणार असून, याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना होईल असे बोलले जाते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यातच याबाबतचे सूतोवाच केले होते.
पोलिस भरतीसाठी सध्या प्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानी चाचणी घेतली जाते. दोन्ही चाचण्यांतील एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवडीची यादी जाहीर होते. या निवड प्रक्रियेमुळे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनेक उमेदवार पुढे शारीरिक चाचणीत अनुत्तीर्ण होतात. परिणामी पोलिस दलाला योग्य आणि सक्षम जवान मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात आल्याने पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या अनेक बेरोजगार युवा-युवतींनी अगोदर मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली होती.
हे नव्याने होणार

पोलिस भरतीची प्रक्रिया दुरुस्तीनंतर आता उमेदवारांना अनेक नव्या बदलांना सामोरे जावे लागेल. त्यांना सोळाशे आणि शंभर मीटर अशा दोन गटांमध्ये धावावे लागेल.गोळाफेक, लांब उडी, पुलअप्स या प्रकाराची १०० गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. याआधी लांब उडी आणि पुलअप्स हे दोन प्रकार वगळण्यात आले होते, त्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल.

सौर्स : सकाळ

8 thoughts on “Police Bharti 2021”

Leave a Comment