RTE Admission 2021 Time Table

RTE Admission 2021 Time Table

RTE Admission 2021 Time Table : The RTE admission process is underway and is being tested by filling up an online application. The RTE admission schedule will be released in the next two to three days. Therefore, parents should prepare the necessary documents for admission.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील ९ हजार ३९३ शाळांमधील ९६ हजार ३८८ जागांच्या प्रवेशाचे वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यातही शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आरटीई प्रवेशाच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित होते. यंदा कोरोनामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी आरटीईच्या प्रवेश क्षमतेत घट झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ९ हजार ३९३ शाळांनी नोंदणी केली असली तरी सुमारे ५० शाळांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. त्यामुळे आरटीईच्या एकूण जागांमध्ये वाढ होऊ शकते.

 

 

 राज्यात आरटीईचे सर्वाधिक प्रवेश पुणे जिल्ह्यात होतात. मागील वर्षी जिल्ह्यात आरटीईच्या १६ हजार ९५० जागांवर उपलब्ध होत्या. यंदा जिल्ह्यातील जागांची संख्या १४ हजार ५२३ झाली आहे. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. जिल्ह्यातील ९६९ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करून पूर्ण करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

 आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू असून ऑनलाइन अर्ज भरून त्याची चाचणी घेतली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.


RTE Admission 2021 Online Apply

आरटीई पोर्टल चार दिवसांपासून बंद

  • पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे पालक हैराण
  • अर्ज भरण्यासाठी उरले चार दिवस

पिंपरी – आरटीई प्रवेश प्रकियेला सुरुवात झाल्यापासून सुरू असलेली अडथळ्यांची शर्यत संपण्याचे नाव घेत नाही. शाळांनी ऑनलाइन नोंदणीकडे पाठ फिरविल्यानंतर आता आरटीईच्या पोर्टलला तांत्रिक अडचणीचे विघ्न लागले आहे. मागील चार दिवसांपासून पोर्टल बंद असल्यामुळे शकडो पालकांना प्रवेश अर्ज करता आलेले नाहीत. त्यामुळे, पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, आरटीईचे पोर्टल त्वरित सुरळीत करावे, अशी मागणी पालकांतून होऊ लागली आहे.

यावर्षी आरटीईची प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच प्रशासन या प्रवेश प्रक्रियेकडे गांभीर्याने पहात नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. शाळा नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर दि. 11 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, पालकांना आपल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आरटीईचे संकेतस्थळच सुुरळीत चालत नसल्याने एका विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी काही तासाचा कालावधी लागत आहे. त्यात मागील चार दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे सतत पोर्टलमध्ये बिघाड होत असल्यामुळे शेकडो पालकांना अर्ज करता आलेले नाहीत.

पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाइलवर एसएमएस जात नाही. पोर्टल बंद असतानाही आरटीईच्या संकेतस्थळावर नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्क्रिनवर येणारा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवल्यास पालकांना अर्ज भरता येईल, असा संदेश चार दिवसांपासून झळकत आहे. त्यामुळे पालक सातत्याने अर्ज करीत आहेत. मात्र, मोबाइलवर एसएमएस जात नसल्याने पालक हैराण झाले आहेत.

पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद असतानाही प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने पोर्टल त्वरित सुरुळीत करावे, अशी मागणी पालकांतून होऊ लागली आहे.

अर्ज भरण्यास उरले चार दिवस

दि. 11 फेब्रुवारीपासून आरटीईसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पोर्टलमध्ये सातत्याने बिघाड असल्यामुळे अनेक पालकांना आखणी अर्ज करता आलेले नाहीत. एक अर्ज भरण्यास चार ते पाच तासांचा वेळ लागत आहे. अशातच मागील चार दिवसांपासून पोर्टल बंद असून, आखणी शेकडो पालक अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत. आता केवळ चार दिवसांचा आवधी उरला असल्यामुळे आतातरी पोर्टल सुरळीत करावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.


“आरटीई’ प्रवेशासाठी 11 दिवसांत 1 लाख 62 हजार 995 अर्ज

RTE Admission 2020 Latest Updates : The deadline for parents to apply online for RTE Admission 2020 is February 29. Online application of 1 lakh 62 thousand 995 students has been registered by parents in 11 days for 25 per cent admission under the Children’s Free and Compulsory Education Rights Act (RTE). Meanwhile, due to technical difficulties, it has been revealed that parents are not going to “SMS” on mobile.

RTE Maharashtra Admission 2021 Required Documents –आरटीई महाराष्ट्र प्रवेश 2020 आवश्यक कागदपत्रे

RTE Admission 2021 Latest Updates

बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गतच्या (आरटीई) 25 टक्‍के प्रवेशासाठी 11 दिवसांत 1 लाख 62 हजार 995 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज पालकांकडून नोंदविण्यात आले. दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाइलवर “एसएमएस’ जात नसल्याची बाबही उघड झाली आहे.
“आरटीई’द्वारे आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून शासनाची परवानगी घेऊन वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणीही सुरू केली आहे. यंदाच्या प्रवेशासाठी राज्यातून 9 हजार 328 शाळांनी नोंदणी केली असून यात 1 लाख 15 हजार 191 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात 972 शाळांमध्ये 17 हजार 57 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या आहेत. या प्रवेशासाठी आतापर्यंत सर्वाधिक 38 हजार 609 पालकांनी अर्जांची नोंदणी केली. नागपूरमध्ये 680 शाळांमध्ये 6 हजार 797 प्रवेशाच्या जागा दाखविल्या आहेत. या जागांसाठी 20 हजार 595 अर्ज दाखल झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यात 669 शाळांमध्ये 12 हजार 915 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी 11 हजार 173 अर्ज दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गमध्ये सर्वांत कमी 51 शाळांमध्ये 347 प्रवेशाच्या जागा दर्शविल्या असून यासाठी 113 अर्ज दाखल झाले. दरम्यान, पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.

सौर्स : प्रभात

‘आरटीई’ चे संभाव्य वेळापत्रक जाहीर

RTE Admission 2021 : Time Table for RTE Admission 2020-2021 is declared now. Candidates apply online from 11th February 2020 to 29th February 2020. RTE 25% Online Admission Process Starting 2020-2021. Parents should prepare the necessary documents for admission. A single lottery will be draw for admission in March and the waiting period of the students will be announced in the same way as the students’ vacancies in schools. Read the complete details carefully which is given below:

आर टी ई २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2020-2021 लवकरच सुरु होत आहे. पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे तयार ठेवावीत.

अधिकृत वेबसाईट

आजपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया :  दि.11 ते 29 फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार

‘आरटीई’साठी एकाच टप्प्यात लॉटरी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. यावर्षी आरटीई प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आले असून त्यानुसार आता 25 शाळांमधील 25 टक्के जागांसाठी राज्यातून तीन ऐवजी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाणार आहे. तर शाळांमध्ये आरटीईनुसार उपलब्ध जागांऐवढीच प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे.

शिक्षण अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळेमध्ये 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांमुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार यावर्षीही राज्याच्या प्राथमिक शिक्षक संचालकांनी 18 जानेवारी रोजी परिपत्रक काढले असून या परिपत्रकात आरटीई प्रवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान आरटीई प्रवेशप्राप्त 2019-2020 च्या ऍटो फॉरवर्ड केलेल्या शाळांची नोंदणीची गटशिक्षणाधिकारी स्तरावरुन पडताळणी केली जाणार आहे. तसेच 11 ते 29 फेब्रुवारी दरम्यान पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. तर 11 ते 12 मार्च दरम्यान राज्यस्तरावर लॉटरी काढण्यात येणार आहे.

लॉटरी काढल्यानंतर 16 मार्च ते 3 मार्च दरम्यान प्रवेश मिळालेल्या पालकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्‍चित करुन घेणे गरजेचे आहे. 13 ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. 24 ते 29 एप्रिल दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कालावधी दिला आहे. 6 ते 12 मे दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे.

तर 18 ते 22 मे दरम्यान चौथ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. यावर्षीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही राज्यस्तरावरुन राबवण्यात येणार असून शाळेतील रिक्‍त जागेच्या संख्येनुसारच रिक्‍त जांगाची प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे हे यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर कागदपत्र पडताळणीसाठी समिती स्थापन करायची आहे. त्यामुळे, यावर्षीची प्रवेश प्रक्रिया लवकर आणि अपेक्षित वेळेत पार पडण्यासाठी मदत होणार आहे.

कागदपत्रे ऑनलाइन भरावी लागणार
आरटीईमधून प्रवेशासाठी पालकांना प्रवेशासाठी आवश्‍यक ते सर्व कागदपत्र ऑनलाईन भरावी लागणार आहेत. आरटीई प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची माहिती गट शिक्षणाधिकारी दालनाबाहेरील नोटीस बोर्ड वर लावण्यात येणार आहे.

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यान्वये (आरटीई) शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी दि.11 ते 29 फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत. मार्चमध्ये प्रवेशासाठी एकाच लॉटरी काढण्यात येणार असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांएवढीच विद्यार्थ्यांची प्रतीक्षायादीही जाहीर करण्यात येणार आहे.

…तर निवड रद्द होणार
कागदपत्रं तपासणीत अपात्र ठरणाऱ्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे. या संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून दाद मागण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अंमलबजावणी करावी, असा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.

ही कागदपत्रे आवश्‍यक
निवासी पुरावा, जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, उत्पन्न, एस.ई.बी.सी. प्रवर्ग, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा प्रवेशासाठी सादर करावा लागणार आहे. सन 2018-19 व 2019-20 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पगार स्लिप, तहसीलदारांचा दाखला, कंपनीचा दाखला गृहीत धरण्यात येणार आहे. पालकांनी अर्ज भरताना सिंगल पॅरेंटचा पर्याय निवडल्यास विधवा, घटस्फोटिताची आवश्‍यक कागदपत्रेही दाखल करणे बंधनकारक आहे.

प्रवेशासाठी आवश्‍यक सूचना
“आरटीई’ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांसाठी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी पात्र शाळांनी इयत्ता पहिलीचा डेटा सरल पोर्टलवर अपडेट करावा त्यानंतर सन 2020-21 च्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत करता येणार नवीन शाळांनीही पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
लॉटरीद्वारे प्रवेश मिळणाऱ्या पालकांना गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासणीसाठी पडताळणी समितीकडे जाण्यास व शाळांमध्ये प्रवेश निश्‍चित करण्यास 16 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत मुदत..

सौर्स : प्रभात

ऑनलाईन अर्ज कराLeave a Comment