RBI Summer Internship 2022

RBI Summer Internship 2022

The annual summer internship program has been announced by the Reserve Bank of India (RBI). This is a great opportunity for young students and freshers looking for a job. After doing internship, candidates can get jobs in many fields including economics, banking, finance. Foreign students can also apply.

आरबीआयमध्ये अप्रेंटिसची सुवर्णसंधी, अर्ज कुठं दाखल करायचा?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे वार्षिक उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण विद्यार्थी आणि फ्रेशर्ससाठी ही एक उत्तम संधी आहे. इंटर्नशिप केल्यानंतर उमेदवारांना अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त यासह अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी मिळू शकते. परदेशी विद्यार्थीही यामध्ये अर्ज करू शकतात.

125 इटर्न्सला संधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल 2022 मध्ये सुरू होणाऱ्या वार्षिक समर इंटर्नशिप प्रोग्रामसाठी इंटर्नशिपची घोषणा केली आहे. RBI इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे एकूण 125 इंटर्नची निवड करेल. निवड झालेल्या इंटर्नला फक्त मुंबई स्थित आरबीआयच्या केंद्रीय कार्यालय विभागांमध्ये प्रकल्पावर काम करावं लागेल.

अर्ज कुठं करायचा?- How to Apply for RBI Summer Internship

इच्छुक विद्यार्थी आरबीआय इंटर्नशिपसाठी अधिकृत वेबसाईटवरील chances.rbi.org.in या लिंकवर वर अर्ज करू शकतात. परदेशी विद्यार्थी पोस्टाने देखील अर्ज करू शकतात. मुख्य महाव्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (प्रशिक्षण आणि विकास विभाग), सेंट्रल ऑफिस, 21 वा मजला, सेंट्रल ऑफिस बिल्डिंग, शहीद भगतसिंग रोड, मुंबई – 400 001 इथं अर्ज पाठवता येतील. अर्जाची प्रत [email protected] वर ई-मेलवर देखील पाठवता येतील.

Who Can Apply For RBI Summer Internship कोण अर्ज करू शकतो?

  • आरबीआय इंटर्नशीपसाठी व्यवस्थापन, वाणिज्य, सांख्यिकी, कायदा, अर्थशास्त्र, बँकिंग, फायनान्स या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो.
  • जे विद्यार्थी पूर्ण तीन वर्षांची व्यावसायिक पदवी घेत आहेत ते उन्हाळी इंटर्नशिपसाठी देखील अर्ज करू शकतात. याशिवाय मॅनेजमेंट, कॉमर्स, स्टॅटिस्टिक्स, लॉ इत्यादी विषयात शिकत असलेले परदेशी विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

निवड प्रक्रिया- Selection Process

आरबीआयकडून प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांची जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये मुलाखत घेतली जाईल. ज्याचे अंतिम निकाल मार्च 2022 मध्ये जाहीर होतील. अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता- chances.rbi.org.in

Leave a Comment