Police Patil Bharti 2020

Police Patil Bharti 2020

पोलिस पाटील भरती २०२०

Nashik Police Patil Bharti 2020 : In the Nashik District Out of 931 villages 363 village police posts are still vacant. Therefore, there are difficulties in taking measures against corona. Therefore, there is a demand that the vacancies of police patil in the district should be filled immediately. Against the backdrop of the corona, the police are playing a more important role than the police patil in quarantining and monitoring the people coming to the villages from many cities, including Mumbai and Pune. Along with the fight against Corona, the role of police is also important in the anti-conflict campaign. Read the other important details carefully given below:

Nashik Police Patil Bharti 2020

नाशिक जिल्ह्यातील एक हजार 931 पैकी 363 गावांतील पोलिसपाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोनाविरोधातील उपाययोजनेत अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिसपाटलांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी होत आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून गावागावांमध्ये येणाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यासाठी व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी महसूल, पोलिसांपेक्षा पोलिसपाटीलच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनाविरोधी लढ्याबरोबरच तंटामुक्ती गाव मोहिमेतही पोलिसपाटलांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.

No. of Vacancies Police Patil – तालुकानिहाय पोलिसपाटलांच्या रिक्त जागा

नाशिक- 17, कळवण- 38 , देवळा- 13 , सटाणा- 35, मालेगाव- 10, चांदवड- 20, नांदगाव- 26, निफाड- 28, सिन्नर- 34, इगतपुरी- 36, त्र्यंबकेश्‍वर- 18, पेठ- 25, दिंडोरी- 26, सुरगाणा- 27, येवला- 12.

Important about Police Patil Posts

  1. कोरोनाविरोधी लढ्यात पोलिसपाटलांची महत्त्वाची भूमिका असली, तरी सध्या लॉकडाउनमुळे ही पदे भरणे शक्‍य नाही. शासन आदेश आल्यानंतर तत्काळ पदे भरली जातील. -बी. ए. कापसे, तहसीलदार, कळवण
  2. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसपाटलांनी चांगले काम केले आहे. शासनाने त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही. आरोग्य, पोलिस व इतर कर्मचाऱ्यांना आरोग्य किट, प्रोत्साहन भत्ता दिला. मात्र, 24 तास काम करणाऱ्या पोलिसपाटलांना कोणताच लाभ दिला नाही. – चिंतामण मोरे, जिल्हाध्यक्ष, पोलिसपाटील संघटना
  3. पोलिसपाटीलही कोविड योद्धा बनले आहेत. असे असताना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. लॉकडाउनच्या काळात शासनाने लक्ष घालून शासनाने तत्काळ मानधन द्यावे. -सोमनाथ मुळाणे, पोलिसपाटील, खतवड (ता. दिंडोरी)
  4. प्रशासनाच्या दृष्टीने पोलिसपाटील गावातील महत्त्वाचा दुवा असून, कोरोना संकटाच्या काळात गावासोबत स्वतःची काळजी घेत गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शासनाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. सर्व पोलिसपाटलांना शासनाने कोरोना आरोग्य विमाकवच द्यावे. – प्राजक्ता देवरे, पोलिसपाटील, आसोली (ता. कळवण)

सौर्स : सकाळ

4 thoughts on “Police Patil Bharti 2020”

  1. मू जिरवड़े ओ पो शिरसमनी ता कळवण

    Reply
  2. मुकाम जिरवाड़े ओ पो शिरसमनी ता कळवण पी कोड 423501

    Reply

Leave a Comment

MahaGov अधिकृत अँप डाऊन!