Recruitment of Center Heads in the State

Recruitment of Center Heads in the State

राज्यात केंद्रप्रमुखांची भरती

Kendra Pramukh Bharti 2020 : Chandrakant Anavkar, state advisor to the state teachers’ committee, has demanded that 47% vacancies be filled in the state. After 2010, many heads of centers retired at fixed age. Some center heads got promotions. As a result, a large number of posts of Center Heads have become vacant. As per the information available, out of 4860 heads of centers in the state, 2574 heads are working and 2286 posts are vacant. Read the complete details given below:

Kendra Pramukh Bharti 2020

कुडाळ ( सिंधुदुर्ग) – राज्यात केंद्रप्रमुखांची 47 टक्‍के पदे रिक्त असून या रिक्तपदांवर अभावित (हंगामी) केंद्रप्रमुखांची भरती करण्याची मागणी राज्य शिक्षक समितीचे राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी केली आहे.
श्री. अणावकर म्हणाले, “”राज्यात केंद्रप्रमुखांची सुमारे 47.2 टक्‍के पदे रिक्त आहेत. व्यवस्थापनाची सोय म्हणून एका एका केंद्रप्रमुखांकडे 2 तर काही ठिकाणी 3 केंद्राचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. केंद्रप्रमुखाची कर्तव्ये विहित वेळेत पार पाडताना त्यांची फार मोठी दमछाक होते. 14 नोव्हेंबर 1994 च्या शासन निर्णयानुसार शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यात 4860 केंद्रशाळाची निर्मिती करून प्रत्येक केंद्रशाळेत एक केंद्रप्रमुख नेमण्यात आला. शाळांचे सानियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. 2010 नंतर नियत वयोमानानुसार अनेक केंद्रप्रमुख सेवानिवृत्त झाले. काही केद्रप्रमुखांना बढत्या मिळाल्या. त्यामुळे केंद्रप्रमुखांची मोठ्या संख्येने पदे रिक्त झाली आहेत. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सध्या राज्यात 4860 केंद्रप्रमुखांपैकी 2574 केंद्रप्रमुख कार्यरत असून 2286 पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत केंद्रप्रमुखांवर काही ठिकाणी 2 तर काही ठिकाणी केंद्राचे प्रभारी कार्यभार सोपवला आहे.”
ते पुढे म्हणाले, “”यापूर्वी केंद्रप्रमुख पदे सेवाज्येष्ठ पदवीधर शिक्षकातून भरली जात होती; परंतु शालेय शिक्षण विभागाच्या 2 फेब्रुवारी 2010 च्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुख भरतीचा 40, 30, 30 हा नवीन पॅटर्न निश्‍चित केला आहे. या पॅटर्नप्रमाणेअर्हता प्राप्त उमेदवातून 40 टक्के पदे सरळ सेवा भरतीने 30 टक्‍के पदे कार्यरत पदवीधर शिक्षकांतून सेवा ज्येष्ठतेने व 30 टक्‍के पदे विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन भरण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने जरी घेतला तरी मात्र या बदललेल्या पॅटर्नप्रमाणे केंद्रप्रमुख पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राज्यात कायमस्वरुपी भरती 2010 नंतर झालेलीच नाही. मधल्या काळात अभावित केंद्रप्रमुख पदे भरली होती.”

“सुमारे 47 टक्के पदे रिक्त झाल्यामुळे कार्यरत केंद्रप्रमुखांवर आलेला वाढत्या कामाचा ताण लक्षात घेऊन शासनाने रिक्त पदावर अभावित केंद्रप्रमुख भरती करावी, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासन दरबारी लावून धरल्यावर शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शालेय शिक्षण विभागाचे, अप्पर मुख्यसचिव यांना पत्र हंगामी केद्रप्रमुख भरण्यास परवानगी मागितली आहे. हंगामी केंद्रप्रमुख पदे भरल्यामुळे शासन तिजोरीवर फार मोठा आर्थिक भार पडणार नाही.”

सौर्स : सकाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *