Police Bharti 2023

Police Bharti 2023-Exam Date

Police Bharti 2023 Written Exam Date: Police Bharti 2023 Written Exam Date: As per the latest update received from the source – the written exam for driver and constable candidates will be held on 26th March 2023. Candidates who have cleared physical test and skill test with prescribed marks will be eligible for this written test. Read More details as given below.

मुंबई – मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी 26 मार्चला लेखी परीक्षा होणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महसंचालक संजय कुमार यांनी दिली आहे. लेखी परीक्षा 90 मिनिटांची व 100 गुणांची असेल. त्याचे स्वरूप ‘ऑब्जेक्टिव्ह’ असेल.

 • राज्यातील १८ हजार ३३१ पदांची पोलिस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे निकष ८ दिवसांत निश्चित होऊन त्यांची परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर चालक व शिपाई उमेदवारांची लेखी परीक्षा अनुक्रमे २६ मार्च आणि २ एप्रिल रोजी होणार आहे.
 • जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेली पोलिसांची मैदानी चाचणी त्याच महिन्यांत संपली. परंतु, दीड महिन्यांपासून ना मैदानीचा निकाल ना लेखी परीक्षा, अशी स्थिती होती. यंदा प्रथमच उच्च न्यायालयाने तृतीयपंथींना पोलिस भरतीसाठी परवानगी दिली. त्यानंतर पोलिस भरतीसाठी राज्यभरातून दीडशे ते दोनशे तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले. त्यांच्या मैदानी चाचणीचे निकष स्वतंत्रपणे ठरविण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र समिती नेमली.
 • या समितीने निश्चित केलेल्या निकषांनुसार आता तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी पार पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकच तृतीयपंथी उमेदवार असून त्याने पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, गृह विभागाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार पोलिस चालक पदाची लेखी २६ मार्च रोजी होणार आहे. तर पोलिस शिपाई पदाची लेखी २ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा एकाचवेळी पार पडणार आहे.

चालक व शिपाई पदाची स्वतंत्र लेखी परीक्षा

गृह विभागाचे पत्र प्राप्त झाले असून पोलिस चालक पदाची लेखी परीक्षा २६ मार्च तर शिपाई पदाची परीक्षा २ एप्रिलला होणार आहे. तत्पूर्वी, तृतीयपंथी उमेदवाराची मैदानी चाचणी पार पडेल. सोलापूर शहरातून एकाच तृतीयपंथी उमेदवाराने शिपाई पदासाठी अर्ज केलेला आहे. – अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर


Police Bharti 2022-Physical Test Date: An important update regarding police bharti examine has come out. The state home department has informed that the police recruitment  has been completed and the physical test will be conducted from 2nd January 2023. Read More details as give below.

District Wise New Updates received : 

 • मुंबई रेल्वे पोलीस भरती शारीरिक चाचणी  :  17th January 2022 पासून
 • धुळे पोलीस भरती शारीरिक चाचणी : 2nd January 2022 पासून
 • नाशिक ग्रामीण पोलीस भरती शारीरिक चाचणी  :  2nd January 2022 To 17th January 2022
 • पोलीस शिपाई पुणे लोहमार्ग ग्राउंड वेळापत्रक : 5 जानेवारीला ग्राउंड सुरू होईल ते 18 जानेवारी पर्यंत ग्राउंड राहील

Important Recruitment News

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3682 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा
मुंबई महापालिकेमार्फत लवकरच पाच हजार आशासेविकांची भरती!
राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
मेगा भरती - ७५ हजार पदे भरण्याचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद भरती अपडेट -जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती -रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार !!
ग्रामसेवक भरती 2023-१०,००० पदांची ग्रामसेवक भरती लवकरच !!

भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गाची 61 रिक्त पदे आणि पोलीस शिपाई चालक संवर्गाची 56 रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस भरती-2021 चे आयोजन करण्यात आले असून सदर पदासाठी दिनांक 02/01/2023 पासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर पोलीस भरतीमध्ये प्रथम शारिरीक चाचणी व त्यानंतर लेखी चाचणी घेण्यात येणार आहे.

चाचणीचे वेळापत्रक

 • चालक = २ ते ८ जानेवारी = दररोज ९०० उमेदवारांची चाचणी
 • शिपाई = ९ ते ११ जानेवारी, १७ ते २० जानेवारी

District Wise New Updates received : 

 • मुंबई रेल्वे पोलीस भरती शारीरिक चाचणी  :  17th January 2022 पासून
 • धुळे पोलीस भरती शारीरिक चाचणी : 2nd January 2022 पासून

राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.

Venue of Field Test/ Ground Test/ Physical Test (Thane Police) :- Saket Police Ground, Kalwa Bay, Thane West.

Solapur Police Bharti-मोठी बातमी! २ ते २० जानेवारीपर्यंत पोलिस भरतीची मैदानी चाचणी

राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.

Venue of Field Test/ Ground Test/ Physical Test (Thane Police) :- Saket Police Ground, Kalwa Bay, Thane West.

पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत.

गृह विभागाच्या वतीने पोलिस चालक, पोलिस शिपाई व राज्य राखीव पोलिस बल या संवर्गातील १८ हजार ३३१ पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी तब्बल १८ लाखांहून अधिक अर्ज आल्याने उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाकडे चालकाच्या ७३ तर पोलिस शिपायाच्या ९८ जागा असून त्यासाठी जवळपास १४ हजार अर्ज आले आहेत. तर ग्रामीणमधील ५४ जागांसाठी सव्वातीन हजार अर्ज आलेले आहेत. माजी सैनिकांसह अन्य घटकातील उमेदवारांसाठी परीक्षा पद्धती थोडी वेगळी आहे. यंदा प्रथमच या भरतीसाठी तृतीयपंथींना संधी देण्यात आली असून, त्यासंबंधीचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी परीक्षा पद्धती कोणती ठेवायची, हा मोठा प्रश्न गृह विभागासमोर आहे. त्यासंबंधीचे नियोजन केले जात आहे, पण नियमित उमेदवारांची परीक्षा त्यामुळे थांबणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे.

लेखीसाठी ‘ओएमआर’ प्रश्नपत्रिका

पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी प्रत्येकी एका जागेसाठी दहा जण लेखीसाठी निवडले जातील. अंकगणित, सामान्यज्ञान (चालू घडामोडी), बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यावर आधारित लेखी परीक्षा होईल. चालक उमेदवारांना मात्र मोटार वाहन चालविण्याची जादा टेस्ट द्यावी लागणार असून, त्यात उत्तीर्ण व्हावेच लागेल. दरम्यान, प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी दिली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित त्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाद्वारे होणार असून, मानवी हस्तक्षेप काहीच नसेल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची चांगली तयारी करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे.

अशी असेल गुणदान पद्धत

गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) :

८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर ते ७.३० मीटर : ८ गुण, ६.१० ते ६.७० मीटर : ६ गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण मिळतात. कमीतकमी ३.१० मीटर ते ३.७० मीटरपर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो.

—————————————–

गोळाफेक (महिला : ४ किलोचा गोळा) :

६ मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ५.५० ते ६ मीटर : १२ गुण, ५ ते ५.५० मीटर : १० गुण, ४.५० ते ५ मीटर : ५ गुण, ४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण ४.५० मीटरपेक्षा कमी : ३ गुण. चार मीटरपेक्षा कमी पडल्यास काहीच गुण मिळणार नाहीत.

———————————————————

१०० मीटर धावणे (पुरुष) :

११.५० सेकंद : १५ गुण, ११.५० सेकंदापेक्षा जास्त व १२. ५० सेकंदापेक्षा कमी : १२ गुण, १२.५० सेकंद व १३.५० सेकंदापेक्षा कमी : १० गुण, १३.५० सेकंद ते १४.५० सेकंद : ८ गुण, १४.५० ते १५.५० सेकंद : ६ गुण, १५.५० ते १६.५० सेकंद : ४ गुण, १६.५० ते १७.५० गुण : एक गुण.

———————————————

१०० मीटर धावणे (महिला) :

१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, १४ ते १५ सेकंद : १२ गुण, १५ ते १६ सेकंद : १० गुण. १६ ते १७ सेकंद : ८ गुण, १७ ते १८ सेकंद : ६ गुण, १८ ते १९ सेकंद : ४ गुण आणि १९ ते २० सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल.

————————————————

८०० मीटर धावणे (महिला) :

२ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी: २० गुण, २ मिनिटे ५० सेकंद ते ३ मिनिटे : १८ गुण, ३ मिनिटे ते ३ मिनिटे १० सेकंद : १६ गुण, ३ मिनिटे १० सेकंद ते ३ मिनिटे २० सेकंद : १४ गुण, ३.२० ते ३.३० मिनिटे : १२ गुण, ३.३० ते ३.४० मिनिटे : १० गुण, ३.४० मिनिटे ते ३.५० मिनिटे : ८ गुण, ३.५० मिनिटे ते ४ मिनिटे : ५ गुण.

——————————————-

१६०० मीटर धावणे (पुरुष) :

५.१० मिनिटे : २० गुण, ५.१० ते ५.३० मिनिटे : १८ गुण, ५.३० ते ५.५० मिनिटे : १६ गुण, ५.५० मिनिटे ते ६.१० मिनिटे : १४ गुण, ६.१० ते ६.३० मिनिटे : १२ गुण, ६.३० ते ६.५० : १० गुण, ६.५० ते ७.१० : ८ गुण, ७.१० ते ७.३० मिनिटे : ५ गुण. ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण दिले जातात.


Police Bharti 2022-Physical Test Date: An important update regarding police bharti examine has come out. The state home department has informed that the police recruitment  has been completed and the physical test will be conducted from 2nd January 2023. Read More details as give below.

राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.

मैदानी चाचणीच्या दृष्टीने प्रत्येक शहर-जिल्ह्यात मैदानांची तयारी केली जात आहे. पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. १९ डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागांसाठी नेमके किती व कोणत्या संवर्गातील किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाठवली जाणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन पोलिस महासंचालकांना कळवायचे आहे. मंगळवारी (ता. २०) त्यासंबंधी पोलिस महासंचालक बैठक घेतील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे ठरवायचे आहे. कोणत्याही उमेदवारांना दोन ठिकाणी परीक्षा देता येणार नाही. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहणार असून भरतीत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजीला वाव राहणार नाही, असे तगडे नियोजन करण्यात आले आहे.

जेथे मैदानी तेथेच लेखी परीक्षा

पोलिस भरतीसाठी काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत. पण, त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.

गैरप्रकारावर ‘सीसीटीव्ही अन्‌ व्हिडिओ’ वॉच

मैदानी चाचणी सर्वच उमेदवारांची होईल, त्यातून प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होईल. मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. तसेच प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना पोलिस महासंचालकांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सिद्धेश्वर यात्रेदिवशी सोलापुरात चार दिवस सुटी

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेनिमित्त १२ ते १५ जानेवारी या चार दिवसांत जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी चाचणी होणार नाही. त्या दिवशी उमेदवारांना सुटी राहील. दरम्यान, २ ते ११ जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आहे, पण उमेदवार शिल्लक राहिल्यास त्यांची सुटीनंतर मैदानी घेतली जाणार आहे. पण, प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना पथसंचलनाची तयारी करावी लागते. त्यामुळे २६ जानेवारीनंतर त्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचेही नियोजन केले जात आहे. त्यासंदर्भात २२ डिसेंबर रोजी अंतिम निर्णय होईल.

जिल्ह्यातील जागा अन्‌ उमेदवार

 • (शहर)
 • पोलिस चालक
 • ७३
 • पोलिस शिपाई
 • ९८
 • एकूण अंदाजित अर्ज
 • १३,१००

——————————————

 • (ग्रामीण)
 • पोलिस चालक
 • २८
 • पोलिस शिपाई
 • २६
 • एकूण अंदाजित अर्ज
 • ३,१५२

१७१३० पदांच्या पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

Police Bharti 2022 Online Application last date till 15th December now. This is good news for the candidates who are preparing for police bharti 2022 in the Maharashtra state and Deputy Chief Minister Devendra Fadnavis has made a big announcement regarding police bharti 2022 today. Now 15 days extension has been given to fill the online application form and Fadnavis has informed about this by tweeting. The deadline for submission of applications for police recruitment in the state has been extended till 15th December 2022. Deputy Chief Minister Devendra Fadnavis has announced that this decision has been taken to address the difficulties in submitting applications, various certificates and to give time to earthquake affected candidates to apply.

मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

 1. राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबतमोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
 2. राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
 3. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
 4. पुढील काही दिवसात राज्यात जवळपास 20 हजार पोलीस भरती केली जाणार असून यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेसाठीच्या राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

पोलिस भरती २०२२ मैदानी चाचणी १२ डिसेंबरला आणि जानेवारीत लेखी परीक्षा

Last date of Police Bharti 2022 online registration is 30th November 2022. As per the latest updates Physical Test will be started from 12th December and the Written examine will be scheduled in January 2023. Candidates keep practicing and solve the practice papers given below for the good score.

तरुणांनो, पोलिस भरतीची जोरदार करा तयारी! १२ डिसेंबरला मैदानी; जानेवारीत लेखी परीक्षा :-

पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे. १२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Maharashtra Police Recruitment 2022 @ http://policerecruitment2022.mahait.org/ Complete advertisement published now for below given district. There are total 18000 vacancies for Police Constable, Police Driver Posts are vacant. Online Application stated form 9th November 2022 on link given below. Last date to apply from below link is 30th November 2022. Candidates see the district wise details below

The Eknath Shinde-Devendra Fadnavis government has given a big relief to the youth of the Maharashtra State regarding the age limit. The state government has taken a big decision regarding age limit in police recruitment process this year for 18000 posts. This decision has kept alive the hopes of the aspirant youth of the state to become police constable. The state government has increased the maximum age limit for police recruitment 2022. Due to this, there is an atmosphere of happiness among the youth who are interested in police recruitment. Read the more details given below and keep follow us on whatapp and telegram for the further updates. 

Maha Police Bharti 2022 Online Registration

Police Bharti 2022 Online Registration Link open

Police Bharti online apply link

District wise Maharashtra Police Bharti 2022 Vacancy Details

SR. No District No. of Posts  Full Advertisement
01 Ahmednagar Police Recruitment 2022  139 Posts Click Here
02 Akola Police Recruitment 2022 366 Posts Click Here
03 Amravati Police Recruitment 2022 41 Posts Click Here
04 Aurangabad Police Recruitment 2022 15 Posts Click Here
05 Beed Police Recruitment 2022
06 Bhandara Police Recruitment 2022  117 Posts Click Here
07 Buldhana Police Recruitment 2022 51 Posts Click Here
08 Chandrapur Police Recruitment 2022 275 Posts Click Here
09 Dhule Police Recruitment 2022 42 Posts Click Here
10 Gadchiroli Police Recruitment 2022  508 Posts Click Here
11 Gondia Police Recruitment 2022 194 Posts Click Here
12 Hingoli Police Recruitment 2022  21 Posts Click Here
13 Jalgaon Police Recruitment 2022 154 Posts Click Here
14 Jalna Police Recruitment 2022 Click Here
15 Kolhapur Police Recruitment 2022 24 Posts Click Here
16 Latur Police Recruitment 2022 29 Posts Click Here
17 Navi Mumbai Police Recruitment 2022 204 Posts Click Here
18 Nagpur Police Recruitment 2022 429 Posts Click Here
19 Nanded Police Recruitment 2022 185 Posts Click Here
20 Nandurbar Police Recruitment 2022 Click Here
21 Nashik Police Recruitment 2022 Click Here
22 Osmanabad Police Recruitment 2022 Click Here
23 Parbhani Police Recruitment 2022 75 Posts Click Here
24 Pune Police Recruitment 2022 795 Posts Click Here
25 Palghar Police Recruitment 2022 216 Posts Click Here
26 Ratnagiri Police Recruitment 2022 131 Posts Click Here
27 Raigad Police Recruitment 2022 278 Posts Click Here
28 Satara Police Recruitment 2022 145 Posts Click Here
29 Sindhudurg Police Recruitment 2022  121 Posts Click Here
30 Solapur Police Recruitment 2022 171 Posts Click Here
31 Sangli Police Recruitment 2022 Click Here
32 Thane Police Recruitment 2022 569 Posts Click Here
33 Wardha Police Recruitment 2022 126 Posts Click Here
34 Washim Police Recruitment 2022 14 Posts  Click Here
35 Yavatmal Police Recruitment 2022  302 Posts Click Here
36 Brihan Mumbai Police Recruitment 2022 8070 Posts Click Here
37 Mumbai Railway Police Recruitment 2022 620 Posts Click Here
38 Mira Bhayandar Police Recruitment 2022 996 Posts Click Here
39 Pimpri Chinchwad Police Recruitment 2022 216 Posts Click Here
40 Thane Gramin  Police Recruitment 2022 116 Posts Click Here
41 Nashik Gramin  Police Recruitment 2022 469 Posts Click Here
42 Pune Gramin  Police Recruitment 2022 669 Posts Click Here
43 Solapur Gramin  Police Recruitment 2022 54 Posts Click Here
44 Aurangabad Gramin  Police Recruitment 2022 39 Posts Click Here
45 Nagpur Gramin  Police Recruitment 2022 179 Posts Click Here
46 Amravati Gramin  Police Recruitment 2022 197 Posts Click Here
47 Pune Railway  Police Recruitment 2022 179 Posts Click Here
48 Aurangabad Railway Police Recruitment 2022 179 Posts Click Here

Police Bharti 2022 Test Series

महाराष्ट्र पोलीस भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

Police Bharti 2022

राज्य सरकारचा पोलीस भरतीतील वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय

 1. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीतील वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील इच्छूक तरुणांच्या पोलीस होण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. राज्य सरकारने पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत वाढ केली आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छूक असलेल्या तरुण-तरुणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
 2. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत, ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झालीय, अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयामुळे एक संधी मिळणार आहे. 2021 आणि 21 या वर्षातील रिक्त पदं भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून हे उमेदवार पात्र असतील.
 3. पोलीस भरतीसाठी राज्य सरकार प्रवर्गानुसार कमाल वयाची अट ठरवते. वयाची अट पूर्ण झाल्यानंतर इच्छूक उमेदवार भरतीच्या स्पर्धेतून आपोआप बाहेर होतो. कोरोनामध्ये 2 वर्ष सर्वकाही बंद होतं. त्यामुळे शासकीय नोकरभरती आणि पोलीस भरतीही होऊ शकली नाही. तसेच राज्य लोकसेवा आयोगाने याआधीच वयोमर्यादेत वाढ केली होती. त्यामुळे पोलीस शिपाई भरतीसाठीही वयाच्या मर्यादेत वाढ करावी, अशी तरुणांची मागणी होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली. त्यामुळे निवडक तरुणांना पोलीस होण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. दरम्यान राज्यात आठवड्याभरात 18 हजारा जागांसाठी पोलीस पदभरती करणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 3 नोव्हेंबरला दिली.

Police Bharti 2022- Latest updates regarding Maharashtra Police Bharti 2022 is that Recruitment process for 18, 5000 Constable from 9th November 2022. Online Registration link @ policerecruitment2022.mahait.org also open in that time. Maharashtra Police to fill 18, 500 vacant posts would begin from November 9 as well as the obstacles, informed Sanjay Kumar DG Training and Special Forces Maharashtra. Read More Details are given below

नवीन अपडेट ११ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्र पोलिसांमध्ये 18,500 रिक्त पदे भरण्यासाठी 9 नोव्हेंबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे कारण त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत, अशी माहिती संजय कुमार, महासंचालक (डीजी), प्रशिक्षण आणि विशेष दल, महाराष्ट्र यांनी आज नागपूर येथे दिली. 


Police Bharti 2022 will be announce in next week of November 2022. Police Recruitment process is postponed this news or GR is currently going viral on social media, according to this news, currently the date of police recruitment may be postponed by 10 to 15 days. There was no police recruitment for the last three years. Many are not eligible for police recruitment due to age limit. Such youth should get a chance, no injustice should be done to them. Therefore, it is understood from the committee and the government that this police recruitment has been suspended for a short period of time in order to relax the age limit. So the age limit can be relaxed after the release of police bharti notification 2022 in next week of November 2022.

पोलीस भरती वयोमर्यादा २ वर्षांनी वाढणार!

कोरोनामुळे दोन वर्षांत पोलिसांसह अन्य शासकीय नोकरभरती राबविता आली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने त्यांना आता त्यात सहभागी होता येणार नाही. त्यासंबंधीची असंख्य निवेदने सरकारकडे आली आहेत. या पार्श्वभूमीवर आता पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा दोन ते तीन वर्षांनी वाढणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय मंगळवारी (ता. १) मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. राज्यात पोलिसांची १४ हजार ९५६ जागांची एकाचवेळी भरती होणार आहे. अर्ज भरण्यास गुरुवारपासून (ता. ३) प्रारंभ होणार होता. पण, कोरोना काळात व त्यापूर्वी राज्यात शासकीय नोकरभरती झाली नाही. नोव्हेंबरअखेरीस ही प्रक्रिया सुरु होणार आहे.

१८ हजार पोलीस भरतीच्या निकषांमध्ये होणार बदल; असे असतील नवे नियम

 1. पोलिस भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे समाजमाध्यमांवर मात्र तरुणांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडली असताना आता नव्या १४ हजार ९५६ पदांच्या भरतीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे. मात्र करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटांतील तसेच सर्व जाती व समाजातील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
 2. आणखी विशेष बाब म्हणजे मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भरतीच्या अटी आणि शर्तीमध्ये बदल केला जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल होती. सन २०२१ मधील पोलीस शिपाई संवर्गातील जाहिरात देण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत असल्याच्या सूचना महासंचालक कार्यालयातील प्रशिक्षण व खास पथके या विभागामार्फत देण्यात आली आहेत तसेच ही जाहिरात देण्याबाबतचे यथावकाश कळविण्यात येईल, अशा सूचना राज्यातील सर्व पोलीस विभागांना देण्यात आल्या होत्या. भरतीबाबतची ही जाहिरात १ नोव्हेंबरला काढण्यात येणार होती. राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु राज्यातील अधिकाधिक तरुणांना या भरतीत सहभाग घेता यावे, या उद्देशाने अटी-शर्तीमध्ये बदल करण्याबाबत विचार सुरू आहे.
 3. महत्वाची गोष्ट म्हणजे गरज पडल्यास टप्प्याटप्प्यानेही भरती करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठकीत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. राज्य शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
 4. पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १: १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
 5. तसेच लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
 6. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी पदे भरली जातील. सध्या राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पोलीस भरती नोव्हेंबर दुसऱ्या आठवड्यात ऑनलाईन अर्ज सुरु होणार!

Police Bharti 2022 Update govnokri


Police Bharti 2022: Maharashtra Police Department inviting the application form from the eligible candidates for the following posts. Maharashtra Police published the notification for the posts of “Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” posts. There are total 17,130 vacancies available for above posts. Eligible & Interested applicants apply for this posts as per the details given below in this page. Candidates follow the how to apply procedure while applying the posts. Applicant apply for the posts on or before the last date of recruitment process i.e. 30th November 2022. Online link will be open from 3rd Nov 2022. More details of the notification, qualification, age limit, selection process and how to apply etc., given briefly below on this page.

SRPF राज्य राखीव पोलीस दल भरती 2022- 1201 जागा

महाराष्ट्र पोलीस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे “पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) ड्रायव्हर”.” पदांच्या एकूण 17130 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Maharashtra Police Department Bharti Notification 2022

Here we provide the complete details of Maharashtra Police Department published the recruitment notification. See the details given below, read it carefully and apply as per the instruction provided in Maharashtra Police Department Bharti Notification 2022.

 • Department Name : 
Maharashtra Police Department
 • Total Number of Vacancies : 
17130 Posts
 • Name of Post : 
Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver
 • Job Location : 
All Over Maharashtra
 •  Application Mode : 
Online Application
 • Last Date  : 
30th  November 2022

Vacancy Details in Maharashtra Police Constable  Recruitment 2022

Below is the vacancy details in Maharashtra Police Constable Recruitment 2022. Each and every Posts name and total no. of filled vacancies for that post are given briefly below:

 • Police Constable (Shipai)   :
14956 Posts
 • Police Constable (Shipai) Driver    :
2174 Posts

Qualification Details in Maha Police Bharti 2022

We provide the educational qualification details in Maha Police Bharti 2022 below for all posts. Separate details of every posts qualification are given below. Candidates read the details given and apply as per their qualification.

 •   Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver :
12th should be passed from its respective boards

 How to Apply in Police Recruitment 

Step by Step details & instructions for How to apply in Police Recruitment for all post are given below. Candidates carefully read the given instruction of How to apply for posts and follow the all instruction. Check the information before submitting the form.

 • Visit http://policerecruitment2022.mahait.org/ or click the recruitment link below to get started.
 • You must first click the Recruitment Button in order to proceed.
 • After deciding which position you want to apply for, register by providing the required information.
 • Now, all required information must be carefully entered into the Maharashtra Police Bharti Online Form 2022.
 • Verify your entries, and then upload any required files, like a photo or a document that has been signed

 Application Fees

 • For Open Category :
Rs. 450/-
 • For Reserved Category :
Rs. 350/-

Important Link of Maha Police Recruitment 2022

Official website
APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT-PEON
PDF ADVERTISEMENT-DRIVER

Home Ministry Published the Latest GR for Police Recruitment 2022. As per the latest updates for New Amendment The state government has decided to amend the Maharashtra Police Act and for the first time, a physical test will be conducted for police recruitment. Now 50 marks physical test and 100 marks written test will be taken. Read the more details below here.

लेखी चाचणीत बहुतेक प्रश्न हे बहुपर्यायी प्रकारचे असतील. लेखी परीक्षेत उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात १० जागा रिक्त असतील तर त्यासाठी एका पदासाठी दहा जणांना (शारीरिक योग्यता चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित) लेखी चाचणीसाठी बसता येईल. पण, दहा जागांसाठी १०० जण लेखी परीक्षेस पात्र झाले आणि शंभराव्या क्रमांकावरील उमेदवाराला जेवढे गुण आहेत, तेवढे गुण असलेल्या उर्वरित उमेदवारांनाही लेखी परीक्षा देता येणार आहे. आता २०२० मधील सात हजार २३१ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा केली होती. राज्याच्या गृह विभागात सद्यस्थितीत तब्बल ४९ हजार पदे रिक्त आहेत. आता परीक्षेची कार्यपध्दती निश्चित झाल्याने रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे. महिलांना ८०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी असेल.

Police Bharti New GR

Age Limit for Police Bharti 2022

Police Bharti 2022 Age Limit

Police Bharti 2022 Updates- 18000 Posts-Good news for the candidates who are waiting for police recruitment process now 18 thousand police will be recruited in Maharashtra.. The Deputy Chief Minister said that the advertisement for 18 thousand police recruitment will be released in the coming week. Read More details regarding Police Bharti 2022 are given below.

Police recruitment: केंद्र सरकारतर्फे १० लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. याची सुरुवात म्हणून आज ७५ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही आगामी काळात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. या अनुशंगाने १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात काढत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागाला पत्र दिली आहेत. सर्व विभागाच्या जाहिराती काढून तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

15 thoughts on “Police Bharti 2023”

Leave a Comment