Recruitment from social media

Recruitment from social media

‘या’ सोशल मीडियावरून कंपन्यांची नोकर भरती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jobs are being recruited through social media such as Instagram and Twitter. Various companies hiring millennials from social media platfrom like instagram and twitter. Companies no longer feel the need to advertise to find talent in the market. Companies have started trying to find youngsters and creative youngsters on social media rather than spend on advertising. Complete details are given below read the details carefully and apply.

Jobs through Social Media such as Instagram and Twitter

इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जमान्यात नोकर भरतीची पद्धत बदलली आहे. असंख्य कंपन्या आता सोशल मीडियावरून नोकर भरती करीत असल्याची माहिती समोर आली आहे. इंस्टाग्राम आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडियावरून नोकर भरती केली जात आहे. मार्केटमधील टॅलेंट शोधण्यासाठी जाहिरात देण्याची गरज कंपन्यांना आता वाटत नाही. जाहीरातीवर खर्च करण्यापेक्षा सोशल मीडियावरून होतकरू आणि क्रिएटिव तरूण शोधण्याचा प्रयत्न कंपन्यांनी सुरू केला आहे.
इन्फोसिस, एक्सेंचर, आयबीएम आणि विप्रो यासारख्या आयटी कंपन्यांची ट्विटरवर लाखो फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवरही लाखो फॉलोअर्स आहेत. आयबीएमने यावर्षी इन्स्टाग्रामवर लाइफएट आयबीएम नावाचे पेज बनवले होते. या पेजवर कर्मचारी आपला जॉब किंवा कंपनीसंदर्भातील माहिती या ठिकाणी टाकत असतात. पेजवर दिलेल्या लिंकवर नोकरी शोधणाऱ्यांना या ठिकाणी आपला सीव्ही पाठवू शकतात. याप्रकारे इन्स्टाग्रामवर एक्सेंचरच्या करियर पेजवर ४०००० फॉलोअर्स आहेत. स्टॅटिस्टाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले, देशभरात ६.९ कोटी लोक इन्स्टाग्रामचा वापर करण्यात येत आहे. ही आकडेवारी २०१९ ची आहे. तसेच यात तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यातील तरुणांचे वय ३५ वर्षापेक्षा कमी आहे. कंपनी याच वयातील मुलांच्या शोधात असते. किंवा त्यांना नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील असते. कंपन्यांची तरुणांच्या अकाउंटवरही नजर ठेवून असते. डिलीवरी कंपनी डुंजोचे मुख्य (ब्रँड आणि मार्केटिंग) साई गणेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८० टक्के रिज्य़ूम (सीव्ही) सोशल मीडियावरून येत आहेत.
गेल्या दोन वर्षातील वाटचालीवर नजर टाकल्यास इन्स्टाग्राम हायरिंग डेस्टिनेशनच्या रुपात याचा विकास झाला आहे. पब्लिक रिलेशन, कंटेट रायटिंग, फोटोग्राफी, फॅशन आमि मनोरंजन इंडस्ट्रीजचे लोक इन्स्टाग्रामवर सहज सापडतात. सोशल मीडियावर क्रिएटिव लोकांना शोधणे सोपे आहे, असे टीमलीज सर्विसेजच्या कार्यकारी उपाध्यक्ष रितुपर्णा चक्रबर्ती यांनी सांगितले.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *