Police Bharti 2019 – pdf जाहिरात उपलब्ध

Police Bharti 2019

Maharashtra Police Bharti 2019 advertisement published now. SRPF Police Bharti and Police Driver Bharti advertisement available now on mahapariksha.gov.in. Online Registration process will be started from 2nd December 2019. Last date of Online registration will be 22nd December 2019. District wise separate details of SRPF Police & Police Constable Driver are given here. Keep visit us for the further updates.

पोलीस भरती २०१९ च्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, pdf जाहिरात उपलब्ध आज पासून उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन २ डिसेंबर २०१९ पासून सुरु होईल आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९. पूर्ण माहिती आमच्या www.mahagov.info ह्या वेबसाईट वर उपलब्ध झाली आहे….

Police Recruitment 2019 District Wise Advertisement

  1. बृहन्मुंबई पोलिस भरती २०१९ – १५६ जागा 
  2. लातूर पोलिस भरती २०१९ – ६ जागा 
  3. नागपूर ग्रामीण पोलिस भरती २०१९ – २८ जागा 
  4. नागपूर पोलिस पोलिस भरती २०१९ – ८७ जागा 
  5. औरंगाबाद पोलिस भरती २०१९ – २४ जागा 
  6. बीड पोलिस भरती २०१९ – ३६ जागा 

 

Police Bharti Exam 2019 Delay

पोलिस भरतीची परीक्षा रेंगाळली

The Police Recruitment process of more than 3,000 vacancies for the post of police constable is under process. Police Bharti is being conducted through the Mahapariksha Portal. However, in the various government examination will be in pipeline. hence the Police Recruitment Examine will be on hold. Candidates read the complete details given below and keep visit on our website for further details :

राज्यात डिसेंबरपासून ७२ हजार रिक्‍त जागेची महाभरती

SRPF Police Bharti 2019

Police Bharti 2020 for 8757 Posts

Traffic Police Bharti 2019

Police Bharti 2019

Maharashtra Police Recruitment 2019

Police Bharti Important Details

Police Recruitment Exam Details

पोलिस शिपाई पदाच्या ३ हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू असून, अर्ज नोंदणीला महिना उलटूनही परीक्षेसंदर्भात सूचना जाहीर झालेली नाही. महापरीक्षा पोर्टलद्वारे ही परीक्षा घेण्यात आहे. मात्र, यापूर्वी पोर्टलद्वारे रखडलेल्या काही परीक्षांचा संदर्भ घेता पोलिस भरतीचीही परीक्षा रेंगाळल्याची चर्चा विद्यार्थी वर्तुळात असल्याने उमेदवार विवंचनेत सापडले आहेत.

राज्याच्या पोलिस विभागात पोलिस शिपाई पदाच्या ३ हजार ५७१, तर कारागृह पोलिसांच्या ९३ जागांकरिता ३ ते २३ सप्टेंबर या कालावधीत अर्ज नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली. महापरीक्षा पोर्टलद्वारे झालेल्या या प्रक्रियेनंतर विधानसभा आचारसंहितेमुळे परीक्षेची सूचना जाहीर झाली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर परीक्षेसंदर्भात सूचना येईल, अशी उमेदवारांना अपेक्षा होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून पोलिस भरतीच्या पुस्तकांची खरेदी होत असून अभ्यासिकांमध्येही गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, यंदा नाशिकमध्ये पोलिस भरती नसल्याने राज्यातील इतर ठिकाणी नाशिकच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातच यंदा पहिल्यांदा ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. पोलिस भरतीच्या नव्या नियमांनुसार पहिल्यांदाच अंमलबजावणी होणार असल्याने उमेदवारांमध्ये दडपण आहे. त्यातच सूचना योग्यरित्या मिळत नसल्याने उमेदवार चिंताग्रस्त झाले आहेत.

महापरीक्षा पोर्टलद्वारे पोलिस भरतीअंतर्गत ऑनलाइन परीक्षा होणार असून भरतीचे अपडेट पोर्टलद्वारे मिळतील, त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार होणार नाही, अशी सूचना महापरीक्षेने केली आहे. शिवाय पोलिस विभागाच्या मुख्य वेबसाइटवरही पुढील अधिसूचना न आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परीक्षा व पुढील वेळापत्रक जाहीर व्हावे, अशी अपेक्षा इच्छुकांच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे.

पोलिस भरतीची अर्ज नोंदणी सप्टेंबर महिन्यात झाली. त्यानंतर आचारसंहितेमुळे भरतीप्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र, महापरीक्षातर्फे ऑनलाइन परीक्षेचीही सूचना करण्यात आलेली नाही. अभ्यास आणि सराव सुरू असला, तरी परीक्षा व भरती केव्हा हा प्रश्न सतावतो आहे.

महापरीक्षा पोर्टलच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला असता, सूचना येईल वेबसाइटवर लक्ष ठेवा, असे उत्तर मिळते. त्यातच यंदा नव्या नियमांनुसार भरती होणार आहे. मात्र, परीक्षेचे वेळापत्रक येत नसल्याने दडपण वाढते आहे.

सौर्स : म. टा.