Recruitment of Professor at Pune University soon

Recruitment of Professor at Pune University soon

पुणे विद्यापीठांतील प्राध्यापक भरती लवकरच

Pune University Bharti 2020 : Savitribai Phule Pune University will open advertisement for the vacant posts of the post of Professor in next month. Besides, there are six vacant seats awaiting the approval of the Finance Ministry of the state, this question will be resolved soon after meeting with Finance Minister Ajit Pawar for the recruitment of these seats, ‘Uday Samant, Minister of Higher and Technical Education, told a press conference on Saturday.

Pune University Bharti 2020

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक पदाच्या १११ रिक्त जागांसाठी येत्या महिन्याभरात जाहिरात प्रसिद्ध होईल. त्याचबरोबर राज्याच्या अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत ८०० जागा रिक्त जागा असून, या जागांच्या भरतीसाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल,’ अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा पदभार स्विकारल्यावर शनिवारी विद्यापीठास भेट दिली. या वेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने उपस्थित होते. राज्य सरकारने विद्यापीठांना घालून दिलेल्या निकषांनुसार भरती प्रक्रिया पार पडेल. यामध्ये वित्त विभागाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत ८०० जागा रिक्त आहेत. सरकारने एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सामान्य प्रशासन विभागाकडून एक निर्णय रद्द झाला. त्यामुळे भरती प्रक्रिया थांबली होती. मात्र, आता या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार असून, प्राध्यापकांची भरती सर्व विद्यापीठांमध्ये होईल,’ असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

सामंत म्हणाले की, पुणे विद्यापीठातील १११ रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील. अर्थ खात्याशी निगडीत जागांचा प्रश्न अर्थमंत्री अजित पवारांसोबत चर्चा करून सोडविण्यात येईल. विद्यापीठांप्रमाणे महाविद्यालयातील भरतीचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापुरता नसून सर्व विद्यापीठांतील रिक्त जागांवर भरती होईल.

शिक्षकांसाठी पुण्यात प्रशिक्षण अकादमी

‘राज्यातील कॉलेजांमध्ये सुमारे ५५ हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यात स्वतंत्र अकादमीची स्थापना करण्यात येणार आहे. ‘रोटेशन’ पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. येत्या महिन्याभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाईल. येत्या एक मार्चपासून प्रशिक्षण वर्ग सुरू होतील,’ असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

नगर-नाशिक उपकेंद्रांचे भूमिपूजन लवकर

‘नगर आणि नाशिक उपकेंद्राच्या प्रश्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी विशेष लक्ष घातले आहे. नाशिकच्या उपकेंद्राचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे एका जागेवर विद्यापीठाचे काम आणि दुसऱ्या जागी राहण्याची व्यवस्था केली जाईल. विद्यापीठातील सात लाख विद्यार्थ्यांपैकी दोन लाख विद्यार्थी नाशिकचे आहेत. येत्या १५ दिवसांत यासंबंधीचा निर्णय प्रसिद्ध करून एक ते दोन महिन्यात इमारतींचे भूमिपूजन होईल,’ असे सामंत यांनी सांगितले.

म. टा.
One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *