Reducing the Staff in the Archeology Department

Reducing the Staff in the Archeology Department

पुरातत्त्व विभागात कर्मचारी कपात

Archeology Department Bharti 2020 : The Archaeological Survey of India (ASI) has decided to lay off 13 staff members who were monitoring the caves in Junnar. Junnar has 212 caves, 324 Chaityagrihas and Vihars. Along with these, there are national protected monuments like Naneghat, many forts, Lenyadri, Shivneri during the Satavahana period. All these are maintained and protected by 27 staff members of the Archaeological Department. Eight employees were laid off six months ago. Now, the Archaeological Survey has issued an order to reduce 13 of the remaining 19 employees in the lockdown. These 13 people have been barred from coming to work since May 1.

Archeology Department Bharti 2020

जुन्नरमधील लेणीसमूहांची निगराणी करणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे. जुन्नरमध्ये २१२ लेण्या, ३२४ चैत्यगृहे-विहार आदी प्राचीन वास्तू आहेत. यांसह सातवाहनकालीन नाणेघाट, अनेक किल्ले, लेण्याद्री, शिवनेरी अशी राष्ट्रीय संरक्षित स्मारके आहेत. या सर्वांची देखभाल व सुरक्षा पुरातत्त्व विभागाच्या २७ कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. सहा महिन्यांपूर्वी आठ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. आता ‘लॉकडाउन’मध्ये उरलेल्या १९ मधून १३ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा आदेश पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने जारी केला आहे. या १३ जणांना एक मेपासून कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

जुन्नर पुरातत्त्व विभागात पाच कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्तीला आहेत. यामध्ये एका सर्वेक्षक सहायकाचा आणि चार बहुवर्ग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासह २००४ पासून २७ कर्मचारी ठेकेदारामार्फत कामाला होते. या कर्मचाऱ्यांवर खऱ्या अर्थाने विभागाची धुरा आहे. सध्या यातील फक्त सहा कर्मचारी राहिले आहेत. ७० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कमी केल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय धास्तावले आहेत. ‘लॉकडाउन’च्या काळात खासगी कंपन्या; तसेच व्यवस्थापनांकडून कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये, त्यांना वेतन द्यावे, असे धोरण जाहीर करणाऱ्या केंद्र सरकारने यामुळे आपल्याच धोरणाला हरताळ फासला आहे. गेल्याच महिन्यात पुरेशा कर्मचारी संख्येअभावी जुन्नरमधील ऐतिहासिक लेणीसमूह दुर्लक्षित असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिले होते. त्या वेळी सांस्कृतिक ठेव्यांची देखभाल व सुरक्षा करण्यासाठी किमान ३४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. वर्षभरात या ऐतिहासिक ठेव्यांना देशविदेशातील हजारो पर्यटक, अभ्यासक भेट देतात. या पार्श्वभूमीवर जादा कर्मचाऱ्यांची भरती करणे, तर सोडाच उलट आहे त्या कर्मचाऱ्यांमधून ७० टक्के कर्मचारी कमी करण्याचा निर्णय म्हणजे राष्ट्रीय संरक्षित ठेव्यांच्या देखभालीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रकार असल्याचे मत इतिहासाचे जाणकार व्यक्त करीत आहेत.

‘पुन्हा सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा’

‘राज्यातील विविध पुरातत्त्व स्थळांचा वारसा जपण्याचे काम करणाऱ्या १२१ कर्मचारी कमी केले आहेत. जुन्नरमधील १३ कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करावे, अशी मागणी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार आहे,’ अशी माहिती शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

अविचाराने घेतलेला हा दुर्दैवी निर्णय आहे. जुन्नरच्या भौगोलिक विस्तारात विखुरलेल्या या ठेव्यांना भेट देण्यासाठी अनेक देशांतून लोक येतात. असे असताना ऐतिहासिक ठेव्यांची देखभाल करणारे कर्मचारी कमी करणे योग्य नाही. हा निर्णय रद्द करावा यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.

– डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर

जुन्नर तालुक्यातील पुरातत्त्वीय वैभव लक्षात घेता त्यांची देखभाल करण्यासाठीचे कर्मचारी मुळातच कमी संख्येने होते. ते वाढविण्याचे सोडून आणखी कर्मचारी कमी करणे चुकीचे आहे. असे झाल्यास या वास्तूंचे विद्रुपीकरण करण्याचे प्रकार वाढू शकतात. हा ठेवा नाहीसा व्हायला वेळ लागणार नाही.

– डॉ. श्रीकांत जाधव, पुरातत्त्व अभ्यासक, पुणे

किल्ले शिवनेरी, लेण्याद्रीसह सर्व लेणी समूहांच्या देखभालीसाठी किमान ३४ देखभाल मजूर व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. याबाबत यापूर्वीच वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, वरूनच कर्मचारी कमी करण्याचा आदेश आला आहे. यामुळे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

– बाबासाहेब जंगले, सहायक सर्वेक्षक, भारतीय पुरातत्त्व विभाग, जुन्नर

सौर्स : मटा

Leave a Comment