Pune Talathi Bharti 2020 Updates

Pune Talathi Bharti 2020 Updates

पुणे तलाठी भरती २०२० अपडेट्स

Pune Talathi Bharti 2020 : As per the latest news received from the source when the Fadnavis was the Chief Minister, the government had entrusted the responsibility of conducting the recruitment process in a transparent manner to the Mahapariksha Portal which is the examination portal of MahaIT. It was decided to recruit for 72,000 posts in ‘C’ and ‘D’ categories through the portal in two phases. In the first phase, Talathi(Mahsul Vibhag)recruitment process was implemented in all the districts for 1809 out of 36 thousand posts in Mahsul Vibhag Maharashtra . There were a lot of mass or high tech copies, dummy candidates at the examination centers assigned to the action in the State Of Maharashtra. So these exams were blamed for a lot of malpractices and financial malpractices. The Maharashtra Times had published news about this from time to time. The state government then had to cancel the portal. However, the recruitment process implemented through this portal is in the midst of controversy. Read Further details about this from below article

महाराष्ट्र तलाठी भरती २०२० संपूर्ण माहिती

Talathi Dummy Candidates – पुणे तलाठी भरतीत ‘डमी’ उमेदवार

पुणे : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टलकडून राबविण्यात आलेल्या तलाठी भरतीच्या प्रकियेत डमी उमेदवारांची निवड झाल्यावर शिक्कामोर्तब झाले असून, प्रशासनानेच भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करताना संशयास्पद बाबी समोर आल्याने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाने भरती प्रक्रिया स्थगित केली आहे. त्यासोबतच संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे.

फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने पदभरती प्रकिया पारदर्शकपणे राबविण्याची जबाबदारी महाआयटीच्या महापरीक्षा पोर्टल‌वर सोपवली होती. पोर्टलच्या माध्यमातून ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील ७२ हजार पदांसाठी दोन टप्प्यांत मेगाभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ३६ हजार जागांपैकी १८०९ जागांसाठी सर्व जिल्ह्यांत तलाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. क्रियेसाठी नेमण्यात आलेल्या, परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मास किंवा हाय टेक कॉपी, डमी उमेदवार यासारखे प्रकार घडले. त्यामुळे या परीक्षांवर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला. याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून, हा प्रकार उजेडात आणला होता. त्यानंतर राज्य सरकारला पोर्टल रद्द करावे लागले. मात्र, या पोर्टलद्वारे राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे. विविध विभागांमध्ये साधारण ५ ते ६ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया झाली. त्यात सर्वाधिक १८०९ जागा तलाठी पदासाठी होत्या. नगर जिल्ह्यात २३६ जागांसाठी तलाठी भरती प्रकिया राबविण्यात येत होती. त्यानंतर पोर्टलमार्फत उमेदवार व त्यांना मिळालेल्या गुणांची यादी प्रकाशित झाली. या यादीत निवड झालेल्या उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची निवड डमी उमेदवारांच्या माध्यमातून झाल्याचे महाआयटी विभागाने नगर जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले. त्यानंतर जिल्हा निवड समितीने याबाबत आणखी तपास करून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा केली. त्या वेळी समितीकडून निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्यावर संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यामुळे समितीने राज्य सरकारकडून अभिप्राय आणि मार्गदर्शन मागविले आहे. याबाबत राज्य सरकारकडून सूचना मिळाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती निवड समितीचे सदस्य सचिव व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यापूर्वी, जालना जिल्ह्यात परीक्षेला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवाराचे नाव निवड यादीत आल्याचा गैरप्रकार झाला आहे.

‘सीसीटीव्ही तपासा’

राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली किंवा सुरू आहे. त्यामुळे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा निवड समितीने कटाक्षाने उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यासोबतच परीक्षा दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे म्हणणे आहे. भरती प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्याचे याचिकाकर्ते नीलेश गायकवाड यांनी सांगितले.

जिल्हा निवड समितीच्या तपासणीनुसार दोनपेक्षा अधिक उमेदवार डमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे समितीने २३६ जागांसाठी अभिप्राय मागवला आहे. या प्रक्रियेतील संशयास्पद बाबी पाहता तलाठी पदभरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असून, तसा अभिप्राय राज्य सरकारला पाठवला आहे. – संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर..

सौर्स : मटा

1 thought on “Pune Talathi Bharti 2020 Updates”

Leave a Comment