Pune University’s SET Exam

Pune University SET Exam 2021

SET Exam- SET परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

Considering the prevalence of corona, many candidates have not been able to fill up the application so far. Therefore, in order to give the opportunity to the candidates to apply, the deadline for filling up the application form for the set examination has been extended till June 17. The University Grants Commission has extended the deadline for filing applications for State Eligibility Test (SET) on September 26, 2021 in Maharashtra and Goa to June 17 instead of June 10.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता अनेक उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळावी, यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी १७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्याची मुदत १० जून ऐवजी आता १७ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

दरम्यान १८ ते २५ जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्यासाठी सेट विभागाकडून २६ ते ३० जून दरम्यान संधी दिली आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

Important Links :

APPLY ONLINE

OFFICIAL WEBSITE

FULL ADVERTISEMENT


Pune University’s SET Exam-The state qualifying examination i.e. set examination will be held on September 26. Applications for this exam (SET Exam 2021) will be available online from May 17 to June 10. For this interested applicants need to apply online. Savitribai Phule Pune University, the State Agency will conduct 37th SET examination at Mumbai, Pune, Kolhapur, Solapur, Ahmednagar, Nasik, Dhule, Jalgaon, Aurangabad, Nanded, Amravati, Nagpur, Chandrapur, Gadchiroli, & Panjim (Goa), centre.

सेट परीक्षेची तारीख ठरली; सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार परीक्षा

राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा येत्या २६ सप्टेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी (SET Exam 2021)  17 मे ते 10 जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यूजीसी महाराष्ट्र आणि गोवा (Goa) या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते. आतापर्यंत 36 वेळा सेट परीक्षा घेण्यात आली आहे.

आता विद्यापीठाकडून 37व्या सेट परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. 26 सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकूण 15 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेविषयीची अधिक माहिती ttp://setexam.unipune. ac.in या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची सांगितले.

Official Website

Full Advertisement 


Pune University’s SET Exam 2020

सेट परीक्षेची तारीख ठरली; सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी ‘सेट’ची परीक्षा 27 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरी मिळविण्यासाठी ‘सेट’ची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठ ही परीक्षा आयोजित करते. यापूर्वी 28 जून रोजी ही परीक्षा होणार होती, पण कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता विद्यापीठाने 27 डिसेंबर ही परीक्षेची तारीख निश्‍चित केली आहे. परीक्षेबाबतची माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सेट परीक्षा ही 38 विषयांसाठी घेतली जाते. यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून 1 लाख 11 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये पुण्यातून सर्वाधिक 19 हजार अर्ज दाखल झालेले आहे. या परीक्षेत पेपर एकमध्ये 100 गुण आणि 50 प्रश्‍न असतात. तर पेपर दोनमध्ये 200 गुण आणि 100 प्रश्‍न असतात. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने होते, अशी माहिती सेट विभागाकडून देण्यात आली आहे.


पुणे विद्यापीठाची ‘सेट’ परीक्षा लांबणीवर

SET Exam 2020 Postponed by Pune University : Savitribai Phule Pune University has postponed the ‘SET’ for the state of Maharashtra and Goa for the post of Assistant Professor on June 28. The university has announced the decision as the prevalence of corona is increasing. The SET examination was scheduled to be held in June this year through the university’s SET department. 1 lakh 11 thousand candidates have applied for this and the number of applications has increased by 9 thousand as compared to last year. The examination was to be conducted at 112 college centers in 15 locations in Mumbai, Pune, Kolhapur, Solapur, Ahmednagar, Nashik, Dhule, Jalgaon, Aurangabad, Nanded, Amravati, Nagpur, Chandrapur, Gadchiroli and Goa. A new schedule for these exams will be announced soon.

SET Exam 2020 Postponed by Pune University

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी येत्या 28 जून रोजी सहायक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी ‘सेट’ अर्थात राज्य पात्रता परीक्षा पुढे ढकलली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने विद्यापीठाने हा निर्णय जाहीर केला आहे.

विद्यापीठाच्या ‘सेट’ विभागामार्फत यंदा जूनमध्ये सेट परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी 1 लाख 11 हजार उमेदवारांनी अर्ज केले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्जाची संख्या 9 हजारांनी वाढली आहे.

ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या 15 ठिकाणच्या 112 महाविद्यालयांच्या केंद्रांवर घेण्यात येणार होत्या. या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

सौर्स : डेलीहंट
Leave a Comment