Police Patil Bharti 2022

Police Patil Bharti 2022

पोलीस पाटील भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

Police Patil Bharti 2022 in Panvel will be started soon. The Aarakshan (reservation) has been released for the vacant post of Police Patil in Panvel and Uran talukas. Therefore, the recruitment of 100 Police Patil posts in Panvel and Uran will be done soon. Read the more details given and keep visit us.

पनवेल आणि उरण तालुकयातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल आणि उरणमधील १०० पोलीस पाटील पदाची भरती लवकरच केली जाणार आहे.

Police Patil Bharti 2022

Police Patil Bharti 2022: According to the information received from the Sub-Divisional Officer’s Office In Ratnagiri District of Dapoli Taluka there is a total 89 posts are vacant. In Dapoli taluka 177 posts of Police Patil  have been sanctioned,  out of which 88 Police Patil  are working and the remaining 89 posts are vacant. Reservations for the post of Police Patil were announced three to four years ago; However, due to non-availability of candidates from this community, the posts in that village are still vacant. Read More details as given below.

 • पोलिसांनंतर गावात शांतता राखण्याचे काम करणाऱ्या पोलिस पाटलांची दापोली तालुक्यात ८९ पदे रिक्त असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना दाखल्यासाठी दुसऱ्या पोलिस पाटलांकडे पायपीट करत हेलपाटे मारावे लागत आहे.
 • गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती पोलिस पाटील यांच्याकडून शासनाला दिली जाते. गावात शांतता राखण्याचे कामही याच पोलिस पाटलांच्या खांद्यावर असते. त्याचबरोबर शासकीय कामांसाठी पोलिस पाटलांकडून रहिवासी दाखला घ्यावा लागतो.
 • दापोली तालुक्यात पोलिस पाटलांची १७७ पदे मंजूर असून, त्यातील ८८ पोलिस पाटील कार्यरत असून उर्वरित ८९ पदे रिक्त आहेत
 • दापोलीत काही महत्वपूर्ण गावे आहेत; मात्र या गावांमध्ये विशिष्ट समाजासाठी आरक्षण पडल्यामुळे उमेदवार न मिळाल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत.
 • तीन ते चार वर्षांपूर्वी पोलिस पाटील पदासाठी आरक्षणे जाहीर झाली; मात्र या समाजातील उमेदवार न मिळाल्याने त्या गावातील पदे अद्याप रिक्त आहेत.
 • ज्या गावात पोलिस पाटील पद रिक्त आहे त्या ठिकाणी लगतच्या गावातील पोलिस पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
 • त्यामुळे पोलिस पाटील रिक्त असलेल्या गावातील नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी लगतच्या गावातील पोलिस पाटील यांना भेटण्यासाठी जावे. त्यामुळे पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

Here we provide the Police Patil Bharti Documents Required List and other important details like police patil exam 2022 pattern Police Patil Salary in Maharashtra, eligibility for Police Patil Bharti in Maharashtra are also given here. Read the पोलीस पाटील भरती 2022 below given details.

As per the latest news Lakhandur Taluka waiting for Police Patil Posts from last 12 years. There are 29 vacancies for Police Patil Post are vacant for past few year. People facing various problem because of this.

Police Patil Recruitment 2022 : Police Patil is an very important post in Police Department and Revenue Department but the government is ignoring it. Police Patil posts are vacant in various talukas. Therefore, the villagers have to face a lot of difficulties. Read the more details given below, and keep visit us.

Police Patil Bharti Age Limit / पोलीस पाटलांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे करा

Police Patil Recruitment 2022- महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना निवेदन देऊन पोलीस पाटलाचे सेवानिवृतीचे वय ६५ करावे व सेवानिवृत्ती योजना सुरु करण्याची मागणी केली. 

Police Patil salary in Maharashtra 2022

 • Pay Scale: Rs. 9,300 to Rs. 34,800 Salary Per Month.

Eligibility Criteria of Maharashtra Police Patil Bharti:

Education Qualification: Candidates should be completed their SSC/10th standard education in the recognized university/institution.

Age Limit:

• Minimum Age Limit: 25 Years

• Maximum Age Limit: 45 Years

Age Relaxation:

• For OBC Candidates: 3 years

• For SC/ST Candidates: 5 years

Application Fees:

• For General/ OBC Candidates: Rs.400/-

• For SC/ST/PWD candidates: Rs.300/-

Police Patil Exam 2022

 • Selection Procedure: • Written Exam & • Interview Test.

Latest update of Police Patil Bharti 2022 here – Home Minister Dilip Walse Patil directed to immediately start the process of filling up the vacancies of Police Patil in the state and also to pay the honorarium of Police Patil on time. Various demands of Police Patil were discussed in meeting. Increasing the honorarium of Police Patil , introducing insurance scheme by the government, raising the retirement age from 60 to 65 years, getting solid amount or pension after retirement, enforcing compassionate principle, paying compensation of Rs 50 lakh to the families of Police Patil who were martyred while on duty There was also a positive discussion on these major demands. Read the following details of Police Patil Bharti 2022  and keep visit us for the further updates. 

Police Bharti 2022 :  डिसेंबर पूर्वी 5200 जागांवर पोलीस भरती

Police Patil Bharti 2022 : राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, शासनातर्फे विमा योजना सुरू करणे, निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करणे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे, अनुकंपा तत्व लागू करणे, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे, या प्रमुख मागण्यांवर यावेही सकारात्मक चर्चा झाली.

Importance of Police Patil Recruitment 2022

 1. सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
 2. वळसे पाटील म्हणाले,पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत गृह व महसूल विभागाने त्वरीत कार्यवाही करावी. तसेच पोलीस पाटलांचे नूतनीकरण करण्यासंदर्भात सर्व बाबींचा अभ्यास करून धोरणत्मक निर्णय घेण्यात यावा. तसेच महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील आदेशात योग्य त्या सुधारणा करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 3. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील यांना प्रति वर्षी पुरस्कार देण्यात येतात. मागील काही वर्षात सदर पुरस्कार देण्याचे बंद झालेले आहे. हे पुरस्कार देण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश श वळसे पाटील यांनी यावेळी दिले.
 4. काही कारणास्तव शेजारच्या गावांचा पोलिस पाटील यांना अतिरिक्त कार्यभार दिला जातो. या अतिरिक्त कार्यभारासाठी अतिरिक्त भत्ता देण्याच्या मागणीस यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच अतिरिक्त कामकाजासाठी अतिरिक्त भत्ता देण्याचे निर्देश त्यांनी गृह विभागास दिले. पोलीस पाटलांना प्रत्येक जिल्हयामध्ये पोलीस पाटील भवन उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारतीमध्ये पोलीस पाटील यांच्यासाठी एक कक्ष निश्चित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत ग्रामविकास विभागास कळविण्यात यावे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये भवन उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्री स्तरावर निर्णय घेण्याबाबत कळविण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले.
 5. राज्यातील बऱ्याच ग्रामीण व नागरी भागामध्ये स्वयंपूर्ण पोलीस ठाणे व चौकी असलेल्या गावांमध्ये पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, याबाबत योग्य ते धोरण निश्चित करण्याच्या सूचना गृह व महसूल विभागास यावेळी देण्यात आल्या.

As per the latest news regarding the Police Patil Bharti 2022 is that 712 vacant posts for Police Patil will be filled soon. At present there are 712 vacancies in the district and the district administration has sought necessary guidelines from the government to fill these vacancies.  The Corona crisis caused further delays. But now that the process has begun, the work of removing the reservation is about to begin. There are 1911 revenue villages in Pune district and so far 1130 posts have been filled. It will soon be recruiting for 712 posts.

From time to time the police patils are informing the district and police department about the incidents and developments in the village. Due to this, the post of Police Patil is important at the village level. For the post of Police Patil for a period of five years, recruitment is done by the Revenue Department and an honorarium of Rs. 5,000 per month is paid by the Police Department to the concerned Police Patil. After the last three-four years, Police Patil will be recruited in the district again soon.For the last four years, no time has been found to fill the vacancies of Police Patil. 

महसूल आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलीस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. यामुळे गाव पातळीवर पोलीस पाटील पदाला महत्व आहे. पाच वर्षांसाठी असलेले पोलीस पाटील पदासाठी महसूल विभागाकडून भरती केली जाते आणि पोलीस विभागाकडून संबंधित पोलीस पाटील यांना दर महा 5 हजार रुपयांचे मानधन दिले जाते. गेल्या तीन- चार वर्षानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा लवकरच पोलीस पाटील भरती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या 712 जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मागितले आहे. गेले चार वर्षांपासून पोलीस पाटीलच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. कोरोना संकटामुळे यासाठी अधिक विलंब झाला. परंतु आता ही प्रक्रिया सुरू झाली असून, आरक्षण सोडत काढण्याचे काम सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यात 1911 महसुली गावे असून, आतापर्यंत 1130 पदे भरण्यात आली आहेत. आता लवकरच 712 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

पोलिस पाटलांची १२ हजार ४२२ पदे रिक्त

Police Patil Bharti 2021 – Maharashtra Police Patil Bharti Process Updates will be started soon. As per the latest Update there were Appr. 12,422 Posts are vacant for Police Patil. This Recruitment will be held on Thane & Konkan, West Maharashtra, North Maharashtra and Marathwada Division. Read the more details given below on this page.

 • Thane & Konkan – 1140 Posts
 • West Maharashtra – 1890 Posts
 • North Maharashtra – 1842 Posts
 • Marathwada – 4050 Post

१२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त

 • राज्यात तब्बल १२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त असून, एकाच पोलिस पाटलांवर तीन ते चार गावांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस पाटीलच नव्हे, तर नागरिकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
 • महसूल आणि पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलिस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलिस पाटील करीत असतात.
 • मात्र, रिक्त जागा भरण्याचा शासन आणि गृह विभागाला चार वर्षांपासून मुहूर्त सापडत नाही.
 • राज्यात एकूण ३८ हजार ७१२ पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी २६ हजार २९० पदे भरली; तर १२ हजार ४२२ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे चार वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने सध्या एकाच पोलिस पाटलांकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. यामुळे त्यांची चांगली तारांबळ उडत आहे. पोलिस पाटलांची सर्वाधिक पदे ही मराठवाड्यात रिक्त आहेत.
 • कोरोना संक्रमणामुळे पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याची शक्यता कमीच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्याने नव्याने बिंदूनामावली तयार करण्यात आली होती. मात्र, पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने आता नव्याने बिंदूनामावली तयार करावी लागणार आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळेही पोलिस पाटील भरतीला विलंब होत आहे. ग्रामीण भागात गावातील तंटे गावातच सोडवून शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलिस पाटलांची मोलाची भूमिका असते. मात्र, तुटपुंज्या मानधनावर सरकार पोलिस पाटलांची बोळवण करीत आहे.

Department wise Vacancy Details – विभागनिहाय पोलिस पाटलांची रिक्त पदे –

 • ठाणे आणि कोकण विभाग – ११४०
 • पश्चिम महाराष्ट्र – १८९०
 • उत्तर महाराष्ट्र – १८४२
 • मराठवाडा – ४०५०

हिंगोली जिल्ह्यात २६० पोलीस पाटलांची पदे रिक्त

As per the latest news 260 vacancies are vacant for Police Patil posts in Hingoli District. Due to this various problem face by people. The role of police patrol in village disputes is to coordinate. Therefore, through their mediation, most of the cases are resolved at the village level; But at present, there are vacancies for police patrols in 260 villages and the villagers are facing a lot of difficulties.

गावकीच्या भांडणतंट्यात पोलीस पाटलाची भूमिका ही समन्वयाची असते. त्यामुळे त्यांच्या मध्यस्थीने बहुतांश प्रकरणे गावपातळीवर मिटवण्यासाठी यश मिळत असते; परंतु सद्य:स्थितीत २६० गावांतील पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, गावांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे, तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असल्यास त्याची माहिती देणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे, आदी कामे पोलीस पाटलांमार्फत होत असतात; परंतु सध्या ही पदे रिक्त असल्याने २६० गावांत कामे विस्कळीत झाली आहेत.

हिंगोली उपविभागांतर्गत हिंगोली व सेनगाव, या दोन तालुक्यांचा समावेश आहे. पोलीस पाटीलपदाचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनस्तरावरून सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेणे गरजेचे आहे. मात्र, तशी कोणतीही प्रकिया होताना दिसून येत नाही. -अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी, हिंगोली.

 1. हिंगोली तालुका : पोलीस पाटीलपद रिक्त असलेली ४७ गावे – अंधारवाडी, एकांबा, कारवाडी, कलगाव, कापूरखेडा, कडती, केसापूर, कनका, खांबाळा, खेड, खानापूर चिता, खेर्डा, खडकद (बु.), गणेशवाडी, गाडीबोरी, घोटा, चिंचपुरी, जांभरून (जहां.), दुर्गसावंगी, धानापूर, धोत्रा, नांदुरा, नांदुसा, टाकळीतर्फे नांदापूर, पहेणी, पारडा, पेडगाव, पेडगाववाडी, बळसोंड, ब्रह्मपुरी, बोरजा, भटसावंगी तांडा, मोप, राहोली (खुर्द), लोहगाव, लिंबाळा मक्ता, लोहरा, वाढोणा प्र.वा., वैजापूर, वराडी, सवड, समगा, सावरगाव (बं.), सागद, सांडसतर्फे बासंबा, हानवतखेडा, हिंगणी, हिरडी आदी गावांचा समावेश आहे.
 2. सेनगाव तालुका : पोलीस पाटीलपद रिक्त असलेली ४१ गावे – आमदारी, उमरदरी, कवरदरी, कोळसा, कापडसिंगी, खैरी (घुमट), खडकी, चोंढी (बु.), चिंचखेडा राजीनामा, जाम आंध, जामदया, डोंगरगाव, तांदूळवाडी, दाताडा (खु.), धोत्रा, नानसी, पार्डी (पोहकर), बेलखेडा, ब्राह्मणवाडा, बोरखेडी (जी.), बोडखा, मकोडी, मनास पिंपरी, माहेरखेडा, रिधोरा, लिंगदरी, लिंग पिंपरी, लिंबाळा- आमदरी, वटकळी, वाघजळी, वायचाळ पिंपरी, वड हिवरा, वझर खुर्द, शेगाव (खो.), लिंबाळा तांडा, साबलखेडा, सावरखेडा, सोनसावंगी, हिवरखेडा, होलगिरा, हत्ता आदी गावांचा समावेश आहे.

चंद्रपूर पोलीस पाटलांची पदे भरावी – रिक्त पदे भरण्याची मागणी

चंद्रपुरात मुख्य दोन रस्ते आहेत. या रस्त्यावर वाहने कुठेही पार्क केली जात असल्याने अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. येथील जेटपुरा गेट तसेच चोरखिडकी परिसरात नेहमी वाहनांची कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. चंद्रपूर-आदिलाबाद राज्य महामार्गावरील तीर्थक्षेत्र असलेल्या गावाकडील रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना झाडांचा आश्रम घ्यावा लागत आहे. दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. शहरातील गंजवॉर्ड, गोलबाजार, भिवापूर, सुपर मार्केट व अन्य बाजाराच्या ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या देण्यात येतात. या पिशव्या कुठेही टाकून देण्यात येत असल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक पिशव्या अनेकदा नाल्यांमधे साठून नाल्या तुंबतात. महानगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सर्व वॉर्डांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद मालगुजारी तलावात मत्स्यपालन करतात. मात्र, योजनेचे अर्थसाहाय्य योग्य प्रमाणात मिळत नाही. संबंधित विभागाने ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्यासारखीच स्थिती आहे. युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.


Nashik Police Patil Bharti 2021 : In the Nashik District Out of 931 villages 363 village police posts are still vacant. Therefore, there are difficulties in taking measures against corona. Therefore, there is a demand that the vacancies of police patil in the district should be filled immediately. Against the backdrop of the corona, the police are playing a more important role than the police patil in quarantining and monitoring the people coming to the villages from many cities, including Mumbai and Pune. Along with the fight against Corona, the role of police is also important in the anti-conflict campaign. Read the other important details carefully given below:

Nashik Police Patil Bharti 2022

नाशिक जिल्ह्यातील एक हजार 931 पैकी 363 गावांतील पोलिसपाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोनाविरोधातील उपाययोजनेत अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिसपाटलांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी होत आहे.  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून गावागावांमध्ये येणाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यासाठी व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी महसूल, पोलिसांपेक्षा पोलिसपाटीलच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनाविरोधी लढ्याबरोबरच तंटामुक्ती गाव मोहिमेतही पोलिसपाटलांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.

No. of Vacancies Police Patil – तालुकानिहाय पोलिसपाटलांच्या रिक्त जागा

नाशिक- 17, कळवण- 38 , देवळा- 13 , सटाणा- 35, मालेगाव- 10, चांदवड- 20, नांदगाव- 26, निफाड- 28, सिन्नर- 34, इगतपुरी- 36, त्र्यंबकेश्‍वर- 18, पेठ- 25, दिंडोरी- 26, सुरगाणा- 27, येवला- 12.

Important about Police Patil Posts

 1. कोरोनाविरोधी लढ्यात पोलिसपाटलांची महत्त्वाची भूमिका असली, तरी सध्या लॉकडाउनमुळे ही पदे भरणे शक्‍य नाही. शासन आदेश आल्यानंतर तत्काळ पदे भरली जातील. -बी. ए. कापसे, तहसीलदार, कळवण
 2. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसपाटलांनी चांगले काम केले आहे. शासनाने त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही. आरोग्य, पोलिस व इतर कर्मचाऱ्यांना आरोग्य किट, प्रोत्साहन भत्ता दिला. मात्र, 24 तास काम करणाऱ्या पोलिसपाटलांना कोणताच लाभ दिला नाही. – चिंतामण मोरे, जिल्हाध्यक्ष, पोलिसपाटील संघटना
 3. पोलिसपाटीलही कोविड योद्धा बनले आहेत. असे असताना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. लॉकडाउनच्या काळात शासनाने लक्ष घालून शासनाने तत्काळ मानधन द्यावे. -सोमनाथ मुळाणे, पोलिसपाटील, खतवड (ता. दिंडोरी)
 4. प्रशासनाच्या दृष्टीने पोलिसपाटील गावातील महत्त्वाचा दुवा असून, कोरोना संकटाच्या काळात गावासोबत स्वतःची काळजी घेत गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शासनाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. सर्व पोलिसपाटलांना शासनाने कोरोना आरोग्य विमाकवच द्यावे. – प्राजक्ता देवरे, पोलिसपाटील, आसोली (ता. कळवण)

सौर्स : सकाळ

15 thoughts on “Police Patil Bharti 2022”

 1. मू जिरवड़े ओ पो शिरसमनी ता कळवण

  Reply
 2. मुकाम जिरवाड़े ओ पो शिरसमनी ता कळवण पी कोड 423501

  Reply
 3. प्रिय, सर . वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या विभागातील पोलिस पाटील यांच्या जागा खाली आहे तर जागा कधी जागा निग्नार कृपया ते लवकरात लवकर कळवा

  Reply

Leave a Comment