Police Patil Bharti 2021

Police Patil Bharti 2021

पोलिस पाटलांची १२ हजार ४२२ पदे रिक्त

Police Patil Bharti 2021 – Maharashtra Police Patil Bharti Process Updates will be started soon. As per the latest Update there were Appr. 12,422 Posts are vacant for Police Patil. This Recruitment will be held on Thane & Konkan, West Maharashtra, North Maharashtra and Marathwada Division. Read the more details given below on this page.

Police Bharti 2021 :  डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर पोलीस भरती

 • Thane & Konkan – 1140 Posts
 • West Maharashtra – 1890 Posts
 • North Maharashtra – 1842 Posts
 • Marathwada – 4050 Post

१२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त

 • राज्यात तब्बल १२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त असून, एकाच पोलिस पाटलांवर तीन ते चार गावांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस पाटीलच नव्हे, तर नागरिकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
 • महसूल आणि पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलिस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलिस पाटील करीत असतात.
 • मात्र, रिक्त जागा भरण्याचा शासन आणि गृह विभागाला चार वर्षांपासून मुहूर्त सापडत नाही.
 • राज्यात एकूण ३८ हजार ७१२ पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी २६ हजार २९० पदे भरली; तर १२ हजार ४२२ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे चार वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने सध्या एकाच पोलिस पाटलांकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. यामुळे त्यांची चांगली तारांबळ उडत आहे. पोलिस पाटलांची सर्वाधिक पदे ही मराठवाड्यात रिक्त आहेत.
 • कोरोना संक्रमणामुळे पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याची शक्यता कमीच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्याने नव्याने बिंदूनामावली तयार करण्यात आली होती. मात्र, पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने आता नव्याने बिंदूनामावली तयार करावी लागणार आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळेही पोलिस पाटील भरतीला विलंब होत आहे. ग्रामीण भागात गावातील तंटे गावातच सोडवून शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलिस पाटलांची मोलाची भूमिका असते. मात्र, तुटपुंज्या मानधनावर सरकार पोलिस पाटलांची बोळवण करीत आहे.

Department wise Vacancy Details – विभागनिहाय पोलिस पाटलांची रिक्त पदे –

 • ठाणे आणि कोकण विभाग – ११४०
 • पश्चिम महाराष्ट्र – १८९०
 • उत्तर महाराष्ट्र – १८४२
 • मराठवाडा – ४०५०

हिंगोली जिल्ह्यात २६० पोलीस पाटलांची पदे रिक्त

As per the latest news 260 vacancies are vacant for Police Patil posts in Hingoli District. Due to this various problem face by people. The role of police patrol in village disputes is to coordinate. Therefore, through their mediation, most of the cases are resolved at the village level; But at present, there are vacancies for police patrols in 260 villages and the villagers are facing a lot of difficulties.

गावकीच्या भांडणतंट्यात पोलीस पाटलाची भूमिका ही समन्वयाची असते. त्यामुळे त्यांच्या मध्यस्थीने बहुतांश प्रकरणे गावपातळीवर मिटवण्यासाठी यश मिळत असते; परंतु सद्य:स्थितीत २६० गावांतील पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, गावांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे, तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असल्यास त्याची माहिती देणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे, आदी कामे पोलीस पाटलांमार्फत होत असतात; परंतु सध्या ही पदे रिक्त असल्याने २६० गावांत कामे विस्कळीत झाली आहेत.

हिंगोली उपविभागांतर्गत हिंगोली व सेनगाव, या दोन तालुक्यांचा समावेश आहे. पोलीस पाटीलपदाचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनस्तरावरून सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेणे गरजेचे आहे. मात्र, तशी कोणतीही प्रकिया होताना दिसून येत नाही. -अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी, हिंगोली.

 1. हिंगोली तालुका : पोलीस पाटीलपद रिक्त असलेली ४७ गावे – अंधारवाडी, एकांबा, कारवाडी, कलगाव, कापूरखेडा, कडती, केसापूर, कनका, खांबाळा, खेड, खानापूर चिता, खेर्डा, खडकद (बु.), गणेशवाडी, गाडीबोरी, घोटा, चिंचपुरी, जांभरून (जहां.), दुर्गसावंगी, धानापूर, धोत्रा, नांदुरा, नांदुसा, टाकळीतर्फे नांदापूर, पहेणी, पारडा, पेडगाव, पेडगाववाडी, बळसोंड, ब्रह्मपुरी, बोरजा, भटसावंगी तांडा, मोप, राहोली (खुर्द), लोहगाव, लिंबाळा मक्ता, लोहरा, वाढोणा प्र.वा., वैजापूर, वराडी, सवड, समगा, सावरगाव (बं.), सागद, सांडसतर्फे बासंबा, हानवतखेडा, हिंगणी, हिरडी आदी गावांचा समावेश आहे.
 2. सेनगाव तालुका : पोलीस पाटीलपद रिक्त असलेली ४१ गावे – आमदारी, उमरदरी, कवरदरी, कोळसा, कापडसिंगी, खैरी (घुमट), खडकी, चोंढी (बु.), चिंचखेडा राजीनामा, जाम आंध, जामदया, डोंगरगाव, तांदूळवाडी, दाताडा (खु.), धोत्रा, नानसी, पार्डी (पोहकर), बेलखेडा, ब्राह्मणवाडा, बोरखेडी (जी.), बोडखा, मकोडी, मनास पिंपरी, माहेरखेडा, रिधोरा, लिंगदरी, लिंग पिंपरी, लिंबाळा- आमदरी, वटकळी, वाघजळी, वायचाळ पिंपरी, वड हिवरा, वझर खुर्द, शेगाव (खो.), लिंबाळा तांडा, साबलखेडा, सावरखेडा, सोनसावंगी, हिवरखेडा, होलगिरा, हत्ता आदी गावांचा समावेश आहे.

चंद्रपूर पोलीस पाटलांची पदे भरावी – रिक्त पदे भरण्याची मागणी

चंद्रपुरात मुख्य दोन रस्ते आहेत. या रस्त्यावर वाहने कुठेही पार्क केली जात असल्याने अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. येथील जेटपुरा गेट तसेच चोरखिडकी परिसरात नेहमी वाहनांची कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. चंद्रपूर-आदिलाबाद राज्य महामार्गावरील तीर्थक्षेत्र असलेल्या गावाकडील रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना झाडांचा आश्रम घ्यावा लागत आहे. दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. शहरातील गंजवॉर्ड, गोलबाजार, भिवापूर, सुपर मार्केट व अन्य बाजाराच्या ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या देण्यात येतात. या पिशव्या कुठेही टाकून देण्यात येत असल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक पिशव्या अनेकदा नाल्यांमधे साठून नाल्या तुंबतात. महानगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सर्व वॉर्डांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद मालगुजारी तलावात मत्स्यपालन करतात. मात्र, योजनेचे अर्थसाहाय्य योग्य प्रमाणात मिळत नाही. संबंधित विभागाने ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्यासारखीच स्थिती आहे. युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.


Nashik Police Patil Bharti 2021 : In the Nashik District Out of 931 villages 363 village police posts are still vacant. Therefore, there are difficulties in taking measures against corona. Therefore, there is a demand that the vacancies of police patil in the district should be filled immediately. Against the backdrop of the corona, the police are playing a more important role than the police patil in quarantining and monitoring the people coming to the villages from many cities, including Mumbai and Pune. Along with the fight against Corona, the role of police is also important in the anti-conflict campaign. Read the other important details carefully given below:

Nashik Police Patil Bharti 2021

नाशिक जिल्ह्यातील एक हजार 931 पैकी 363 गावांतील पोलिसपाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोनाविरोधातील उपाययोजनेत अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिसपाटलांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी होत आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून गावागावांमध्ये येणाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यासाठी व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी महसूल, पोलिसांपेक्षा पोलिसपाटीलच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनाविरोधी लढ्याबरोबरच तंटामुक्ती गाव मोहिमेतही पोलिसपाटलांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.

No. of Vacancies Police Patil – तालुकानिहाय पोलिसपाटलांच्या रिक्त जागा

नाशिक- 17, कळवण- 38 , देवळा- 13 , सटाणा- 35, मालेगाव- 10, चांदवड- 20, नांदगाव- 26, निफाड- 28, सिन्नर- 34, इगतपुरी- 36, त्र्यंबकेश्‍वर- 18, पेठ- 25, दिंडोरी- 26, सुरगाणा- 27, येवला- 12.

Important about Police Patil Posts

 1. कोरोनाविरोधी लढ्यात पोलिसपाटलांची महत्त्वाची भूमिका असली, तरी सध्या लॉकडाउनमुळे ही पदे भरणे शक्‍य नाही. शासन आदेश आल्यानंतर तत्काळ पदे भरली जातील. -बी. ए. कापसे, तहसीलदार, कळवण
 2. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसपाटलांनी चांगले काम केले आहे. शासनाने त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही. आरोग्य, पोलिस व इतर कर्मचाऱ्यांना आरोग्य किट, प्रोत्साहन भत्ता दिला. मात्र, 24 तास काम करणाऱ्या पोलिसपाटलांना कोणताच लाभ दिला नाही. – चिंतामण मोरे, जिल्हाध्यक्ष, पोलिसपाटील संघटना
 3. पोलिसपाटीलही कोविड योद्धा बनले आहेत. असे असताना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. लॉकडाउनच्या काळात शासनाने लक्ष घालून शासनाने तत्काळ मानधन द्यावे. -सोमनाथ मुळाणे, पोलिसपाटील, खतवड (ता. दिंडोरी)
 4. प्रशासनाच्या दृष्टीने पोलिसपाटील गावातील महत्त्वाचा दुवा असून, कोरोना संकटाच्या काळात गावासोबत स्वतःची काळजी घेत गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शासनाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. सर्व पोलिसपाटलांना शासनाने कोरोना आरोग्य विमाकवच द्यावे. – प्राजक्ता देवरे, पोलिसपाटील, आसोली (ता. कळवण)

सौर्स : सकाळ

12 thoughts on “Police Patil Bharti 2021”

 1. मू जिरवड़े ओ पो शिरसमनी ता कळवण

  Reply
 2. मुकाम जिरवाड़े ओ पो शिरसमनी ता कळवण पी कोड 423501

  Reply

Leave a Comment