Pune Security Guard Bharti 2021

Pune Security Guard Bharti 2021

पुणे सुरक्षा रक्षक भरती 2021

As per the latest news due to the lockdown and with the departure of Other State security guards to the village, job opportunities have become available to the Marathi youth. There are 800 to 900 security guard agencies in the city. They have a demand for security guards. More than 60,000 security guards are needed in Pune city, Pimpri-Chinchwad and rural areas. Preference will be given to ninth and tenth passers. This opportunity is available to the youth between the ages of 18 to 35 and they can get a salary of 12 thousand 500 to 18 thousand rupees. Eligible candidates can contact P4 Foundation’s Shramik Bhavan at Nagar Road or send your bio-data to [email protected] Read the more detail given below:

बेरोजगार तरुणांनो, चिंता करु नका… तुम्हालाही मिळेल नोकरी ! वाचा ‘ही’ महत्वाची बातमी

पुणे : लॉकडाऊनमुळे तुमच्या हाताला काम नाही, तुम्ही बेरोजगार आहात, तर काळजी करु नका, कारण पुण्यात खासगी सुरक्षा क्षेत्रात सध्या 60 हजाराहुन अधिक सुरक्षा रक्षकांची गरज आहे. त्यामुळे किमान काही दिवसांसाठी तरी तुमच्या नोकरी प्रश्न सुटु शकेल आणि तुमच्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यास मदत होऊ शकेल !

कोरोनामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला, तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना स्वत:च्या कुटुंबाच्या काळजीपोटी गावचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे एकीकडे हाताला काम नसलेल्याची संख्या असतानाच दूसरीकडे मात्र परप्रांतीय कामगार गावी गेल्यामुळे भूमीपुत्राना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात नोंदणीकृत तब्बल पावणे दोन लाख खासगी सुरक्षा रक्षक काम करत होते. त्यामध्ये परप्रांतीय सुरक्षा रक्षकांची संख्या मोठी होती. परंतु कोरोनामुळे परप्रांतीय कामगारांपैकी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तरांचल, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम येथील रहिवासी असलेल्या 70 टक्के सुरक्षा रक्षकांनी आपल्या गावी जाणे पसंत केले. त्यामुळे शहरामध्ये मागील दोन महिन्यापासुन खासगी सुरक्षा रक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवु लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात तरुणाना नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिस प्रायव्हेट सिक्युरिटी – पार्टनरशीप प्रोग्राम (पी फोर फाउंडेशन)

इथे आहे सुरक्षा रक्षकांची गरज

व्यावसायिक क्षेत्रात येणारे आयटी कंपन्या, विविध उत्पादने निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शासकीय व निमशासकिय कार्यालये (निविदा प्रक्रिया पूर्ण), मॉल्स, मोठमोठ्या सोसायटया, अपार्टमेंट, पंचतारांकीत हॉटेल्स, गोडाऊन, छोट्या कंपन्या (शंभर पेक्षा कमी कामगार असणाऱ्या) अशा असंख्य ठिकाणी काम करणारे खासगी सुरक्षा रक्षक गावी निघुन गेल्याने तेथे खासगी सुरक्षा रक्षकांची गरज निर्माण झाली आहे.

अशी मिळेल सुरक्षा रक्षकाची नोकरी

परप्रांतीय सुरक्षा रक्षक गावी गेल्याने मराठी तरुणाना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.शहरात 800 ते 900 सुरक्षा रक्षक एजन्सी आहेत.त्यांच्याकडे सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात 60 हजारहून अधिक सुरक्षा रक्षकांची सध्या गरज आहे. नववी, दहावी उत्तीर्ण होणाऱ्याना प्राधान्य दिले जाणार आहे. 18 ते 35 या वयोगतातील तरुणाना ही संधी उपलब्ध असून त्यांना 12 हजार 500 ते 18 हजार रूपयांपर्यंत पगार मिळू शकतो. पी फोर फाउंडेशनच्या नगर रोड येथील श्रमिक भवन येथे संपर्क साधु शकता किंवा [email protected] इमेलवर आपला बायोडेटा पाठवु शकता.

“गेल्या दोन वर्षापासून पोलिस भरती झालेली नाही. त्यातच कोरोनामुळे पुणे, पिंपरी – चिंचवड व ग्रामीण भागात आता सुरक्षा रक्षकांची गरज भासत आहे. सध्या 60 हजार सुरक्षा रक्षकांच्या जागा आहेत. मराठी तरुणाना रोजगाराची चांगली संधी मिळू शकते. रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.” – सचिन मोरे, मुख्य समन्वयक, पी फोर फाउंडेशन..

सौर्स : सकाळ

मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षकांची १४०० पदे रिक्त

Security Guard Board Registration -sgbregistration.in

5 thoughts on “Pune Security Guard Bharti 2021”

Leave a Comment