Pune Mahanagarpalika Doctors Bharti

Pune Mahanagarpalika Doctors Bharti 2020

पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती

Pune Doctor Bharti Merit List : In the Pune Mahanagarpalika Doctor Recruiting process 1100 candidates from all over the state have applied for this recruitment. Since he could not be reached due to the lockdown, he had requested to submit his documents after the lockdown. However, as many candidates as possible have received their documents. Accordingly, a merit list has been prepared and it will be announced. There will be a merit list of the posts which are urgently required and objections will be invited within two days. The final list will be released after that. Candidates whose names are in the final list will be hired on contract basis immediately, according to which the present problem of NMC will be removed, said the Commissioner.

Pune Doctor Bharti Merit List पालिकेच्या डॉक्टरभरतीला येणार वेग

महापालिकेतील डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेला वेग आला असून, कायमस्वरूपी भरण्यात येणाऱ्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल पदांची ‘मेरिट लिस्ट’ आज, शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसांत त्यावरील हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. महापालिकेतील रखडलेल्या डॉक्टर भरतीला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तानंतर वेग आला असून, कायमस्वरूपी भरण्यात येणाऱ्या पदांची ‘मेरिट लिस्ट’ जाहीर झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांच्या भरतीलाही वेग येणार आहे. करोनाबाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणारे महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका; तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफने गेले ७५ दिवस कुठलीही सुट्टी न घेता स्वत:ला या लढाईत झोकून दिले आहे. शहरातील ४० हजार नागरिकांची तपासणी आणि उपचार या काळात करण्यात आले आहेत. यातील बहुतांश डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी थकले असून, त्यांना काही काळ विश्रांतीची गरज आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे महापालिकेतील भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे महापालिकेतील डॉक्टरांना विश्रांती मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने भूमिका घेतल्यानंतर महापालिकेतील पदाधिकारी, विरोधी पक्ष तसेच गटनेत्यांनी या विषय ऐरणीवर आणून रखडलेल्या भरतीला वेग देण्यासाठी आग्रह धरला. महापालिका आयुक्तांनी भरतीसाठीची ‘मेरिट लिस्ट’ तत्काळ‌ जाहीर करण्याचे प्रशासनाला आदेश दिल्यानंतर अखेर ही यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे.

भरतीचे सर्वाधिकार मुख्यसभेला असून, ही सभा पुढील दोन ते तीन महिने होऊ शकणार नाही. या भरतीमध्ये राज्यभरातील ११०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ते लॉकडाउनमुळे पोहोचू न शकल्याने त्यांनी लॉकडाउन संपल्यानंतर आपली कागदपत्रे सादर करू, अशी विनंती केली होती. तरीही शक्य तितक्या उमेदवारांची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यानुसार ‘मेरिट लिस्ट’ तयार करण्यात आली असून, ती जाहीर करण्यात येणार आहे. तत्काळ आवश्यकता असलेली पदांची मेरिट लिस्ट असणार असून, त्यावर दोन दिवसांत हरकती सूचना मागविण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम यादीत नावे असणाऱ्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तत्काळ कामावर घेण्यात येणार असून, त्यानुसार महापालिकेची सध्याची अडचण दूर होईल अशा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

सौर्स : मटा


PMD Doctor Recruitment 2020 : The Pune municipal administration had decided on April 15 to fill 178 posts of class one and two in the health department. Municipal Commissioner Shekhar Gaikwad issued a similar order. These posts were expected to be filled in the next 15 days through direct service. These vacancies would have been filled immediately; In the current Corona battle, the help of municipal doctors would have been invaluable. While the battle of Corona was showing signs of escalation, all the employees and officers of the corporation were involved in this battle. So the recruitment of doctors got stuck in the red tape. Municipal doctors and paramedical staff were called in to help private doctors. However, there was little help during this period.

PMC Doctor Bharti Update – डॉक्टरांची भरती रखडली

करोनाबाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणारे महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका; तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफने गेले ७५ दिवस कुठलीही सुट्टी न घेता स्वत:ला या लढाईत झोकून दिले आहे. शहरातील तब्बल ४० हजार नागरिकांची तपासणी आणि उपचार या काळात करण्यात आले आहेत. यातील बहुतांश डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी थकले असून त्यांना काही काळ विश्रांतीची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेने त्यांच्या मदतीसाठी सुरू केलेली डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया लालफितीत अडकली आहे. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण झाल्यास ताज्या दमाचे १२८३ डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ या लढाईत महापालिकेला उपलब्ध होऊ शकेल.

महापालिका प्रशासनाने १५ एप्रिललाच आरोग्य विभागातील वर्ग एक आणि दोनच्या तब्बल १७८ जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी तसे आदेशही काढले. येत्या १५ दिवसांत सरळ सेवा पद्धतीने ही पदे भरली जाण्याची अपेक्षा होती. या जागा तत्काळ भरल्या गेल्या असत्या; तर सध्याच्या करोनाच्या लढाईत महापालिकेच्या डॉक्टरांच्या मदतीला या सर्वांची मोलाची भर पडली असती. करोनाची लढाई उग्र होण्याची चिन्हे दिसत असताना महापालिकेतील सर्वच कर्मचारी, अधिकारी या लढाईत उतरलेले होते. त्यामुळे डॉक्टरांची भरती लालफितीमध्ये अडकली. महापालिकेचे डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांना मदतीसाठी खासगी डॉक्टरांकडे मदत मागण्यात आली. मात्र, या काळात तुटपुंजी मदत आली.

गेली ७५ दिवस महापालिकेचे डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ या लढाईत उतरलेला आहे. यातील बहुतांश जणांनी एक दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही. ते आता शरीराने थकले असले, तरी त्यांच्यातील लढवय्या वृत्ती कायम आहे. या डॉक्टरांना मदतीसाठी अधिक स्टाफ यावा, यासाठी महापालिकेने कंत्राटी पद्धतीने ४५ दिवसांसाठी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ अशा ११०५ जागांची भरती काढली आहे. यातील १७ डॉक्टरांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. तर, त्याचवेळी १७८ कायमस्वरूपी भरण्यात येणाऱ्या १७८ जागांची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. जवळपास दीड महिन्यानंतरही या भरतीचा गोंधळ कायम आहे.

करोनाचे संकट गडद होण्याचा अंदाज आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार ८६ पदे भरण्याची परवानगी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठड्यात दिली होती. वित्त विभागात गेल्या अडीच वर्षांपासून अडकलेला हा प्रस्ताव पवार यांनी अवघ्या दोन दिवसांत मार्गी लावला होता. महापालिकेनेही ही भरती प्रक्रिया सुरू केली असली, तरी त्यातील गुंता अधिकाधिक वाढतोच आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये बराच वेळ वाया जातो आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर संपवून ताज्या दमाचे डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ मदतीसाठी ‘फिल्ड’वर आणणे गरजेचे बनले आहे. करोनाची लढाई दीर्घ काळ चालणार असून यामध्ये सर्वांचीच मदत आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया उच्च पदस्थ डॉक्टरांकडून व्यक्त होते आहे.

No. of Posts Details PMC Doctor Bharti 2020

 • कायमस्वरूपी भरण्यात येणारी पदे- १७८
 • तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणारी पदे- ११०५

Temporary Doctors Bharti – तात्पुरत्या पदांमधील वर्गवारी

 • एमबीबीएस डॉक्टर – २००
 • आयुर्वेदिक डॉक्टर – १००
 • आरोग्य निरीक्षक – ५०
 • निरीक्षक (हिवताप) – ५०
 • ज्युनिअर नर्स – १५०
 • परिचारिका – १५०

कायमस्वरूपी भरतीची जाहिरात दिल्यानंतर मोठ्या संख्येने अर्ज आले. मात्र, अनेक अर्जदार लॉकडाउनमुळे वेळेत पोहोचू शकले नाहीत. अर्जदारांचे अर्ज, कागदपत्रे त्यांची छानणी या कामांना लॉकडाउनमुळे वेळ लागला. ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अडचणीही खूप आहेत. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने ४५ दिवसांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत यातील बहुतांश प्रक्रिया पूर्ण करून संबंधित डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ कामावर रुजू होणे अपेक्षित आहे.

– शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त


PMC Arogya Vibhag Doctors Recruitment well be expected soon. In the last week of March, Deputy Chief Minister Ajit Pawar had given permission to fill one of the vacant posts for the essential services of the pune mahanagarpalika in the last week of March. The proposal, which has been stuck in the finance department for the last two and a half years, was implemented by Pawar in just two days. Following the approval of the state government, the Pune municipal administration has also taken steps to recruit the necessary doctors and accordingly, 178 seats will be filled.

The Pune municipal administration has decided to fill up the vacant posts of Classes One and Two in the Health Department, and Municipal Commissioner Shekhar Gaikwad has issued such orders. The posts will be filled in straight service manner in the next 15 days and advertisement will be published in two days. The recruitment comprises of 121 seats in class one and two posts in class two. This recruitment is going to be based on quality. It will depend on education, work experience and years of service.

PMC Arogya Vibhag Doctors Recruitment

महापालिका प्रशासनाने आरोग्य विभागातील वर्ग एक आणि दोनच्या तब्बल १७८ जागा भरण्याचा निर्णय घेतला असून, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी तसे आदेश काढले आहेत. येत्या १५ दिवसांत सरळ सेवा पद्धतीने ही पदे भरली जाणार असून, त्यासाठीची जाहिरात दोन दिवसांत प्रकाशित करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये वर्ग एकच्या १२१ जागा, तर वर्ग दोनच्या ५७ पदांच्या समावेश आहे. ही भरती गुणवत्तेवर आधारित होणार आहे. त्यासाठी शिक्षण, कामाचा अनुभव आणि सेवेची वर्षे यावर अवलंबून राहणार आहे.

करोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी रिक्त असलेल्या पदांपैकी एक हजार ८६ पदे भरण्याची परवानगी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठड्यात दिली होती. वित्त विभागात गेल्या अडीच वर्षांपासून अडकलेला हा प्रस्ताव पवार यांनी अवघ्या दोन दिवसांत मार्गी लावला होता. राज्य सरकारची यावर परवानगी आल्यानंतर महापालिका प्रशासनानेही लगेचच आवश्यक डॉक्टरांची भरती करण्यासाठी पावले उचलली असून त्यानुसार १७८ जागा भरण्यात येणार आहेत.

महापालिकेचा कामाचा निपटारा योग्य वेळेत होण्यासाठी आरोग्य, अग्निशमन आणि घनकचरा विभागातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांची भरती करण्याचा प्रस्ताव ८ नोव्हेंबर २०१७ला राज्य सरकारसमोर सादर करण्यात आला होता. पालिकेने वर्ग एक ते चार यामध्ये १८९३ पदे रिक्त असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. त्यापैकी ७५ टक्के म्हणजे १२४८ पदे भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. राज्य सरकारने त्यापैकी एक हजार ८६ पदे भरण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेने रिक्त पदे भरताना आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते; तसेच, वित्त विभागाच्या धोरणानुसार, ‘गट क’ आणि ‘गट ड’मधील सर्व पदे नियमित भरण्याऐवजी सहजपणे जी कामे यंत्रणेकडून शक्‍य असल्यास ती करून घ्यावीत, अशी विशेष सूचनाही केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १७८ जागा भरण्यात येणार आहेत.

भरती गुणवत्तेनुसार PMC Doctor Bharti as per Eligibility

डॉक्टरांची भरती करताना ऑनलाइन मुलाखती घेण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता संबंधित डॉक्टरांचे शिक्षण, कामाचा अनुभव, त्यांची सेवा वर्षे याद्वारे गुणवत्ता ठरवली जाणार असून, त्यानुसार ही भरती होणार आहे. संबंधितांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर लगेचच भरती केली जाणार आहे.

सौर्स : मटा

Pune Mahanagarpalika Mega Bharti Expected soon

पुणे महानगरपालिका एक हजार ८६ रिक्त पदांना मान्यता

PMC Recruitment 2020 : Deputy Chief Minister Ajit Pawar has allowed to fill one thousand 86 of the vacant posts to serve the essential services of the municipality, in the wake of the Carona virus crisis getting worse day by day. The proposal, which has been stuck in the finance department for the last two and a half years, is expected in the municipality soon.

Due to the lack of doctors on the back of Carona, the Additional Commissioner, Rubal Agarwal, directed Pawar’s need to approve the proposal. Pawar immediately took notice of the proposal and directed the Additional Chief Secretary of the Finance Department to take up the issue of the corporation. Accordingly, one thousand 86 posts have been allowed to be filled.

अत्यावश्यक सेवेसाठी सरकारचा आदेश

करोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी रिक्त असलेल्या पदांपैकी एक हजार ८६ पदे भरण्याची परवानगी दिली आहे. वित्त विभागात गेल्या अडीच वर्षांपासून अडकलेला हा प्रस्ताव पवार यांनी अवघ्या दोन दिवसांत मार्गी लावल्याने महापालिकेत लवकरच मेगाभरती अपेक्षित आहे.

महापालिकेचा कामाचा निपटारा योग्य वेळेत होण्यासाठी आरोग्य, अग्निशमन आणि घनकचरा विभागातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांची भरती करण्याचा प्रस्ताव ८ नोव्हेंबर २०१७ला राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. पालिकेने वर्ग एक ते चार यामध्ये १८९३ पदे रिक्त असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. त्यापैकी ७५ टक्के म्हणजे १२४८ पदे भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. राज्य सरकारने त्यापैकी एक हजार ८६ पदे भरण्यास परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारने मंजुरी दिल्याचा आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे.

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर पालिकेला डॉक्टरांची उणीव भासत असल्याने अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रस्ताव मंजूर करण्याची गरज पवार यांच्या निर्दशनास आणून दिली. पवार यांनी प्रस्तावाची तत्काळ माहिती घेऊन वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पालिकेचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. त्यानुसार एक हजार ८६ पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मान्य करण्यात आलेली पदे : 

 • गट अ : १२३
 • गट ब : ९२
 • गट क : ४०३
 • गट ड : ४६८

…………..

‘ही काळजी घ्या’

महापालिकेने रिक्त पदे भरताना आस्थापना खर्च हा ३५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वित्त विभागाच्या धोरणानुसार, ‘गट क’ आणि ‘गट ड’मधील सर्व पदे नियमित भरण्याऐवजी सहजरित्या जी कामे यंत्रणेकडून शक्‍य असल्यास ती करून घ्यावीत, अशी विशेष सूचनाही सरकारने या पदांची मान्यता देताना केली आहे.

सौर्स : मटा
6 thoughts on “Pune Mahanagarpalika Doctors Bharti”

 1. Good morning sir
  Mi / ravi gaikwad aditya birla hospital madhe ward boy hya post war 4year job kela hai
  & sancheti hospital. Hardekar hospital chaitanya hospital hya 3 hospital madhe supervisor & field officer madhe kaam kel hai ata sadhya mala hospital working madhe total experience 11 year cha hai sadhya mi government job search madhe hai ward boy safai khata

  Reply
 2. Sir plz dont do jobs on contract plz make a permanant vacancy we r played on our life sir its a humble request to u

  Reply

Leave a Comment